भाग ५८
(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)
आतापर्यंत आपण वाचले -
पांडव अँक्शन प्लॅन बनवत आहेत. नवीन पात्राची एन्ट्री झाली आहे.
\" टीम लॉरी.\"
कोण आहे हा?
स्वामीवरच ही जबाबदारी देवेशने का दिली?
स्वामी ही जबाबदारी स्वीकारेल का?
\" टीम लॉरी.\"
कोण आहे हा?
स्वामीवरच ही जबाबदारी देवेशने का दिली?
स्वामी ही जबाबदारी स्वीकारेल का?
" आणि याच पत्रातून अयुला माझ्या आणि मिराच्या नात्याबद्दल कळलं आणि की निनावी पत्रे होती ती त्याने लिहिली." आता मोहनना अजूनच चित्र स्पष्ट होत होतं.
" हो. तिने ती पत्रे गरोदर असतानाच्या काळात लिहिली. ती पोष्टात देण्यासाठी मीरा कितीतरी वेळा माझ्याकडे घेऊनही आली; पण प्रत्येक वेळी तिनेच तसे करण्यापासून मला रोखले." आता प्रश्न लोबोंच्या डोळ्यात होते.
" मीच त्याला कारण आहे." मोहननी मान खाली घातली." तेव्हा तिला माझी किती गरज होती. तिला किती तरी गोष्टी मला सांगायच्या असतील; पण मीच तिला तसे करण्यापासून रोखले." मोहननी केबिनच्या खिडकीतून दूर डोळ्यातली आसवं लपवली.
_______________________________________________________
आता पुढे -
ठिकाण :मदर मेरी हॉस्पिटल अँड रेहाबिलेशन सेंटर.
"आणि आता मला तिच्याकडून किती गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत; तर ती हा अनोळखी अबोला धरून मला छळते."मोहनचे शब्द जड झाले होते.
"ती काय छळणार?"लोबोंच्या स्वरात नाराजी होती.
"ती जेव्हा इथे आली, तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं की; ती प्रेग्नेंट आहे. एक सेविका म्हणून तिने इथे राहायचं ठरवलं खूप हेल्प होतं होती तिची आम्हांला. कधी ती आमची फॅमिली बनली कळलंच नाही." लोबो खुर्चीतून उठून खिडकीत जाऊन उभे राहिले.
"आमच्या चेहऱ्यावर आनंद पसरवताना ती मात्र या फाऊंटन पाशी आपलं दुःख मोकळं करायची. मला रोज रात्री ती तिथे एकटी उभी दिसायची." लोबो खिडकीतून दिसणाऱ्या फाऊंटनकडे पाहत म्हणाले.
"तुम्ही कधी तिला विचारलं नाहीत का?" मोहन थोडेसे अपराधी स्वरात म्हणाले.
"काय विचारणार? तिच्या प्रेगनन्सीची लक्षणं तर दिसू लागली होती मला आणि हे ही चांगलच माहीत होतं; की शी वॉज अनमॅरिड. मी सगळ्या स्टाफला सांगितलं होतं. तिच्या मनाला जपा. तिच्या पास्टबद्दल कोणीही तिला काही विचारायचं नाही आणि मीही हे नियम पाळले. "
" आय एम सॉरी; पण जेवढा अग्नेयला तुमचा राग येतो तेवढाच किंवा त्याहून जरा कमी. मला ही येतो." आता लोबोंचा स्वर जरा चढला होता.
" नो निड टू से सॉरी. तुम्ही दोघेही तुमच्या जागी बरोबर आहात आणि मीही. नाही मी बरोबर आहे की चूक आहे; हे आता माझं मलाच कळत नाही. एक काळ होता. जेव्हा मला माझा निर्णय बरोबर वाटत होता; पण आता वाटतंय, मी माझ्या आयुष्यातली अक्षम्य चूक करून बसलो आहे आणि त्याची शिक्षा नंतर नाही; तर देव आताच मला देतोय. स्वतःचं कुटुंब असूनही एकटेपणा काय असतो, हे मला चांगलेच लक्षात येते. अयु, तो त्याच्या जागी बरोबरच आहे. त्याचं दुःख, त्याचा क्षोभ, त्याला होणाऱ्या वेदना मी कमी कधीही भरून काढू शकत नाही; पण भूतकाळात मागे जाण्यापेक्षा त्याच्या सावलीतून वर्तमान काळाला बाहेर काढून तो मोकळेपणाने जगावा. जेणेकरून अयुच्या भविष्यावर त्याची सावली पडणार नाही." मोहनच्या चेहऱ्यावर स्पष्ट अपराधीपणाच्या छटा दिसत होत्या.
" डॉक्टर लोबो, मी विचारणे चूक आहे; पण तरी विचारतो अयुच्या लहानपणीचे काही फोटो आहेत का? मला बघायचे होते."मोहनची नजर अस्थिर आणि शब्द कचरत तोंडातून बाहेर पडत होते.
"फोटो तसे फार नाही होते आणि जे काही होते ते अग्नेयकडे आहेत. का कोण जाणे? त्याने मागच्या काही वर्षात इथला त्याचा सगळा डाटा स्वतःच्या ताब्यात घेतला. आय एम सॉरी. मी यात तुमची काहीच मदत करू शकत नाही." लोबो म्हणाले, तसे मोहन भकास हसले.
"बापावर गेला आहे तो. त्याला अंदाज होता; की मी त्याची माहिती मिळवायचा प्रयत्न करणारं. हा सगळा खटाटोप त्यासाठी होता." खिन्न मनाने मोहन लोबोंच्या केबिन मधून बाहेर पडले.
_______________________________________________________
ठिकाण: सीबीआय हेड क्वार्टर
सगळे आता आश्चर्याने स्वामीकडे बघत होते.
"येस. आय एक्सेप्ट धिस टास्क."स्वामी प्राउडली म्हणाला.
अग्नेय जरा साशंकतेने त्याच्याकडे बघत होता.
" आय कान्ट बिलिव इट. स्वामी आर यू शुअर. सॉरी तू मनाला नको लावून घेऊस. मला असं वाटतं; कारण ऑफिस गॅदरिंग मध्ये कधीही एक स्मॉल शॉटच्या पुढे न जाणारा तू. सर?" माधव अविश्र्वासाने देवेशकडे पाहिले.
देवेश काही बोलणार तेवढ्यात स्वामीने त्याला थांबवलं आणि बोलू लागला,
"लेट मी इंट्रो ड्युस माय सेल्फ प्रॉपरली.
मी एम. स्वामी. सन ऑफ बालाजी स्वामी; ओनर ऑफ बिग वाइनरी फार्म एम. वाईन्स." स्वामी जसा एक एक वाक्य उच्चारत होता तसे पांडवचे चेहरे बघण्यासारखे झाले होते.
मी एम. स्वामी. सन ऑफ बालाजी स्वामी; ओनर ऑफ बिग वाइनरी फार्म एम. वाईन्स." स्वामी जसा एक एक वाक्य उच्चारत होता तसे पांडवचे चेहरे बघण्यासारखे झाले होते.
" व्हॉट द एम वाईन्स? म्हणजे तेच जे आपल्याकडचे नो. १ एक्सपोटर आहेत. ज्यांच्याकडे खूप सारी वाइन पेटंट आहेत?" ज्युलियाने विचारताच स्वामीने मानेने तिला होकार दिला.
"सो, मी बालपणापासून हे काम बघत आलो आहे. मी अप्पानां यात असिस्ट सुद्धा करत होतो. मी लिटिल मास्टर सोमेलियर म्हणूनही माझ्या लहानपणी प्रसिद्ध होतो." स्वामीने हे सांगताच सगळ्यांचे डोळे चमकले.
"म्हणजे तू? तुला? लहानपणीच? आई ओरडली नाही का तुझ्या बाबांना?" रावण अगदी काळजीने बोलला. तसं स्वामीला हसूच आलं.
" अरे सोमेलियर फक्त ड्रिंक केल्यामुळेच नाही बनत तर त्याबद्दलच नॉलेज ही चांगलं असणं आवश्यक आहे. मी तेव्हापासूनच कोणत्याही वाइनची चव न घेता तिच्या वासाने सांगू शकत होतो; की त्या वाइनमध्ये काय इन्ग्रेडियंट आहेत आणि हे माझं वैशिष्ट्य आहे. तिचं एज, तिच्या बनवण्याची प्रोसेस सगळं सगळं मी तेव्हापासून बघत आलो आहे. सगळ्यात महत्त्वाचं मला कोणतीही दारू चढत नाही. रादर मला माहित आहे, तिला कसं हॅण्डल करावं."स्वामीच बोलणं सगळे आश्चर्याने ऐकत होते.
"ओके देन. फिक्स झालं. टीम लॉरी आज पासून तुझ्या ताब्यात."अग्नेय स्वामीच्या खांद्यावर टॅपिंग करत म्हणाला.
_______________________________________________________
सीबीआय हेड क्वार्टर पार्किंग एरिया……
"अरे तुम्ही ते फ्युल बचत का काय? ते करत होता ना? मग हा आज वेगळी गाडी घेऊन?"
आपल्या बाईकवरून जाणाऱ्या अग्नेयकडे बघत नंदूने सांजला विचारले.
"...." सांजने प्रश्न इग्नोर केला आणि तिच्या गाडीकडे वळली.
"अग कुठे जातेस? माझ्या प्रश्नाचं उत्तर तर दे." नंदूला आता जरा नाही तर जास्तच संशय येऊ लागला.
"...." तिने आता कंटाळवाण्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिले.
" ओके. ओके. मी नाही विचारत. चल बाय. मी निघतो." असं म्हणूनही तो थोडा वेळ तिथेच थांबला होता. त्याला सांजशी तिच्या ट्रीटमेंट विषयी बोलायचं होतं.
निघतो म्हणूनही नंदू तसाच उभा आहे, हे बघून सांजने एक भुवयी उंचावली.
\"काय?\" हा प्रश्न त्या डोळ्यात उमटला होता.
\" नको आज नको. आज काही हीचा मूड बरोबर दिसत नाही.\" त्याने तिला मानेनेच काही नाही म्हणून सांगितले.
ती त्याला जरा फोर्स करून विचारणारच होती, तेवढ्यात तिचा फोन वाजला.
स्क्रीनवरच नाव बघून तिने पुन्हा नंदुकडे पाहिले. डोळ्यांनीच त्याला हा अर्जंट कॉल आहे थोडा वेळ थांब असा इशारा करून तिने तो उचलला.
" हॅलो."
पलीकडचे संभाषण काही कळतं नव्हतं.
" बरं ठीक आहे." एवढच बोलून तिने फोन ठेवला.
"चल मी निघते. आजो वाट बघत असतील." तिने त्याला काहीही बोलायची संधी न देता गाडीत बसून ती स्टार्ट ही केली.
त्याला तिच्या चेहऱ्यातला बदल जाणवला ही तरी त्याने तिला ते जाणवू दिलं नाही.
एका पाठोपाठ एक दोन गाड्या निघाल्या.
एक सांजची आणि दुसरी नंदूची.
\" हा रस्ता तर डार्लिंगच्या घराच्या दिशेने जात नाही आहे. हा तर जातोय ……..\" नंदू तिच्याही नकळत व्यवस्थित तिचा पाठलाग करत होता.
आणि त्यामुळेच त्याला कळले होते; की सांज कुठे जात होती.
©® स्वर्णा.
_______________________________________________________
कथानक आवडतं असेल तर नक्की माझ्या अकाउंटचे अनुसरण करा.
समीक्षा द्यायला विसरू नका.
मनःपूर्वक आभार.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा