पांडव - fantastic five⭐
भाग ५२
भाग ५२
(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)
आतापर्यंत आपण वाचले -
माधवचा पाठलाग उरलेले टीम मेंबर्स करत आहेत.
मिराचा अजाणतेपणा, मोहन आणि अग्नेयला जवळ आणेल का?
"आम्ही बापलेक नाही आहोत! " तो जरा जास्तच मोठ्याने म्हणाला.
"शु!! हळू बोल. त्यांना ऐकू जाईल तर किती वाईट वाटेल त्यांना. तुमचं भांडण झालं, म्हणून काय झालं. आपल्या बाबांशी कोणी असं वागत का?" तिने त्याला दमात घेतलं. तसा तो तिला चुकवून रागात पुढे चालत निघाला. त्याला ती पुढे अजून काय सांगेल आणि विचारेल याची भीती वाटू लागली होती.
तो पुढे जाताच तिने मोहनची पाठ धरली.
"अहो, ऐका ना!!!"
तिचे एवढेच शब्द त्याची पावलं रोखायला पुरेसे ठरले. त्यात भरीस भर म्हणून की काय, तिने त्याचा हात धरला.
हातों नें तेरे,
जो मेरा हात थामा है|
मैं तो हील भी ना सका,
वक्त भी वही रूक गया है|
_______________________________________________________
आता पुढे -
खूप साधी परंतु स्वच्छ घर असलेली एक छोटी वस्ती. मोजकीच घर असल्यामुळे तिथे गाड्यांची जास्त वर्दळ नव्हती.
दुरून बघितलं तर सगळं काही नॉर्मल वाटतं होतं. असं असताना ही वस्ती एवढी लांब आणि एका बाजूला का आहे? असे प्रश्न गाडीतून उतरणाऱ्या प्रत्येकाच्या मनात येत होते.
त्यांनी माधवला कळू नये म्हणून गाड्या खूप लांब पार्क केल्या होत्या आणि चालत निघाले होते.
थोड्या अंतरावर त्यांना माधव त्याने बुक केलेल्या कॅब मधून सामान उतरवताना दिसला. त्याच्या अवतीभवती सगळ्या वयोगटातल्या छोट्या मुलींचा गराडा होता.
कोणी त्याच्या हातातल्या बॅग घेत होतं. कोणी त्याच्या कंबरेला मिठी मारून \"उचलून घे.\" असा हट्ट करत होतं. तर कोणी स्वतःच्या कंबरेवर लहान बाळ घेऊन त्याला एकापाठोपाठ एक प्रश्न विचारत होतं.
त्यांचा तो उत्साह आणि गलका पाहून पांडवांच्या चेहऱ्यावर समाधानाच हसू आलं.
ते ही सावकाश निश्चिंत होऊन त्या दिशेने निघाले.
"हो, हो. मी सगळ्यांशी बोलेन. सगळ्यांची तक्रार ऐकेन; पण त्या आधी तुमच्यासाठी एक सरप्राइज आहे. रेणुका, अम्मा कुठे आहे?" माधवचा त्या गलक्याला शांत करणारा आवाज पांडवांच्या कानात पडला.
"भाई, तुला माहित आहे ना! अम्मा आहे ती. तू कितीही चांगलं वेगळं जेवण आणलस, घरी बनवलंस, तरी ती मात्र तिचा पेजेचा वाडगा शिजवत बसणार. तिचं सोड. सरप्राइज काय आहे ते सांग." थोडासा जड आवाज असणारी, गोरी गोमटी, पंजाबी ड्रेस घातलेली, त्या सगळ्यात मोठी असलेली मुलगी म्हणाली.
"ते आलेत." माधव नुसतं एवढं म्हणाला आणि एकच गलका उठला.
"अम्माSSSSSSSS…… अम्माSSSSSSSS……"
एक सूती हलक्या रंगाची साडी घालून, वार्धक्याकडे झुकलेली, ज्याची छटा तिच्या केसांपासून त्वचेपर्यंत डोकावत होती. एक स्त्री लगबगीने दारात प्रगट झाली.
"माधवा, खरं बोलतेय का ही?" असं विचारतच अम्माने रेणूच्या पाठीत धपाटा घातला.
" आं!! अम्मा लागत ग. भाई म्हणाला म्हणून मी म्हटलं. मारते कशाला?" न दुखणारी पाठ उगीचच चोळत रेणुका बोलली.
" भाई, तूच सांग ना रे अम्माला." अम्माने मोठे डोळे करताच ती मदतीसाठी माधवकडे धावली.
" हो. अम्मा, ते आलेत. आतापर्यंत पोहचले पाहिजे होते. माझ्या मागोमागचं निघाले."
" आणि हे तुला कसं कळलं?" रावणने पाठीमागून एका हाताने माधवचा गळा आवळत विचारलं. (पकड तशी घट्ट नव्हती म्हणा.)
"सोड, सोड, सांगतो. मी सांजच्या गाडीत ट्रॅकर लावला आहे."माधवने असं सांगताच सांजचे डोळे विस्फरले. ती रागाने त्याच्याकडे बघत आहे म्हटल्यावर तो वरमला.
"अशी बघू नकोस. तुझ्या या बडीनेच मला असं करायला सांगितलं होतं." असं म्हणताच ती नंदूकडे वळली.
"फॉर सेफ्टी रिझन." त्याने अगदी सहज खांदे उडवले.
तशी तिही शांत झाली.
"आता का शांत? जा दोघांनी त्याचा गळा धरा." रावणच्या हातातून आपला गळा सोडवत माधव म्हणाला.
" पुरे पुरे, कोणी कोणाचे गळे धरायची गरज नाही आहे. चला जेवायच्या वेळेला आलात तर जेवून घेऊ."अम्माने फर्मान सोडला.
"चला बाळांनो, पाहुणे आलेत तर वाढायच्या तयारीला लागा." सगळी मुलं धावत पळत वस्तीच्या मध्यभागी असलेल्या अम्माच्या वाड्यात (इतर घरांपेक्षा हे घर थोडं मोठं होतं.) गेली.
माधव अम्माला सगळ्यांची ओळख करून देऊ लागला.
" सो फ्रेंड्स, ही आमची सर्वांची अम्मा आणि अम्मा ही माझी टीम \" पांडव \".
हा स्वामी, ही ज्युलिया, हा रावण" असं म्हणत रावणचे बायसेप्स माधवने अम्माला दाखवताच एक हशा पिकला.
हा स्वामी, ही ज्युलिया, हा रावण" असं म्हणत रावणचे बायसेप्स माधवने अम्माला दाखवताच एक हशा पिकला.
" हे मिस्टर देवेश तिरुपती, हा नंदू आणि ही सांज."
एक एक करून सगळे पांडव अम्माच्या पाया पडले.
अम्मानेही त्यांच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवला.
हसत मुख अम्माची नजर कोणाला तरी शोधत होती.
"तो सुट्टीवर होता. त्यामुळे आला नाही."
माधवने असं म्हणताच उरलेल्या पांडवनी भुवया उंचावल्या.
माधवने असं म्हणताच उरलेल्या पांडवनी भुवया उंचावल्या.
"अग्नेयला शोधतेय अम्मा. तुम्ही तिला आता ओळखताय; पण ती तुम्हाला माझ्या इतकीच ओळखते." माधवने त्याची कॉलर टाइट केली.
" पण असं का? तू आम्हाला इथे आधी का नाही आणलं?" ज्युलियाने माधवला धपाटा घातला.
" का लपवलं आमच्या पासून या सर्वांना?" सांजनेही एक मुक्का दिला.
" लपवत नव्हतो मी. फक्त कधी सांगायची संधी नाही मिळाली." असं बोलताना माधवने सांजचे दोन्ही हात हातात घेतले. "तूही मला कधी काही न विचारता माझ्या फर्माईशी पूर्ण करत गेलीस." माधवने पाणावलेले डोळे फुसले.
तशी सगळ्यांनी एक टाइट हग केली.
" चला रे बाळांनो जेवून घ्या." अम्मांची खड्या आवाजातील हाक ऐकून सगळे आत गेले.
_______________________________________________________
ठिकाण : मदर मेरी हॉस्पिटल अँड रेहाबिलेशन सेंटर.
तिच्या हात धरण्याने खूश झालेला तो आज तिने प्राण जरी मागितले तरी द्यायला तयार होता.
" हां बोलाना?"
"मी काय म्हणते. लहान आहे तो. त्याचं मनावर नका घेऊ." बोलताना हात अजुनही धरलेलाच होता. मोहनच्या कानावरून शब्द नुसते आदळून जात होते.
"ऐकताय ना? मी काय सांगते ते."
"हां? होय, होय. मी नाही मनाला लावून घेत."
" छान. चला मग जेऊन घेऊ." असं म्हणतं तिने त्याचा हात सोडला आणि जेवायला गेली.
जेवताना अग्नेयचा फोन वाजू लागला.
"येस. आय एम कमिंग." जेवण आवरत घेत तो निघून ही गेला.
त्याला आज मीराशी बोलणं कठीण होतं होतं. ती सारखी सारखी त्याला मोहनशी जुळवून घेण्याची शिकवणं देतं होती. त्यामुळे त्याची चिडचिड अजून वाढत होती.
त्याला आलेला फोन कॉल, या सगळ्यातून सुटण्याचा एकमेव मार्ग वाटला त्याला.
_______________________________________________________
ठिकाण: अम्माचा वाडा
सगळ्यांची जेवणं आटपेपर्यंत दिवस मावळतीला लागला होता.
" रोज असा मोकळा वेळ मिळत नाही." तिरुपती नंदूच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला.
नंदूनेही मान हलवली, तशी दोघांच्याही शर्टना मागून ओढ जाणवली.
"दादा, चला ना आंधळी कोशिंबीर खेळू." एक छोटी परी इवलंसं तोंड करून त्यांना म्हणत होती.
तिच्या गोबऱ्या गालाचे गाल गुच्चे घेत तिरुपतीने तिला कडेवर उचलून घेतली.
"परीताई, तिघात कशी खेळणार आंधळी कोशिंबीर?" नंदूनेही तिच्या गालावर ओठ टेकवत विचारले.
"फक्त आपण तिघचं नाही. ते सगळे पण खेळत आहेत. मी तुम्हाला बोलवायला आले."तिने दूर खेळायला जमलेल्या सगळ्यांकडे हात दाखवला.
"लेट्स गो देन." तिरुपती आणि नंदू तिला घेऊनच ती दाखवते त्यादिशेने निघाले.
"राज्य कोणावर?" रेणूने विचारताच माधवने आपली इविल स्माईल आली.
" नाही हां भाई. तू सारखं असं करतोस. मी नाही, राज्य घेणार." असं म्हणत रेणू सांजच्या मागे जाऊन लपली.
"ताई, तू सांग ना, भाईला. तो तुला आणि नंदू भाईलाच घाबरतो. नाहीतर आमच्यावर बॉसिंग करत फिरतो." ती सांजला पाठीमागून मिठी मारत लाडीगोडी लावू लागली.
"असं करतो का? तुझा भाई. मग त्याच्यावरच राज्य देऊ आपण." सांजने असं म्हणताच एकच गलका उठला,
" येSSSSSS" तसा माधव आणि इतर टीम हसू लागले.
झालं! माधवच्या डोळ्यांना पट्टी बांधली गेली.
खेळ रंगू लागला. कोण चुकवून पळत होतं, तर कोण नकळत सापडत होतं.
असं करता करता सांज आऊट झाली.
"डार्लिंग, नो चिटिंग हां. लहान असताना खूप फसावयाची ती मला." नंदूच्या वाक्यावर सांज खळखळून हसली.
तिने \"ओके\"चं साईन दाखवताच रेणूने तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली.
शांतपणे मन एकाग्र करून सांज सगळ्या आजूबाजूचा अंदाज घेत खेळू लागली.
ज्युलिया आणि माधव तिची छेड काढत होते, तर रावण दुरून मजा बघत होता.
नंदू आणि तिरुपती दोन वेगळ्या टोकांना उभे होते. जणू सांजला कोणाची मैत्री त्यांच्यापर्यंत पोहचवते हे पहायची चढाओढ लागली होती.
सांज चालू लागली. तशी चहुकडून तिला हाका, टाळ्या आणि पावलांचे आवाज येऊ लागले.
ती चालता चालता क्षणभर थांबली. मन स्थिर करून मार्ग निश्चित करत निघाली.
थोड अंतर गेली नसेल, तेवढ्यात मागून रावणचा आवाज आला, " डेंजर."
पण काही उपयोग झाला नाही, त्याला आवाज द्यायला उशीर झाला होता. ती समोरच्या दगडाला अडखळून धडपडली.
आता ही तोंडावर पडणार म्हणून सगळीच जण घाबरली.
सांजनेही कापडी पट्टीच्या आत डोळे गच्च मिटून घेतले; पण ती पडली नाही.
तिला दोन मजबूत बाजूंनी आपल्या कवेत सावरलं.
सावरताना त्यांची मिठी नकळतच घट्ट झाली. त्या दोघांनाही कळलं नाही.
क्रमशः
©® स्वर्णा.
_______________________________________________________
आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.
आणि हो! मी एक गोष्ट त्या दोघांची पर्व 2 हे गोष्ट त्या दोघांचीचे नवे पर्व सुरू केल आहे. प्लीज त्याला वाचायला नक्की वेळ काढा आणि तुमचे अभिप्राय नोंदवा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा