पांडव - fantastic five⭐
भाग ६०
भाग ६०
(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)
आतापर्यंत आपण वाचले -
त्याची कार्डवरची भिरभिरती नजर कॉकटेल लाउंज एरियात उभ्या मिक्सोलोजिस्ट(जो कॉकटेल बनवतो.) त्याच्याकडे गेली. त्याने असिस्टंट मॅनेजरला डोळ्यांनीच आश्वस्त केले.
"सर, मी स्वतः तुमचं स्पेशल ड्रिंक प्रिपेर करून आणतो. ट्रस्ट मी. यू विल डेफिनेटली लव्ह इट." अचानक त्या असिस्टंट मॅनेजरच्या डोळ्यातून ओसंडून वाहणारा कॉन्फिडन्स बघून स्वामीने त्याला परवानगी दिली आणि सोबत त्याची नजर जिथे जात होती ती व्यक्ती ही नोटीस केली.
\" हा इथे.\" मनातले विचार स्वामीने तोंडावर दाखवले नाहीत.
_______________________________________________________
आता पुढे -
ठिकाण : सांजच घर
आज संपूर्ण दिवसात अग्नेय कामाव्यतिरिक्त सांजच्या समोर उभा सुद्धा राहिला नव्हता. त्याने तिला टाळलं नव्हतं; पण त्याच अलिप्त राहणं, तिच्या मनाला का कोण जाणे खटकत होतं.
त्याने जेव्हा तिच्याकडे कनफेस केलं; तेव्हा कोणतीच भावना तिच्या मनात नव्हती. होत ते फक्त आश्चर्य.
त्या रात्री मारलेली ती मिठी, डोक्यावरून केसातून मायेने फिरणारा हात आणि छातीशी घट्ट कवटाळणारा आश्वासक दुसऱ्या हाताचा स्पर्श यात कुठेही वासना किंवा दुर्भावना नव्हती आणि असती तर हे तिला त्या वेळीच जाणवलं असतं. तसं नव्हतं म्हणून तर तिला इतकं सिक्युर फिल झालं. त्यात होती ती फक्त आश्वासकता.
तो तिथे असताना तिला हात लावताना यमालाही शंभर वेळा विचार करायला हवा, असा कॉन्फिडन्सने ओथंबून गेलेला तो स्पर्श.
फक्त तिला याची तसूभरही कल्पना नव्हती; की ती व्यक्ती तो असेल. हा तिच्यासाठी धक्का होता, अस म्हणता येणार नाही; पण आश्चर्याची गोष्ट नक्कीच होती. तिची काहीही ओळख नसताना त्याला तिच्याबद्दल एवढी आत्मीयता, एवढी ममता का वाटावी? की तो नाटक करत होता त्यावेळी. अशी शक्यता वाटणं ही चुकीचं आहे. ती तो स्पर्श आणि त्या स्पर्शातून मिळालेली ऊब कधीच विसरू शकणार नव्हती.
ते स्वप्न लक्षात राहण्यासाठी तो स्पर्श एक दुवा ठरला; ही शक्यता नाकारता येणार नाही.
तिला लहानपणापासून अश्या वातावरणात आजोनी वाढवली होती; की ज्यात तिला चुकीचा स्पर्श हा लगेच लक्षात यायचा.
आज सांजला मनात का कोण जाणे, सारखे अग्नेयचे विचार येत होते. तिला सतत तिच्यासमोर सगळी घटना दिसत होती. तिच्या डोळ्यात डोळे घालून बघत कबूल करणारा अग्नेय आठवतं होता.
ऑफिस मधून आल्यावर सगळं आवरताना किंवा जेवताना घरात तिची नजर त्यालाच शोधत होती. तरीही एकदाही तो दिसला नव्हता.
तिने आजोंना विचारलं ही,
" आजो, तुमचा फेवरेट पेईंग गेस्ट कुठे आहे? आज त्याचा फास्ट आहे की आधीच बाहेरून जेवून आलाय ? आणि हे घरात सांगायची पद्धत असते. या साहेबांना कोणी शिकवली नाही का?" ती उगाचच त्याची माहिती काढावी म्हणून आजोंच्या पुढ्यात डाफरली.
" ??" आजोंनी एक आय ब्रो रेझ केली.
" तुला नक्की काय विचारायचं आहे?" त्यांनी थेट तिला आय कॉन्टॅक्ट ठेवत विचारलं.
" मघाशी काय मी हवेशी बोलतं होते की काय? कमाल करता तुम्ही." तीही आता मुरलेली कॉप होती. त्यांच्या शब्दात काय डोळ्यातही सापडणं कठीण.
" तो असेल त्याच्या खोलीत. आला तेव्हाच मला म्हणाला होता की; जेवण नको आणि तसंही आज माझा जेवण करायचा टर्न होता. त्यामुळे त्याने मला सांगणं पुरेस आहे." आजो अजूनही तिचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करत होते.
" व्हॉट एवर." असं म्हणत तिने बेफिकरिने खांदे उडवले खरे; पर दिल में तो उसकी फिक्र ने हडकंप मचा रखा था|
तो का? ते माहीत नव्हतंच आणि तो हडकंप आहे हे तिला कबूलही करायचं नव्हतं.
ती या पुढचं जेवण मुकाट्याने जेवून आवरून झोपायला गेली.
_______________________________________________________
तो कोणत्या मनस्थितीत होता त्याचं त्यालाच माहीत नाही. मनात काय सुरु होतं त्याचं त्यालाच उमजत नव्हतं.
टेबल वरच्या नाईट लॅम्पच्या प्रकाशात तो त्याचा अल्बम चाळत होता. त्यात जास्ती करून त्याचे अवॉर्ड्स सेरेमनीचे फोटो. सुरुवातीच्या काही काळातले डॉक्टर लोबो आणि मदर मेरी रेहबिलेशन सेंटरच्या स्टाफ बरोबरचे फोटोज पण होते. मिराच्या बरोबर त्याने बरेच फोटो हट्टाने काढून घेतले होते.
\"ती मला विसरेल…. ती मला विसरत आहे……. तिला मी आता आठवत नाही……..\" अश्या असंख्य विचारांनी क्षणोक्षणी धास्तावलेले त्याचे मन; तिच्या बरोबरचा प्रत्येक क्षण त्याला जपायला भाग पाडत होते.
हातात एक ग्रुप फोटो ज्यात तिच्याजवळ उभ राहायला मिळणार म्हणून फोटो काढायला तयार झालेला तो ..
तिच्या अगदी शेजारी उभा राहिला होता. तिच्याही नकळत हात मागेच ठेवून, त्या हातात तिचा पदर घट्ट पकडला होता त्याने…. डोळे तिच्या चेहऱ्यावरच्या हसुवर खिळलेले. कॅमेरामॅनने तो क्षण अगदी नेमका कॅप्चर केला.
तोच फोटो पाहत डोळे भरून आले त्याचे. डोळ्यातून बाहेर येऊ पाहणारे अश्रू; उपड्या हाताने पुसत त्याने त्यांना थोपावले. त्याच्या थोपवण्याच्या प्रयत्नाची त्या अश्रूंना ही सवय झाली होती. ते कधी कधी तर बाहेर पडायचा प्रयत्नही करत नसतं.
बेड वर पाठमोरा बसलेला अग्नेय तिला, रुमच्या अर्धवट उघड्या दारातून दिसला. आत जाऊ की नको या प्रश्नात नकाराने विजय मिळवला आणि तिची पावले तिच्या खोलीच्या दिशेने वळली.
_______________________________________________________
ठिकाण: सांजची प्रायव्हेट जिम
सांज नॉर्मल रूटीन एक्सरसाईज करून शीर्षासन करत होती. तरीही तिचं लक्ष ट्रेडमिल वर धावणाऱ्या अग्नेयवर होतं.
त्या दिवसापासून ( सांज, नंदू आणि अग्नेय यांनी एकत्र वर्कआऊट केलेल्या दिवसापासून) अग्नेय इथेच त्याचं जिम रूटीन कंप्लीट करायचा. त्याने त्यासाठी तिची कधीही परमिशन मागितली नाही; की तिने कधी त्याला रोखले नाही.
आज ही तो तेच करत होता; पण त्याचा स्पीड नेहमी पेक्षा खूप जास्त होता. तिचं लक्ष त्याच्या या धावपळीवरच होते.
ही धावपळ करूनही त्याच्या जीवाला शांतता मिळाली नाही. त्याने तिथला वेग हळूहळू नॉर्मलला आणत ट्रेडमिलवरून उतरून पंचींग बॅगवर आपला राग काढायला सुरुवात केली.
एक एक पंच, एवढ्या जोरात होता; की बॅग कधीही फुटून त्यातून स्टफ्फिंग बाहेर येईल असे वाटत होते. त्याच्या हातात ग्लोव्हज नसल्यामुळे मुठीतुन रक्त यायला सुरुवात झाली होती.
आता मात्र सांजला काळजी वाटू लागली आणि ती शीर्षासन थांबवून त्याच्या दिशेने निघाली.
जोरात येणारा पंच तिने पंचिंग बॅग सकट चुकवला आणि एक जोरदार बॅक पंच त्याला मारला; तो क्षणभर तिच्याकडे \" व्हॉट द हेल?\" असा प्रश्न डोळ्यांनी विचारत तसाच धुसफूसत तिला पाहत उभा राहिला.
आता मात्र दोघांनी आक्रमक पवित्रा घेत किक बॉक्सिंगला सुरुवात केली. तिने जेवढ्या त्वेषाने त्याला पंच मारला; त्याचं स्पीडने त्याचा बॅक स्ट्रोक आला.
तिचं फाईटिंग स्किल माहित असलेला तो आज तिला आजमावत होता.
दोघेही काही कमी नव्हते. आता पंचेसची जागा लो किक्सने घेतली होती. बऱ्याच वेळच्या फाईट नंतर दोघेही घामाघूम झाले होते. अग्नेयने तिची मान पाठीमागून हाताच्या फासात अडकवून तिला ब्लॉक केलं होतं तीही काही कमी नव्हती. ती तेवढ्याच निकराने त्याला तो फास घट्ट करण्यापासून रोखत होती.
अखेर तिने पूर्ण ताकदीनिशी खाली वाकून त्याला पाठीवर उचलले आणि दाणदिशी त्याचा धोबीपछाड केला; पण तसं करताना त्याच्या हाताच्या पकडीत तिची मान असल्याने तीही खाली थोडीशी वाकली.
दमल्याने आणि पाठीवर पडल्याने तो तसाच पडून डोळे मिटून राहिला आणि नंतर त्याच्या चेहऱ्यावर हळूहळू हलक हलक मंद स्मित येऊ लागलं.
तिची स्थितीही काही फारशी वेगळी नव्हती. त्याला हसताना बघून तीही तिथेच थपकल मारून हसत बसली आणि नंतर आहे त्या स्थितीतच पाठीवर पडून झोपली. हसू तर दोघांच्याही चेहऱ्यावर रेंगाळले होते.त्याचं डोकं तिच्या डोक्याच्या जवळ आणि दोघांचे देह विरुद्ध दिशेला अश्या अवस्थेत सीलिंग कडे बघत दोघे थोडा वेळ विचार करत तसेच पडून राहिले.
बोलणं काहीच झालं नव्हतं आणि दोघांकडे ही बोलायला काही नव्हतं. वाटतं मात्र होतं मनाला की; समोरचा काहीतरी बोलायला हवा होता.
मनाशी काही निश्चय करून थोड्यावेळाने दोघेही तिथून उठले.
तो जिमच्या बाहेर जाऊ लागताच तिने त्याचा हात धरला. त्याने न कळून तिच्याकडे पाहिले आणि प्रश्नार्थक एक भुवई उंचावली.
तिने त्याचं लक्ष त्याच्या हाताला झालेल्या जखमेवर वळवलं आणि त्याला ओढत तिथे जवळच असलेल्या सीटिंग अरेंजमेंटकडे घेऊन गेली. जाताना सोबत तिथला जवळचा फर्स्ट एड बॉक्स घ्यायला ती विसरली नाही.
_______________________________________________________
ठिकाण : देवेशच ऑफिस
कोणत्याही नॉक शिवाय दार धाडकन ढकलल गेलं; तसं देवेशने समोरच्या व्यक्तीकडे आश्चर्याने बघितलं.
समोरच्या व्यक्तीकडनं त्याला अशी अपेक्षा नव्हती; पण आज त्या व्यक्तीचा रोख काही वेगळाच होता.
"जर त्याला तिथे पाठवायचं होतं तर मला का या कामावर नेमलं" त्याचा राग देवेशवर निघाला.
©® स्वर्णा.
_______________________________________________________
कथानक आवडतं असेल तर नक्की माझ्या अकाउंटचे अनुसरण करा.
समीक्षा म्हणजेच कमेंट द्यायला विसरू नका.
मनःपूर्वक आभार.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा