पांडव भाग ४८

Truth Always Comes Out


पांडव - fantastic five⭐
भाग ४८



(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -

सांजला तिच्या आई वडिलांच्या एक्सीडेंटबद्दल पूर्ण माहिती मिळाली, तरीही काही संशयास्पद गोष्टी तिला खटकल्या.

नंदू आणि सांज दोघांनीही त्या केसचा पुन्हा विचार करायचं ठरवलं.

अग्नेय आणि नंदूची नाईट आउट.

"सॉरी. माझ्यामुळे तुला त्रास झाला." नंदू छतावर फिरणाऱ्या फॅन कडे एकटक पाहत म्हणाला.

"हो, झाला खरा. राग किंवा वाईट वाटून घेऊन नकोस; पण मला स्पष्ट बोलायची सवय आहे. त्रास असं काही नाही; पण मला…."

"एकटं राहायला आवडतं." नंदुने त्याच वाक्य पूर्ण केलं तसं तो आश्चर्याने नंदूकडे पाहू लागला.

"माझंही काहीसं असंच आहे. आवडतं असं नाही; पण आता सवय झालीय."नंदूची छतावरची नजर अजूनही तशीच होती.

अग्नेयला त्याला पाहून आरश्यात पाहिल्यासारखं वाटू लागलं होतं. त्याने त्याच्याकडे पाठ फिरवली आणि झोपायचा प्रयत्न करू लागला.




सकाळी मेसेज टोनने अग्नेयाची झोप मोड झाली.

" डीएनए रिपोर्ट रिसिव्हड."



_______________________________________________________



आता पुढे -

अजून सूर्य उगवला ही नव्हता. अग्नेयला बाथरूमच दार उघडायच्या आवाजाने जाग आली. त्याने बघितलं तर नंदू फ्रेश होऊन आला होता.

"???"अग्नेयाने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले.


"जिमला जातो."

"इथे जवळ जिम आहे?"अग्नेय अजूनच आश्चर्यचकित झाला.

"सांजची स्वतःची फुल्ल इक्विप जिम आहे. प्लस तिथे आजो कराटे क्लास पण घेतात. चल मी दाखवतो." नंदू .

"वेट. आय मस्ट फ्रेशेन अप."अग्नेय बाथरूमच्या दिशेने धावला.


_______________________________________________________


ठिकाण: आजोंच कराटे इन्स्टिट्युट.


"ही… या…."

"हे……"

"लेफ्ट…… राईट…….."


"इची….. नी…… सन….."(नंबर्स इन जापनीज)मुलांचे एका सुरातले आवाज जसं ओडीटोरियम जवळ येत होतं तसे ते मोठे होतं जातं होते.

घराच्या बॅक साइडला एका विशिष्ट अंतरावर एक प्रशस्त बिल्डिंग होती.

आजो जवळपास वीस मुलांच्या पुढ्यात उभे होते आणि ड्रिल घेत होते.

त्यांना गूड मॉर्निंग विश करत नंदू अग्नेयला पुढे घेऊन गेला. तिथे एक फुल्ल इक्विप जिम विथ स्मॉल चेंजिंग रूम होती.


नंदू काल रात्री चेंज केलेल्या पोलो कंपनीच्या कंफर्ट कॉटन वेस्ट आणि कॉटन शॉर्ट्स मध्ये होता.

अग्नेयने त्याचा रोजचा वर्कआऊट लूक फॉलो न करता सिंपल पुमा कॉटन वेस्ट आणि पुमाचीच ट्रॅक पँट घातली होती.


दोघेही रुमच्या दाराजवळ आले आणि त्यांनी डोअर नॉक् केले.


\"ट्रुली जंटलमन\"

आत मध्ये एक मुलगी वर्कआऊट करत आहे. आपल्या अचानक आत येण्याने तिने अन्कंफर्टेब्ल फिल करू नये याची दोघांनाही पुरेपुर जाण होती.

"येस बडी. आय एम वेटींग फॉर यु." आतून एक हसरा आणि कॉन्फिडंट आवाज आला.

दोघेही आत गेले. तेव्हा ती हेडस्टँड म्हणजेच शीर्षासन करत होती.


स्लिव्हलेस स्लिम फीट कॉटन टँक टॉप त्याला मॅचींग ट्रॅक पँट घालून पाय आकाशाला परपेंडिक्युलर आणि हात आणि डोक्याच्या मदतीने जमिनीवर आधार धरून ती हेडस्टँड पोझशनिंग ( शीर्षासन) मध्ये उभी होती.

"गूड मॉर्निंग." ती.

तिचे डोळे बंद होते.

"गूड मॉर्निंग." दोघांचा एकत्र आवाज आला. तिने आश्चर्याने डोळे उघडले.

ती डोळे उघडे पर्यंत नंदू तिच्या अगदी समोर हेडस्टँड पोझिशन मध्ये उभा होता.

जरा डोळे सराऊंडिंगमध्ये फिरवले असता तिला वर्टिकल पुश अप्स करायला स्टार्ट करणारा अग्नेय दिसला.

तिचा फिफ्टीन मिनिट सेट केलेला अलार्म वाजला, तसे तिने सावकाश पाय खाली घेतले.

सरळ उभी राहत दोन मिनिट ती स्टेबल झाली.

नंतर तिने योगा मॅट सरळ केलं.

शीर्षासन केल्यानंतर बॉडी रिलॅक्स करण्यासाठी तिने शवासन सुरू केले.

नंदुचे शीर्षासन पूर्ण झाले तसे त्याने स्टॅबीलिटीसाठी ताडासन केले.

अग्नेयने व्हर्टिकल पुश अप्स कंप्लीट झाल्यावर या दोघांवर एक नजर मारली. त्या दोघांना वर्कआऊट मध्ये योगाला महत्त्व देताना बघून तो इंप्रेस झाला.

त्यानेही बॉडी काम(इंग्लिश वर्ड अर्थ - शांत) करण्यासाठी प्लॅंक एक्सरसाईज स्टार्ट केली.


सन राइज् होऊ लागला तसे सांज आणि नंदू दोघांनीही सूर्यनमस्कार घालण्याची सुरुवात केली. अग्नेय तेव्हा पुश अप्स करत होता.

काही वेळातच त्यांचा वर्कआऊट संपला, तसे घामाने भिजलेली तिघेही घरी जायला निघाले.

इन्स्टिट्युटच्या दाराजवळ येताच सांजने काऊंटिंग स्टार्ट केलं

" वन… टू…..थ्री…."

तिचं काऊंटिंग ऐकून अग्नेयने या दोघांकडे आश्चर्याने बघितले. दोघेही रनिंग स्टार्ट करायच्या पोझिशन मध्ये उभे होते.

ते धावू लागताच अग्नेयने ही त्यांना कॉपी केले.


अग्नेय बेस्ट ॲथलिट होता. त्या दोघांना ओव्हरटेक करत तो कधी पुढे गेला लक्षात यायला जरा वेळ लागला.


तसे हे दोघेही काही कमी नव्हते त्यांनीही त्याच्या पाठोपाठ नंबर लावले.



_______________________________________________________


ठिकाण: सांजचे घर.


अग्नेय त्यांच्या पुढे असल्यामुळे पटकन रूममध्ये जाऊन वॉशरूम मध्ये गेला.

नंदू त्याच्या मागून रूममध्ये पोहचला. त्याने बॉडी हिट वाढल्यामुळे रिलॅक्स होण्यासाठी पोस्ट वर्कआऊट स्ट्रेचिंग करायला सुरुवात केली.

तो स्ट्रेचिंग करत असतानाच वॉश रूमचा दरवाजा उघडला.

अग्नेय आंघोळ करून आला तसे नंदूने पुश अप्स थांबवले आणि तो आंघोळीला गेला.

शॉवरचा आवाज येतोय न येतोय तोच दार टकटकलं.


अग्नेयने डोअर ओपन केलं तर समोर सांज उभी होती. तिच्या हातात चेंजिग साठी कपडे होते.

कमरेला व्हाइट टर्किश टॉवेल गुंडाळलेला, बेअर अपर बॉडी, वेट हेअर विथ वॉटर ड्रिपिंग. एका मिडीयम साइज टर्किश नॅपकिनने ते वेट हेअर ड्राय करत अग्नेय दारात उभा होता.


एक हात दरवाज्याच्या फ्रेमला आणि दुसरा डोअर नॉब वर. जसं काय तिने आत येऊ नये, म्हणून याने तिला अडवले होते.


" व्हॉट?" त्याने आय ब्रो ट्विस्ट केल्या.


तिच्या हातातल्या कपड्यांवर नजर फिरवत तो म्हणाला, " आय हॅव माय ओन."

" देन वेअर इट. व्हाय आर यू स्टँड लाईक मॉडर्न मोगली?" तिने मिश्किल हसत त्याच्या खांद्याला हाताची बॅक साईड लावून बाजूला केले.

सरळ बेड पाशी जात कपडे ठेवून ती निघून गेली.

" डार्लिंग, आली होती ना?" आतून आवाज आला.

" ह्मम"

" ओके. प्लीज गिव्ह मी दॅट क्लॉथ." त्याने एक हात वॉश रूमचा डोअर उघडून बाहेर काढला.



______________________________________________________



ठिकाण : सांजच डायनिंग रूम.


आजो सारखेसारखे अग्नेयच्या खोलीच्या दिशेने पाहत होते.

"आजो, तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट स्टार्ट करा. नंदू आणि अग्नेय येतीलच." पाठीमागून येत त्यांच्या समोर प्लेट ठेवत सांज म्हणाली.


"एस आय विल. बट लेट देम कम. आय विल वेट फॉर देम."

"चालू द्या तुमचं. मला आज मोठी ऑर्डर आहे, त्यामुळे मी काही थांबत नाही." ती हसली आणि किचन मध्ये जाऊ लागली.

"कधी सुरू केलं हे केटरिंग?" आवाज ऐकून ती हसली; पण वळली मात्र नाही.


नंदूने आजोंच्या बाजूची खुर्ची ओढली आणि तिथे बसला.


अग्नेय त्याच्या मागोमाग येऊन समोर बसला.


"हे ऑफिसर, तू चॅम्पला ओळखत असशीलच; पण लेट मी इंट्रॉड्युस हिम डिफ्रेरेंटली. ही इज माय बॉय. सांज चाईल्ड हुड पल(फ्रेंड). वन ऑफ अवर फॅमिली मेंबर. " आजो हे सगळं बोलताना प्राउडली नंदुच्या पाठीवरून हात फिरवत होते.

"आजो, हो सगळ्यांना कळलं; की बडी तुमचा आहे ते."

"जेलस गर्ल."सांजच्या वाक्याची टेर उडवत आणि अग्नेयाला डोळा मारत आजो म्हणाले.


त्यानेही हसून रिप्लाय दिला.

_______________________________________________________


ऑफिसमध्ये जाण्यासाठी सगळे बाहेर पडले.

सांज आणि नंदू, तिच्या कारकडे वळले.
तोपर्यंत मागून बाईक स्टार्ट झाल्याचा आवाज आला.

दोघांनी नकळून आवाजाच्या दिशेने पहिले.

अग्नेय त्याची यामाहा वायझेडएफ घेऊन त्या दोघांच्या बाजूला येऊन उभा राहिला.


"???" दोघांनी त्याच्याकडे आश्चर्याने बघितले.

" मी आज लिव्ह घेतली आहे." एवढंच सांगून तो तिथून सुसाट निघूनही गेला.


" हा खूपच सुट्ट्या घेतो, नाही का?" दोघे एकदम म्हणाले.

"आपल्याला काय? चल ऑफिसला उशीर होईल." सांज गाडीत बसत म्हणाली.

\"पण मला काहीतरी वेगळं वाटतंय. काय ते नेमकं नाही सांगू शकत. याच्यावर जरा नजर ठेवायला हवी.\" मनातल्या मनात विचार करत नंदू गाडीत बसला.


_______________________________________________________


ठिकाण:...................


"इतके दिवस नाव लपवले, आता कोणाला चेहराही दाखवावा असं वाटतं नाही आहे का?" पाठमोऱ्या आकृतीला बघून तो आयरॉनिकली म्हणाला.

पाठमोरी व्यक्ती न वळता फक्त उदासीन हसली.



क्रमशः



©® स्वर्णा.


_______________________________________________________


आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.

आणि हो! मी एक गोष्ट त्या दोघांची पर्व 2 हे गोष्ट त्या दोघांचीचे नवे पर्व  सुरू केल आहे. प्लीज त्याला वाचायला नक्की वेळ काढा आणि तुमचे अभिप्राय नोंदवा.

🎭 Series Post

View all