पांडव भाग ५६

Truth Always Comes Out
पांडव - fantastic five⭐
भाग ५६



(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -

एक मोठं कन्फेशन

त्याने त्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले. एकदमात उरलेली कॉफी पिऊन त्याने मग खाली ठेवला.

आता तो पूर्ण गोष्ट तिला सांगुनच थांबणार होता.


"दुसऱ्या दिवशी सकाळी मला ब्रेकफास्ट च्या वेळी कळले; की ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसुन तू होतीस." आतमात्र त्याने डोळे गच्च मिटले. दोन्ही हाताने आपला चेहरा घट्ट बंद केला.


ती मात्र मोठे मोठे डोळे करून त्याच्याकडेच पाहत होती.

तिच्या मग मधली कॉफी केव्हाच थंड झाली होती.


_______________________________________________________



आता पुढे -

ठिकाण : सांजचे घर


सांज त्याच्याकडे रोखून पाहत आहे हे तिला न बघता ही त्याला समजले होते.

ती आता बोलायला सुरू करणार, तेवढ्यात त्याने तिला हातानेच थांबवले. मिटलेली नजर तिच्या नजरेला मिळवत सगळा धीर एकवटून तो बोलू लागला,

"थांब. माझं बोलणं पूर्ण ऐकून घे. मी त्या रात्री जे काही वागलो, ती निव्वळ माणुसकी होती. त्याच्या मागे कोणताही वाईट हेतू नव्हता." तो अगदी मनापासून सांगत होता आणि हे सांजच्या मनालाही माहीत होते. तिला आता त्याच्या बोलण्यातून थोडा थोडा रेफर्न्स लागत होता.
\" वेट, म्हणजे आज संध्याकाळी..\" ती मनात विचार करत असतानाच त्याने पुढे बोलायला सुरुवात केली.

" मी दुसऱ्या दिवशी सकाळी तुला जेव्हा त्याचं खोलीत जाताना पहिलं. तेव्हा मला कळलं; की ती मुलगी तू आहेस. मी तुला तेव्हाच सगळं सांगणार होतो; पण तू काही रिॲक्टच केलं नाहीस."

" तू माझ्या रिअँक्शनची वाट पाहत होतास?" तिने जरा रागातच विचारले.

" हो. कारण असं स्वतःच्याच तोंडाने सांगणं माझ्यासाठी खूप अवघड होतं. आताही मी खूप एफर्ट्स घेत आहे. तू तर त्या दिवशी अशी वावरालीस की जसं काही घडलंचं नाही." त्याने तिच्यावर नजर रोखली.

" हो, कारण मला काही नीट आठवतं नव्हतं." ती तोंडात पुटपुटली.

" काय बोललीस?" त्याला ऐकू न आल्याने तो जरा गोंधळला.

"काही नाही. तू पुढे बोल; की झालं तुझं सांगून." तिने विषय बदलला.

" नाही. आताही आंधळी कोशिंबीर खेळत असताना….."

" तो तू होतास?" तिने त्याचं वाक्य पूर्ण केलं.

त्याने नुसतीच होकारार्थी मान हलवली.

"हे बघ आताही मी काही मुद्दाम नाही केलं. इट्स अल्सो…"


"ह्युमिनिटी." तिने असं बोलताच त्याने मान पुन्हा अप अँड डाऊन केली.

"करेक्ट. तुला ही माहीत आहे आता. मी फक्त तुला वाचवलं." तो अगदी सहज बोलला.

"मग आता? तुझी काय अपेक्षा आहे? या सगळ्यासाठी मी तुला थँक्यू म्हणावं?" ती थोडी रेस्टलेस होत म्हणाली.

"नाही. आय डोन्ट निड इट. रादर मी ही तुला सॉरी बोलेन अशी अपेक्षा, तू मनात ठेवू नये असं मला वाटतं. कारण मी काहीच चुकीचं केलेलं नाही. पुन्हा अशी वेळ आली तर तेव्हाही मी असाच वागेन." तो बेफिकीरपणे म्हणाला आणि आपला कॉफी मग घेऊन तिथून निघून गेला.


आज त्याला खूप रिलॅक्स वाटतं होतं. ज्या गोष्टीला त्याला सामोरं कसं जायचं हे कळतं नव्हतं; ती गोष्ट त्याने इतक्या सहज हॅण्डल केली होती.

त्याला सांजची रिएक्शन या सर्वांवर काय असेल, हे बघायची उत्सुकता होती; पण आता तिथे थांबणं ही त्याला जमणार नव्हतं. त्यामुळेच ती काही बोलायच्या आतच तो तिथून निघून गेला.


_______________________________________________________


ठिकाण: देवेशच घर

"तुला काय वाटतं?" देवेशने त्यालाचं उलट प्रश्न केला.


तो गप्प मान खाली घालून बसला होता. नंदुसाठी हा खूप महत्त्वाचा निर्णय होता. सांज त्याच्यासाठी काय होती. या प्रश्नाचं उत्तरं आजपर्यंत तो स्वतःलाही देऊ शकला नव्हता. उत्तर देणं लांबची गोष्ट आहे त्याला हा प्रश्न स्वतःला विचारायची सुद्धा कधी बुद्धी झाली नव्हती.


\"शी इज लाईफ फॉर हिम. लाईक ब्रिदिंग.\"


" काय विचारतोय मी तुला एन के?" देवेशने त्याला हलवले.

"माधव, एवढं जर सांगतोय तर, ते खरचं बेनिफिशियल असेल संयुसाठी. तू जास्त काळजी नको करुस." देवेशने त्याच्या खांद्यावर हात टाकला.


अम्माकडून निघताना माधव आणि नंदू मध्ये सांजच्या स्वप्नांविषयी बोलणी झाली होती.


अम्मा फक्त एक सोशल वर्कर नसून त्यांनी सायकॉलॉजी मध्ये मास्टर्स केलं आहे.


त्यांना सांजच्या स्वप्नांविषयी कंसर्न करुया, असे माधव नंदूला सुचवत होता. जेणे करून सांजला मदत ही होईल आणि त्या अम्मा असल्यामुळे सगळ्या गोष्टी कॉन्फिडेंशियल राहतील.

नंदूला एवढा मोठा विषय हाताळताना टेंशन येण्याबरोबर काळजीही भरपूर वाटतं होती.


"देवू, तुला माहीतच आहे. आई आणि बाबा गेल्यावर मी सांजच्या बाबतीत जास्त इमोशनल आणि सेन्सिटिव्ह झालो आहे. ती फक्त माझी फॅमिली नाही तर त्याहून अधिक आहे माझ्यासाठी. जे मी शब्दात नाही सांगू शकत. याचं कारणामुळे मी घेतलेला निर्णय मला चेक करायचा होता, नॉट ट्वॉईस ऑर थ्राईस, बट ॲज ऑफन ॲज पॉसिबल टाइम्स." नंदूने असं म्हणताच देवेशने त्याला मी समजू शकतो अश्या अर्थाने मान हलवली.


"डिसिजन तर घ्यावा लागेलचं. तू आजोंशी ही बोल आणि मग ठरव, जे योग्य वाटेल ते; पण आता मात्र झोप बाबा! उद्या ऑफिस आहे आणि मला त्या मोठ्या पांडव टिमशी रोज डील करावं लागतं. त्यांचे ते दोन लीडर म्हणजे माझ्या डोक्याला ताप आहेत." देवेशने असं म्हणताच नंदूने त्याच्याकडे हसत हसत बघितले.

" तुला तर अंगाईच म्हणतो थांब." नंदु त्याला मारायला त्याच्या मागे धावला.


_______________________________________________________


ठिकाण: सीबीआय हेड क्वार्टर


" काही नवीन अपडेट्स?" देवेशने पूर्ण टिमकडे पाहत विचारले.


सगळे शांत होते.

" नवीन काही घडामोडी नाहीत. फक्त चित्रगुप्तने दिलेला डाटा आम्ही अनालाइझ करून त्यावरून काही ठिकाणी छापे टाकले आहेत. तिथल्या मुद्देमालाला फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलंय. सगळे ड्रग सँपल जुन्याच टाईप मधले आहेत. काही मोठे स्पॉट सोडले तर त्यांनी चीप प्रॉडक्ट अवेलेबल करून युथ कॅप्चर करायचा पुरेपुर प्रयत्न केला आहे." ज्युलिया तिचे लॅब रिपोर्ट देवेशच्या हातात देत म्हणाली.

" मला वाटतं आपण ही त्यांची स्टेटर्जी अभ्यासायला हवी. \" बी अनप्रिडीक्टेबल.\"" असं नंदूने म्हणताच सगळ्यांनी सहमती दर्शवली.


"म्हणजे त्यांचा पाठलाग थांबवायचा का? हा सगळा रिसर्च स्टॉप करून न्यू केस हातात घ्यायची का? त्यांना दाखावण्यापुरती."रावणने सुचवले.

" मला वाटतं त्याहून काही वेगळं…" देवेश बोलतं होता एवढ्यात….


" त्यांना अंधारात ठेवायचं; पण ते असं की त्यांच्या सावलीलाही कळता नये." नंदुने त्याचं वाक्य पूर्ण केलं.

" आपण इंवेस्टिगेशन सुरूच ठेवायच. फक्त त्यांना मिस गाईड करत. मी माझ्या काही सोर्स कडून अशी इन्फो मिळवली आहे; की लोकल सप्लायर मधला एक माणूस इन्फिनिटी मेंबर आहे. त्याच्या मार्फत इथल्या ॲक्टिव्हिटी कंट्रोल केल्या जातात." सांजने बोलता बोलता स्क्रीन वर लोकल सप्लयारची इन्फो असलेली फाईल ओपन केली.

"ओके, मग सगळ्यांची कुंडली आहे माझ्याकडे." स्वामीने स्क्रीन स्प्लिट करत त्यावर आपली लॅपटॉप स्क्रीन शेअर केली.

माधवने ही लगेच त्यांचे ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट ट्रॅकिंग करायला स्टार्ट केलं.


"नो. थ्री जो आहे तोच मेन थ्रेड आहे; पण टार्गेट हा सप्लायर नाही. तर याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणारे लोक आहेत." अग्नेयने स्क्रीनवर \"टीम लॉरी\" याच्या इन्फोला सर्कल केलं.

"कोणाचा अल्कोहॉल टॉलरान्स जास्त आहे इथे?" त्याने मागे वळून सगळ्यांकडे पाहत प्रश्न केला.



क्रमशः



©® स्वर्णा.


_______________________________________________________



गोष्ट त्या दोघांची पर्व २ नक्की वाचा आणि भरघोस प्रतिसाद नोंदवा. तुमचा मिळणारा प्रतिसाद हाच कथेची गाडी पुढे नेणार इंधन ठरेल. प्रतिसाद नोंदवताना कृपया विशेष टीप लक्षात घ्या.

🎭 Series Post

View all