Oct 24, 2021
कथामालिका

दगडीखाना ! पार्ट 3

Read Later
दगडीखाना ! पार्ट 3

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
दगडीखाना!! पार्ट 3

@दुसऱ्या दिवशी सकाळी

" मी नाही येणार. माझं काय काम..!" किरण

" अरे तुला यावच लागेल. आणि आता तू दगडीखानाचा मेम्बर आहेस. आम्ही सर्वजण पार्टीला एकत्रच जातो. \"\" यश म्हणतो.

" तुमच्या मोठ्या लोकांची पार्टी त्यात मी गावठी काय करू ? मघाशी ऋचाताई आल्या होत्या. मला म्हणाल्या ह्याला घरी का ठेवलंय. कपड्याचा किती वास येतो. परत खूप काही बोलल्या. इंग्लिशमध्ये चिप बीप अस काही!!" किरण

यशला राग येतो. तो हॉलमध्ये जातो.

" कार्तिक..तुझ्या त्या ऋचाला सांभाळ बर. किरणला काही पण बोलत होती. " यश रागात म्हणतो.

"आय एम सॉरी यार. तुला तर तिचा स्वभाव माहिती आहे. किरण , मी सॉरी म्हणतो ऋचाकडून. " कार्तिक म्हणतो..

" बघितलस कार्तिक . हा किरण येऊन दोन दिवस नाही झाले आणि आपल्यात भांडणे सुरू. अजून पुढे हा काय करवून घेणारे देव जाणे. " पार्थ म्हणतो..

किरणच्या डोळयात पाणी येते आणि तो खोलीत निघून जातो. यश त्याला समजवायला रूममध्ये जातो.

" पार्थ..मी आणलं होत किरणला. त्याच वय बघ..कंडिशन बघ. मग अस टोचून बोलत जा. " यश

" तू बघ त्याच आणि तुझं वय..तुला पार्टनर भेटत नाहीत का जे त्याच्याशी इशक लढवतोय!!" पार्थ

यशला पार्थचे हे वाक्य टोचते. तो तडक बेडरूममध्ये जातो. यश बेडरूमचे दार लावतो.

" ए रडुबाई अस रडायला काय झालं ? पार्थ तर चिडका आहे. त्याच काय वाईट वाटून घ्यायच. "
यश किरणचे डोळे पुसतो आणि किरणच्या मऊ गालावर हात ठेवून हलकसे किस करतो. किरण लाजतो.

"सॉरी..चुकून. " यश म्हणतो.

किरण काहीच बोलत नाही.

" पण तू रडू नकोस यार. आज  मला ऑफीसला सुट्टी आहे. आपण शॉपिंगला जाऊ. आवर पटकन मी आंघोळ करून येतोय. " यश

यश अंघोळीला जातो. मग टॉवेल घालून बाहेर येतो. यशच्या गोऱ्या सेक्सी पिळदार शरीरयष्टी आणि ते सोन्याचे लॉकेट किती शोभते. किरणच्या डोळ्यात मादकता येते. समोर कामदेव उभा आहे असे वाटते. वाटते लवकर जाऊन यशला मिठी मारावी आणि त्याच्या पूर्ण देहाला किस करावं. किरणला पहिल्यांदा कुण्यातरी पुरुषाद्दल प्रेम वाटत होते. आधी वडिलांनी केलेले टॉर्चर आणि नंतर काकाने केलेले शोषण. पण यशने आता नकळत किस केलं तेव्हा किरणच्या मनात प्रेमाची पालवी फुटली. का हा माणूस इतका जीव लावतोय माझ्यावर ? जिथं माझ्या आईवडिलांनी कधी इतकी काळजी केली नाही. हा भेटणार होता म्हणून देवाने पळून जाण्याचा कौल दिला होता का ? स्वप्नातील राजकुमार अजून वेगळे तर काय असतात. यशच आहे का ज्याला नियतीने माझ्यासाठी नेमले आहे ?

किरण स्वतःतच गुंग असताना यश चुटकी वाजवतो आणि गोड स्माईल करतो.

"किधर खो गया ? " यश

किरण स्माईल देतो.

"अकेले अकेले मुसकुरा रहे हो क्या गम है वो छुपा रहे हो ? " यश म्हणतो.

मग दोघे बाहेर पडतात.

" इथली हवा किती प्रदुषित आहे..!!" किरण

"इथल्या लोकांचे मन पण प्रदूषित आहे" यश

दिल्लीच्या रोडवर खूप ट्रॅफिक होती. पण यश किरणचा हात पकडतो. किरण यशकडे बघतो.

"हाच आधार का जो मला नेहमीच पाहिजे होता?" किरण विचार करतो. स्वतःशीच हसतो.

दोघेही शॉपिंग करतात. यश किरणला सलूनमध्ये घेऊन जातो. नवीन हेअरस्टाईल करवतो. सुरुवातीला किरण डोळे उघडत नसतो पण नंतर किरण डोळे उघडून आरश्यात बघतो तर त्याला विश्वास बसत नाही की हे आपण आहो आणि हे रूप आपले आहे. यश किरणचा नकार असतानासुद्धा त्याला शुज घेऊन देतो. किरणला इलिवेटरची खूप भीती वाटायची पण यश त्याचा हात पकडतो .

." ट्रस्ट मी. मी तुझ्या केसालापण धक्का नाही लागू देणार. " यश

किरण आज पहिल्यांदा आपले आयुष्य जगत होता. यशच्या प्रेमात पडला होता. दोघेही लाल किल्ल्यावर गेले. यश अचानक गर्दीत गायब झाला. किरण घाबरला. मग यश परत आला. किरण धावत जाऊन त्याला मिठी मारतो आणि रडायला लागतो.

" प्लिज मला सोडून जाऊ नको. तू सोडला तर कुणी नाही माझं !!" किरण रडत म्हणतो.

यश मग त्याच्या डोक्यावर हात फिरवतो. दोघेही लाल किल्ला फिरतात. किरण खूप खुश असतो. यश किरणची फोटो पण काढतो. पुढे दोघे करीम मध्ये जातात.

" एक विचारू..ऋचाताई आणि कार्तिक भाऊ नवराबायको सारखे का राहतात ? ते पण लग्न न करता ?" किरण

"किरण..सेक्स ही फार मोठी गोष्ट नाहीये..सेक्स फक्त जीवनाचा एक पार्ट आहे..ते दोघे जिफबीफ आहेत आणि लग्नाआधी सेक्स करणे यात काही गैर नाही. लोक आता खूप लिबरल झाले आहेत. आपण सुध्दा अश्या बुरसटलेले विचारांना सपोर्ट नाही करायचं. ऋचा लग्नाआधी सेक्स करते म्हणून ती काही चारित्रहीन होत नाही. प्रत्येकाला आपल्या नैसर्गिक सुखांचा शोध घेण्याचा अधिकार आहे!!" यश

संध्याकाळी पार्थ आणि कार्तिक डायरेक्ट पार्टीत पोहोचतात. योमिता आणि मीना पण असतात. यश किरणला घेऊन येतो.

\"\"हा कोण आहे ?" पार्थ.

"मिठ्या..किरणचा मेकओव्हर केलाय. आता वाटतोय का तो गावठी बोल ? " कार्तिक

क्रमश..

हॅलो जुगनू. ?? कथा कशी वाटली ती प्लिज प्लिज कमेंट करून सांगा. कथा जर इत्तूसी पण आवडली असेल तर प्लिज प्लिज कमेंट करा. ?

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now