पांडव भाग ४९

Truth Always Comes Out


पांडव - fantastic five⭐
भाग ४९



(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -

ठिकाण: मदर मेरी हॉस्पिटल अँड रेहाबिलेशन सेंटर.


"इतके दिवस नाव लपवले, आता कोणालाही चेहराही दाखवावा असं वाटतं नाही आहे का?" पाठमोऱ्या आकृतीला बघून तो आयरॉनिकली म्हणाला.

पाठमोरी व्यक्ती न वळता फक्त उदासीन हसली.



_______________________________________________________



आता पुढे -


काही वेळापूर्वी

ठिकाण: मदर मेरी हॉस्पिटल अँड रेहाबिलेशन सेंटर.


मिस्टर लोबोंच्या केबिनचा डोअर खाडकन उघडला.

त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसत त्याने एक दीर्घ श्वास घेतला.

दोन्ही हातांच्या तळव्यांनी पूर्ण चेहरा झाकून त्याला रब्ब करत पून्हा हाताची बोटे केसात गुंतवली.


त्याने रिपोर्ट्स साठी त्यांच्यासमोर हात पुढे केला.

लोबोंनी त्याच्या हातात दिलेला लखोटा ओपनच होता.

"तुम्ही रिपोर्ट वाचलात?" त्याने पेपर बाहेर काढता काढता त्यांच्यावर एक तिरपा कटाक्ष टाकला.


डॉ. लोबोंनी मानेनेच होकार दिला. त्यांच्या त्या एका रिएक्शनने त्याला रिपोर्ट काय आला आहे याची जाणीव झाली.

त्याचा हात तसाच थांबला. लोबोंना वाटलं आता तो घाईने ते पेपर वाचेल पण तसे काही न करता त्याने ते पेपर एन्वेलोप मध्ये ढकलले आणि तो केबिनच्या बाहेर पडला.



_______________________________________________________


ठिकाण: मदर मेरी हॉस्पिटल अँड रेहाबिलेशन सेंटर.


त्याची पावले झरझर पडू लागली. केव्हा एकदा समोरच्या व्यक्तीला जाब विचारतो असं त्याला झालं होतं.


खूप शोधाशोध केल्यावर त्याला ती व्यक्ती टेरेसवर निरभ्र आकाशकडे पाहताना दिसली.

"इतके दिवस नाव लपवले, आता कोणाला चेहराही दाखवावा असं वाटतं नाही आहे का?" पाठमोऱ्या आकृतीला बघून तो आयरॉनिकली म्हणाला.

पाठमोरी व्यक्ती न वळता फक्त उदासीन हसली.


"मिस्टर मोहन महेश सरदेसाई उर्फ बॉस." त्याच्या तोंडून आपलं पूर्ण नाव ऐकणं असह्य झालं. तसे ते मागे वळून अग्नेयला सामोरे गेले.


"थँक्यू." त्याच्याकडे बघून ते हसत उतरले.

"कश्याबद्दल?"त्यांना शांत पाहून तो अजूनच चवताळून उठला होता.

"डीएनए रिपोर्टबद्दल. ते तू काढल्यामुळे माझा वेळ आणि पैसा दोन्ही वाचले. पैसा तसाही महत्त्वाचा नव्हताच; पण वेळ तो मी आधीच खूप वाया गेला आहे माझा. तुला भेटण्यासाठी मी खूप एक्सायटेड होतो. आय जस्ट कांन्ट वेट." ते अतिउत्साहाने रुंद हात पसरून त्याच्याजवळ येऊ लागले.

त्याने त्यांना हातानेच दूर रोखले.

"का? भेटायचं होत तुम्हाला मला? आपला काय संबंध आहे?"तो खांदे उडवत म्हणाला.

"तो तर तुझ्या हातातल्या पेपर्समध्ये प्रुव्ह झाला असेलच." बॉस थोड स्वतःला सावरत, थोड स्वतःला आवरत बोलले.

"मिस्टर मोहन महेश सरदेसाई. मी मुद्दामच माझी इच्छा नसताना तुमचं हे पूर्ण नाव घेतलं का माहीत आहे?" आता त्याचे डोळे तप्त लाव्हा ओकत होते.

बॉसनी त्याला असं बघून गच्च डोळे मिटून घेतले.

"हे जे तुमच्याकडे आहे ना! मिडल नेम विथ सरनेम! ते माझ्याकडे नाही आणि आता हा चीप पेपर ते माझ्यावर लादू शकत नाही." त्याने हातातले रिपोर्ट्स फाडले.

\"डोळ्यातल्या अश्रूंना बजावून ठेवले होते. त्यांनी माझे ऐकले नाही. आजपर्यंत भावनांच्या वादळात न अडकता तटस्थ राहत आलो, आज मात्र ते जमलेच नाही. समोरचे हे सळसळते रक्त माझे आहे, हे कळून सुद्धा आता त्याला आपलंसं करता येईल का ते माहीत नाही.\"

दोन्ही हातांच्या तळव्यांनी पूर्ण चेहरा झाकून त्याला रब्ब करत पून्हा हाताची बोटे केसात गुंतवली.(बाप लेक सारख्याच हॅब्बिट)

"सॉरी." ते एवढंच कसबसं बोलू शकले.

"आय डोन्ट नीड इट. रादर आय डोन्ट निड यू." तो रेलॅक्टंटली म्हणाला.

"मग काय हवंय तुला?" त्यांनी बोलताना त्याच्या नजरेला नजर भिडवली.


"गो अवे फ्रॉम माय मॉम अँड मी."त्याने बॉसकडे पाठ फिरवली.


"ते शक्य नाही." त्यांनी मानेने डोक्याला एक नकारार्थी झटका दिला आणि त्याबरोबर अग्नेयच्या डिमांडलाही झटकून टाकले.

"का?" तो रेस्टलेस्ली म्हणाला.

"मी मीराला आता कधीच सोडणार नाही." रिस्त्रेंट(निग्रह) होता त्यांच्या आवाजात. \" आणि ती तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. रादर तू तिच्यापासून दूर राहू शकत नाही.\" ते मनात उदासीन हसले.

चेहरा मात्र निर्विकार होता.

"ती तुम्हाला ओळखते कुठे?" तो खिल्ली उडवत म्हणाला.

"तुला असं वाटतं नाही. तू खूप दिवसांनी येतं आहेस इकडे." आता बॉसनीं त्याच्याकडे बघत खांदे उडवले.

आता त्याचा पारा पुन्हा चढायला लागला.

" ...." तो काही न बोलता रागाने बघत चलबिचल होऊ लागला, आता मात्र त्याला तसं बघून बॉसनां त्याची गंमत वाटू लागली.

"म्हणायचं काय आहे तुम्हाला?"तो रेस्टलेस होतं म्हणाला.

" तशी ती तुलाही ओळखत नसेल." मस्करीत ते बोलून गेले खरे; पण त्यांच्या चेहऱ्यावरचे मिश्किल भाव असलेले स्माईल जास्त काळ टिकले नाही.



\"तेव्हाही आणि आताही
   अजाणाता वागून गेलो.
मनात विचारही करणे अशक्य असताना
     तुला आज पुन्हा दुखावून गेलो.\"


त्याचे डोळे त्याने मिटले. त्यांच्याबद्दलचा राग आणि तिच्या आजारपणामुळे असलेलं दुःख, त्याच्या भावनांवर असणाऱ्या ताब्याला सुरंग लावू पाहत होते.


बॉसंना ही भरून आले. मनातलं अंतर कधी दूर होईल माहीत नाही; पण त्यांनी त्या दोघांतल शारीरिक अंतर कमी करत, त्याच्याजवळ येऊन उभे राहिले.

अग्नेयचे डोळे अजूनही मिटलेलेच होते.

"अयु, आय एम सॉरी. मी फ्लोमध्ये बोलून गेलो रे. मला तुला दुखवायचं नव्हतं रे."त्यांचा मायेचा हात त्याच्या खांद्यापर्यंत पोहचला.


"डोन्ट!!!!" तो त्यांचा हात स्पर्शूही न देता त्यांच्यापासून दूर होत किंचाळला.


"डोन्ट यू डेयर टू टच मी."रागाने रक्त उतरून लाल झालेले ते डोळे पाणावले होते.


"अयु? काय अयू? मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे. फक्त मी तिच्यासाठी अयु आहे. यू डोन्ट!! ट्राय टू गेट क्लोज आणि कोणाला सांगताय तिच्याबद्दल? तिच्या या अवस्थेला जबाबदार कोण आहे? काय तर म्हणे फ्लो मध्ये बोलून गेलो. फॉर युवर काईंड इन्फो, ही तिची अवस्था मी जन्माला आलो तेव्हापासून होती. अश्या अवस्थेतच मी तिच्याबरोबर माझं बालपण." त्याला स्वतःचीच कीव आली,"माझं बालपण! हां! काय असतं बालपण? मी कधी अनुभवलचं नाही. तिला आठवलं की तिला एक मुलगा आहे; तरच ती मलाजवळ घेई. इतरवेळी  इथल्याच एका नर्सच्या अंगाखांद्यावर असायचो. डॉ. लोबोनी मग मला तिच्या जवळ राहता यावं म्हणून माझ्या बद्दल तिच्या वेगवेगळ्या आठवणी रचल्या. कधी ती मला तिच्या मैत्रिणीचा मुलगा समजे, कधी डॉ. लोबोंचा मुलगा, तर कधी आई असतानाही मी मात्र माझ्या आई साठी अनाथ होतो. हे दुःख तुम्ही कसं कंपनसेट करणार आहात." आता मात्र त्याच्या चेहऱ्यावर राग कमी आणि हतबलता जास्त होती.


"बस! आता मला कोणतं ही डिस्कशन नको आहे. यू मे लिव्ह मिस्टर." त्याने पुन्हा एकदा दोन्ही हातांच्या तळव्यांनी प्राण चेहरा झाकून त्याला रब्ब करत पून्हा हाताची बोटे केसात गुंतवली.


"मी कुठेही जाणार नाही आहे." आवाजात पुन्हा फर्मनेस आला.

"जावंच लागेल."त्यानेही व्हॉईस रेझ केला.


"नाही गेलो तर काय करणार आहेस तू?"त्यांच्या डोळ्यात एक चॅलेंज होतं.


" डोन्ट चॅलेंज मी! तुम्ही अजून मला ओळखलं नाही आहात. दूर निघून जा इथून." त्याने त्याचा स्वतःवरचा ताबा घालवला आणि बॉसनां धक्का दिला.

त्याच्याकडून या कृतीची त्यांना अपेक्षा नव्हती. जुन्या जखमांवरची खपली निघून भळाभळा रक्त वाहू लागल्याने तो त्याचं कॉम्पोझर घालवून बसला.


बॉस बेसावध असल्याने त्याच्या धक्याने त्यांचा तोल गेला.


पडताना ते कोणालातरी आदळले. स्वतःच्या मुलाकडून मिळालेली वागणूक त्याचं मन दुखावून गेली.

"काय प्रकार आहे हा?"समोरच्या व्यक्तीने त्यांना सावरत विचारले. आवाजात जरा राग होता. समोरची व्यक्ती पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले.


_______________________________________________________


ठिकाण: सीबीआय हेड क्वार्टर.


सांज गाडी पार्क करून गाडीतून उतरली. मागची डिकी तिने ओपन केली. सकाळी बनवलेले ब्रेकफास्ट आयटम्स तिने व्यवस्थित बॅगमध्ये टिफीन पॅक करून आणले होते.


तिने त्या बाहेर काढायला सुरुवात केली. नंदू तिच्याकडे आश्चर्याने बघत होता.

"डार्लिंग, इतकं सगळं?"

"अरे, आपला सगळ्यांसाठी नाश्ता आणि मिड टाईम खायला आहे ते." तिने अगदी सहज सांगावं तसं सांगितलं.

"तरीही इतकं? आपण काय बकासुर आहोत का? जास्तीत जास्त एक बॅग एक्स्ट्रा. हे काय आहे?" त्याच्या चेहऱ्यावर क्यूरियोसिटी आणि स्ट्रेस एकदम दिसतं होता.

"हे सगळं आपलं नाही आहे….." ती पुढे बोलणार एवढ्यात तिथे माधव आला.

"थँक्यू सांज. यू आर सच अ स्वीट हार्ट." असं म्हणत त्याने त्यातल्या काही बॅग्स ताब्यात घेतल्या आणि घाई घाईत निघूनही गेला.

नंदूला त्याने बघितलं होतं. त्याने काही विचारण्याआधी तिथून सटकायच असं ठरवूनच माधव पळाला होता.

जवळपास धावतच जाणाऱ्या पाठमोऱ्या माधवकडे नंदू बघतच राहीला. त्याने सांजला एक  सस्पिशीयस लूक दिला.





क्रमशः



©® स्वर्णा.


_______________________________________________________


आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.

आणि हो! मी एक गोष्ट त्या दोघांची पर्व 2 हे गोष्ट त्या दोघांचीचे नवे पर्व  सुरू केल आहे. प्लीज त्याला वाचायला नक्की वेळ काढा आणि तुमचे अभिप्राय नोंदवा.

🎭 Series Post

View all