दगाबाज दिल भाग 2

Dagabaj


भाग 2

प्रेम कथा



मागील भागात आपली ओळख झाली ती सुदाम सोनवणे ह्या श्रीमंत मनाच्या माणसाशी..

तर एकीकडे संजीवनी आणि परेश असून ही त्यांची फार अशी झलक मिळाली...हळूहळू या दोघांची ओळख उलगडत जाणार आहे..

एकीकडे मोठा भाऊ म्हणजे परेशचा मोठा दादा हरीश ज्याचा स्वभाव सगळ्यांना आवडणारा..

----------------
सुदाम यांनी घरात नेमकी चोरी कोणी केली ह्याचा छडा लावण्यासाठी सगळे नौकर बोलावून घेतले ,मुनीम जी यांनी सगळ्यांना साहेबांसमोर उभे केले होते..एक एक करून सगळ्यांनी नकार दिला, पण एक मात्र भीती पोटी बाहेर निघून गेला, ह्यात साहेबांना आणि मुनीम यांना शंका आली ती त्यावरच पण त्यांनी कसलाच गवगवा नाही केला, जो नौकर होता तो एक म्हतारा व्यक्ती होता आणि त्याची बायको आजारी होती. जिच्या इलाजासाठी तो छोटे चिल्लर पैसे घेऊन जमा करत आणि त्यातून बायकोची औषध घेऊन येत.

मुनीम यांना अशी उडती खबर लागली आणि त्यांनी लगेच साहेबांच्या कानापर्यंत पोहचवली, त्यात साहेबांनी प्रकरण इथेच मिटते घ्यायला तर सांगितलेच पण त्या व्यक्तीच्या बायकोचा इलाज त्यांच्या हॉस्पिटलमध्ये करण्याचे आदेश दिले..साहेबांचा हा स्वभाव पाहून तो गरीब त्यांच्या मोठेपणा समोर नतमस्तक झाला..


सुदाम सोनवणे हे खरे मोठे आणि मनाचे श्रीमंत..


एकीकडे त्यांना एक आलेला फोन काही चैन पडू देत नव्हता..

त्यांच्या कॉलेजच्या सावंत साहेबांचा फोन होता तो, एकदम अचानक यायला सांगितले.. खूप मोठी घटना घडली आहे, खरे तर पोलीस केस आहे. आपल्याच कॉलेजच्या एका 1फर्स्ट इअर च्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे ते ही आपल्या कॉलेजच्या मागच्या तलावात..मुलगी वाचली आहे पण तुम्ही एकदा ह्यासाठी येऊन जावे. उगाच चर्चा आणि बदनामी नको..असे सांगून त्यांना कॉलेजमध्ये येण्याची विनंती केली..


त्यांनी मुलीचा तपशील घेतला, पोलीस केस होण्याआधी तिचा इलाज महत्वाचा, मग भले ही केस करा, कारणे शोधा, तिला आधी पुण्यात हलवा..


सावंत यांनी मुलीची सगळी माहिती दिली..


सुदाम साहेब, "सावंत ही मुलगी कोण आहे."

सावंत,"साहेब ही 1फर्स्ट इअर मेडिकल स्टुडंट आहे ,संजीवनी खरात. "

सुदाम साहेब,"का केले तिने हे असे काही कल्पना आहे का तुम्हाला, विचार पूस केली का तिच्या मैत्रिणी कडे."

सावंत," साहेब हे प्रेम प्रकरण असू शकते असे वाटते ."

सुदाम साहेब,"तुम्ही असेच काही बिना बुडाचे बोलू नका ,काही वेळेस आपला अंदाज चुकीचा ही ठरू शकतो ,सगळ्याच मुली अश्या असतात असे नाही ."

सावंत जरा खजील झाले ,त्यांनी पटकन अंदाज बांधायला नको होतो ,ते ही साहेबांचा स्वभाव माहीत असतांना, आधी पूर्ण चौकशी करायला हवी होती आणि मगच बोलायला हवे होते..


सावंत, "साहेब मी अंदाज लावला पण मी मूळ कारण शोधून तुम्हाला सविस्तर कळतो ."

सुदाम साहेब, "तिला आपण आजच भेटून येऊ, तिची काय परिस्थिती आहे हे समजले म्हणजे काही प्रमाणात आपले टेन्शन कमी होईल, शेवटी लोकांच्या मुली आपल्या भरोश्यावर इथे शिकायला येतात ,म्हणजे एका अर्थी आपणच त्यांचे पालक आहोत , प्रथम जबाबदारी आता आपली आहे ."

सावंत, "साहेब चला मी गाडी बाहेर काढायला सांगतो मग आपण लगेच निघू तिकडे ."

सुदाम साहेब," सावंत अरे ते राहिलेच एक सांगायचे ,तिच्या आई वडिलांना ही बातमी तुम्हीच द्यावी आणि जरा जपून द्या ही बातमी ,नाहीतर ते उगाच घाबरून जायचे, आणि जर त्यांना काही पैशाची अडचण असेल तर इकडून पैसे पाठवा म्हणजे ते गाडी करून येतील ."


सावंत ,"जी साहेब ,करतो मी व्यवस्था ."

सुदाम साहेब आणि सावंत साहेबांच्या गाडीत बसतात ,सावंत साहेबांचे दार उघडायला जातात ,आणि साहेब त्यांना असे काही करण्यापासून रोखतात...त्यांना सांगतात माझे काम मला करायला आवडते, शक्य तो तुम्ही फक्त कॉलेजची जबाबदारीच नीट पार पाडा..


सावंत साहेबांचा नेमका तो इशारा समजून जातात, त्यांनी अशी चूक केली जी करायला नको होती ,त्यांनी मुलीबाबत घडलेल्या घटनेची माहीत आधीच शोध घेऊन साहेबांना कळवायला हवी होती ,घटना काल घडली आणि आज सावंत यांनी साहेबांना कळली ,तोपर्यंत ती मुलगी साध्या दवाखान्यात उपचारासाठी पाठवली होती ,ह्यात कॉलेजची साधारण लोकांमध्ये बदनामी झाली ,तर पत्रकारांनी ही पेपर मध्ये छापली होती ,आणि मग ही बातमी मुनीम यांनी वाचून साहेबांना सांगितली होती ,हीच मोठी चूक सावंत यांच्या हलगर्जीपणा मुळे झाली होती ,पण वेळीच साहेबांनी त्याचा आधीच बंदोबस्त केला म्हणून मानहानी टाळली होती ,मुलीला घेऊन मुनीम खुद पुण्यात गेले होते..हेच सावंत यांना का जमले नाही याचा राग साहेबांना होता.


सुदाम साहेब खूप चौकस बुद्धीचे व्यक्तिमत्त्व होते ,जितके चांगले तितकेच कडक ही होते ,त्यांना कामात बिलकुल हलगर्जीपणा आवडत नव्हता ,आणि खोटे बोलणे तर त्यांना कधीच आवडले नव्हते..गरीब श्रीमंत हा कसलाच भेद नव्हता..


दोघे ही लांबचा प्रवास करून पुण्यात हॉस्पिटलमध्ये पोहचले होते ,पूर्ण प्रवास भर सावंत निमूटपणे खजील होऊन बसले होते ,त्यात साहेबांचा त्यांच्यावर राग दिसत होता ,परत एखादी चूक झाली की आज सावंत यांचे काही खरे नव्हते...


सुदाम साहेब ," सावंत ते मगाशी सांगितलेले काम केलेत का तुम्ही "


सावंत, "कोणते साहेब ,कोणते काम सांगितले होते तुम्ही मला ."


साहेब ,"तुम्हाला मी सांगितले होते ,त्या मुलीच्या आई वडिलांना कळवा ,ते ही तुमच्या कडून झालेले दिसत नाही ,इतका कसा हलगर्जीपणा हा तुम्हा ,तुम्ही एक डायरी ठेवा ,जे संगीतले जाईल त्याची नोंद घ्या ,आणि काम झाले की त्यावर मार्क करा ,म्हणजे विसर पडणार नाही .."


सावंत, "हो साहेब हे आत्ता करतो त्यांना फोन ,पण मला त्यांना बोलतांना भीती वाटते ,त्यांना कसे कळवू ही बातमी आत्महत्या केल्याची ."


साहेब ,"ओ तुम्ही फक्त इतके कळवा ,तुमची मुलगी आजारी आहे ,तुम्ही पुण्याला निघून या ,आणि ते ही जमत नसेल तर आता मात्र तुम्ही घरी जा ,मी करतो तुमची सर्व कामे .."

सावंत ,"साहेब मी कळवले त्यांना ते निघतील पुण्याकडे यायला ,आणि त्यांना पैसे ही दिले आहेत ,तसे हे ही सांगितले आहे की पैसे कमी जास्त लागले तर तुम्ही इथे आल्यावर मी पैसे देईल ."

साहेब, "कमाल आहे तुमची सावंत ,माझे मुनीम ते 75 वर्षाचे असून त्यांनी एका इशाऱ्यात सगळे कामे केली आहेत आत्तापर्यंत ,आणि तुम्ही अजून तरुण आहात पण सगळे कसे मी सांगितल्याशिवाय होत नाही ,त्यात ही किती चुका."

सावंत, "मी करेन हळूहळू manage साहेब. "


साहेब ," त्या मुलीच्या रूम पार्टनर चे फोन घ्या कोणाकडून तरी आणि मला आजच्या आज माहीत द्या त्या मुली विषयी, कोण ,कुठल्या गावची ,काय तिला व्याप ताप आहेत ,कोणाशी तिची मैत्री आहे ,कोणाच्या दबावात येऊन तिने हे पाऊल उचलले आहे ते ."


सावंत, "हो साहेब मी घेतो माहिती तिची सगळी."


साहेब," अरे हो पुण्यात ज्या हॉस्पिटलमध्ये ती आहे त्या हॉस्पिटलचे माझे खास मित्र आहेत ,त्यांची इथे मोठी फॅमिली आहे ,आणि त्यांचा मुलगा आपल्याच कॉलेज मध्ये शिकत आहे ,आपण ह्या मुलीला भेटून घेऊ आणि पुढे माझ्या मित्राकडे जाऊन येऊ ,त्याची खूप मदत होईल ह्या प्रकरणात ,त्याचा मोठा दबदबा आहे इथल्या राजकारणात ,म्हणून एकदा तरी भेट घेऊ.."

दोघे जवळ जवळ आलेच होते पुण्यात शिरले होते तोच रस्त्यावर लावलेले मोठे मोठे होर्डिंग पाहून साहेब सावंत यांना म्हणाले ," हे जे मोठे अभिनंदनाचे होर्डिंग आहेत ते माझ्या मित्राच्या मोठ्या मुलाचे आहेत ,तो ह्या पुण्यातील एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे ,त्याच्या कामाचे कौतुक वाखण्याजोगे आहे ,खूप समजदार आणि कर्तव्यदक्ष असा हा मुलगा आहे...हरीश रोडे.."


हरीश रोडे हा तोच ,परेशचा मोठा भाऊ...जो ह्या कथेच्या एका पत्रात दिसणार आहे...

संघ.... मुंबई
प्रकार... कथामालिका
लेखिका... अनुराधा आंधळे पालवे



क्रमशः.....?








🎭 Series Post

View all