दाग अच्छे है.. रहस्य कथा (भाग 1)

एका उच्चभ्रु सोसायटीत एका मॉडलेचा खुन होता ..कोणी केला असेल खून हे उलगडणारी रहस्य कथा

शरण्याला उठवायला आलेल्या शरण्याच्या आईने  बेडरूममध्ये पाहिलं तर खुर्चीवर पसरलेले कपडे होते.स्टडी टेबलाएवजी कागदपत्र ,पुस्तके  ड्रेसिंग टेबलावर होती आणि चार्जर, तिची बॅग ,तिचं आवडतं सॉफ्ट टॉय तिचा लोड हे बेडवर मस्त पसरेलेलं होतं. पुर्ण रूम एखाद्या कॉम्पुटर गेममधील रूम वाटत होती. ज्यात  नावानुसार पसाऱ्यातून वस्तू शोधावी लागते. हे पाहून रागाने शरण्याच्या आईने मुग्धाने रागाने विचारलं.


"शरण्या किती तो पसारा ठेवते रूममध्ये, अग! पोलीस स्टेशनमधलं तुझं टेबल ही असच असता का गं ? "

आईचा रागीट स्वर ऐकून शरण्याने तोंडावरच पांघरूण लगेच काढलं आणि आपला अजून काही वेळ झोपायचा बेत रहित केला आणि शरण्या पांघरूणातुन उठत लागीट स्वरात आईला म्हणाली.

"आई असं कसं ठेवेन मी ? मी सिनियर इन्स्पेक्टर आहे. माझी काही पोझिशन आहे की नाही."

"नाही ना..!जरा स्वत:च्या बेडरूमलाही आवराव करावी माणसाने. बाईचा हात लागला कि पुर्वी घरात लक्ष्मी येते म्हणायचे आणि तू अशी अस्तव्यस्त राहतेस." मुग्धा अजुनही पसाऱ्याकडे पाहत  रागीट स्वरात म्हणाली. शरण्यासाठी हे नेहमीचीच होतं म्हणून ती पटकन आईचं पुढचं लेक्चर टाळण्यासाठी बाथरूममध्ये पळाली.

शरण्या बोलणी चुकवण्यासाठी बाथरूममध्ये पळाली हे पाहून मुग्धाला अजूनच राग आला.ती शरण्याला अजून जोरात बडबडायला लागली.

"आमच्या वेळी आई समजवतं नाही बसायची तर रट्टे द्यायची आणि तुम्हा मुलांना आम्ही मारत नाही म्हणुन तुम्ही शेफारता."

"आई तू मला कसं मारलं असतं.तू सायकलॉजिस्ट आहेस.माणसाच्या मनाचे अजार तू बरोबर ओळखतेस. तुच म्हणायचीस ना ! मारलं की मुलांच्या मनावर  कायमचे आघात होतात. मग .." शरण्या आईची फिरकी घेत म्हणाली.

"हो आणि तुम्ही मुलं जेव्हा आमचं न ऐकून आमच्या मनावर आघात करता त्याचं काय..?आता मी क्लीनिकची तयारी करू का तुझी रूम आवरू ? मला जराही पसारा खपत नाही आणि तू अगदी माझ्या विरूद्ध..." मुग्धाने आता शरण्यावर टीपिकल इमोशनल ब्लैकमेलिंग करायला सुरवात केली.  सकाळी सकाळी सुरू झालेल्या ह्या इमोशनल अत्याचारमुळे वैतागलेली शरण्याने आईच्या गळ्यात पाठुन हात घालत म्हणाली,

"आई करते ग !रूम साफ, नको गं पिडु !आधीच क्राईम केसची कागदपत्र तयार करताना दमली होती. म्हणुन बिलकुल मन होतं नव्हत साफ सफाईच."

तशी मुग्धाने हसत शरण्याच्या गालाला हलकी चापट मारली आणि म्हणाली.

"जा ! ब्रेकफास्ट करून घे.मी आवरते रूम तुझी, पण एवढ लक्षात ठेव. लग्न झालं की आई साफसफाईला येणार नाही. मग तेव्हा काय करशील? "

"सिंपल ! हायर साफसफाई कंपनी, पण आवराआवरी इज नॉट  माय कप ऑफ टी." शरण्याने डायनिंग टेबलावर बसुन ब्रेड आमलेटचा रोल खात आईला धासू उत्तर दिलं.

शरण्याचे असं उलट उत्तर ऐकुन तर शरण्याची आई घडी करायला घेतलेली बेडशीट तशीच टाकुन तिला धपाटा घालयला रूममधून बाहेर आली .इतक्यात शरण्याचा फोन वाजला.

"हो परब बाई ..तुम्ही निघा..मर्डर स्पॉट माझ्या घरावरून  वीस एक मिनिटेच लांब आहे तर मी डायरेक्ट तिकडेच येते." फोनवर एवढं बोलुन शरण्या जरा अस्वस्थ झाली कारण हिल रोड हा जरा पॉश आणि उच्चभ्रु लोकांची वस्ती असलेला एरीया होता. तिकडे अचानक असं काही झालं म्हणजे मिडीया पोलीसांच्या सिक्युरिटीवर प्रश्नचिन्ह उभे करणार होती.

"आई येते ग! एका खुनाची केस आलीय."  असं म्हणुन शरण्या ब्रेड आमलेटचा रोल तोंडात टाकुन तयार व्हायला गेली.

खुनाची केस म्हटल्यावर मुलगी टेंशनमध्ये असणार हे उमजून मुग्धाने मुलीला सुनवण्यासाठीचे शब्द परत घशात गिळले.

इन्स्पेक्टर शरण्या क्राइम स्पाॅटवर गेली. अजुन वॅनमधुन तिचे सहकारी यायचे होते. तिने वॉचमनकडे चौकशी केली व त्याला खुन झाला तो फ्लॅट दाखवायला सांगितलं.

फ्लॅटच्या बाहेर गर्दी जमलेली, पण, पोलीस ऑफिसर आले म्हणुन लोक बाजुला सरकली. बिल्डींग त्रिकोणी आकारात बांधलेली होती आणि पाठी पर्कींग जागा होती व पुढे गार्डन व चाइल्ड ऐरीआ होता. प्रत्येक मजल्यावर फक्त चार फॅल्ट होते. दोन समोरासमोर आणि दोन  लिफ्टच्या इकडे थोडासा कोपऱ्यात.कॉरीडॉर  मात्र ऐसपैस मोठ होता. मर्डर झाला तो आणि बाकीचे बाजूकडचे दोन्ही फ्लॅट उघडे होते, पण  मर्डर स्पॉट झाला त्याच्या एकदम समोरचा एक फ्लॅट मात्र बंद होता. शरण्याच्या नजरेने ते घेरलं आणि तिला ते विचित्र वाटलं कारण फॅल्ट बंद असावा अशी फॅल्टच्या दरवाज्यावर काही चिन्ह नव्हती. ना उंबरठ्यावर धूळ, ना जुनं न वापरेलेल लॅच.सगळं अगदी चकाचक होतं.

तिने वॉचमनला विचारलं "एवढी मोठी घटना झाली आणि हा फ्लॅट बंद कसा? कोण राहत नाही का इकडे ?"

"रहता है  ना मॅडम ,एक साहब है देसाई नामका ओर उनकी पागल मिसेस स्वाती." शरण्याने वॉचमनचे म्हणणे ऐकून घेतले आणि ती मर्डर झालेल्या फॅल्टच्या आत गेली. तिने पाहिलं तर एक बाई आरामखुर्चीत बसलेली होती. सगळ घर अगदी चकाचक दिसत होतं.कोणीही म्हटलं नसतं इकडे खुन झालाय म्हणून.

प्रत्येक वस्तु अगदी जागेवर ठेवल्यासारखी टापटीप होती  पण, त्या बाईच्या जवळ जाऊन पाहिल तर तिच्या चेहऱ्यावर पॉलीथीनची पिशवी घट्ट बांधलेली होती.  तिचा चेहरा सांगत होता, मृत्यु श्वास गुदमरून झालाय मात्र स्वत:ला वाचवण्याकरता तिने काही हालचाल केली असावी असं दिसत नव्हतं.

शरण्याने अगदी जवळ जाऊन बघितलं तर तिला समजलं की बाईचे वय साधारण तिशीचे आहे.  बॉडीच्या अंगावर लॉंग निळा वनपिस होता, तसच मँचिंग निळ्या बांगड्या,निळ नेलपॉलिश आणि निळे दागिने.
महागड्या सेंटचा सुंगध अजुनही दरवळत होता जणु ती बाई डेडबॉडी नसुन आरामखुर्चीत पेंगणारी व्यक्ती असावी असं वाटत होतं.

इतक्यातच तिची टीमही तिकडे पोहचली, तिने ग्लोज घालुन बॉडीला हात लावला तर बॉडी थंड होती पण अजुन कडक नव्हती झाली, ह्याच्याअर्थ मृत्यु काही तासापुर्वीच झाला असणार असा एक निष्कर्ष शरण्याने स्वत:शीच काढला.

अँम्बुलस येऊन बॉडी घेउन गेली आणि मग शरण्याने पाहिले तर एवढा खुन होऊनही सगळ घर नको तेवढ टापटीपीत आहे, पण जेव्हा  हवलदार परब बाईंनी शुरॅक उघडला तर तो मात्र अगदीच अस्ताव्यस्त होता. मग शरण्याने  डेडबॉडी कोणी सर्वात आधी पाहीली ह्याची चौकशी सेक्रेटरीकडे सुरू केली.

त्यांनी सांगितल्याप्रमाणें त्यांच्याकडे काम करायला येणाऱ्या शांताने पहिल्यांदा बॉडी पाहिली होती. ती बॉडी मिहीका नावाच्या एका मॉडेल मुलीची होती. मिहीकाचं कुणाशी भांडण वैगरे काही होते का ह्याची चौकशी केल्यावर समजले, समोरच्या फ्लॅटमधील मिसेस देसाई यांच्याशी परवाच तिचं भांडण झालं होतं. मिसेस देसाई यांनी भांडण करताना चक्क गळा दाबला होता तिचा.


शरण्याने अजुन काही  माहिती मिळते का ह्याची चौकशी करण्यासाठी शांता मोलकरणीला बोलवलंआणि मग परबबाईने तिचं स्टेटमेंट घ्यायला सुरवात केली

"शांता तू किती वाजता सोसायटीत येतेस?" परब बाईंनी विचारलं

"मी आठ वाजता येते."शांताने उत्तर दिलं

"मिहीकाची बॉडी किती वाजता पाहिली?"परब बाईने विचारले.

"मी नऊ वाजता मिहीका मॅडमच्या फ्लॅटमध्ये आली. पाहिल तरं मॅडम आरामखुर्चीत बसलेल्या दिसल्या. मी किचनमध्ये झाडू घ्यायला जात असताना त्यांच्या खुर्चीजवळुन गेली.

पहिल्यांदा नाही समजलं, पण मग पाहीलं तर पिशवी त्यांच्या तोंडावर होती.ते पाहुन मी घाबरले आणि मी किंचाळतच बाहेर आली. मग मी बाजुच्या करमरकर साहेबांकडे बेल वाजवून काय झालं ते सांगितलं.मग ते आले आणि  त्यांनी पोलीसांना आणि सेक्रेटरी यांना फोन केला." हे बाेलतानाही शांताला तो प्रसंग आठवूनही तिला घाम फुटलाय असं परब बाईंना जाणवलं.त्या तिच्या देहबोलीवरून शांता किती खर बोलत आहे ते पाहत होत्या.

"शांता मिहीका कशी मुलगी होती ?" परब बाईने विचारलं.

"मॅडम खुपच घमेंडखोर होत्या तेवढ्याच घाणेरड्याही. घर नुसत अस्तव्यस्त ठेवायच्या मग मलाच आवराआवर लागायच.लादी करताना, केर काढताना कपडे ,बॅगा मीच उचलुन सोफ्यावर ठेवायची." नुसता वैताग,  पण आज घर ..." शांता बोलता बोलता थांबली.


"घर ...काय ?वाक्य पुर्ण कर.तुला माहीत असलेल सगळं सांग.नाहीतर खुनाच्या केसमध्ये अडकशील." परब बाई दटावत म्हणाल्या.

"आज घर एकदम टापटीप होतं .अगदी त्या स्वाती मॅडमच्या घरासारखं. बाकी मला काही माहीत नाही.मॅडम मी गरीब आहे.मला ह्यात अडकवू नका. " एवढं म्हणुन शांताने एकदम परब बाईंचे पाय पकडले.

ते पाहुन शरण्याने शांताबाईला उभं केलं आणि सोफ्यावर बसवत म्हणाली.

" शांत हो!कोणी तुला अडकवत नाही .जर तू खर खर सांगितलं तर.मला सांग शांता !घरी कोण यायचं का?मिहीकाचा बॉयफ्रेंड किंवा मित्र मैत्रिणी. "

"मी  काम करत असताना तर कोण यायच नाही. नंतरच मला नाय माहिती." शांताने माहिती दिली़.मग शरण्याने शांताला जायला सांगितलं.

शरण्याने सगळ घर चेक केलं. घरात सगळ्याच वस्तू टापटीप होत्या, पण फक्त बाहेरून. जेव्हा तिने व टिमने बंद कपाटे उघडली तेव्हा कुठे कपड्यांचा ढीगच कोसळला, तर कुठे डबे आणि इतर वस्तू अस्तव्यस्त पडल्या होत्या. ह्याचा अर्थ घर कदाचित खुन्याने आवरलं असाव असा अंदाज शरण्याने काढला. इतक्यात फॉरेनसिक माणुस अमरने त्याच काम सपंल्याच जाहीर केलं आणि जाताना म्हणाला ,

" बाहेरच्या वस्तुवर एकही फिंगरप्रिंट्स नाही आहेत, अगदी विक्टीमचेही. मॅडम घरही अगदीच साफ आहे. डेड बॉडी पाहता व्हिक्टीमला आधी गुंगी देऊन बेशुद्ध केलंय.मग मारलयं.तरी कश्याने तरी शरीरात गेलं असावं हेच कळत नाही आहे."

शरण्याने ओके म्हणुन मान हलवली आणि मग सोसायटीच्या ऑफिसात जाउन बसली.


खरच मिसेस देसाई असतील का खुनी हे पाहण्यासाठी कथेचा सोबत रहा

🎭 Series Post

View all