पांडव भाग ५०

Truth Always Comes Out
पांडव - fantastic five⭐
भाग ५०



(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -

अग्नेयला रणछोड हेच मोहन सरदेसाई आहेत, हे कन्फर्म झाले. संशय तर त्याला होताच.


"हे सगळं आपलं नाही आहे….." ती पुढे बोलणार एवढ्यात तिथे माधव आला.

"थँक्यू सांज. यू आर सच अ स्वीट हार्ट." असं म्हणत त्याने त्यातल्या काही बॅग्स ताब्यात घेतल्या आणि घाई घाईत निघूनही गेला.

नंदूला त्याने बघितलं होतं. त्याने काही विचारण्याआधी तिथून सटकायच असं ठरवूनच माधव पळाला होता.

जवळपास धावतच जाणाऱ्या पाठमोऱ्या माधवकडे नंदू बघतच राहीला. त्याने सांजला एक  सस्पिशीयस लूक दिला.



_______________________________________________________



आता पुढे -

ठिकाण : सीबीआय हेड क्वार्टर

सांजने हसत त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला आत नेले.


लिफ्ट मध्ये....


"तू हसतेस काय?"

"हसू नाहीतर काय करू? तुला नक्की कश्याचा प्रॉब्लेम आहे? तो आपल्यापासून काही लपवातोय याचा; की त्याच्यासाठी मी इतके सगळे पदार्थ बनवले याचा?" सांज अजूनही हसत होती


"तू टॉपिक चेंज करू नकोस. तुला माहित आहे. मला याचा काही फरक पडत नाही; की तू त्याच्यासाठी कितीही पदार्थ बनवावेत. मला याचाही प्रॉब्लेम नाही; की तो त्याचं आयुष्य आपल्यापासून लपवतोय." तो बोलता बोलता लिफ्ट थांबली.


दोघेही बाहेर आले.

सांज उत्तरादाखल फक्त हसली.

"आय नो बडी. मी गंमत केली. मला माहित आहे, तुझी कन्सर्न ही आहे; की असं काय आहे जे त्याला लपवाव लागतं आहे. रादर त्याच्या सारख्या व्यक्तीला; जो इतका स्पष्ट वक्ता आहे." सांज बोलली तशी नंदूचे डोळे चमकले.


"तुम्ही दोघे माधव बद्दल बोलतं आहात का?" रावण त्यांच्या मागे उभा होता.


त्यांनी वळून त्याच्याकडे पाहिले.

"तुला काही माहीत आहे का?" दोघांनी एकदम विचारलं.

त्याने नकारार्थी मान हलवली.


"फक्त एवढंच माहीत आहे; की काळजी करण्यासारखं काही नाही." रावणने असं बोलतं, दोघांच्या मध्ये उभं राहतं दोघांच्याही खांद्यावर हात टाकले.


तिघेही पांडव डिस्कशन रूमच्या दिशेने निघाले. तिघांचेही मोबाईल एकत्र वाजले.


"कम टू माय कॅबिन." तिरुपती.


"चला बघू खुरापाती काय म्हणतायत?" तिघे तिरुपतीच्या कॅबीनच्या दिशेने निघाले.


_______________________________________________________


ठिकाण: मदर मेरी हॉस्पिटल अँड रेहाबिलेशन सेंटर.


"काय प्रकार आहे हा?"समोरच्या व्यक्तीने त्यांना सावरत विचारले. आवाजात जरा राग होता. समोरची व्यक्ती पाहताच अग्नेय आणि मोहन(रणछोड) यांच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले.


"काही नाही. मी जरा चालताना अडखळलो. त्यामुळे तोल गेला."मोहननी स्वतःला सावरत लेकाची बाजू ही सावरली.


"तो(तोल) तर तुमचा खूप आधीच घसरलेला आहे."अग्नेय तोंडातल्या तोंडात पुटपुटला.


तरीही मोहनच्या कानापर्यंत पोहचलेच. त्यांनी त्याच्या कडे दुर्लक्ष केले. मिराच्या बाजूला व्यवस्थित उभे राहत ते पुढे म्हणाले,

"तुम्ही इथे? काही काम होतं का?"

"काम???" मीरा आता जरा गोंधळली.

"????" बराच वेळ चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करून उभीच राहिली.

"जेवलात का तुम्ही?" मोहन घड्याळात पाहत म्हणाले.


"हां! आता आठवलं मी जेवायला जात होते. तुमचे दोघांचे आवाज कानावर पडले. तेव्हा नकळत इथे आले. सॉरी, मी थोडं ऐकलं." तिने असं बोलताच या दोघांचेही चेहरे बघण्यासारखे झाले होते.

\" हिने नक्की कुठं पर्यंत ऐकलं? मुळात कुठून कुठ पर्यंत?\" मोहन.

\" तिला सगळं कळलं तरी ती इतकी शांत का?\" अग्नेय.

\" कधी ना कधी तिला हे कळणारच होतं; पण आता असं नको. तिचा नेमका काय समज झाला तेच लक्षात येत नाही आहे. याचा तिच्यावर विपरीत परिणाम नाही झाला म्हणजे मिळवलं.\" विचार करता करता त्यांनी द्विधा मनस्थितीत अग्नेयकडे पाहिले.

त्याची आणि मोहनची नजरानजर होताच दोघांनी नजर रागात फिरवली.

\" यांच्यामुळे होतंय हे सगळं. का आले हे इथे? आय हेट हीम.\" अग्नेय धुसफुसला.


\" हा पण ना जरा शांत राहिला असता तर याचं काही बिघडलं असतं आणि म्हणे स्मार्ट कॉप. एवढं कळतं नाही; की कुठे बोलताना आवाज केवढा ठेवायचा. बालिश!!\" मोहननी त्याला बघून नकारार्थी मान हलवली.

\" मला बघून मन काय हलवताय. मी माझं सेल्फ कंपोझर तुमच्यामुळे घालवून बसलो. त्याचा आता पश्र्चाताप होतोय मला.\" त्याने रागानेच त्यांच्याकडे बघत डोळे मिटले आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला.


"हॅलो, तुम्ही दोघे."मीरा त्या दोघांना कधीपासून आवाज देत होती.


" तुमचं नयन मटका करून झालं असेल तर जेवायला येता का दोघे?" तिने असं विचारताच दोघांच्याही माना सरळ रेषेत वर खाली झाल्या.


" बाप लेक अगदी सारखेच आहेत. चिडके कांदे कुठले? या दोघांमुळे आज मला जेवायला उशीर झाला." मीरा तोंडातल्या तोंडात पुटपुटत त्यांच्या पाठून चालली होती.

तरीही त्या दोघांच्या कानावर पडलचं.

" बापलेक??" दोघे एकदम मागे बघून ओरडले.

"ओरडताय काय?" तिने तर दोन्ही कान हातांनी गच्च मिटले.

" तुम्ही आता म्हणालात ना, बापलेक." मोहन हळू आवाजात म्हणाले.

" मीपण ऐकलं तुला हे माहीत आहे?"अग्नेय आपल्या आवाजावर शक्य तितकं कंट्रोल करत बोलला.

ती मात्र आता गप्प उभी होती.

_______________________________________________________


ठिकाणं: सीबीआय हेड क्वार्टर.


सगळे डीसक्शन रूममध्ये बसले होते.


ज्युलिया बोर्डवर तिने कलेक्ट केलेली माहिती एक्सप्लेन करून सांगत होती.

तिने सायबर कॅफेमध्ये मिळालेले सँपल आणि इतर ठिकाणी मिळालेले ड्रग सँपल यांच व्यवस्थित वर्गीकरण करून त्यांचा एक चार्ट बनवला होता.

त्यात क्वांटीटी, क्वालिटी आणि त्या ड्रगचा स्ट्राँगनेस मेंशन केला होता.

"मी कॅफेमध्ये मिळालेले पण माफियाशी संपर्कात नसणारे जे लोक होते. उदा. स्टूडेंट, तिथले लोकल जर्सिज, फॉरनर्स, एक्सेट्रानां, त्यांचा जबाब नोंदवून रेहाबिलेशन सेंटरमध्ये पाठवून दिलं आहे. तिथले आरोपी आपल्या स्पेशल सेल्स ना हलवण्यात आले आहेत. त्यांची हेअरिंग उद्या आहे. उद्या कोर्टमध्ये त्यांच्यासाठी बेल मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो; पण बेल मिळणं कठीण आहे." ज्युलिया लिहीता लिहीता सांगत होती.


"डोन्ट वरी. मी केस स्ट्राँग होईल, एवढे एविडेन्स फाईल केलेले आहेत. त्यांच्या पबला जेव्हा विझिट दिली. तिथले सुद्धा प्रुफ आम्ही सबमिट केले आहेत." स्वामीने त्याच्या पुढ्यातील फाईल तिरुपतीच्या हातात दिली.


"केस स्ट्राँग आहेच. फक्त मला एक संशय आहे; की याचा मेन बॉस कोणी तरी वेगळाच आहे. या प्रकरणातील आपण हजर केलेल्या सगळ्या आरोपींना शिक्षा झाली तरीही, ड्रग डीलिंग सुरूच राहिलं. याचे रूट्स खूप डिप आहेत." नंदू हातातले पेपर्स चाळत म्हणाला.


"चित्रगुप्तने दिलेल्या पेनड्राईव मध्येही असेच संकेत आहेत." सांज हातातलं पेन बोटांच्या साहाय्याने गोल गोल फिरवत म्हणाली.

"चित्रगुप्तवरून आठवलं. संयु, त्याला तुला भेटायचं आहे. असं त्याने त्याच्या वकिलाला सांगितलं आहे. त्याने खूप चांगला रिस्पॉन्स दाखवला, असं त्याचे वकील सांगत होते." तिरुपतीच्या चेहऱ्यावर समाधान होते.

" तो त्याने दाखवायला हवा होताच. तो मनाने वाईट नाही, फक्त त्याची परिस्थिती त्याला या वळणावर घेऊन आली आहे." रावण बोलला तश्या सगळ्यांनी माना हलवल्या.


"मी जाईन त्याला भेटायला." सांज शांत आवाजात म्हणाली.


ज्युलियाने सगळ्यांचं लक्ष पुन्हा एकदा बोर्डकडे वळवलं.


" सी आय थिंक या लोकांनी एक पॅटर्न फॉलो न करता बऱ्याच प्रकारे ड्रग्स पेडलिंग केलंय. प्रत्येक वेळी नवनवीन आयडिया वापरून त्यांनी त्यांच्याबद्दल
मिस्ट्री क्रियेट करून ठेवली आहे. मी त्यांच्या किती ॲक्टिविटी ट्रेस केल्या; पण मोठं काही हाती लागत नाही आहे."स्वामी थोडा चिडत म्हणाला.


" मी बऱ्याच हॉटेल्स, पब, कॅसिनो, सायबर कॅफे आणि कॉलेज कॅम्पस मधून होणाऱ्या सगळ्या कॉल्सना टॅप केलंय. या एरियातले सगळे सीसीटीव्ही कॅमेरे मी हॅक करून फुटेजवर खूप बारीक लक्ष ठेवलेलं आहे." माधवने त्याचा लॅपटॉप बिग स्क्रीनला कनेक्ट करत सगळ्यांना त्याचं वर्क दाखवायला सुरुवात केली.

" या सगळ्या लोकेशनंना मॅपवर जॉइंट केलं तर 8 इंग्लिश अंक तयार होतोय जो व्हर्टिकली इन्फिनिटी साईन नोटिफाय करतो." माधवने बिग स्क्रीनवर मार्करने ड्रॉ केलं.

"याचा अर्थ असा होतो की; हे कधीच न संपणार चक्र आहे. जे एकमेकात गुंतून राहिलं कायम." नंदू म्हणाला.


"म्हणजे आपल्या काहीही करून ही चेन ब्रेक करायची आहे. गूड जॉब एवरीवन. चला आता लंच ब्रेक झालाय, जेवायला जाऊ." तिरुपती आपल्या जाग्यावरून उठत म्हणाला.


क्रमशः



©® स्वर्णा.


_______________________________________________________


आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.

आणि हो! मी एक गोष्ट त्या दोघांची पर्व 2 हे गोष्ट त्या दोघांचीचे नवे पर्व  सुरू केल आहे. प्लीज त्याला वाचायला नक्की वेळ काढा आणि तुमचे अभिप्राय नोंदवा.

🎭 Series Post

View all