पांडव - fantastic five⭐
भाग ५१
भाग ५१
(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)
आतापर्यंत आपण वाचले -
मीरा, तिला सगळ माहीत आहे का?
माधव, तो काय आणि का लपवतोय?
व्हर्टीकल इन्फिनिटी, एक नवीन मिस्ट्री साईन.
"म्हणजे आपल्या काहीही करून ही चेन ब्रेक करायची आहे. गूड जॉब एवरीवन. चला आता लंच ब्रेक झालाय, जेवायला जाऊ." तिरुपती आपल्या जाग्यावरून उठत म्हणाला.
तसे सगळे उठू लागले. सांज, नंदू आणि रावण यांचं लक्ष मात्र माधववर होत. त्याचा पाठलाग आधी डोळ्यांनी आणि मग देहाने केला. माधवला काहीही कळू न देता.
माधव आपली गाडी काढून सुसाट निघाला.
पाठोपाठ इतरांनी आपल्या गाड्या सोडल्या.
_______________________________________________________
आता पुढे -
ठिकाण : सीबीआय हेड क्वार्टर
काही वेळापूर्वी.....
रावणने मोबाईलवर मेसेज करून ज्युलियाला आणि नंदूने तिरुपतीला माधवचा पाठलाग करण्याविषयी कल्पना दिली होती.
माधव निघताच त्याच्या पाठोपाठ सांजच्या गाडीतून सांज, रावण आणि ज्युलिया व देवेशच्या गाडीतून देवेश आणि नंदू निघाले.
वर्तमान......
सांजच्या गाडीत
" आपण करतोय ते बरोबर आहे ना?" ज्युलियाला माधवचा असा पाठलाग करणं अजूनही पटत नव्हतं.
" आपण फक्त त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. त्याच्यावर संशय घेत नाही आहोत." रावण तिला समजावत होता की स्वतःच्या मनाला.
" ......." सांज मात्र शांत गाडी चालवत होती.
देवेशच्या गाडीत.......
"देवू, तुझा हात आता कसा आहे?" नंदू काहीतरी बोलावं म्हणून बोलला. देवेशचा हात तर कधीच बरा झाला होता.
" बरा आहे. एन के, तू संयुशी बोललास का?" देवेश चेहरा निर्विकार ठेवायचा प्रयत्न करत असला तरी काळजी त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती.
"हम्म." नंदुचा थंड प्रतिसाद बघून देवेशने गाडी चालवता चालवता एक कटाक्ष त्याच्याकडे टाकला.
"काय बोलली ती?" लक्ष जरी गाडी चालवण्यात असलं तरी कान मात्र नंदूच्या बोलण्यावर होत.
"तिच्यासाठी तो एक शॉक होता. मी तुला बोललो होतोच; की तिला पूर्वी तिचा ॲक्सिडेंट आणि पडणारी स्वप्न आठवत नव्हती." नंदूने एक दीर्घ श्वास घेतला.
" पण काल परवात तिला पडलेलं स्वप्न, तिला कसं कोण जाणे लक्षात राहिलं." बोलता बोलता पुन्हा नंदू थांबला, तसे देवेशने त्याच्याकडे वळून पाहिले आणि बोलला,
"मग?" देवेशची क्युरोसिटी वाढली.
"मग काय? माझी परेड लावली तिने." नंदूने असं बोलताच देवेश हसायला लागला.
" देवू, हसू नको. तुला माहित नाही. तिची मनधरणी करणं, मला किती कठीण गेलंय ते." नंदूने निःश्वास सोडला.
" सिरीयसली?? एनके हे तू कोणाला सांगतोय? मला? संयुला अख्या जगात कंट्रोल करू शकणार, आजोनंतरचं एकमेव माणूस तूच आहेस. तू हे कठीण वैगरे मला नको सांगू. हां! तू तेवढं चुकला असशील. रादर तिच्या स्वभावाकडे पाहता ती खूप समंजस आधीही होती आणि आता ही आहे." देवेश गाडी चालवताना मध्ये मध्ये नंदू कडे बघून बोलतं होता.
"हो! संयुच्या ओएमजी, मी विसरलो होतो, मी तिच्याबद्दल कोणाला सांगत आहे ते." नंदू आता हसत होता.
"ते सोड, पुढे काय ते सांग?" देवेश अजूनही मेन ट्रॅकवर होता.
"मला डाऊट आहे; की तो ॲक्सिडेंट नव्हता. इट्स प्लॅन मर्डर." हे ऐकताच देवेशने गाडी साइडला घेतली.
"व्हॉट? आणि असं तुला का वाटत?" देवेशच्या चेहऱ्यावर जितकं आश्चर्य तितकीच काळजी दिसतं होती.
_______________________________________________________
ठिकाण : मदर मेरी हॉस्पिटल अँड रेहाबिलेशन सेंटर.
ती आता त्या दोघांच्या समोर गप्प उभी होती. ते दोघेही तिच्याकडे डोळ्याच्या पापण्या एकमेकांना न भेटू देता बघत होते.
\" तिला मी आठवतोय! आज वर्षातला तो दिवस आहे जो मी हृदयी असा कोरून ठेवेन; की तो मला डोळे बंद करून आत डोकावताना सर्वात आधी दिसावा. असे फार कमीच क्षण आहेत म्हणा आणि म्हणूनच ते माझ्या आयुष्यातले गोल्डन मूव्हमेंटस आहेत. आज मी तिला कोणत्याही वेगळ्या नात्याने किंवा नावाने हाक न मारता, हृदयातून आर्त साद घालू शकणार आहे. आज मी तिला बऱ्याच वर्षांनी म्हणेन....... आई.\" अग्नेयचे डोळे झरझर आकाशात येऊन गर्दी करु पाहणाऱ्या काळ्या ढगांसारखे भरू लागले. मिराची समोरची प्रतिमा डोळ्यातल्या प्रेमाने धूसर केली.
\" आता पुढे काय? ती .... मला...... मला .......ती....... ओळखते. मग आधी का नाही बोलली?...... कशी बोलेल? कदाचित डॉक्टर लोबो सांगतात त्याप्रमाणे हा तो दिवस असेल जेव्हा तिला सगळं आठवतंय!\" या एका विचाराने मोहनच्या मनात धास्ती निर्माण केली.
\"आज ती खरंच! मी कोण आहे ते ओळखते. आमचं नातं, आमच्या जुन्या आठवणीं, आमची पहिली वहीली भेट तिला आठवलं असेल का?\" त्याच्या मनात आशेची हिरवी पालवी अंकुरीत झाली. तिचा रंग हिरवा होण्याआधी हळू हळू त्याला काळवंडतो आहे असं वाटू लागलं, जेव्हा त्याला त्यांची शेवटची भेट, त्या नंतरचा आजतागायतचा विरह आणि समोर उभा अग्नेय दिसला.
ज्याच्या अवघ्या आयुष्यावर, त्याच्या एका निर्णयाचे पडसाद उमटले होते. आज स्थिती जर अशी नसती तर त्याने अग्नेयला हृदयी कवटाळले असते. त्याच्याशी वेगवेगळ्या केस डिस्कस केल्या असत्या आणि बरंच काही.
पण…… हा पण नेहमी मध्ये येत राहीला आणि असं काहीच घडलं नाही.
आता ते दोघे मात्र दोन विरुद्ध टोकाला उभे राहून, तिच्या उत्तरासाठी, प्रेमाच्या पावसासाठी आतुर असलेल्या चातकाप्रमाणे टिपून घ्यायला आतुरले होते.
" सांग ना, आ…."ती कशी रिऍक्ट होईल, या भीतीने \"आई\" हा शब्द पूर्णच झाला नाही.
"अरे! त्यात काय आहे एवढं? तुम्ही दोघं असे भांडत होता; की कोणीही हाच अंदाज बांधले; की तुम्ही दोघे बाप लेक आहात. त्यात तुमच्या या एकमेकांसारख्या लकबी पाहून मला असं वाटलं; की तुम्ही बापलेक आहात, म्हणून मी बोलले. माझं काही चुकलं आहे का?" तिचं स्पष्टीकरण ऐकून त्या दोघांचा चेहरा मात्र पडला.
"काय झालं? नाही आहात का?" तिने असं विचारताचं ते दोघे काय सांगणार होते. हो आहोत! म्हणणं त्यांच्यासाठी कठीण होतं आणि नाही म्हणण्यासाठी एकच मन तर दुसऱ्याची जीभ साथ देत नव्हती.
" सॉरी, मी पण ना! उगीच परक्याच्या गोष्टीत नाक खुपसते. चला जेवायला जाऊ." त्या दोघांना तसच गप्प उभ पाहून मीरा तिथून जाऊ लागली. तसे ते दोघेही निमूटपणे तिच्या मागे जाऊ लागले.
चालता चालता ती हळूच अग्नेयच्या जवळ गेली आणि दबक्या आवाजात बोलू लागली.
"काय रे? तुम्ही असे घरी पण भांडता का? नाही, म्हणजे राहवलं नाही, म्हणून विचारते. तुझी आई कशी सहन करते तुमची ही बापलेकाची भांडण?" ती असं बोलताच त्याने जरा त्राग्यानेच तिच्याकडे पाहिले.
"आम्ही बापलेक नाही आहोत! " तो जरा जास्तच मोठ्याने म्हणाला.
"शु!! हळू बोल. त्यांना ऐकू जाईल, तर किती वाईट वाटेल त्यांना. तुमचं भांडण झालं, म्हणून काय झालं. आपल्या बाबांशी कोणी असं वागत का?" तिने त्याला दमात घेतलं. तसा तो तिला चुकवून रागात पुढे चालत निघाला. त्याला ती पुढे अजून काय सांगेल आणि विचारेल याची भीती वाटू लागली होती.
तो पुढे जाताच तिने मोहनची पाठ धरली.
"अहो, ऐका ना!!!"
तिचे एवढेच शब्द त्याची पावलं रोखायला पुरेसे ठरले. त्यात भरीस भर म्हणून की काय, तिने त्याचा हात धरला.
हातों नें तेरे,
जो मेरा हात थामा है|
मैं तो चल भी ना सका,
वक्त भी थम सा गया है|
क्रमशः
©® स्वर्णा.
_______________________________________________________
आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.
आणि हो! मी एक गोष्ट त्या दोघांची पर्व 2 हे गोष्ट त्या दोघांचीचे नवे पर्व सुरू केल आहे. प्लीज त्याला वाचायला नक्की वेळ काढा आणि तुमचे अभिप्राय नोंदवा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा