Login

पांडव भाग ५४

Truth Always Comes Out


पांडव - fantastic five⭐
भाग ५४



(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -


"नाही माधव, तू तृतीयपंथी असतास, तर मी तुला योग्य मार्गदर्शन केले असतेच; पण तुझं जे अस्तित्व आहे, ते तुला जगू देणं, हे काही तुझ्यावर उपकार नव्हेत. मी फक्त तुला माझ्या अनुभवामुळे योग्यवेळी योग्य मदत करण्याचं एक माध्यम बनले." अम्मानी माधवच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला.

"हो. अम्माने सगळ्या प्रकारच्या पीडितांना आसरा दिला आहे. भूकंपग्रस्त, पूरग्रस्त, बलात्कारित, एसिड ॲटक पीडित, ॲक्सिडेंट मध्ये सापडलेले. ही सगळी तिचं लोक आहेत जी आज एकमेकांचा आधार बनली आहेत आणि अम्मा आमची आधारस्तंभ." माधव अम्माच्या मांडीवर डोकं ठेवून भारवून बोलतं होता.




_______________________________________________________



आता पुढे -


"नाही रे, असं काही. जसं मी यांना आपलं केलं तसं यांनीही मला आपलं मानलं. माझ्या शब्दाचा मान ठेवणं, कोणतीही गोष्ट करताना माझं मत विचारात घेऊन ती करणं हे खूप मोठं आहे माझ्यासाठी." अम्मा बोलताना त्यांच्या डोळ्यात एक चमक होती.


"बरं तसा तुम्ही पण माझ्या शब्दाला मान द्या आणि आज रात्री जेवूनचं जा."सगळ्यांनी या अम्मांच्या सूचनेला होकार दिला.

" एक अट आहे. आता जेवण मी बनवणार." ज्युलिया असं बोलताच सगळ्यांनी घाबरून तिच्याकडे पाहिले.

" अम्मा, दुपारचं जेवण खूप झालंय आज रात्री आमचा सगळ्यांचा उपास." रावणने असं म्हणताच एकच हशा पिकला.

नंदूच्या बाजूला बसलेली ज्युलिया मात्र हिरमुसून नंदूच्या खांद्याला बिलगली.


" ए कोणी चिडवू नका रे तिला." एका हाताने तिला साईड हग करत नंदू म्हणाला आणि मायेने तिच्या केसावरून हात फिरवू लागला.

" ज्युली, तू वाईट नको वाटून घेऊ यांचं. यांना सांगून टाक; की काही काळजी करू नका. आज जेवण तू नाही, तर डार्लिंग बनवतेय." नंदुच्या मायेने फिरणाऱ्या हाताकडे लक्ष असलेली ज्युलिया त्या स्पर्शात एवढी गुंतली होती; की तो पुढे काय म्हणाला हे समजायला तिला खूप वेळ लागला.

जेव्हा लक्षात आलं, तेव्हा तिने त्याचा डोक्यावरचा हात रागाने बाजूला केला आणि त्याला मारायला धावली. नंदू तिला चुकवत तिथेच पळत होता.

कधी रावणच्या मागे, तर कधी माधवच्या असं करत करत तो तिच्या हाताला लागत नव्हता.

दमलेल्या ज्युलियाने मदतीच्या अपेक्षेने सांजकडे पाहिले.

सांजच्या अगदी जवळून जाणाऱ्या नंदूला तिने घट्ट पकडले. ज्युलियाकडे बघत धावणारा नंदू जरा गोंधळला. त्याला जराही सावरू न देता सांजने त्याला मिठीत बंधिस्त केले.

त्या दोघांना असं बघून त्याला पकडायला धावणारी ज्युलिया ही क्षणभर गोंधळली.


\" आय नीड टू कन्फर्म, इज ही बडी ओर नॉट? नो ही इज नॉट हिम. म्हणजे मगाचचा माझा अंदाज बरोबर होता. तो कोणी वेगळी व्यक्ती आहे हे नक्की. पण कोण? \" सांजच्या डोक्यात अजूनही मगाशी स्पर्श झालेल्या व्यक्तीचा शोध घेणे सुरू होते. अनायसे आलेली संधी तिने साधली खरी; पण तिला त्यातून ती व्यक्ती काही सापडली नाही. नंदू आणि ज्युलिया दोघेही स्तब्ध मात्र झाले.

"ज्युली, कम अँड कॅच हिम." सांजच्या हाकेने दोघेही भानावर आले.

"सोड डार्लिंग, ती मारेल मला." नंदू स्वतःला सोडवायचा प्रयत्न करत म्हणाला. तो जसा प्रयत्न करत होता ते बघून सगळ्यांनाच हसू आलं. त्याचे प्रयत्न फक्त शाब्दिक होते. आपण जर पॉवर युझ केली, तर सांजला लागेल, या कल्पनेने तो फक्त तोंडानेचं तिला रिक्वेस्ट करत होता.


त्याचा केविलवाणा चेहरा पाहून सांज ही विरघळली. तिने त्याला मारायला जवळ येणारी ज्युलिया दिसताच नंदूला आपल्या पाठीशी घातले.

"सांज, धीस इज नॉट फेअर." सांज आता नंदूला वाचवत आहे, हे बघताच ज्युलिया गाल फुगवून म्हणाली.

"थांबा दोघेही. बडी, से सॉरी टू हर." सांज असं म्हणताच नंदू ज्युलियाला लगेच सॉरी बोलला.


"आणि तू ग. चल मी शिकवते तुला कुकिंग. यांच्या नादी नको लागू." अगदी एका आई प्रमाणे तिने नंदूला पाठीशी घातले होते.

सगळे त्यांची ही पकडापकडी एन्जॉय करत आहेत हे पाहून, देवेश हळूच अग्नेयच्या जवळ गेला.


" एम्बर, आर यू ऑल राईट?"


" येस, मला काय झालं आहे?" शब्द आणि एक्स्प्रेशन दोन्ही गोष्टींनी अग्नेयने त्याच्या मनातल्या तुफानाला सहज लपवले.

"ओके." तिरुपती तेवढ्या पुरता शांत राहिला खरा; पण त्याच्या नजरेने अग्नेयच्या नजरेचा पाठलाग केला.

\" हा संयुकडे एकटक का बघतोय? तो तिच्याकडेच बघतोय; की मला भास होतोय? तो होता कुठे? अम्मानी त्याची चौकशी केली, तेव्हाच मला त्याचा कॉल आला. आवाजावरून त्याचा मूड ओळखन कठीण; पण आता मला थोडे अंदाज बांधायची सवय झालीय. नक्की तिकडे काय झालं असेल. तो आला तेव्हा पासून पाहतोय. एकतर तो हरवल्यासारखा दिसतोय, नाहीतर सांजला एकटक पाहतोय.\" देवेश अग्नेयचा अंदाज घेत होता.


_______________________________________________________


"मी तुला जे सांगितलं होतं, त्याबद्दल तू काय ठरवलं आहेस." माधव नंदूला एकाबाजूला घेऊन आला होता.

सांज जेवण बनवत होती, ज्युलिया आणि रावण तिला असिस्ट करत होते. जोडीला वाड्यातली मुलं होती.

अग्नेय त्याच्याही नकळत सांजचं निरिक्षण करत होता आणि देवेश त्याचं.


या सगळ्यांच्या नजरा चुकवून माधव नंदूला बाजूला घेऊन गेला होता.

" मी तुझ्या सल्ल्याचा विचार केला आहे; पण मला अजून थोडा वेळ हवा." नंदू अजूनही द्विधा मनस्थितीत होता.

" तुला माझ्यावर विश्वास नाही का?" माधव अगदी काकुळतीला आला.

"तसं नाही रे. आई बाबांना एवढ्या लहान वयात गमावलं आहे; की ती रिस्क मी सांजच्या बाबतीत घेऊ शकत नाही." नंदूचा आवाज ओलावला.

"आय नो, म्हणूनच मी तुला हा पर्याय सुचवला आहे. सांज तुझ्यासाठी जेवढी महत्त्वाची आहे, तेवढीच ती आमच्यासाठी पण महत्त्वाची आहे. तू हवं तर तुझ्या सर्व शंकांचं निरसन करून मगच डिसिजन घे." माधवने असं सांगताच नंदूने त्याला जवळ घेतलं.

"मला माहित आहे. फक्त मला थोडा वेळ हवा आहे." नंदूच्या वाक्यावर माधवनेही संमती दर्शवली.

" चला जेवायला." जेवणासाठी आलेल्या हाकानी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले.


_______________________________________________________


"अम्मा, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला."पांडवनी असं म्हणताच पूर्ण वाड्यातून एक आवाज आला.

"आम्हांला पण."

" येत जा रे असेच. माधवा, घेऊन ये रे यांना अधेमधे." अम्मा जड आवाजात म्हणाल्या.

सगळे घरी जायला निघू लागले, तशी सगळ्यांनी माधवला एक एक करत मिठी मारली.


तेव्हाही मिठी मारताना सांजच्या डोक्यात तोच विचार होता; पण माधव तो नसणार याची तिला शंभर टक्के खात्री होती. तो स्पर्श वेगळा होता.


\"आता झालेला हा स्पर्श मला इतका का आठवतं आहे? तो आधी कधी झाला होता का? ओळखीचा वाटूनही अनोळखी असा. अनोळखी वाटूनही आपलासा त्याचं वेळी वाटणारा.\"



तिचं या वेगळ्या वागण्यावर दोन व्यक्तीचं लक्ष होतं.  एकाच्या नजरेत ते कुतूहल निर्माण करत होतं तर दुसऱ्याच्या नजरेत भीती.


क्रमशः



©® स्वर्णा.


_______________________________________________________




गोष्ट त्या दोघांची पर्व २ नक्की वाचा आणि भरघोस प्रतिसाद नोंदवा. तुमचा मिळणारा प्रतिसाद हाच कथेची गाडी पुढे नेणार इंधन ठरेल. प्रतिसाद नोंदवताना कृपया विशेष टीप लक्षात घ्या.

🎭 Series Post

View all