Login

पांडव भाग ५७

Truth Always Comes Out


पांडव - fantastic five⭐
भाग ५७



(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)




आतापर्यंत आपण वाचले -



" आपण इंवेस्टिगेशन सुरूच ठेवायच. फक्त त्यांना मिस गाईड करत. मी माझ्या काही सोर्स कडून अशी इन्फो मिळवली आहे; की लोकल सप्लायर मधला एक माणूस इन्फिनिटी मेंबर आहे. त्याच्या मार्फत इथल्या ॲक्टिव्हिटी कंट्रोल केल्या जातात." सांजने बोलता बोलता स्क्रीन वर लोकल सप्लयारची इन्फो असलेली फाईल ओपन केली.

"ओके, मग सगळ्यांची कुंडली आहे माझ्याकडे." स्वामीने स्क्रीन स्प्लिट करत त्यावर आपली लॅपटॉप स्क्रीन शेअर केली.

माधवने ही लगेच त्यांचे ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट ट्रॅकिंग करायला स्टार्ट केलं.


"नो. थ्री जो आहे तोच मेन थ्रेड आहे; पण टार्गेट हा सप्लायर नाही. तर याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणारे लोक आहेत." अग्नेयने स्क्रीनवर \"टीम लॉरी\" याच्या इन्फोला सर्कल केलं.

"कोणाचा अल्कोहॉल टॉलरान्स जास्त आहे इथे?" त्याने मागे वळून सगळ्यांकडे पाहत प्रश्न केला.

_______________________________________________________



आता पुढे -




अग्नेयच्या प्रश्नावर धडाधड सगळ्या मेंबर्सनी हात वर केले, फक्त रावण सोडून.


जसं नंदू आणि सांजने हात वर केला तसं सगळे पांडव हसायला लागले.


"काय झालं?" स्वामीने त्यांना असं हसताना पाहून विचारलं.


"हे दोघेही पित नाहीत. फक्त प्याल्याच नाटक मात्र एक नंबर करतात." माधवने असं म्हणताच सांजने त्याच्या पाठीत धपाटा घातला.


" व्हॉट? " अग्नेय आश्चर्याने त्या दोंघाना पाहू लागला.


" येस. माझे डॅड जेव्हा ख्रिसमस ईव्हची पार्टी देतात. तेव्हा हे दोघेही बघण्यासारखे असतात. एकतर काही तरी कारणं देऊन टाळतात. नाही तर….." ज्युलिया पुढे बोलतं होती.



" ज्युली." नंदुच्या आवाजाने ज्युलिया गप्पच झाली. आज बऱ्याच दिवसांनी त्याने तिला अश्या आवाजात हाक मारली होती. तिने एक नजर त्याच्याकडे चोरटी टाकली. तो तिच्याकडेच बघत होता.


" सांग ग तू. सांग ग, घाबरु नकोस या दोघांना." देवेश आता हसू लागला होता.


आता सांज आणि नंदू ही हसू लागले होते.


" हे दोघे कपड्यांवर ड्रिंक्स स्प्रे करून, आपल्याला चढली आहे याचा आव आणत फिरतात आणि एवढ्यावर यांचं नाटक थांबत नाही. आम्हांला यांना घरी सोडायला सुद्धा लावतात." ज्युलिया दबकत दबकत सांगत, शेवटी हसू लागली.


आता सगळेच मनमुराद हसले.


" मी विचारण्याचा मुद्दा असा; की टीम हा पट्टीचा ड्रिंकर आहे. तो नुसता पित नाही, तर प्रत्येक दारूची जाण असणारा आहे. त्याच्या जर क्लोज व्हायचं असेल. तर सगळ्याप्रकारची दारू पिता आली पाहिजे आणि पचवता ही आली पाहिजे." अग्नेय एक्स्प्लेन करत होता.


" त्याचा क्लोज माणूसच त्याच्याजवळ पोहचू शकतो आणि त्यासाठी तुम्ही त्याच्या चेकलिस्ट मध्ये बसलं पाहिजे. अल्कोहॉल टॉलरान्स इज मस्ट. जर त्याला थोडा जरी संशय आला तर तुमचं नावच नाही तर तुमच्या जवळच्यांच्या आठवणींतून ही तुम्हाला तो गायब करू शकतो." हे बोलताना का कोण जाणे त्याने सांज कडे पाहिले. ती मात्र शांत सगळं ऐकत होती.

" तर त्याच्या सवयी, आवडी नावाडी आणि त्याचं शेड्युल हे आहे." त्याने त्याची रिसर्च फाईल स्क्रीनवर ओपन केली.

" आय थिंक, या लिस्ट मध्ये एकच माणूस फिट बसतो. तो म्हणजे स्वामी." देवेश प्राऊडली म्हणाला. आफ्टरऑल स्वामीचा मेंटोर होता तो.


सगळेच आश्चर्याने स्वामीला बघू लागले.



_______________________________________________________


ठिकाण : मदर मेरी हॉस्पिटल अँड रेहाबिलेशन सेंटर.


हॉस्पिटलच्या मध्यभागी असणारा तो कारंजा आता मोहनसाठीही जिव्हाळ्याचा विषय बनत चालला होता. मोहन ही तिथे तासंतास उभा राहून विचार करत राहायचे.


आज ही तसेच त्या पाण्याच्या प्रवाहाला बघत ते उभे होते.


बाजूला उभ्या व्यक्तीचा त्यांना हासभासही नव्हता.

" हाय."


"हॅलो डॉ. लोबो." मोहन अजूनही पाण्याकडेच पाहत होते.


" व्हॉट शुड आय कॉल यू? रणछोड ऑर मिस्टर सरदेसाई." लोबोंच्या या प्रश्नावर मोहन हसले आणि उतरले,

"ओन्ली मोहन. नो निड ऑफ फॉर्मलिटी." मोहन प्रसन्न हसले.

त्यांना हसताना पाहून डॉ. लोबांच्या डोळ्यांसमोर थोडासा रुद्धापकाळाकडे झुकलेला, तरीही फिट असलेला, पाणीदार डोळ्यांचा अग्नेय उभा राहिला.

तसा अग्नेयचे दिसणं हे मीरावर गेलं होतं; पण जेव्हा पासून डॉ. लोबोंना हे बापलेकाच नातं, निश्चित झाल्यापासून ते अग्नेयमध्ये मोहननां आणि मोहनमध्ये अग्नेयला शोधत होते.

"सो, यू आर मिस्टर मोहन, नॉट रणछोड." लोबोनीं उपरोधिकपणे विचारले आणि त्यांनीही त्यांची नजर कारंज्यावर स्थिरावली.

लोबोनां वाटलं आपल्या वाक्याने मोहन जरा चलबिचल होतील आणि सगळ्याच स्पष्टीकरण द्यायला सुरुवात करतील.


"हे तुम्हाला आधीच माहीत होते." पण झालं उलटच मोहनच्या या वाक्यावर डॉ. लोबोच चलबिचल झाले.

आ वासून ते मोहनकडे पाहू लागले.

शेवटी न राहवून ते बोललेच.

" मला तसा अंदाज होता; पण पुरावे न मिळाल्याने खात्री होत नव्हती." डॉ. लोबोनीं नजर चोरली.

"???" मोहननीं त्यांच्याकडे आश्चर्याने आणि डोळ्यात थोडासा राग आणून पाहिले.

"नाही म्हणजे तशी खात्री होती; पण माझ्याकडे तुमच्या एक्सपर्टीमुळे काही ठोस पुरावा नव्हता." लोबोनी घाबरत घाबरत कबूल केलं.

मोहन आता गालात हसत होते.


"तसं मला पहिल्याच दिवशी संशय आला होता. जेव्हा मी तुमच्या डोळ्यातलं पाणी पाहिल; पण सगळं तपासून बघितल्या शिवाय मला कोणताही मोठा निर्णय घ्यायचा नव्हता आणि मीरालाही तुमच्या बरोबर सुरक्षित वाटत होतं. तिच्या हेल्थमध्ये चांगली प्रोग्रेस होती. ती मला गमवायची नव्हती आणि म्हणून मी खूपच सिक्रेटली तुमचं बॅकग्राऊंड चेक केलं. मीराच्या बाबतीत मी कोणतीही रिस्क घेऊ नाही शकतं; पण मानलं पाहिजे तुम्हाला. मला खूप आटापिटा करूनही जास्त काही हाती लागलं नाही. शेवटी मी अशी सिच्युएशन क्रिएट केली; की अग्नेय डी. एन. ए. टेस्ट साठी रेडी होईल. तेव्हा कुठे मला तुम्ही सापडलात." बोलता-बोलता पुन्हा मोहनच्या चेहऱ्याकडे पाहत प्रश्न केला.

"पण तुम्हाला कसं कळलं? की मला मी तुम्हाला आधीपासून ओळखल आहे."


लोबोनी असे विचारताच मोहन हसले.

"चला बसून बोलू. तुमच्याकडे तसे बरेच प्रश्न असतील. माझ्याकडून सगळ्या प्रश्नांची मी, एकएक करून उत्तर देतो."


दोघेही डॉक्टर लोबोंच्या केबिनकडे निघाले.



_______________________________________________________


डॉ. लोबोंच्या केबिनमध्ये…..


केबिन मध्ये येताच लोबोनी इंटर कॉम वरून कॉल लावला.


"काय मागवू? चहा? की कॉफी?" त्यांनी मोहनना विचारले.


"चहा आवडतो मला; पण गरम प्यायला.  खूप मोठा विषय आहे; त्यामुळे तो थंड होईल बोलता बोलता. त्यापेक्षा कॉल्ड कॉफी मागवली, तरी चालेल." मोहन मनाची तयारी आणि आठवणींची उजळणी करत बोलले.


"टू कॉल्ड कॉफी."डॉ. लोबो रीसिव्हर जाग्यावर ठेवून मोहन पुढे काय सांगत आहेत हे आतुरतेने ऐकू लागले.


मोहननी अतिशय शांत आवाजात बोलायला सुरुवात केली.


त्यांनी लोबोना सगळं सांगितलं. अगदी त्यांच्या आणि मिराच्या पहिल्या भेटीत पासून ते ते दोघे वेगळे कसे झाले तिथं पर्यंत.


" मला काही वर्षांपासून काही निनावी लेटर्स येतं होती. सुरुवातीला त्यात मीराच्या आणि माझ्या प्रेमसंबंधांचा उल्लेख होता. त्यात काही पत्रे स्वतः मिराने लिहिलेली होती अश्या अर्थाची होती." थोडा वेळ काही तरी मनातच विचार करून मोहन पुन्हा बोलू लागले,


" अयुने ती लिहिलेली नव्हती. मग काय स्वतः मिराने?" मोहननी आश्चर्याने चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणून लोबोंकडे पाहिले.


मोहनच्या तोंडून अयु ऐकून लोबो गालात हसले आणि त्यांनी मुक संमती दर्शवली.


"कसं शक्य आहे?" मोहन जरा गोंधळले.
"की ही तेव्हाची पत्रे आहेत जेव्हा तिला सगळं आठवतं होतं." मोहन असं म्हणताच लोबोनी मानेनेच होकार दिला.


" आणि याच पत्रातून अयुला माझ्या आणि मिराच्या नात्याबद्दल कळलं आणि जी निनावी पत्रे होती ती त्याने लिहिली." आता मोहनना अजूनच चित्र स्पष्ट होत होतं.

" हो. तिने ती पत्रे गरोदर असतानाच्या काळात लिहिली. ती पोष्टात देण्यासाठी मीरा कितीतरी वेळा माझ्याकडे घेऊनही आली; पण प्रत्येक वेळी तिनेच तसे करण्यापासून मला रोखले." आता प्रश्न लोबोंच्या डोळ्यात होते.


" मीच त्याला कारण आहे." मोहननी मान खाली घातली." तेव्हा तिला माझी किती गरज होती. तिला किती तरी गोष्टी मला सांगायच्या असतील; पण मीच तिला तसे करण्यापासून रोखले." मोहननी केबिनच्या खिडकीतून दूर डोळ्यातली आसव लपवली.



©® स्वर्णा.


_______________________________________________________



गोष्ट त्या दोघांची पर्व २ नक्की वाचा आणि भरघोस प्रतिसाद नोंदवा. तुमचा मिळणारा प्रतिसाद हाच कथेची गाडी पुढे नेणार इंधन ठरेल.

🎭 Series Post

View all