पांडव - fantastic five⭐
भाग ५९
भाग ५९
(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)
आतापर्यंत आपण वाचले -
" हॅलो."
पलीकडचे संभाषण काही कळतं नव्हतं.
" बरं ठीक आहे." एवढच बोलून तिने फोन ठेवला.
"चल मी निघते. आजो वाट बघत असतील." तिने त्याला काहीही बोलायची संधी न देता गाडीत बसून ती स्टार्ट ही केली.
त्याला तिच्या चेहऱ्यातला बदल जाणवला ही तरी त्याने तिला ते जाणवू दिलं नाही.
एका पाठोपाठ एक दोन गाड्या निघाल्या.
एक सांजची आणि दुसरी नंदूची.
\" हा रस्ता तर डार्लिंगच्या घराच्या दिशेने जात नाही आहे. हा तर जातोय ……..\" नंदू तिच्याही नकळत व्यवस्थित तिचा पाठलाग करत होता.
आणि त्यामुळेच त्याला कळले होते; की सांज कुठे जात होती.
_______________________________________________________
आता पुढे -
ठिकाण: मदर मेरी हॉस्पिटल अँड रेहाबिलेशन सेंटर.
"मी आलेय." गाडीचा दरवाजा बंद करत ती बाहेर आली. एवढं बोलून तिने फोन ठेवला.
\" यांनी मला इथे का बोलावले आणि बॉस इथे करतायत का ? ते मीरा मावशीला भेटायला तर आले नसतील ?\" विचारात अडकलेली सांज रेहाबिलेशन सेंटरमध्ये शिरली.
\"बरेच दिवस झाले कामाच्या व्यापात आणि या धावपळीत मी त्या दोघांची चौकशी करू शकले नाही. ज्या अर्थी बॉसनी मला इथून फोन केला आहे, त्या अर्थी त्यांची व मीरा मावशीची भेट झाली आहे असं दिसतंय.\" ती तिच्या विचारत एवढी गुंतली होती की, तिच्या पाठीमागून चोर पावलांनी येणारा नंदू तिला जाणवला ही नाही. त्याने तशी खबरदारी घेतली होती.
सांज चालत चालत एम्पलोयी क्वार्टर्सच्या दिशेने निघाली.
\" इकडे कुठे जाते ही? आणि एवढ्या रात्री हिला कोणाला भेटायचं आहे? मीरा मावशी तर हॉस्पिटलच्या वार्डमध्ये राहतात आणि ते वॉर्ड याच्या विरुद्ध दिशेला आहेत. मग इतक्या रात्री असा कोणाचा फोन हिला आल मी माधवला तो नंबर सुद्धा ट्रेस करायला सांगितला होता; पण त्या नंबरची जास्त इन्फॉर्मेशन मिळाली नाही. कोणी तरी व्ही आय पी नंबर वापरला होता; कोण असेल ते बघितल्यावर कळेलच.\" नंदू सावध रीतीने तिचा पाठलाग करत होता.
तिने एका खोलीचे दार वाजवले. थोड्या वेळातच आतून दाराच्या दिशेने येणाऱ्या पावलांचा आवाज तिच्या कानी पडला.
दारं उघडताच तिने समोरच्या व्यक्तीकडे बघून स्माईल केलं.
"ये ग. सॉरी, तुला इतक्या उशिरा बोलावलं. ये ना आत ये. अशी दारात उभी का?" मोहननी दारात उभ्या सांजचे स्वागत केले.
"आणि हो! आत येताना तुझ्या सावलीलाही आत घेऊन ये." खोलीत जाण्यासाठी वळलेले मोहन मिश्किलपणें हसत सांजला म्हणाले.
तशी शूज काढणारी सांज ही हसली.
" बडी, कम." तिने अस म्हणताच अवघडलेल्या चेहऱ्याने नंदू जिथे लपला होता, तिथून बाहेर आला आणि शूज रूमच्या बाहेर काढून त्या दोघांच्या पाठोपाठ रूममध्ये शिरला.
तिघेही खोलीत असलेल्या छोट्याश्या बैठक व्यवस्थेवर बसले.
कुठून सुरुवात करावी अश्या विचारात असणाऱ्या मोहन नी अवघडलेल्या अवस्थेत नंदू आणि सांजकडे पाहिले.
सांजला त्यांच्या आणि मीरा बद्दल माहीत होतेच; (काही महत्त्वाचे मुद्दे म्हणजेच अग्नेय सोडून) पण नंदुला काय आणि कुठपर्यंत माहीत आहे याचा अंदाज त्यांना येत नव्हता.
शेवटी अग्नेय हा विषय वगळून आपण या दोघांशी बोलूया असं त्यांनी ठरवलं. खरतर त्यांना एकट्या सांजशी अग्नेय विषयीच बोलायचं होतं. ते काही आज शक्य नाही असं दिसून येताच त्यांनी एका दीर्घ विरामाने बोलायला सुरुवात केली.
" मी आता इथेच राहणार आहे."
" तुम्ही माव…..मॅम ना भेटलात का?" तोंडातून येणारे मावशी सांजने वाटेतच अडवून गिळले.
" सांज, मी तुला या आधीही कितीतरी वेळा सांगितलं आहे; की ऑफिसच्या बाहेर तू मला बॉस म्हणायची गरज नाही. मी तुझ्या वडिलांचा मित्र होतो आणि नेहमीच राहीन त्या नात्याने तू मला काका आणि मीराला मावशी म्हटलीस तरी माझी हरकत नाही." ते हसत म्हणाले तशी सांज ही हसली.
"हो, भेटलो आम्ही; पण……" ते पुढचं बोलू शकले नाहीत. उठून शांतपणे खिडकीत जाऊन उभे राहिले.
" सगळं नीट होईल, तुम्ही नका काळजी करू." सांज काहीतरी बोलावं म्हणून बोलली. तिच्या मनात त्यांना विचारायला असंख्य प्रश्न होते; पण आता ते विचारणे योग्य नाही हे ही तिला माहित होतं.
" ओके बॉस. आम्ही निघतो. आजो वाट पाहत असतील. आता तुम्ही इथे आहात हे समजले आहे तर येतंच राहू." सांज उठता उठता बोलली.
" नको!" बॉस जवळपास ओरडले
त्यांच्या किंचाळण्याने नंदू आणि सांज दोघेही घाबरले.
त्यांना असं घाबरलेले पाहून बॉसनी सारवासारव करायला सुरुवात केली.
"तसं नव्हे. तुमच्या कामाच्या दगदगीत तुम्हाला वेळ मिळणं कठीण होतं. हे मला माहित आहे आणि मला तसं वाटलं तर मीही तुम्हाला फोन करून बोलवून घेइन इथे. कस आहे, माझंही कामाचं शेड्युल नीट बसलेलं नाही. त्यामुळे मी तुम्ही आल्यावर वेळ देऊ शकेल असं नाही. समजून घ्या. मी आज तुला इथे बोलावलं कारण मी इथे आहे हे तुला मला सांगायचं होतं. त्याचं बरोबर तुम्ही सध्या जी केस सोडवत आहात, ती खूपच हाई प्रोफाइल केस आहे. काही मदत लागली किंवा कुठे ओळख लागली तर बिनधास्त सांगा. माझी सीबीआयच्या बाहेरही बरीच माणसं आहेत." बॉसची वाक्य आणि त्यांच्या हावभावांना सॅटिस्फाय करत नव्हती. ते बोलते होते एक आणि त्यांचे हावभाव दुसरंच काही सांगत होते; पण नंदू आणि सांज दोघेही जास्त खोलात न शिरता मानेनेच होकार देऊन तिथून निघाले.
"बॉसच वागणं, तुला खटकलं का ग? आय थिंक मी यायला नको होतं तुझ्याबरोबर; पण तूही असा चेहरा करून, न सांगता निघालीस. मग मला राहवलं नाही." नंदू गाडीच्या दिशेने जाताना मन खाली घालून सांजला विचारलं.
"हो. मला खटकलं; पण त्यांचं काहीतरी स्वतःचं कारण असू शकतं. तू बडी! तुला सगळं कळतं तरीही कधी कधी इम्पेशंट असल्यासारखा वागतोस. जाऊ दे चल आपण घरी जाऊ." सांज मनात मात्र हाच विचार करत निघाली.
_______________________________________________________
ठिकाण: ड्युरेता क्लब
हिरवळीने भरलेलं लॉन, गोल्फ कोर्स लॅविश
प्रिमायसेस, एक मोठं स्विमिंग पूल आणि सगळं क्लीन तर एवढं की बघणाऱ्याच मन इथून जायलाच होणार नाही. कोणाला खरं वाटणारं नाही की अश्या ठिकाणी क्रिमिनल ॲक्टिव्हिटी सुरू आहेत.
एक लक्झरियस ब्लॅक बुगाटीला व्होईचर नॉइर त्या प्रिमायासेस मध्ये शिरली. पार्किंग मध्ये आधीच लक्झरियस कार्सची कमी नव्हती.
एक ब्लॅक टक्सिडो घातलेला आणि ब्लॅक गॉगल्स लावलेला असा टॉल, डार्क अँड हँडसम त्या गाडीतून उतरला.
( ओह नो ! मी ओळखलच नाही. ही इज एम स्वामी.)
त्याने क्लब इंत्रन्स मधून एंटर करताच तिथला मॅनेजर त्याच्या जवळ धावतच आला.
" वेलकम मिस्टर स्वामी. वी आर ऑनर्ड टू हॅव यू हियर." मॅनेजरने स्वामी बरोबर हॅण्ड शेक केले.
"..." स्वामी काही न बोलता मंद हसत होता.
स्वामीला लीड करत मॅनेजर वीवीआयपी एरियात असलेल्या बार एंड डायनिंग सेक्शनमध्ये घेऊन गेला.
स्वामीला या सर्वांची चांगलीच सवय असल्याने तो अगदी निर्धास्तपणे मॅनेजरच्या
मागून जात होता.
त्याचे एक्स्प्रेशन, त्याची स्टाईल सगळच तिथे असलेल्या प्रत्येकाचं अट्ट्रॅक्शन सिक करत होतं. तो मात्र या कशाची तमा न बाळगता, आजुबाजूच वातावरण एन्जॉय करत होता.
या सगळ्यात त्याने टीम लॉरीच्या प्रेझेनस नोट करून ठेवला. आज तो फक्त टीमच निरिक्षण करणार होता. तेहि त्याला संशय येऊ न देता.
स्वामीने बसायला अशी जागा निवडली; की जिथून टीमला तो आणि त्याला टीम सहज दिसू शकेल. त्याचबरोबर टीमला त्याचा संशय ही येणार नाही.
स्वामी काऊचवर बसताच मॅनेजरने त्याच्याकडे असलेलं स्पेशल वाइन एडिशनच मेनू कार्ड दाखवलं.
ते हातात घेत स्वामीने त्याच्या लिस्टवर नजर फिरवायला सुरुवात केली.
"मी काही सजेस्ट करू का?" तिथे नवीनच जॉईन झालेल्या असिस्टंट मॅनेजरने मध्येच येत विचारलं.
त्याने या दोघांनाही आत येताना लक्षपूर्वक पहिलं होतं. स्वतः मॅनेजर जर या गेस्टची बडदास्त ठेवत आहे, तर आपण कशाला मागे रहा.
\" लेट्स कलेक्ट, सम ब्राऊनी पॉइंट्स.\" असा विचार करत तो पुढे आला होता.
त्याच्या वाक्याने मॅनेजर मात्र चिडला; पण स्वामी समोर काही बोलू शकला नाही. स्वामीने त्या असिस्टंट मॅनेजरकडे असे पाहिले, जसे की तो एक लहान मुलगा आहे.
\" बघू तरी हा काय सजेस्ट करतो?\" असा विचार करत स्वामीने हातातलं कार्ड त्याच्या दिशेने सरकवल.
आता मात्र तो असिस्टंट मॅनेजर प्रेशर खाली आला.
त्याने घाबरतच कार्ड ओपन केलं आणि उगीचच त्यावर नजर फिरवत विचार करायचं नाटक करू लागला.
त्याची कार्डवरची भिरभिरती नजर कॉकटेल लाउंज एरियात उभ्या मिक्सोलोजिस्ट(जो कॉकटेल बनवतो.) त्याच्याकडे गेली. त्याने असिस्टंट मॅनेजरला डोळ्यांनीच आश्वस्त केले.
"सर, मी स्वतः तुमचं स्पेशल ड्रिंक प्रिपेर करून आणतो. ट्रस्ट मी. यू विल डेफिनेटली लव्ह इट."अचानक त्या असिस्टंट मॅनेजरच्या डोळ्यातून ओसंडून वाहणारा कॉन्फिडन्स बघून स्वामीने त्याला परवानगी दिली आणि सोबत त्याची नजर जिथे जात होती ती व्यक्ती ही नोटीस केली.
\" हा इथे.\" मनातले विचार स्वामीने तोंडावर दाखवले नाहीत.
©® स्वर्णा.
_______________________________________________________
कथानक आवडतं असेल तर नक्की माझ्या अकाउंटचे अनुसरण करा. समीक्षा द्यायला विसरू नका.
मनःपूर्वक आभार.
.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा