पांडव भाग ४७

Truth Always Comes Out


पांडव - fantastic five⭐
भाग ४७



(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -

सांज आणि चित्रगुप्तची भावूक भेट.

सांजच्या घरी परत जाताना अग्नेयच्या मनाची घालमेल.

सांज इनच्या घरी पोहचल्यावर नंदूला कळले; की अग्नेय सांजकडे पेईंग गेस्ट म्हणून राहायला आला आहे.


बेडरूमच्या गॅलरीमध्ये उभी राहून ती एकटक समोर पाहत होती. सुरुवातीला शून्यात लावलेली तिची नजर समोर वाढलेल्या डेरेदार वृक्षावर स्थिरावली.

भला मोठा वृक्ष न्याहाळताना तिची नजर पक्षिणीच्या घरट्यावर रुळली.

नर मादी आणि त्यांचं छोटंसं पिल्लू आणि खूप सारा चिवचिवाट.


ती इतकी गुंग झाली होती; की धाड करून उघडलेल दारं तिच्या लक्षात आलं नाही.


लक्षात आलं नाही; की तिने येऊनही दुर्लक्ष केलं.


ती वळली नाही; की तसूभर ही हलली नाही.


दारापासून सुरू झालेला पावलांचा आवाज तिच्याजवळ येऊन थांबला.


आधी त्या आवाजात जोर होता; पण तिच्या खोलीमधल वातावरण बघून त्याचा त्रागा ओसरला.


एक दीर्घ श्वास;


"डार्लिंग, माझी सिच्युएशन सम……"

\" समजून घे ग.\"

तो पुढे बोलूच शकला नाही. हात हवेतच गोठले. शरीर ताठरले.

तो सांजच्या मिठीत बंधिस्त झाला. अश्रूंनी छातीवर पाऊस पडायला सुरुवात केली. हृदय द्रवण्यास एवढे पुरेसे झाले.


_______________________________________________________



आता पुढे -


ठिकाण - सांजची बेडरूम

ती आता थोडी सावरून बाजूला बसली होती. नंदू तिच्यासमोर बसून तिच्या अवस्थेचा अंदाज घेत होता.


"बडी, तुला नक्की काय आणि कुठपर्यंत माहित आहे." तिने सरळ विषयाला हात घातला.


"अपेक्षा करते तू काही ही न लपवता यावेळी मला सगळं सांगशिल." तिच्या आवाजात उपरोधिक टोला होता. तो बिचारा खाली मान घालून बोलू लागला.


" मी मला माहीत आहे तेवढं आणि आजोनी मला जेवढं सांगितलं तेवढं तुला सांगू शकतो." असं म्हणतं त्याने त्या दिवसाचं सगळं जसंच्या तसं वर्णन तिच्या पुढे केलं जेवढं त्याला माहित होतं तेवढं.

ती गप्प ऐकत होती.


" मला स्वप्नात काय दिसायचं?" तिने उत्सुकतेने विचारले.

"ते तू आम्हाला कधीच सांगितलं नाहीस. रादर तू आदल्या रात्री काही घडलच नव्हतं अशी वागायचीस." तो काकुळतीला येऊन म्हणाला.

" काल रात्री ही तसचं झालं असेल." ती स्वतःशीच बोलावं तशी बोलली.

"हो. पण एक गोष्ट मात्र वेगळी आहे, ती म्हणजे तुला आठवतंय की तुला स्वप्न पडलं होतं. इतरवेळी तू ते पण विसरायची." त्याने पुन्हा एकदा ही गोष्ट ब्रेन अनालाईज केली.


" तुला अजून काहीच आठवत नाही का? स्वप्न पडल्या व्यतिरिक्त." तो एगरली तिच्या रिएक्शन चेक करू लागला.

" मला…अजून ….काही……" सांज डोक्यावर थोडा स्ट्रेस देत विचार करत होती तेवढ्यात त्या दोघांना आजोंची हाक ऐकू आली.


" इट्स डिनर टाईम. एव्हरी बडी कम फास्ट."

" चल आधी जेवून घेऊ."



_______________________________________________________


ठिकाण : डायनिंग रूम


नंदू तिला हाताला धरून खोली बाहेर निघाला. तो हात तसाच डायनिंग टेबलजवळ पोहचल्यावर ही हातातच होता.

ते दोघेही एक एक चेअर बाहेर काढून बसले. अग्नेय आधीच तिथे होता. त्याने तिथे निर्विकार बसत सायलेंट लिसनरची भूमिका ॲक्सेप्ट केली होती.

जेवणं शांततेत झालं. तरीही मन मात्र अशांत होतं. आजोंना राहून राहून ही गोष्ट खटकत होती.

जेवणं झाल्यावर त्यांनी नंदूला आपल्या रूममध्ये बोलावलं.

"चॅम्प, एनीथिंग सिरीयस."

"एवरीथिंग इज सिरीयस. तिला काल रात्री स्वप्न पडलं होतं."

नंदूने असं म्हणताच आजोंच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते.

" आजों???" आता सरप्राइज व्हायची वेळ नंदुची होती.

"अरे मला काल रात्री तिचा आवाज ऐकू आला. मी तिच्या खोलीकडे तेव्हा गेलो होतो." आजोनीही जेवढ्यास तेवढं सांगितलं.


" मुद्दा हा नाही आहे की तिला स्वप्न पडलं मुद्दा हा आहे की यावेळी तिला ते पडलं याची जाणीव आहे. स्वप्नात काय घडलं हे जरी तिला अजून आठवलं नसलं तरी." नंदू म्हणाला तसे आजो ही जरा रिलॅक्स झाले.

"मग काही सिरीयस नाही आहे."


" आजो हे तुम्ही आता म्हणताय. सकाळपासून माझी परेड लावलीय तिने. तिला मी हे आधी का नाही सांगितलं म्हणून. तुमचं काय तुम्ही वा…च….ला….त." नंदुने बोलताना ओढलेला शेवटचा शब्द आणि त्याच कारण असलेली आजोंच्या मागे उभी असलेली सांज.


"......"आजोनीही वळून नंदुची आय साईट फॉलो केली.


" बडी, तू आज इथेच राहणार आहेस का?"


" माझी काहीच हरकत नाही." आजो आणि नंदू दोघेही एकदम म्हणाले.


"चांगली गोष्ट आहे." तिने असं म्हणत तिचा मोर्चा आजोंकडे वळवला.


"तुम्हाला तुमच्या लाडक्या चॅम्पने अपडेट दिले असतीलच. नाऊ ओपन युवर माउथ अँड टेल मी व्हॉट इज इन युवर स्टमक?" तिने भुवया उंचावल्या.


आजोंनी तिला सविस्तर सगळं सांगितलं.

राम आणि सीता बद्दल सांगताना त्यांचा आवाज भरून आला. सांज सगळं शांतपणे आणि काळजीपूर्वक ऐकत होती. नंदुला यातल्या बऱ्याच गोष्टी माहीत असल्या तरी काही गोष्टी नव्याने समजत होत्या.


बोलता बोलता घड्याळात केव्हा दहा वाजले कळलंच नाही.

" आजो, तुमची झोपायची वेळ झाली आहे. उद्या सकाळी मुलं येतील क्लासला. चल बडी, आपण ही झोपायला जाऊ." सांजने असं म्हणताच आजो म्हणाले, " इन डिफरेंट रूम्स." आणि मिश्किल हसले.

"आजो, यु आर बिकमींग मोर अँड मोर नॉटी दिझ डेज." नंदूने असं म्हणताच सांजही हसली.

"तू काय त्यांच्या गप्पांना लागलास. चल, उद्या ऑफिस आहे आपल्याला."सांज त्याला ओढत आजोंच्या रुममधून बाहेर घेऊन गेली.



_______________________________________________________



रूम मधून बाहेर आल्यावर नंदू सिरियस होऊन सांजला म्हणाला,

"आय हॅव गट फिलिंग. आई आणि बाबांचा ॲक्सिडेंट झाला नाही तो करवला गेला. आय एम ट्राईंग टू डिग्ग द ट्रूथ."

सांजने मात्र यावर काहीच अभिप्राय दिला नाही. फक्त शांतपणे ऐकत चालत होती.


ती चालता चालता थांबली तशी नंदुची नजर तिच्यावर स्थिरावली.

ती एका खोलीच्या बाहेर उभी राहिली होती.

तिने डोअर नॉक केलं आणि तशीच उभी राहिली.

थोड्याच वेळात दरवाजा उघडला.


समोरच्या व्यक्तीने सांजला बघून चेहऱ्यावर मोठा क्वेस्शन मार्क उमटवला आणि एकदा आत खोलीत भिंतीवर लावलेल्या घड्याळावर नजर फिरवून परत तिच्याकडे वळवली.

"सॉरी. आय नो मी तुला त्रास देत आहे; बट कॅन यू प्लीज अलावू नंदू टू स्लीप इन युवर रूम." तिने अगदी सहज विचारले.

\" ही मला असं कसं विचारू शकते. मालकाची नात असली म्हणून काय झालं. या रुमच मी भाडं देतो. फुकट राहत नाही. तो तिचा गेस्ट आहे तिने त्याला कुठेही ठेवावं माझ्या खोलीत का? एवढाच जर पुळका आला आहे तर त्याला आपल्या खोलीत…..\" विचार मनातच रद्दबातल झाला आणि मानेने कधी कन्फर्म केलं हे त्याला कळलंच नाही.

डोकं पुन्हा जाग्यावर येईपर्यंत हा दारातून बाजूलाही झाला होता आणि सांज आणि नंदू आत आले होते.

आता अग्नेय त्यांना बाहेर जा असं सांगू ही शकत नव्हता. त्याने रेस्टलेसली शोल्डर डाऊन केले.


सांज रूम मधून बाहेर पडताना त्याला

"थॅन्क्स." म्हणाली.

तो मात्र नो रिप्लाय मोडमध्ये होता.

नंदूने झोपायची तयारी सुद्धा सुरू केली. त्याच्या हातात त्याचे चेंजींग क्लॉथ होते. वॉशरूम मध्ये जाऊन तो चेंज करून आला.


नाईलाजाने अग्नेय ही तेच काम करत होता. तसं पाहायला गेलं तर त्याला रूम कोणाबरोबर ही शेअर करायची सवय नव्हती. आज ती करावी लागत होती, ते ही नंदू बरोबर.

"मी खाली चटई टाकून झोपेन." नंदू सहज बोलावं तसं बोलला आणि तो खाली अंथरण्यासाठी आजूबाजूला चटई शोधू लागला.
"सांजकडून घेऊन येतो." ती न मिळाल्याने तो म्हणाला.

" नो निड. बेडवर झोप तू. मला काहीच प्रॉब्लेम नाही." अग्नेय बेडवरची चादर व्यवस्थित करत बोलला.


दोघे एकमताने झोपले खरे; पण झोप मात्र एकालाही येत नव्हती.


दोघांनाही ही गोष्ट लक्षात आली.


"सॉरी. माझ्यामुळे तुला त्रास झाला." नंदू छतावर फिरणाऱ्या फॅनकडे एकटक पाहत म्हणाला.

"हो, झाला खरा. राग किंवा वाईट वाटून घेऊन नकोस; पण मला स्पष्ट बोलायची सवय आहे. त्रास असं काही नाही; पण मला…."

"एकटं राहायला आवडतं." नंदुने त्याच वाक्य पूर्ण केलं तसं तो आश्चर्याने नंदूकडे पाहू लागला.

"माझंही काहीसं असंच आहे. आवडतं असं नाही; पण आता सवय झालीय."नंदूची छतावरची नजर अजूनही तशीच होती.

अग्नेयला त्याला पाहून आरश्यात पाहिल्यासारखं वाटू लागलं होतं. त्याने त्याच्याकडे पाठ फिरवली आणि झोपायचा प्रयत्न करू लागला.


_______________________________________________________


सकाळी मेसेज टोनने अग्नेयाची झोप मोड झाली.

" डीएनए रिपोर्ट रिसिव्हड."


क्रमशः



©® स्वर्णा.




आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.

आणि हो! मी एक गोष्ट त्या दोघांची पर्व 2 हे गोष्ट त्या दोघांचीचे नवे पर्व  सुरू केल आहे. प्लीज त्याला वाचायला नक्की वेळ काढा आणि तुमचे अभिप्राय नोंदवा.

🎭 Series Post

View all