पांडव भाग ४५

Truth Always Comes Out


पांडव - fantastic five⭐
भाग ४५



(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -

टीम मेंबर चित्रगुप्तने दिलेल्या पुरव्यांच अनालिसीस करतात.

देवेश सगळ्यांना लंच ट्रीट देतो.

सांज  नंदू, माधव आणि रावणला तिला पडलेल्या स्वप्नाविषयी सांगते.


सांजला कळतं की तिला ही स्वप्न लहान असल्यापासून पडत आली आहेत. फक्त तेव्हा ती उठल्यावर तिला काही आठवत नसे.


देवेशला अग्नेय सांगतो; की तो सांजच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहायला कसा गेला.



"संयु?????"अग्नेयने भुवया उंचावत आणि नजर देवेशच्या डोळ्यावर रोखत विचारले. तेव्हा देवेशला कळलं की तो मनात न बोलता मोठ्याने बोलला.

"येस. संयु.. तुला जसं मी एंबर म्हणतो. तसंच तिला मी कॉलेजमध्ये असताना तिला संयु म्हणायचो. संयु अँड एनके माय कॉलेज बेस्टीज!!!" देवेश प्राउडली म्हणाला.

"ओह आय सी. हाउझ युर् कॉलेज लाईफ?" अग्नेयने सहज विचारावं तसं विचारलं; पण त्याला त्या तिघांचा भूतकाळ जाणून घ्यायचा होता. स्पेशली द सांज अय्यरचा भूतकाळ.


_______________________________________________________



आता पुढे -


"एकदम रॉकिंग!!! तू इमॅजिन नाही करू शकतं. एवढी मज्जा करायचो आम्ही." देवेशच्या डोळ्यांचे हिरे चमकू लागले.

" जितके नॉटी, तितकेच अभ्यासात सिंसियर. तुला सांगुन खरं वाटणार नाही.
एनके वॉन्टस् टू गो इन मेडिकल फिल्ड."

"व्हॉट??"

"येस. तो तेवढा हुशार आहे ही." देवेश मध्येच थांबला. त्याला त्याचंच वाक्य फ्लॅश बॅक मध्ये घेऊन गेले.


_______________________________________________________


फ्लॅश बॅक.


ठिकाण : कॉलेज कॅम्पस.


"हे हिरो. व्हॉट्स न्यू?"

"लेट्स गो फॉर फन."

असे छोटे मोठे संवाद कॉलेज कॅम्पस मध्ये ऐकू येत होते.


"संयु, चल ना आपण मूव्ही बघायला जाऊ." देवेश कॉलेज लायब्ररीत सांज आणि नंदू बसले होते तिथे येऊन; सांजच्या बाजूला बसत म्हणाला.

"गेलो असतो रे!! हा बडी बघ ना!! केव्हापासून नोट्स कंप्लीट करत बसला आहे." सांजने नंदूकडे बघत तोंड वाकडे केले.

"एनके, तुझ्या नोट्स तर तू दोन दिवसांपूर्वीच कंप्लीट केल्या होत्या ना??" आता मात्र नंदूने मिश्किल नजरेने सांजकडे पाहिले.

तिने मात्र या दोघांशी आय कॉन्टॅक्ट टाळला.

देवेश आता मात्र हसू लागला.

"दॅट्स नॉट फेअर संयु. तो तुझ्या नोट्स कंप्लीट करत आहे आणि तू???" देवेश जरा सिरीयसली बोलला तशी ती ओशाळली.

" सॉरी ओ एम जी."

"दॅट्स लाईक अवर गूड गर्ल." असं म्हणतं तिच्या डोक्यावरून हात फिरवत, तो नंदूकडे वळला आणि म्हणाला," एन के, तू इतका ब्रिलियंट स्टूडेंट आहेस. डिसिल्वा टीचर म्हणत होत्या की; तू मेडिकल फील्ड मध्ये तुझं सिलेक्शन झालं होत. व्हाय डोन्ट यू गो देयर?"

"कारण मला या कॉलेजमध्ये येऊन तुझ्याशी मैत्री करायची होती." नंदूची उत्तर कधी कधी देवेशला कोड्यात टाकणारी असायची.

_______________________________________________________


प्रेझेंट टाईम

ठिकाण: कोर्ट प्रिमायासेस

तेव्हा न मिळालेलं उत्तर त्याला त्या रात्री त्याच्या घरी नंदूकडून मिळालं होतं.

नंदुच्या आईने नंदुकडून सांजच्या संरक्षणाचे वचन घेतले होते. त्यामुळे आणि त्याबरोबरच सांजला पडणारी ती स्वप्ने नंदुला तिच्यापासून दूर जाऊ देत नव्हती.


तिची काळजी आणि वचनबद्धतेने नंदूला त्याच्या करियर पासून दूर केलं.


" काय रे? कुठे हरवला आहेस?"अग्नेयने देवेशला पुन्हा प्रेझेंट डे मध्ये आणले.

" कुठे नाही? हां तर मी तुला काय सांगत होतो?"

" सांजबद्दल."

" आं?" देवेशने जरा गोंधळून त्याच्याकडे पाहिले.

" अरे म्हणजे !! तू, सांज, नंदू आणि तुझ्या कॉलेज लाईफबद्दल सांगत होतास." थोडी सारवासारव झाली वाक्यांची; तरीही देवेशच्या नजरेला त्याची नजर मात्र भेटली नाही.

जास्त शंका आणि आढेवेढे देवेशने ही घेतले नाहीत. त्यालाही त्या आठवणींना उजाळा दिल्याने एक वेगळा आनंद मिळतं होता.

तो पुढे बोलू लागला. तेवढ्यात त्याला समोरून पोलिसांच्या ताफ्यात येणारा चित्रगुप्त दिसला.

गाडीतून बाहेर येताना भिरभिरती नजर एकदाच चौफेर फिरवून चित्रगुप्तने ती पुन्हा जमिनीशी मिळवली. त्याच्या बरोबरच्या पोलिसांनी लगेच त्याच्या डोक्यावर काळया रंगाचं कापडी कव्हरींग घातलं.


देवेश का शांत आहे? हे पाहण्यासाठी अग्नेयने त्याची आय साईट फॉलो केली.

चित्रगुप्त हा त्याच्यासाठी सुद्धा एक कोडंच होता. दोघेही उठून त्याच्या दिशेने निघाले.

" हॅलो ऑफिसर्." चित्रगुप्तबरोबर असणाऱ्या इन्चार्ज ऑफिसरसोबत या दोघांनी हस्तांदोलन केले.

चित्रगुप्त त्या काळया रंगाच्या कापडी कव्हरींगच्या आतून अंदाज घेत होता. त्याला आता त्या सिच्युएशनची चीड येत होती.

\" ही वॉन्टस् टू सी सांज.\"

निदान तिचा आवाज तरी कानावर पडावा, म्हणून त्याची चुळबुळ सुरु होती. हातांची चुळबुळ, पायांची थरथर, मनाची धाकधूक तिच्यासाठी होती.


"ती इथे आली नाही आहे." त्याची ही अवस्था न बघावल्याने देवेश अखेर उतरला.


त्या कव्हरींगच्या आत असतानाही त्याच्या पापण्यांची बंद होण्याची हालचाल देवेशला जाणवली.

"मला थोडे प्रश्न विचारायचे होते." अग्नेय बोलला खरा; पण तेवढ्यात केसाचा पुकारा झाला.

"सॉरी, तुम्ही नंतर त्याला सेल मध्ये भेटा."

"इट्स ओके नो प्रोब्लेम."

ऑफिसर चित्रगुप्तला घेऊन कोर्ट रूमच्या दिशेने निघून गेले.


_______________________________________________________


ठिकाण: सीबीआय हेड क्वार्टर


केबिनच्या खिडकीतून अस्ताला जाणारा सूर्य पाहत सांज उभी होती.

मन आणि बुद्धी तिला एकटं सोडायला तयार नव्हते. सगळे आराखडे, तर्क वितर्क मांडून त्यांनी तिला भांडवून सोडलं.


मोबाइलच्या रिंगने तिच्या थॉट प्रोसेसच्या एक्स्प्रेसला ब्रेक मारला.


स्क्रीनवर

\"❤️ओएमजी❤️\"

झळकत होते.

"हमं." तिचा आवाज ऐकून त्याच्या चेहऱ्यावर हसू आले.

"व्हेअर आर यू?" आवाजात क्युरिओसिटी कमी आणि काळजी जास्त झळकत होती.

"इन माय केबिन. व्हाय?"

"मला वाटलं, तू त्याला भेटायला येशील." तिच्या उत्तराच्या प्रतीक्षेत काही काळ लोटला.


" मला त्याला अश्या स्थितीत पहावल नसतं."

"पण तो फक्त तुझ्या वाटेला डोळे लावून बसला असेल तर?" त्याचा आवाज तिला विचार करायला भाग पाडू लागला.

"ओएमजी, प्लीज डोन्ट फोर्स मी." तिच्या आवाजातून त्याला काहीतरी वेगळं घडलं असावं याची कल्पना आली.

"संयु, काहीतरी घडलं आहे हे नक्की. तू सांगितलं नाहीस तर मला कळणार कसं? तुला, मला सांगायचं नसेल, तर दॅट्स डिफरेंट मॅटर." त्याने बुल्स आय हीट केला.

"असं काही नाही आहे रे." तिने निर्वाणीचा प्रतिसाद दिला.

" मग ये. आय एम वेटींग."

फोन कट झाला होता. तशीच दोन मिनिटं बंद फोनकडे बघत तिने डोळे मिटले. काही मनाशी ठरवून ती ऑफिस कॅन्टीनच्या दिशेने निघाली. वाटेत मोबाईल वरून सँडविच आणि कॉफी पार्सलची ऑर्डर दिली.


तिने कॅन्टीनमधून ऑर्डर कलेक्ट करून ती पार्किंग एरियाकडे निघाली.

गाडीच लॉक ओपन करून ती ड्रायव्हिंग सीटवर बसली न बसली तोच गाडीचे इतर दरवाजे उघडून धडाधड बंद झाले.


तिने काही न बोलता आपला दरवाजा बंद केला आणि गाडी स्टार्ट केली.

" अरे काय हे? नो रिअँक्शन?" माधव आयरोनिकली म्हणाला.

" तिच्यासाठी हे नवीन नसून देजा वु आहे."
नंदूने तिचा राग हलका करायचा आणि विषय बदलायचा प्रयत्न केला. ती मात्र काहीच रिअँक्ट झाली नाही.

गाडी कोर्टाच्या दिशेने भरधाव निघाली.


_______________________________________________________



ठिकाण: कोर्ट प्रिमायसेस


गाडी थांबली, तसे गाडीतून सगळे उतरले.

सांजने मोबाईल चेक केला आणि एका दिशेने कोर्टाच्या बिल्डिंगमध्ये जायला निघाली.

बाकीच्यांनी तिला निमूटपणे फॉलो केलं.

भिरभिरणारी नजर आणि झपझप पडणारी पावले देवेश आणि अग्नेयच्या जवळ जाऊन स्थिरावली.

नजरेतून नवीन प्रश्न डोकावत होता.

\" तो कुठे आहे?\"

"ऑफिसर सांज?" मागून ओळखीच्या आवाजात एक हाक ऐकू आली.

तिच्या शार्प ब्रेन स्कॅनर तो आवाज स्कॅन केला आणि डोळे मिटले. डोक्यात एकच नाव होते.

\" चैत्रा बेणे \"

सांज मागे वळेपर्यंत चैत्रा तिच्या अगदी जवळ येऊन पोहचली होती.

"...." सांजला काय बोलावं सुचेना.


"...." चैत्राचे ही डोळेच आसवतून बोलत होते.

अनेक प्रश्नांनी मनात थैमान घातलं होतं. उचंबळून ओठांचा रस्ता ही धरला; पण तिथपर्यंत पोहचू मात्र शकले नाहीत.


"तो वाईट नाही ग………." एवढंच ती सांजला सांगू शकली.

" आय नो, बट…. आय एम हेल्पलेस." तिने पुढे काही न बोलणंच योग्य समजलं.

चैत्राला मात्र राहवत नव्हते. तिने पुन्हा त्याची बाजू मांडायला तोंड उघडले.

पण बोलू मात्र शकली नाही.

तिच्या समोरून चित्रगुप्तला घेऊन पोलीस येतं होते.

दोन - एक दिवसात त्याचा चेहरा मोहरा पर बदलून गेला होता.

आयुष्य तर आधीच विस्कटलेले होते, त्यात आता देहही विस्कटला.


सांज त्याला पाठमोरी उभी होती. त्यामुळे दोघांनाही एकमेकांच अस्तित्व अजून स्पष्ट झाले नव्हते.


दिलने दस्तक तो दि, दिमाग ने मानने से इनकार कर दिया |


"ताई." एक क्षीण आवाज तिच्या कानी पडताच ती मागे वळली.


चित्रगुप्त सावकाश चालत चैत्राच्या दिशेने येत होता.

त्याला त्याच्याकडे वळून बघणारी सांज दिसून ही तिचा तो आभास वाटत वाटतं होता.


"कसा आहेस?"चैत्रा काहीतरी बोलावं म्हणून बोलली.


"माहित नाही. तिच्या नजरेत तर मी चुकीचा आहे ग." त्याचं सटीरिकल( उपहासात्मक) बोलणं, हिच्या डोळ्यात राग निर्माण करून गेलं.

"तू वागायचं नव्हतं मग तसं." तिने रागात त्याची कॉलर पकडली.

"न जेवून आणि असं सटीरिकल बोलून तुला काय सिद्ध करायचं आहे? तू खूप मोठा क्रांती आणणारा आणि आम्ही कोण हां???? कोण आहोत आम्ही? ही बघ… ही तुझ्यासाठी जीव झुरवते. का करावं आम्ही असं? तुला काय पडलंय त्याचं? शेवटी तू तेच केलंस जे तुला करायचं होतं." तिने अजूनही त्याची कॉलर सोडली नव्हती.

तो तिला डोळ्यात साठवत होता. 


क्रमशः



©® स्वर्णा.




आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.

प्लीज वाचायला नक्की वेळ काढा आणि तुमचे अभिप्राय नोंदवा.

🎭 Series Post

View all