दाग अच्छे है (रहस्यमय कथा भाग 3)

एक तपास मिहीकाचा खुनी शोधण्याचा

पुर्वार्ध(स्वाती निर्दोष होती आणि संशयाचा काटा उमेशवर होता..आता उमेशवरचा गुन्हा सिद्ध करू शकेल का शरण्या )


मिहीकाची बॉडी डोळ्यासमोर आणुन शरण्या डिटेलिंग आठवायचा प्रयत्न करू लागली. इतक्यात वाफाळत्या चहाच्या सुंगधाने तिच लक्ष विचलित केलं.परब बाई छान मसाला कुटून घातलेला चहा घेऊन उभ्या होत्या.


" थँक्स! खरच गरज होती.वरतून फार  प्रेशर येतयं.मिडीयात लवकर खुनी नाही आणला तर हा एरिआ नॉट सेफ वॉर विमेन म्हणुन अपोजिशन पार्टी आरडाओरडा करतील. आमदारांच्या मतदार संघात हा एरिआ पडतो ना..!"शरण्याने आपल्यावरचा ताण परब बाईंशी शेअर केला.


"मॅडम ..स्वाती देसाईच संशयित वाटते.अजून कोण मारणार तिला. तिच्याकडे हा फ्लॅट सोडला तर काही खास बँन्क बॅलेन्स किंवा प्रॉपर्टी नव्हती. काका काकीनांही तिला मारून घर मिळेल, पण ते तर स्वत:च श्रीमंत आहेत आणि त्यांचा गेल्या पाच वर्षांत तिच्याशी संपर्कही नव्हता."


"बरोबर आहे परब बाई..पण नुसता गळा दाबला म्हणुन तर आत नाही ना टाकू शकत. घरात काहीच फिंगरप्रिंट्स नाही आहेत. मस्त झालाय चहा..सुंगधच एवढा सुंदर होता की.."


हे बोलताना शरण्याला काहीतरी जाणवलं आणि ती एकदम उत्साहित होऊन म्हणाली ,"सुगंध येस..परब बाई ..सुगंध."


"सुगंध ..हा!चहाचा सुगंध ना..मलाही आवडतो.म्हणुन तर मी स्पेशल मसाला टी मागवते."


"नाही तो सुगंध नाही.मिहीकाच्या बॉडी भवती खुप सुगंध येत होता.हे असे तासनतास राहणारे परफ्युम खुप महाग असतात. एक काम करा.. आपल्याला त्या घरात परत जायला हवं.मला तिच्या परफ्युमच्या बाटल्या चेक करायच्या आहेत."


इतक्यात शरण्याला सुर्वे या सबइनस्पेक्टरने मिहीकाच्या डेड बॉडीचे व क्राईम सिनचे फोटो आणुन दिले आणि वॉचमन आल्याचे सांगितलं.शरण्याने त्याला आत बोलावलं आणि उमेश त्या दिवशी आला होता का हे विचारलं.


वॉचमनने सांगितलं की सोसायटीत दोन गेट आहेत. पुढच्या गेटकडून विझीटर येतात आणि पाठच्या गेटहुन डायरेक्ट गाड्या अंडरग्राउंड पार्कींगला जातात, पण तिकडे सिक्युरिटीवर वॉचमन नसतो कारण शटर फक्त रजिस्टर थम्ब इंप्रेशन देऊनच उघडलं जातं आणि जर कुणी जबरदस्ती केली तर लगेच अलार्म वाजतो, तसचं सोसायटीच्या सेक्रेटरी व वॉचमनच्या मोबाईलमध्ये अलार्म चालू होतो. त्या ठीकाणाचा सीसीटीव्ही बंद झाला होता परवापासून, त्यामुळे त्यालाही आयडीया नव्हती. मग तो जरावेळ विचार करून म्हणाला ,


"मॅडम, देसाई सरांचीही गाडी आहे, पण ते ही सर्विस वापरतात की नाही माहीत नाही."

उमेशच लोकेशन दाखवतयं, पण तो आलाय का बिल्डिंगमध्ये हे समजत नाही आहे. पाठचा सीसीटीव्ही खराब आहे, पण शटर कोणीही ओपन करू शकत नाही आहे. मग खुनी कोणीतरी असा असणार जो अंडरग्राउंड पार्कींग मधुन जिन्याने मिहीकाच्या फ्लॅटमध्ये गेला असेल.

पण मग तो कोण असावा..ह्या विचारात शरण्याने डेडबॉडी आणि क्राईम सिनचे फोटो चेक करायला घेतले.

फोटोत घरातील ड्रेसिंग टेबलच्या आत सात आठ परर्फ्युमच्या बॉटल होत्या, ह्याचा अर्थ मिहीकाला सुगंधाच वेड होतं, पण ह्या बॉटल नीट मँग्निफाईग ग्लासने पाहिल्यावर जाणवलं की ह्या काही खास महागड्या नव्हत्या,एखादया मध्यमवर्गीय माणुस सहज विकत घेऊ शकत होता.

म्हणजे मिहीकाला बेशुद्ध  करण्यासाठी महागडे परफ्युम वापरले असणार आणि त्यात क्लोरोफॉर्म किंवा तसचं तत्सम औषध मिक्स केल असणार ज्याने मिहीकाला संशय आला नसेल. तिने आनंदाने त्या फरफ्युमचा फवारा स्वत:च्या अंगावर मारला असणार.

जशी मिहीकाची शुद्ध हरपली असेल तसं त्या खुन्याने  पॉलीथीनची बॅग घट्ट तिच्या गळ्याभवती आवळली असणार. ऑक्सिजन कमी होऊन मिहीकाचा जीव अवघ्या काही मिनिटातच गेला असणार. बेशुद्ध असल्याकारणाने तिने स्वत:ला वाचवण्यासाठी प्रयत्नही केला नसरणारच. शरण्याने साधारण खुन कसा झाला असावा ह्याची साधारण कल्पना मनात रेखाटली.

शरण्याने उमेशला पोलिस स्टेशनमध्ये बोलावलं.त्याला विचारलं की तो किती दिवस शहराच्या बाहेर होता.उमेशने सांगितलं की तो फार्मा शोसाठी चार दिवस शहराच्या बाहेर गेला होता. काल रात्रीच तो परत आला.

शरण्याने उमेशला  परत विचारलं,"नक्की तुम्ही काल रात्री परत आलात.नीट विचार करून उत्तर द्या."

उमेश ठामपणे हो म्हणाला ,"मग हे कॉल रेकॉर्ड काय दाखवत आहेत.तुमचा फोन तुम्ही फ्लाईट मोडवर टाकला कारण तुमचं लोकेशन ट्रेस होऊ नये, पण तुमच्या वॉटसअप कॉलने गडबड केली.तुम्हाला आलेल्या कॉल मुळे तुम्ही काल आला नव्हता तर परवा रात्री आला होता."

हे ऐकुन उमेश टरकला.त्याला काय बोलावं ते सुचेना कारण शरण्याने पुरावा म्हणुन उमेशचे कॉल रिकॉर्ड त्याच्या समोर ठेवले.शरण्याने हेही सांगितलं की मिहीका एक एस्कॉर्ट होती.वॉटसएप चॅट वरून उमेशचे व तिचे अनैतिक संबध होते असे दिसुन येते होते.

ती दर पंधरा दिवसातून एकदा उमेशला सेक्स सर्विस द्यायची आणि उमेश तिला एक फिक्स अमांउट द्यायचा. पण मग मिहीकाची हाव वाढली आणि ती उमेशला ब्लॅकमेल करायला लागली म्हणून उमेशने तिला मारलं आणि मग कुठेतरी हॉटेलात राहून काल रात्री कॉलनीत परत आला.

पन्नाशीचा उमेश हे सगळं ऐकून घाबरला आणि गयावया करायला लागला.त्याने मान्य केलं की तो मिहीकाला ब्लॅकमेलचे ठराविक पैसे द्यायचा, पण मिहीकाने त्याला एक ऑफर दिली .तिला दहा लाख रूपये दिले तर त्यांचे सर्व व्हिडीओ ती डिलीट करणार होती.तो एवढ्या मोठ्या रकमेचं बॅन्क ट्रानजेक्शन तो करू शकणार नव्हता म्हणून त्याने ठरलेली रक्कम सोन्याच्या बिस्कीटात देण्याच दोघात ठरलं.

त्यासाठी त्याने दोन तीन दिवस आधी शहरातील काही  सोन्याच्या दुकानातून बिस्कीटे घेतली आणि काही बाहेर गावच्या दुकानातून उरलेली बिस्कीट खरेदी केली. ही खरेदी चालू असतानाच त्याला मिहीका व स्वातीच्या भांडणाबद्दल फोन आला.

 मग त्याने विचार केला की मिहीकाला मारायचं आणि त्यात स्वातीला अडकवायचं. स्वातीच्या स्वच्छतेच्या वेडामुळे त्यांचे वैवाहीक संबंध संपुष्टातच आलेच होते. त्याला ह्या एका गुन्ह्यामुळे दोन्ही घोळातून सुटका मिळणार होती.मग त्याने सोसायटीचे सीसीटीव्ही मेंटेन करणाऱ्या कंपनीच्या माणसाला कार पार्किंगचा सीसीटीव्ही खराब करायला सांगितला.

तसेही थम्बं इंप्रेशन आणि सीसीटीव्ही यांचा सगळा डेटा त्याच माणसाच्या कंपनीत स्टोअर होत असल्यामुळे त्याला सोसायटीत न येता ते करणं शक्य होतं. त्याने कॅमेरा खराब केल्यावर उमेश रात्री एक वाजता कारपार्कींगच्या एरीआतून आत गेला.त्याने पाहिलं तर फ्लॅट आधीच उघडा होता आणि मिहीका मरून पडलेली होती.

आधी उमेशला धक्का बसला, पण नंतर त्याने सगळ घर आवरलं आणि मिहीकाला मारण्यासाठी आणलेल्या विषारी दारूनेच घर एकदम पुसून टापटीप केलं ज्याने संशय स्वातीवर येईल.

उमेशच्या देहबोलीवरून तो खरं बोलत असावा असं शरण्याला जाणवलं.तसही तिच्याकडे फक्त वॉटसअपचॅट होती.जिथपर्यंत पुर्ण पुरावा मिळत नाही तिथपर्यंत उमेशला अटक करण शक्य नव्हतं, पण तो मुख्य संशयीत होता हे मात्र खरं होतं.

"मग जर तुम्ही घर साफ केलत तर चिखलाचा डाग का सोडलात?"

शरण्याने उमेशला विचारलं.तसा उमेश चमकुन म्हणाला ,

"डाग! मी तर कोणताही डाग बघितला नाही. खरतर मी घर साफ करताना मिहीकाच्या बॉडी जवळ गेलोच नाही. मला कुठूनही माझे ठसे तिकडे येऊ द्यायचे नव्हते आणि मला तिला तसं बघताना भीतीही वाटत होती."

"नीट आठवा ,मग तुम्ही काय पाहिलं जेव्हा तुम्मिही हीकाच्या घरात आलात?" शरण्याने विचारलं.

"मी आलो तेव्हा लांबुन खुर्चीवर मिहीका झोपल्यासारखी वाटत होती.मी मिहीका अशी गोड हाक मारली आणि तिला उठवयला गेलो. कदाचित ती कुणाची तरी वाट पाहत असावी असं वाटलं. मग तिच्या चेहऱ्यावर असलेल्या प्लास्टिक बॅगमुळे मी घाबरलो आणि मी तिकडून बाहेर आलो. लिफ्टमध्ये सीसीटिव्ही असल्यामुळे मी जिन्यानेच खालती आलो. एक दोन सिगरेट फुंकल्यावर मला स्वातीला अडकवायची आयडीया आली.मग मी परत वर गेलो आणि जमेल तेवढं घर साफ करून घर अगदी टापटीप केलं."


उमेश खरच बोलतं होता तर मग मिहीकाला नक्की कोणी मारलं हा प्रश्न जसा तुम्हाला पडलाय तसा शरण्यालाही पडला होता.ह्याच उत्तर पुढच्या व अंतीम भागात मिळेल

🎭 Series Post

View all