Login

दगडीखाना ! पार्ट 1

समलैंगिक आणि स्त्रीविशेष कथा
दगडीखाना!! पार्ट 1

नमस्कार..आजकाल दिल्लीत पण गणपती बसू लागलेत..मी कोण ? मी "दगडीखाना" . मी एक फ्लॅट आहे. माझं नाव दगडीखाना ठेवलंय कारण इथे राहणारे तरुण दगडाच्या हृदयाचे आहेत म्हणून. माझ्या आत तीन तरुण राहतात. ही कथा त्यांचीच आहे . माझ्या बाल्कनीतुन पूर्ण कॉलनी दिसते. चला तर मग गणपतीच्या आरतीला जाऊ. जानकीबाईने मोठ्या हौशाने बसवला आहे गणपती. जानकीबाई या कॉलनीमधल्या मराठी स्त्री. लव्ह मॅरेज केलं. पती बंगाली व्यापारी. चला तर मग गणपतीचे दर्शन करूया आणि ह्या शुभकथेला प्रारंभ करूया.

तो गोरा..सरळ नाक..वाढलेली पण खुलून दिसणारी दाढी..शांत पिसफुल चेहरा..अंतर्मुख स्वभाव असल्यामुळे गाणे ऐकण्याची सवय असलेला म्हणून गळ्यात सतत निळ्या रंगाचे हेडफोन असलेला..निळा टीशर्ट घालून गणपतीची आरती करतोय ना तो आहे पार्थ..ह्या कथेचा नायक. पार्थ खूप कमी बोलतो पण जेवढे बोलतो मनाला लागेल भिडेल असच बोलतो.

शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको ।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहरको ।
हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवरको ।
महिमा कहे न जाय लागत हूं पादको ॥

आता नटून थटून मराठी मोळ्या स्त्रीचा प्रवेश झालाय ना त्या "इति जानकीबाई" !! बाईचा रुबाब आकाशाएवढा. नाकावर राग आणि डोळ्यात जरब. त्यांनी लाडक्या पार्थच्या बाहुवर हात ठेवला . पार्थ आपल्या गुलाबी ओठांनी स्माईल देतोय. द्यावच लागेल शेवटी घर मालकीण आहे ना.

जय देव जय देव,
जय जय श्री गणराज
विद्या सुखदाता
धन्य तुम्हारा दर्शन
मेरा मन रमता,
जय देव जय देव ॥

आता एक सुंदर मुलगी प्रवेश करत आहे ना..ती आहे "मीना". जानकी बाईच्या नजरेत आदर्श मुलगी. जानकीबाई थोडं रागात बघते. जानकीबाईना अजून कुणीतरी हवं होतं. मीनाला लगेच समजते. ती इशारा करत आहे की "ती" पण लवकरच येईल. मीना आसामची. दिल्लीत जॉब करते आणि जानकीबाईकडे भाड्याने राहते. तिचा चेहरा पहा.. निरागसता.. भोळेपणा आणि सौंदर्याचा अद्भुत संगम..पार्थ तिला चिडवतो तुझे एनआरसीमध्ये नाव आहे ना चेक कर. ती पण म्हणते माझं पहिल्याच लिस्टमध्ये आलं म्हणून.

अष्टौ सिद्धि दासी संकटको बैरि ।
विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी ।

तस जानकीबाईकडे अजून एक भाडेकरू आहे बर का. आसामच्या थोडं इकडे तिकडे बघा. सिक्कीम?? हो..आता एन्ट्री होत आहे कथेच्या नायिकेची.."योमिता"ची!! बघा तिच्याकडे. सारा अली खान सारखी दिसते ना ? तिच्या ओठाच्या बाजूला असलेला तीळ आणि तिचा गोरा रेखीव चेहरा किती सुंदर बनवतो तिला..स्वर्गातील अप्सरा भूमीवर प्रकटली असे वाटते..अर्जुनाची चित्रांगदा पण अशीच सुंदर असावी का ? पण ही योमिता फक्त सौंदर्याने प्रभावी नसून तिचे हृदय अजून सुंदर आहे..म्हणून ती या कथेची नायिका आहे. बघा..मंदिरात प्रवेश करण्याआधी कस गरिबांना दान देत आहे. पार्थ तिच्याकडे बघून गालातल्या गालात हसतोय. पण तिच्या कपड्याकडे बघून जानकीबाई रागात आहेत. का आपण स्त्रीचे चारित्र्य कपड्याने मोजतो?? ते पण या शतकात!! पाय पूर्ण झाकले पाहिजे..अरे ती कम्फर्टेबल आहे तर घालू द्या ना..नाही.. संस्कृती रक्षक आहोत आम्ही..स्त्रीचा देह पूर्ण झाकला पाहिजे!!असो..जानकीबाई ..योमिता समजूतदार आहे..तिने जे कपडे घातले ते इतके पण तोकडे मुळीच नाहीत!!

कोटीसूरजप्रकाश ऐबी छबि तेरी ।
गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारि ॥
॥ जय देव जय देव...॥

सावधान.. जॉगिंग करून एक तरुण येतोय..हिरो आला..शिट्टी वाजवा..हा मराठी तरूण थांबलाय..त्याची बॉडी पाहून.. त्याची सेक्सि बिअर्ड पाहून घायाळ होणाऱ्या तरुणी पाहा.. तस दिल्लीच्या पोरी सहज इम्प्रेस होत नाहीत बर का..त्याला डिंपल आहेत आणि हसताना हा खूपच सुंदर दिसतो. नजर लागावी इतके तेज आहे मुलाकडे..हा मंदिरात येतोय. पार्थकडे बघून त्याने डोळा मारला. अहो..पार्थचा एकमेव मित्र आहे तर..ह्याच नाव आहे " कार्तिक सरपोतदार" ..भाई.. रॉयल्टी खून मै है!!

भावभगत से कोई शरणागत आवे ।
संतत संपत सबही भरपूर पावे ।

ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।
गोसावीनंदन निशिदिन गुन गावे ॥

आता घरून तयार होऊन जो क्युट गोरा..महाराष्ट्रात वाढलेला पण राजस्थानी छोरा.. यश सोनी..क्युट आहे ना..त्याचा आवाज पण ऐकत बसावा असा आहे!!यश आला!!कार्तिकने त्याला "यो" केलं!!आरती संपत आलीय!!

जय देव जय देव,
जय जय श्री गणराज
विद्या सुखदाता
धन्य तुम्हारा दर्शन
मेरा मन रमता,
जय देव जय देव ॥

थांबा.. एक मोठी कार खराब झालीय..कारमधून एक सुंदर हँडसम तरुण बाहेर निघाला..आरती ऐकून त्याचे पाय आपसूकच मंदिराकडे वळले!!गोरा..हँडसम..हा तरुण मंदिरात पाय ठेवतो!!पार्थ प्रसाद वाटत असतो!!

हा तरुण म्हणजे कथेचा नायक.."साहिल"!!

दोघांची नजरानजर होते!!पार्थ भूतकाळात जातो!!

"आज के जमाने मै कौन भक्ती करता है?" साहिल

"भक्त और भगवान तो हर जमाने में रेहते है सर..अपने अपने नजरियेकी बात है!!" पार्थ..

साहिल आपली एक भुवयी वर करतो..पण ड्राइवर लगेच बोलावतो..असो..कमीत कमी पहीली भेट तर झाली!!साहिल जाताना मागे वळून बघतो..मी तर वास्तू आहे..मला भविष्याची कल्पना आधीच येते!!

कार्तिकला ऋचाचा मिस्ड कॉल आलाय..तो प्रसाद घेऊन निघालाय..यश पण आपले एक महत्वाचे काम करण्यासाठी रेल्वे स्टेशनकडे निघालाय..यश,कार्तिक आणि पार्थ एकाच फ्लॅटवर म्हणजे दगडीखाण्यात राहतात..पार्थ बायसेक्सउल आणि यश गे आहे आणि हे कार्तिकला माहीत आहे!!कार्तिक स्ट्रेट आहे..त्याची ऋचा नावाची जिफ आहे!!त्याला बाकीचे "गे" असल्याचे माहीत आहे!!पार्थ बँकेत काम करतो..यश सिव्हिल इंजिनिअर आणि कार्तिक एमबीए असून जॉब करतो. कथा सुरू झालीय!!आता कथेत "किरण" येणारे. कोण किरण ? साहिल आणि पार्थ ओळखतात का ? आहो..समजेल..वाट बघा.

क्रमश...


हॅलो जुगनू.. मी इरावर नवीनच आहे. त्यामुळे काही चूक झाली तर मोठ्या मनाने माफ करा. कथा संवेदनशील विषयावर आहे. तुम्ही कथेला भरभरून प्रेम कराल ही आशा करतो.

🎭 Series Post

View all