Login

पांडव भाग ५५

Truth Always Comes Out
पांडव - fantastic five⭐
भाग ५५



(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -

सगळे घरी जायला निघू लागले, तशी सगळ्यांनी माधवला एक एक करत मिठी मारली.


तेव्हाही मिठी मारताना सांजच्या डोक्यात तोच विचार होता; पण माधव तो नसणार याची तिला शंभर टक्के खात्री होती. तो स्पर्श वेगळा होता.


\"आता झालेला हा स्पर्श मला इतका का आठवतं आहे? तो आधी कधी झाला होता का? ओळखीचा वाटूनही अनोळखी असा. अनोळखी वाटूनही आपलासा त्याचं वेळी वाटणारा.\"



तिच्या या वेगळ्या वागण्यावर दोन व्यक्तीचं लक्ष होतं. एकाच्या नजरेत ते कुतूहल निर्माण करत होतं तर दुसऱ्याच्या नजरेत भीती.



_______________________________________________________



आता पुढे -


अग्नेय तिरुपतीच्या गाडीकडे जायला निघाला. त्याला शक्य तितकं सांजला टाळायचं होतं.


"अग्नेय, तिकडे कुठे?" सांजने त्याला हटकले.

"???" त्याला तिचा रोख न कळल्याने तिच्याकडे गोंधळून पाहिले.


"तू घरी येतोयस ना? मग चल." तिने स्वतःच्या गाडीकडे चालू लागली.

आता मात्र अग्नेय घाबरला.

"ए वेड्या, ती बोलवते. जात का नाहीस तू? असा काय बावळटासारखा वागतोयस?" देवेश त्याच्याजवळून गाडीकडे जात असताना कानात खुसपुसला.


अग्नेयने मात्र आपलं कम्पोझर परत मिळवलं आणि कोणती ही प्रतिक्रिया न देत तिला हातानेच पाच मिनिटात आलो असं सांगितलं. सरळ चालत जाऊन त्याने कारणाशिवाय देवेशला मिठी मारली. जसं की तो त्याला फक्त \" बाय.\" म्हणण्यासाठी जात होता.

देवेशला त्याच्या या सवयी माहीत होत्या. तो फक्त हसला आणि त्याच्या मिठीतुन बाहेर येत, याच काही खर नाही अश्या विचारत आपल्या गाडीत बसला. बाकीचे सगळे मेंबर्स देवेशच्या गाडीने निघाले.


अग्नेयने स्वतःला गिअर अप केले.

\"जे होईल ते होईल, लेट्स फेस इट.\"

तो गाडीत बसला याची खात्री करून, सांजने गाडी स्टार्ट केली.


\"आता फक्त तीन व्यक्ती तपासायच्या राहिल्या.\" विचार करता करता तिची नजर सहज अग्नेयवर गेली.

\" तीन नाही चार. याला आपण विसरलोच.\" ती पुन्हा समोर बघून गाडी चालवू लागली.


\" हिने असं का मला बघितलं? नेमकं काय सुरू आहे हिच्या डोक्यात? मी आता हे असं दुसऱ्यांदा वागलो आहे. त्याबद्दल तिला स्पष्टीकरण हवं आहे का? काय अपेक्षित आहे तिला? विचार करून करून डोक्याचा भुगा होईल माझ्या.\" 


" स्टॉप." अग्नेय जोरात किंचाळला.

सांजने लगेच गाडी साईडला घेऊन थांबवली.

" काय झालं? आर यू फिलिंग अनवेल? ऑर वॉन्टस् टू गो वॉशरूम?" शेवटचा प्रश्न तिने अगदी हळू आवाजात विचारला.

याचे डोळे मात्र तो ऐकून विस्फरले.

"काय? नाही ग" असं म्हणत आता मात्र तो हसू लागला.


ती गोंधळून त्याला बघता बघता कधी त्याच्या निर्मळ हसण्यात गुंतून स्वतःही हसू लागली, तिचं तिलाच कळलं नाही.

" अरे! मग गाडी का थांबवली?" तिने हसतच विचारलं.

" मला कॉफी प्यायची आहे." त्याने काहीतरी कारण द्यायचं म्हणून दिलं हे तिच्या लक्षात आले.

" मी घरी जाऊन बनवेन. आता इथे थांबलो तर उशीर होईल. उद्या ऑफिस आहे आणि घर ही जवळ आलंय. मग निघुया का?" ती त्याचे हावभाव टिपत होती.


त्याने चेहरा लपवण्यासाठी खिडकीतून बाहेर बघतच मानेने होकार दिला.

\" याचं काही तरी बिनसलं आहे. घरी जाऊन बघुया काय ते?\"


गाडी घराच्या दिशेने निघाली.


_______________________________________________________


ठिकाण: सांजचे घर


रूम मधला एसी त्याची घुसमट कमी करू शकला नाही. घुसमट नव्हतीच ती, ते होते अवघडलेपण. त्याने नक्की काय चुकीचे केले होते हेच त्याला कळत नव्हते. केले होते ते चुकले होते; की लपवले हे चुकले. काही असो; नुसते विचार करत बसण्यापेक्षा तिला एकदाचे सांगून टाकायचे आणि मनाला यातून मोकळं करायचं.


तो रूममधून बाहेर पडला.


सांज किचनमध्ये कानात हेड फोन घालून कॉफी बनवत उभी होती. कॉफी बनवत असताना गाणी ऐकणे, गुणगुणणे हे तिचे आवडीचे काम.

कॉफी मग रेडी करून तिने ते दोन्ही हातात घेतले. तशीच मागे वळली तर समोर तो उभा होता.

नजरानजर होताच तिने त्याला टेरेसवर जाऊया असा इशारा केला. त्यानेही डोळ्यांनीच होकार देत तिच्या हातातला एक मग आपल्याकडे घेतला.


तिच्या पाठून जिना चढताना त्याने मनात पुन्हा एकदा सांजला काय सांगायचं याची प्रॅक्टीस केली.


टेरेसवर पोहचताच तिने एक दीर्घ श्वास घेतला. तिथे असलेल्या सिटिंग अरेंजमेंटवर बसत तिने समोरच्या टीपॉय वर कॉफी मग ठेवला.

" सांग तुला मला काय सांगायचं आहे?" तिच्या प्रश्नाने तो त्याची सगळी प्रिपरेशन विसरला.

"आं??" ती काय बोलली आणि आता आपण काय सांगायचं. यात गुंतलेला तो काहीच बोलू शकला नाही.

"अरे, तू काही मला निव्वळ कॉफी प्यायला इथे बोलावलं नाहीस. आय एम गूड लिसनर. तू तुला हवं ते मला सांगू शकतोस. अगदी एखादं मोठं टॉप सिक्रेट ही. मी खूप चांगली सिक्रेट किपर आहे. डोन्ट वरी." ती त्याच्याशी अगदी सहज बोलतं होती.

" हवं ते सांगू शकतो?" त्याने प्रतिप्रश्न केला.

" हो. हवं ते." ती त्याला अश्वस्त करत म्हणाली.

"तू, ते शांतपणे ऐकून घेशील? माझ्याबाबत कोणताही गैरसमज करून घेणार नाहीस?"

" हो मी ऐकून घेईन आणि गैरसमज नाही करून घेणार."ती जरा वैतागली.

"असं काय मोठं वर्ल्ड टॉप सिक्रेट आहे? जे सांगताना तू एवढा विचार करत आहेस." तिला माहित नव्हते; की हा कोणता बॉम्ब तिच्या अंगावर टाकणार आहे.

"बोल तू बिनधास्त."

"मी इथे राहायला आलो तेव्हा मला फक्त एवढंच माहीत होतं; की इथे ब्रिगेडियर त्यांच्या नातीबरोबर राहतात. ती नात केवढी आहे? कोण आहे? हे मला माहीत नव्हते." त्याने सुरुवातीपासून सांगायला सुरुवात केली.

"ओके." तिने नोड केलं.

" ही त्या दिवशीची गोष्ट आहे. मी इथे राहायला येऊन एखादाच दिवस झाला होता. मी माझं सामान व्यवस्थित लावून नुकताच बेड वर आडवा झालो होतो. रात्रीचे एक दोन वाजले असतील." त्याने मध्येच थांबून एक कॉफीचा घोट घेतला.

तिनेही त्याचं अनुकरण केल.

त्याने पुन्हा सांगायला सुरुवात केली.

"नुकताच माझा डोळा लागला होता आणि तेवढ्यात एक आर्त किंकाळी माझ्या कानात पडली. मी आवाजाच्या दिशेने धावलो आणि एका रूम पाशी येऊन पोहचलो. रूमचा दरवाजा उघडला तर आत एक छोटी मुलगी पाय पोटाशी घेऊन थरथरत गादीवर बसली होती. ती खूप घाबरली होती. मी मागचा पुढचा कोणताही विचार न करता तिला जवळ घेतले. मला तिची ती सिच्युएशन पहावली नाही. मी तिला घट्ट मिठीत घेऊन शांत करायचा प्रयत्न केला. तशी ती सावकाश सावरली आणि माझ्याच मिठीत झोपली. मी तिला बेडवर झोपवून, तिच्या अंगावर पांघरून घातले. तेव्हाही माझ्या डोक्यात ती एक छोटी मुलगी आहे. असेच होते."त्याचे हे बोलणे ऐकून तिच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत होते.

त्याने त्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले. एकदमात उरलेली कॉफी पिऊन त्याने मग खाली ठेवला.

आता तो पूर्ण गोष्ट तिला सांगुनच थांबणार होता.


"दुसऱ्या दिवशी सकाळी मला ब्रेकफास्टच्या वेळी कळले; की ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसुन तू होतीस." आतमात्र त्याने डोळे गच्च मिटले. दोन्ही हाताने आपला चेहरा घट्ट बंद केला.


ती मात्र मोठे मोठे डोळे करून त्याच्याकडेच पाहत होती.

तिच्या मग मधली कॉफी केव्हाच थंड झाली होती.


क्रमशः



©® स्वर्णा.


_______________________________________________________




गोष्ट त्या दोघांची पर्व २ नक्की वाचा आणि भरघोस प्रतिसाद नोंदवा. तुमचा मिळणारा प्रतिसाद हाच कथेची गाडी पुढे नेणार इंधन ठरेल. प्रतिसाद नोंदवताना कृपया विशेष टीप लक्षात घ्या.

🎭 Series Post

View all