दगडीखाना ! पार्ट 2

स्त्रीविशेष समलैंगिक कथा
दगडीखाना!! पार्ट 2

यश रेल्वेस्टेशनवर जातो. पण त्याला समजते की पार्टीचे येणे कॅन्सल झाले. तो आजूबाजूला हॉटेल बघत असतो एखादी कॉफी वगैरे प्यावी म्हणून तोच त्याला एका पंधरा-सोळा वर्षाच्या पोराचा धक्का लागतो.

"आई ग!" तो काळा सावळा , स्लिम पण दिसायला क्युट असलेला पोरगा म्हणतो. यशला समजते की हा मुलगा मराठी आहे.

" महाराष्ट्रचे आहेत का तुम्ही ?" यश खुश होऊन म्हणतो.

तो घाबरलेला मुलगा रेल्वेच्या पटरीवर जातो.

" अरे काय करतोय ? " यश

" मरू द्या मला..नाही जगायचं आता . "  तो मुलगा म्हणतो.

यश त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. तिकडून रेल्वे येते. सुदैवाने किरणला चक्कर येते. त्याला खूप ताप पण असतो. किरण गरीब घरचा ग्रामीण भागातील वाटत असतो. खिशात एक महादेवाची फोटो सापडते. यशला किरणला एकट सोडून जाऊ वाटत नाही. तो एक रिक्षा करतो. किरणला हॉस्पीटलमध्ये नेतो.

मग डॉक्टर म्हणतात की बीपी वगैरे लो आहे. काही गोळ्या लिहून देतात. किरणला शुद्ध येते पण तो काहीच बोलत नाही. यश पण त्याला फोर्स करत नाही. त्याला घरी घेऊन येतो. सूप पिऊ घालतो. गोळ्या देतो आणि पार्थच्या रूमवर झोपी घालतो. कारण कार्तिक रूममध्ये आपल्या जिफसोबत रोमान्स करत असतो. पुढे ऋचा जाते. कार्तिकला किरणबद्दल समजते.

@ त्या दिवशी संध्याकाळी

कार्तिक ऑर्डर केलेल्या पिझ्झाची फोटो काढून फेसबुकवर पोस्ट करतो .

"या खायला!!"  

"वाह..आता मस्त लाईक्स भेटतील!!" कार्तिक

"तुमच्यामुळे अन्नाचा अपमान होतो. अरे अन्न हे पूर्ण ब्रह्म असते. अस फोटो काढणे आपल्या संस्कृतीत नाही बर का!!" यश

" ऐ यश..फालतू पकवू नकोस..तुझ्या फेसबुकवरच्या पोस्टला किती लाईक्स असतात रे..निदान लोकांना समजतात तरी का ते??आणि लाईक्स नाही भेटले तर रडत बसतोस की माणुसकी संपलीय आणि आता लाईक पण करत नाही कुणी..आबे मिठ्या..लाईक्स आणि माणुसकीचा संबंध काये? " कार्तिक म्हणतो.

" माझ्या पोस्ट इंटलेकचुअलच्या सर्वात वरच्या लेव्हलच्या असतात. म्हणून त्या सहज कोणाला समजत नाहीत. " यश

दोघांमध्ये भांडण सुरू होते. तोच पार्थ त्याच्या रूममध्ये जातो. आणि दोघांचे पण लक्ष जात नाही.

" सोड..कुण्या पोराला मध्ये बेडवर झोपवले आहेस?तुझा आयटम आहे का ?" कार्तिक

\"" नाव मला पण माहीत नाही ब्रो . पण तो आत्महत्या करत होता ना रेल्वे स्टेशनवर. मराठी आहे रे. पंधरा सोळा वर्षाच पोरग उपाशी होत. मी त्याला कारमध्ये बसवून  घेऊन आलो. वेड्यासारखा बडबडत होता. मी येऊन झोपवलं . " यश

" यश. चुत्या झालाय का ? पार्थ आला तर चिडेल खूप!!" कार्तिक

"पार्थ..पार्थ मध्ये गेलाय वाटत..!!" यश घाबरत म्हणतो.

इकडे पार्थ त्याच्या खोलीत आणि त्याला किरण डायरी उघडताना दिसतो.

" ओय मिस्टर..कुछ मॅनर्स है की नहीं.. किसिके भी पर्सनल डायरी को पढ रहे हो!!" पार्थ

पार्थ डायरी हिसकावून घेतो.

"माफ करा..!" किरण म्हणतो.

यश आणि कार्तिक आत येतात.

"यश..तुझ्या पार्टनरला तुझ्या खोलीत ठेवत जा !!" पार्थ

"पार्थ..चिल्ल..हा यशचा पार्टनर नाहीये!!" कार्तिक

मग तिघेजण किरणला हॉलमध्ये घेऊन जातात.

किरण आपली कहाणी सुरू करतो. कार्तिक पॉपकॉर्न आणून ठेवतो. खूप मोठी कहाणी असावी असा त्याचा विश्वास असतो.

" मी मूळचा कोल्हापूरचा. माझं नाव किरण. मला लहानपणीपासून साडी घालायला , नटायला थटायला आवडायचं. चोरून ही सर्व कामे करायचो. मला कधीच मर्दासारखे वागता आले नाही. मला कधीच तसे चालता आले नाही. सर्वजण बायकी म्हणून माझी चेष्टा करत. मी महादेवाचा भक्त झालो. सर्व उपासतापास केले. पण मला मर्द बनवलं नाही देवाने. शाळेत मित्र नव्हता कुणी. बाबा रोज रात्री माझ्या बायकी वागण्यांमुळे मला मारत. काडीपेटीने पायाला चटके देत. मी रात्ररात्रभर उपाशी राहत. मी एकलकोंडा झालो. पुढे पुण्यात आलो काकाकडे शिकायला. पण तिथं पण मला खूप काम लावण्यात आले. माझं अभ्यासात लक्ष लागत नसत. काका कधी कधी माझ्यासोबत झोपत. मला चावत. खूप मारत. मला समजत नव्हते माझे काय चुकले की माझ्या नशिबी इतकी दुःखे आली. दहावी नापास झालो. घरच्यानी परत बोलवलं. माझ्या लघवीतून लाल रक्त येऊ लागले. मला गावच्या साधुकडे नेलं. घरचे मला जोगती बनवणार होते. गळ्यात मोत्याची माळ घालणार होते. लुगडं घालणार होते. मी खूप खुश झालो. कारण आता मला पुरुषसारख वागायचं गरज नाही. मला देवीची भक्ती करता येणार. बाईसारख राहता येणार. मला घरात सर्वजण आदराने वागू लागले. का तर माझ्यात देवी आहे म्हणून. पण एके रात्री मला स्वप्न पडले की त्यात मला देव दिसला. मला पळून जा म्हणाला. दुसर्याच दिवशी मला अजून एक जोगती भेटला. इतका खुश होऊ नको आणि पळून जा इथून अस म्हणाला. मग मी देवाची इच्छा समजून पळून आलो. वाटेत खूप संकट आली. गुंड्यानी पकडलं. अपंग करण्याचा प्रयत्न केला. पण महादेवाच्या कृपेने दिल्लीत कसेबसे आलो. पैसे घरून चोरून आणले होते. पण मला मरायचे आहे. प्लिज मला मरू द्या. एकदा मेलो तर पुढच्या जन्मी पूर्णपुरुष नाहीतर स्त्री तरी बनलं मी!!" किरण रडत म्हणला.

"आणि परत गे बनला तर ? " कार्तिक

यश कार्तिककडे रागाने बघतो.

" मग परत मरेल!! " किरण

" Worst form of loneliness is not accepting who you are?" पार्थ

" म्हणजे?" किरण

" म्हणजे पार्थ म्हणतोय..तू जे आहेस तसा स्वीकार कर..स्वतःवर प्रेम कर..अस मरून काही नाही होत रे..चुत्या लोक मरतात..!!" यश

" माझ्या आईवडिलांनी कधी माझ्यावर प्रेम केलं नाही..जगणे नकोसे झालय!!" किरण

" ठिके मर तू..उद्यापर्यंत याला कोल्हापूरला पाठवा.. ही पीडा आपल्या नशीबी नको..कार्तिक तू आज माझ्या खोलीत झोप..यश..मला उद्या संध्याकाळी हा किरण दिसला नाही पाहिजे !!" पार्थ

" पार्थ.. तुझा लहान भाऊ असता तर असच सोडलं असत का ? कोल्हापुरात जोगती बनेल हा. इथे आपण सोडलं तर कोण आहे ह्याच. निदान माणुसकीच्या नात्याने विचार कर यार. याला इथेच ठेऊ..हवं तर भाडे मी भरतो..!!" यश

" पार्थ..थोडं चिल्ल मार.. वाटेत याने सुसाईड केली तर आपणच जबाबदार असू!!" कार्तिक

" व्हॉट द फक. माणुसकी माय फूट.. हा मरो जगो मला काय करायचं..आणि डार्विन बोलून गेला..फिटेस्ट सर्वाइव्ह. जर इतकं चुत्या असाल तर मरायलाच हवं..तस पण समाज जगू नाही देणार!!" पार्थ

पार्थ रागाने रूममध्ये जातो..

" पार्थच्या बोलण्याचे वाईट नको मानूस.. थोडं येड आहे पण मनाने चांगला आहे!!" कार्तिक

कार्तिक आणि पार्थ एका रूममध्ये झोपतात आणि यश आणि किरण एका रूममध्ये..

यश किरणच्या निरागस चेहऱ्याकडे बघत असतो..हळूच किरणच्या कपाळावर किस करतो..

" देवा.. तू माझ्यावर जबाबदारी टाकली आहेस ना..मी ह्याला कधीच निराश होऊ देणार नाही!!" यश

दगडीखान्यात प्रेमाचा नवीन धागा गुंफत होता..

@दुसऱ्या दिवशी

" यार..कुक नाही आला आणि भूक लागलीय!!" यश

"मी काही बनवू का ? मी पुण्यात असताना सर्व कामे शिकलो होतो!!" किरण

मग किरण पोहे बनवतो.

" उत्कृष्ट..घरचे पोहे खातोय अस वाटलं!!" यश

" खरच यार..हॅट्स ऑफ!!खूप टेस्टी झालेत पोहे!!" कार्तिक

तिकडून पार्थ येत असतो..यश त्याला म्हणतो..

" पार्थ..पोहे खाणार का..किरणने बनवले!" यश

" बाहेर वीस रुपयाला भेटतात.. रामपूर के म्शहुर पोहे..मला तेच आवडतात!!" पार्थ

घरची बेल वाजते..

" जानकीबाई..!!" पार्थ ओरडतो..

मग तिन्ही मुले साफसफाई करु लागतात..
"माझा शर्ट कुठय??" कार्तिक ओरडतो..मग सर्व हॉल व्यवस्थित झाला की दार उघडतात..

" इतका उशीर का झाला ?" जानकीबाई

"आम्ही नाश्ता करत होतो..!!" यश म्हणतो..आणि लगेचच तिघे पाया पडतात..

" असू द्या..!!हा कोण ? पोह्याचा वास खूप छान येतोय!!" जानकीबाई

" हा माझा मित्र आहे.. रूम शोधायला आला होता!!" यश म्हणतो..

यश जानकीबाई आणि सोबत असलेली मीना हिला पोहे ऑफर करतो. दोघी पोहे खातात.

\"\"तुझ्या हातचे पोहे खाऊन मला माझ्या आईची आठवण झाली!!" जानकीबाई किरणला म्हणते.

"काकू..ह्याला इथं ठेवता येईल का?" यश विचारतो..

"हो..अस पण फ्लॅट चार जणांचा आहे..मला याच आधार कार्ड वगैरे द्या..फॉर्म भरून घेता येईल..!!" जानकीबाई

जानकीबाई किरणला रेंट वगैरे सांगतात..पण पार्थला यशचा खूप राग येतो..जानकीबाई निघून जातात.. पण मीना थांबते..

"\"पार्थ..कल बड्डे है मेरा..पार्टी अरेंज की है.. तुम तिनो आ जाओ..आप भी आ जाओ ( किरण कडे बघून ) मै डिटेल्स व्हाट्सप् करती हू!!" मीना

मीना निघून जाते..कार्तिक पार्थला चिडवतो..

" दो दिल मिल रहे है.. मगर..!!" कार्तिक

" गप बस..आता आधार कार्ड कस देणारे याच..फसणारे तुम्ही सर्व..पोलिस व्हेरिफिकेशन झालं तर..!!" पार्थ

" बघू यार..काही दिवस टाळावे लागेल जानकीबाईला..!!" यश म्हणतो..

क्रमश...

हॅलो जुगनू..?? पहिल्या भागाला दिलेल्या प्रतिसादबद्दल आभार. हा भाग जर इतुसा पण आवडला असेल तर भरभरून कमेंट करा.

🎭 Series Post

View all