पांडव भाग ४६

Truth Always Comes Out


पांडव - fantastic five⭐
भाग ४६



(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -

देवेश अग्नेयला त्यांच्या कॉलेज लाईफबद्दल सांगतो. काही जुन्या आठवणी ताज्या होतात.

सांज तिची वाट पाहत असणाऱ्या चित्रगुप्तला भेटायला जाते.



दिलने दस्तक तो दि, दिमाग ने मानने से इनकार कर दिया |


"ताई." एक क्षीण आवाज तिच्या कानी पडताच ती मागे वळली.


चित्रगुप्त सावकाश चालत चैत्राच्या दिशेने येत होता.

त्याला त्याच्याकडे वळून बघणारी सांज दिसून ही तिचा तो आभास वाटत वाटतं होता.


"कसा आहेस?"चैत्रा काहीतरी बोलावं म्हणून बोलली.


"माहित नाही. तिच्या नजरेत तर मी चुकीचा आहे ग." त्याचं सटीरिकल(उपहासात्मक) बोलणं, हिच्या डोळ्यात राग निर्माण करून गेलं.

"तू वागायचं नव्हतं मग तसं." तिने रागात त्याची कॉलर पकडली.

"न जेवून आणि असं सटीरिकल बोलून तुला काय सिद्ध करायचं आहे? तू खूप मोठा क्रांती आणणारा आणि आम्ही कोण हां???? कोण आहोत आम्ही? ही बघ… ही तुझ्यासाठी जीव झुरवते. का करावं आम्ही असं? तुला काय पडलंय त्याचं? शेवटी तू तेच केलंस जे तुला करायचं होतं." तिने अजूनही त्याची कॉलर सोडली नव्हती.

तो तिला डोळ्यात साठवत होता. 


_______________________________________________________



आता पुढे -


आकाशाचे रंग जसे झरझर बदलतात तसे तिच्या आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते.

दोघेही अधिक काळ एकमेकांच्या डोळ्यात रोखून पाहू शकले नाही.


तिने त्याची कॉलर सोडली आणि एक नजर त्याच्याबरोबर असणाऱ्या ड्युटी ऑफिसरकडे वळवली.

त्यानेही तिच्या नजरेतला प्रश्न समजून घेऊन तिला डोळ्यांनीच संमती दर्शवली.

ती पुन्हा चित्रगुप्तकडे वळली. त्याचा हात पकडून त्याला तिथल्याच जवळच्या बाकड्यावर बसवलं.

स्वतःसोबत आणलेलं पार्सल त्याच्या पुढ्यात ठेवून, तिने ते उघडलं. त्याला कुठलाही प्रश्न न विचारता आणि कुठलाही रिस्पॉन्स द्यायची संधी न देता तिने सँडविच भरवायला सुरुवात केली.


येणारा जाणारा प्रत्येक माणूस, संपूर्ण टीम आणि तिथले ड्युटी ऑफिसर्स त्या दोघांना आश्चर्याने बघत होते.


तो अगदी चार-पाच वर्षांच्या मुलासारखा तिच्याकडून भरवून घेत होता.

"सॉरी." तो खाता खाता दबक्या आवाजात म्हणाला.

"त्याचा आता काही उपयोग होणार आहे का?" तिने कॉफीचा एक सीप त्याला दिला.

"तुला त्रास…" त्याचे पुढचे शब्द तिने बाहेर पडूच दिले नाहीत, त्यांना सँडविचच्या घासाने ढकलून पोटात पाठवले.


" इतकंच तुला जर समजत आहे तर इथून पुढे तो होणार नाही याची काळजी घे. मी एक वकील पाठवते. त्यांचं ऐक. हे असलं उपोषण सोडून दे. मला रोज येणं शक्य नाही; पण माझी नजर तुझ्यावर आहे हे ध्यानात ठेव." तिचं भरवण्याच काम सुरूच होतं. तो मात्र तिला डोळ्यात साठवत, यंत्रवत खात होता.


सँडविच आणि कॉफी संपत आली. ती तिथून उठली.

" कान्ट वी ॲटलिस्ट बी फ्रेंड्स?" त्याचा तोच इगरली व्हॉईस.

" इट्स डीपेंड ऑन युवर ओव्हर ऑल बिहेविअर अँड को- ऑपरेशन." ती त्याच्याकडे वळून न बघताच बोलली.

पुढे जाऊन तिने इन्चार्ज ऑफिसरांना काही इन्स्ट्रक्शन दिल्या आणि काही इन्फॉर्मेशन घेतली.

त्यानंतर मात्र ती न वळता सरळ कोर्टाच्या बाहेर निघून गेली.

सगळी टीम जी एवढं वेळ तिचं ऑबेझर्वेशन करत होती, ती तिच्या पाठोपाठ कोर्टबाहेर निघाली.


सांजला आता तटस्थ राहणे गरजेचे ही होते आणि अवघडही जात होते. तिला कोणत्याच मेंटल स्ट्रेसला सामोरं जायचं नव्हतं. आधीच काही नवीन सत्ये तिच्या पुढ्यात उलगडत होती आणि यापुढेही उलगडत जाणार होती.


गाड्या पार्क केल्या होत्या तिथे सगळे पोहचले.


" मी घरी जातं आहे." सांजने देवेशला सांगितले. त्याने मानेनेच होकार दिला. त्याला आज तिचा वेगळा मूड जाणवत होता.

" आमच्या गाड्या ऑफिसमध्ये आहेत. आम्ही तुमच्याबरोबर येऊ का?" माधव सिच्युएशनची डिमांड लक्षात घेऊन देवेशला म्हणाला.

रावणनेही त्याच्या वाक्याला दुजोरा दिला.
 

"ओके देन, लेट्स गो." देवेश म्हणाला खरा; पण अग्नेयची पावले तिथेच खोळंबली.

सगळे गाड्यांच्या दिशेने वळले.

"मिस्टर अग्नेय." सांजने अग्नेयला हाक मारली. तसा तो तिच्याकडे पाहू लागला.

"लेट मी. ड्रॉप यू." ती इतक्या सहज म्हणाली; की कोणालाही डाऊट आला नाही.

"थँक्यू." तोही गुपचूप तिच्या मागे निघाला.

अग्नेय ड्रायव्हरच्या बाजूचा दरवाजा उघडत होता, तोपर्यंत नंदू त्याच्या मागून येऊन त्या सीटवर बसला.

हे सगळं एवढ्या लवकर झालं; की काय घडलं आहे हे कळायला अग्नेयला वेळ गेला. तो दरवाजा धरून तिथेच उभा होता.


" अरे असा काय उभा तू? चल जायचं आहे आपल्याला." त्याला तसाच गोंधळलेल्या अवस्थेत उभा बघून नंदू म्हणाला.

"आं हां." तोही मग डोअर बंद करून मागच्या सीटवर बसला.


\" हिने याला सांगितलंय ना? मी हिच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहायला आहे ते. असेल तर बरं आहे; पण जर नसेल तर???\" विचार करताना अग्नेयची नजर समोर असलेल्या मिररमध्ये गेली.

नंदूने ही त्याचं वेळी पाहिले आणि दोघांची नजरानजर झाली. तेव्हा नंदूला आठवलं; की गाडीत हा पण आहे.

त्याच्या डोक्यात सांजचा रुसवा काढून तिचा मूड ठीक करणे, याव्यतिरिक्त दुसरं काही येतंच नव्हतं.

अचानक गाडीत अग्नेयचा प्रेझेंस जाणवताच त्याने रस्त्यावर नजर रोवली.


\" अरे डार्लिंगचं घर जवळ आलं आहे. हा उतरणार कधी? की हा इथेच जवळ पास राहायला आला आहे. ओह!! हां देवू म्हणाला होता; की हा रेंट वर घर शोधत आहे……\" त्याला विचार करताना काहीतरी आठवलं आणि त्याच्या आय ब्रोज ट्विस्ट झाल्या. त्याने पुन्हा एकदा मिरर मधून अग्नेयकडे पाहिले.


\" डोन्ट टेल मी. त्या दिवशी आजो ज्या पेईंग गेस्टबद्दल सांगत होते तो हा आहे. नाही, नाही हा जर तो असता तर निदान डार्लिंग तरी मला तसं बोलली असती. \"

अग्नेयने मात्र पुन्हा मिररमध्ये बघायची हिंमत केली नाही.

अग्नेयच मन आता \" गाडी थांबू नये.\" अशी प्रार्थना करत होतं.

खरं तर अग्नेय त्याला घाबरत नव्हता; पण त्याला दुसऱ्याच्या आयुष्यात त्याच्यामुळे खळबळ माजलेली नको होती.

तो जे काम करायला आला होता ते त्याला कोणाच्याही नजरेत न येता करायचे होते.

त्यातल्या त्यात \" द नंदकुमार देवधर \" यांच्या नजरेत येणं त्याला परवडणार नव्हतं.

यामुळे तो सेफ प्ले करत होता.



_______________________________________________________


ठिकाण : सांजचं घर.


गाडी थांबली तसे दोघेही वास्तवात आले.

सांज तर केव्हाच उतरून घराच्या दिशेने निघून गेली होती.

अग्नेय तर गाडीतून बाहेर येत तिच्यामागे अक्षरशः धावला.

सांज जरी घरात शिरत असली तरी तिची नजर मागून येणाऱ्या या दोघांवरही होती.

ते जसे गाडीतून उतरले हिने डोअर लॉक केलं. दरवाजा उघडाच होता. आजो हॉलमध्ये काहीतरी करत होते. तिला आत येताना पाहून ते काही विचारतील याच्या आधीच ती तिच्या खोलीच्या दिशेने निघून गेली.


तिचं वागणं त्यांना खटकलच; पण काही विचारायला मॅडम थांबल्या कुठे? रूमच्या दिशेने जाणाऱ्या तिच्याकडे बघत असतानाच अग्नेय त्यांना क्रॉस करून लगबगीने त्याच्या रूमकडे जाताना दिसला.

" हे ऑफिसर, व्हाय आर यू इन रश?"


" ब्रिगेडयर, प्लीज गीव्ह मी सम टाईम. आय फ्रेशेन अप क्विकली." तो पुढची पावलं अक्षरशः धावला.


"अरे!!!! झालंय काय यांना?"

आजोंनी हेल्पलेस्ली मान हलवली.


ते पुटपुटत वळत होते; की तेवढ्यात त्यांना दरवाज्यातून येणारा नंदू दिसला.

" हे चॅम्प! कम." त्यांनी नंदूचा हात धरुन त्याला स्वतःच्या बाजूला सोफ्यावर बसवले.


"आजो, ही इज?? " अग्नेय गेला त्या दिशेने इशारा करत तो बोलला.

नंदू, इतरांच्या पुढ्यात कितीही स्ट्रेट फॉरवर्ड आणि फिअरलेस असला तरी आजोंसाठी तो लहानपणीचा चॅम्प म्हणूनच वागे. त्याच्या मनातला प्रश्न अर्धाच त्याच्या ओठात राहिला.


"ओह!!! ही. तू ओळखतोस ना त्याला?" आजोंनी त्याला उलटा प्रश्न केला तसे नंदू क्षणभर थांबून मानेनेच होकारार्थी उतरला.

"मग? हां!!! आय फॉर्गेट टू टेल यू. ही इज अवर न्यू पेईंग गेस्ट." आजो सहज बोलावं तसं बोलले.


"व्हॉट?" त्याचा आवाज एकदम चढला. एवढा चढला; की आजोही घाबरले.
"अरे!!! असं ओरडायला काय झालं?"आजोंनी त्याला गोंधळून विचारलं.

 
त्यांना बघून त्याने टोन डाऊन केला,"व्हेन डीड धिस हॅपेन?"

आजोंनी त्याला डिटेल स्टोरी सांगितली. तो त्यांचं बोलून संपतय न संपतय तोच हा उठून सांजच्या खोलीच्या दिशेने निघाला.


"सो ही इज वेरी नाइस गाSSSSS "आजोंचे शब्द कंप्लीट होण्याचीही त्याने वाट पाहिली नाही.

" आज सगळ्यांना झालंय तरी काय? नो वन इंटरेस्टेड इन टॉकिंग विथ मी" आजो आता जरा हिरमुसले आणि संथ पावलं मोजत आपल्या खोलीच्या दिशेने निघून गेले.


_______________________________________________________


ठिकाण : सांजची खोली.


बेडरूमच्या गॅलरीमध्ये उभी राहून ती एकटक समोर पाहत होती. सुरुवातीला शून्यात लावलेली तिची नजर समोर वाढलेल्या डेरेदार वृक्षावर स्थिरावली.

भला मोठा वृक्ष न्याहाळताना तिची नजर पक्षिणीच्या घरट्यावर रुळली.

नर मादी आणि त्यांचं छोटंसं पिल्लू आणि खूप सारा चिवचिवाट.


ती इतकी गुंग झाली होती; की धाड करून उघडलेल दारं तिच्या लक्षात आलं नाही.


लक्षात आलं नाही; की तिने येऊनही दुर्लक्ष केलं.


ती वळली नाही; की तसूभर ही हलली नाही.


दारापासून सुरू झालेला पावलांचा आवाज तिच्याजवळ येऊन थांबला.


आधी त्या आवाजात जोर होता; पण तिच्या खोलीमधल वातावरण बघून त्याचा त्रागा ओसरला.


एक दीर्घ श्वास;


"डार्लिंग, माझी त्यावेळची सिच्युएशन सम……"

\" समजून घे ग.\"

तो पुढे बोलूच शकला नाही. हात हवेतच गोठले. शरीर ताठरले.

तो सांजच्या मिठीत बंधिस्त झाला. अश्रूंनी छातीवर पाऊस पडायला सुरुवात केली. हृदय द्रवण्यास एवढे पुरेसे झाले.


क्रमशः



©® स्वर्णा.




आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.

आणि हो! मी एक गोष्ट त्या दोघांची पर्व 2 हे गोष्ट त्या दोघांचीचे नवे पर्व  सुरू केल आहे. प्लीज त्याला वाचायला नक्की वेळ काढा आणि तुमचे अभिप्राय नोंदवा.

🎭 Series Post

View all