दबक्या पावलांनी आली माझी मालकीण झाली
सध्या लग्नाचा सिझन आहे, अनेकजण प्रि वेडिंग तसेच लग्नाच्या फोटोशूटमध्ये व्यस्त असणार. या सोहळ्याचे उत्तमोत्तम फोटो आणि व्हिडीओ बनवण्यासाठी साथ लागते उत्तम अश्या गाण्याची. सध्या प्रत्येक मराठी व्यक्तीवर एका नवीन गाण्याने छाप पाडली आहे, ते म्हणजे "दबक्या पावलांनी आली माझी मालकीण झाली". हे गाणं इतकं सुंदर आहे की एखादा व्यक्ती नव्याने प्रेमात पडेल. त्यातले शब्द, प्रेमपूर्वक भावना मनाला स्पर्शून जाते. हिंदी तसेच बॉलिवूड गाण्यांना डोक्यावर घेणाऱ्या मराठी माणसाला हे मास्टरपीस ऐकून नक्कीच छान वाटेल.
या गाण्याची शब्दरचना खालीलप्रमाणे.
दबक्या पावलांनी आली, माझी मालकीण झाली...
एका वाघाची शिकार, एका हरिणीने केली..
यंदा यावं माझं नाव, साजणीच्या उखाण्यात
चोरुनचोरुन पाहतं,
एक पाखरू लाजतं,
गाणं आमच्या वरातीचं
माझ्या मनात वाजतं
एका वाघाची शिकार, एका हरिणीने केली..
यंदा यावं माझं नाव, साजणीच्या उखाण्यात
चोरुनचोरुन पाहतं,
एक पाखरू लाजतं,
गाणं आमच्या वरातीचं
माझ्या मनात वाजतं
तिच्या पैंजनाचे ताल
माझे नाचू नाचू हाल
वाजू वाजू दमला ना
माझ्या काळजाचा ढोल
माझ्या नावाचं कुंकू रे
तिचं कपाळ मागतं
माझे नाचू नाचू हाल
वाजू वाजू दमला ना
माझ्या काळजाचा ढोल
माझ्या नावाचं कुंकू रे
तिचं कपाळ मागतं
गाणं आमच्या वरातीचं
माझ्या मनात वाजतं
बट गालावर खेळ
सोळा झाले पावसाळे
बोलायचे खूप खूप तरी
ओठावरी टाळे
बोललो ना कुठे काही
तरी गावात गाजतं
गाणं आमच्या वरातीचं
माझ्या मनात वाजतं
सोळा झाले पावसाळे
बोलायचे खूप खूप तरी
ओठावरी टाळे
बोललो ना कुठे काही
तरी गावात गाजतं
गाणं आमच्या वरातीचं
माझ्या मनात वाजतं
दबक्या पावलांनी आली, माझी मालकीण झाली...
एका वाघाची शिकार, एका हरिणीने केली..
यंदा यावं माझं नाव, साजणीच्या उखाण्यात
चोरुनचोरुन पाहतं,
एक पाखरू लाजतं,
गाणं आमच्या वरातीचं
माझ्या मनात वाजतं