काही वेळात सेक्रेटरी तिकडे आले.
नोटीस केलं, स्फेटी डोअर असुनही मेन डोअरला पाच वेगवेगळे लॉक होते.
स्वाती उमेश देसाई.
मी आणि माझा नवरा.मुलगा हॉस्टेलला असतो.
हो!माझ्या बाजुला राहते.आयमिन राहत होती.
शरण्याला तिची अवस्थता जाणवत नाही.नजरेला नजर न देणं.सतत अस्वस्थपणे हात फडक्याला पुसणं ह्याने शरण्याला ही आता स्वातीवर संशय येऊ लागला होता.
त्यांच्या थंड अभिप्रायावरून शरण्याला अजुनच केस गुंतागुंतीची वाटू लागली. एक नवरा आपल्या बायकोला पोलिस स्टेशनमध्ये नेत असल्याच्या खबरीवरून एवढा शांत प्रतिक्रिया कशी देऊ शकत होता. काहीतरी पाणी मुरत होतं.
शरण्याने स्वातीला अजुन काही धुळीच्या फाईल दिल्या मग स्वाती त्या फाइली अश्या साफ करायला लागली जणु त्या तिच्यासाठी अल्लाउद्दिनचा जादुई दिवा आहेत.हे करताना स्वातीच्या चेहऱ्यावरचा ताण ओसरू लागला होता.
"का मारल मिहीकाला...ती घर घाण ठेवायची म्हणुन?
"स्वाती मँडम जर खुन्याने हा डाग सोडला नसता तर तुम्ही जेल मध्ये असतात. डाग चांगले असतात. खुनी कोण ते सांगतात."
दुसऱ्या दिवशी मिहीकाचे कॉल रेकॉर्ड आले. तसे तर तिला काही वेगवेगळ्या मॉडलिंग कंपन्याचे कॉल होते आणि उमेशचाही म्हणजे स्वातीच्या नवऱ्याचाही एक कॉल होता. तसचं अजून एका नंबरवरून मात्र मिहीकाला दर दोन दिवसांनी कॉल येत होता. शरण्याने तो नंबर आणि उमेशच्या नंबर ह्यांच्यावर फोकस करायच ठरवलं.
शरण्याने उमेशची आणि त्या नंबरची जागा खुन झाला त्या दिवशीची काय होती ह्याची माहिती मोबाईल कंपन्याकडून काढली.
दुसऱ्या दिवशी जेव्हा माहिती आली तेव्हा शरण्या शॉक झाली कारण उमेशचा नंबर काही काळ सोसायटीत असल्याचं दाखवत होता.रात्री एक ते साधारण तीन वाजेपर्यंत, पण मग बिल्डिंग एनट्रन्सच्या फुटेजमध्ये उमेश दिसत नव्हता आणि वॉचमननेही त्यादिवशी उमेश आल्याच का नाही सांगितलं हा विचार करून तिने सोसायटीच्या वॉचमनला पोलिस स्टेशनात बोलवलं. तसचं तिने अजुन ठिकाणी लावलेले सी.सी.टीव्ही फुटेजही नीट पाहायला सुरवात केली.
तिला जाणवलं, सगळे फुटेज क्लीअर आहे मग उमेश आत आला कसा आणि परत गेला कसा.
तिने पोस्टमार्टम डिपार्टमेंटला फोन केला आणि विचारलं,
"मिहीकाच्या बॉडीची एटॉप्सी झाली का?"
"हो झाली आहे. मृत्यु श्वास घुसमटुन झालाय.बॉडीवर काही स्ट्रगलिंग मार्क नाही आहेत. मृत्युच्या आधी काही गुंगीच औषध दिल आहे.पण ते पोटात नाही सापडलं.सो ते औषध काय आहे आणि शरीरात कुठुन गेल ह्याचं इनविस्टीगेशन बाकी आहे. "समोरून उत्तर आलं.
"ठीक आहे. बॉडी केव्हा पर्यत हँन्डओवर होईल ? अजुन एक काही प्रेग्नसी सिमटंम सापडले का?"शरण्याने लव एगंल आहे का हे पाहण्यासाठी विचारलं.
"नाही.ती कुमारिका नव्हती.मेली त्या दिवशी शारीरिक संबधही नव्हते आले,पण तिला वाईल्ड सेक्सची आवड असावी कारण शरीरावर लव बाईटस आहेत. बॉडी आज संध्याकाळी मिळेल.लॅब रिपोर्ट परवा येतील कदाचित." समोरून उत्तर आलं.
"ठीक आहे, मग मी मिहीकाच्या काका काकीला तसं फोन करून सांगते.थँक्स फॉर इन्फॉर्मेशन."शरण्या म्हणाली.
स्वाती खुनी नाही आणि उमेश बद्दल फक्त संशय आहे तर मग खुनी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की वाचा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा