पांडव भाग ४४

Truth Always Comes Out


पांडव - fantastic five⭐
भाग ४४



(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -

सांजकडे जो पेईंग गेस्ट म्हणून राहत आहे तो म्हणजे अग्नेय आहे हे कळले.

सांज आणि अग्नेय एकत्र ऑफिसला जातात.


पूर्ण टीम आता किलिंग इज हीलिंग केस नंतर ड्रग माफिया केस कडे लक्ष केंद्रित करायचं ठरवते.


"मग तुम्हां तिघांचं पॅच अप झालं आहे. हे कधी सांगणार?"आता मात्र सगळे हसायला लागले.

"त्यात सांगण्यासारख काय आहे? त्यांनी न सांगता ही आम्हांला कळलं. हो की नाही रावण?" ज्युलियाने असं विचारताच रावणने होकारार्थी मान हलवली." तू लेट करंट आहेस. त्याला आम्ही काय करणार." ज्युलिया आता त्याची टांग खेचू लागली.

सगळे हसत होते; मात्र त्यांच्या पुढे वेगळं चॅलेंज त्यांची वाट बघत होते.






आता पुढे -


ठिकाण : सीबीआय हेड क्वार्टर

स्क्रीनवर चित्रगुप्तने दिलेल्या पेन ड्राईव्ह मधली माहिती झळकत होती. त्याने खूप डिटेल माहिती कलेक्ट केली होती.

त्या एरियात असलेले सप्लायर्स, ड्रग्स देणाऱ्याचे आणि घेणाऱ्यांचे अड्डे, सप्लाय करणाऱ्यांचे फोटो आणि कॉन्टॅक्ट नंबर्स, त्या प्लेसेसचे डिटेल पत्ते इतकी सगळी माहिती त्याने त्या पेनड्राईव्ह मध्ये सेव्ह केली होती.

"इंप्रेसीव!!" बोललं कोणीतरी एक होतं; मनात मात्र सगळ्यांच्या होतं.

"त्याच्या केसमध्ये प्रोग्रेस कुठंपर्यंत झाली आहे?" अग्नेय त्यावेळी सुट्टीवर असल्याने त्याला ही अपडेट हवे होते.


"त्याने कालच आपला कबुली जबाब दिला. त्याला सध्या न्यायालयीन कोठडीत ठेवलं आहे. आज दुपारी त्याची फर्स्ट हियरींग आहे." तिरुपतीने माहिती दिली.


"त्याला कोणी वकील मिळाला का? किंवा त्याने तशी मागणी केलीय का?"माधवने उत्सुकतेने विचारलं.

"...."तिरुपतीने स्वामीकडे पाहिले.

स्वामीने नकारार्थी मान हलवली आणि बोलू लागला,

"तो तुम्ही सगळे असताना जेवढं बोलला तेवढंच. तिथून तो बोलला तर नाहीच, त्याने अजून काही खाल्लही नाही. असं मला तिथल्या कॉन्स्टेबलकडून कळलं."


"त्याने कायद्याच्या दृष्टीने गुन्हाच केला आहे. यात दुमत नाही; तरीही त्याच्याविषयी मनात चीड निर्माण होतं नाही." रावण हातातल्या पेनाने टेबलावर ठेवलेल्या कागदावर रेघोट्या मारत म्हणाला.

सगळे बोलत असले, तरी सांज मात्र गप्प होती.

"डार्लिंग!" नंदूच्या हाकेलाही तिने रिस्पोंड केलं नाही.

"डार्लिंग??" आता मात्र त्याने जरा मोठ्याने हाक मारली.


"हां???"सांज काही न कळून त्याच्याकडे बघू लागली.

"आर यू फिलिंग, अनवेल?" नंदूच हे वाक्य ऐकून तिने भुवया आकसल्या.

\" माझ्या काय तोंडावर प्रिंट झालंय का? आज माझा मूड ठीक नाही आहे ते आणि तसं असेल तर मला विचारून आणखीन माझा मूड का खराब करत आहे? आय डोन्ट नो!\"


तिला विचारात गुंतलेलं पाहून बाकीच्यांना पुन्हा प्रश्न पडला. अग्नेय मात्र शांतपणे तिचे निरीक्षण करत होता. त्याच्यासाठी आज तिच्याकडून एकच्या वर एक सरप्राइजेस मिळत होती; पण तिचं काहीतरी बिनसलं होतं, हे मात्र नक्की. काय ते कळत नव्हतं.


तोपर्यंत लंच ब्रेक झाला.

" सांज आज काय आणले आहेस टिफिन मध्ये?"ज्युलियाने उत्सुकतेने विचारले.

"आज नो टिफीन. सकाळी जरा आवरायला उशीर झाला." सांज जरा नर्व्हस होतंच म्हणाली.

तोपर्यंत तिरुपतीने मागवून येऊन डिक्लेअर केलं; की आजची लंच ट्रीट त्याच्याकडून.

सगळेजण हॉटेलला जाण्यासाठी आपापल्या गाड्या काढायला पार्किंग लॉटमध्ये गेले.


"एम्बर, व्हेर इज युवर बाईक?"

पार्किंग लॉटमध्ये अग्नेयची बाईक न दिसल्यामुळे देवेशने विचारले.


देवेशचा हात आता थोडा बरा होता.
कालच त्याने डॉक्टरकडे जाऊन,  वॉंड चेक करून आला होता. आता त्याला स्लिंगपण घालावं लागतं नव्हतं;

आज तो स्वतःची गाडी घेऊन आला होता.


देवेशच्या प्रश्नाला उत्तर न देता, अग्नेय त्याच्याच गाडीत बसला.

"माय टुडेज मोटो इज,\" सेव्ह फ्युअल.\"" त्याने तिरुपतीला सांगितले.


त्याने असं म्हणताच सांजने मनात \" आला मोठा.\" म्हणत तिच्या गाडीकडे वळली.

देवेश, अग्नेय, ज्युलिया आणि स्वामी एका गाडीने, तर नंदू, सांज, माधव आणि रावण दुसऱ्या गाडीने निघाले.

हॉटेलवर पोहचताच ज्युलिया आणि स्वामी आता निघून गेले, अग्नेय मात्र देवेशच्या सोबत थांबला. देवेशला पार्किंग स्पेस मिळेपर्यंत त्यांना गाडीत बसावे लागले.

तोपर्यंत मागाहून निघालेले नंदू आणि बाकीचे टीम मेंबर्स तिथे पोहचले.

पार्किंग स्पेस ग्रॅब करून दोघांनीही एकत्र गाड्या पार्क केल्या.


सगळे उतरून हॉटेल लॉबीच्या दिशेने निघाले तोपर्यंत ज्युलिया आणि स्वामी त्यांची वाट पाहत लॉबीमध्ये थांबले होते.


"नाइस चॉईस." माधवने हॉटेल पाहताच रिमार्क नोट केला.


देवेश गालात हसला.

टेबल समोर खुर्च्यामध्ये बसण्यापासून ते मेनू ऑर्डर करण्यापर्यंत अग्नेय या तिघांचे म्हणजेच सांज, नंदू आणि देवेशचे बारकाईने निरीक्षण करत होता. त्यांच्यातल्या संभाषणावर सुद्धा याचं बारीक लक्ष होतं.

त्याला वाटलं; सांज काल रात्री विषयी त्या दोघांना किंवा कमीत कमी नंदूला तरी सांगेल. फार काही नाही तर अग्नेय तिच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहत आहे. याचा उल्लेख करेल; पण सांजने असं काहीही केलं नव्हतं.

अग्नेय संपूर्ण लंच संपेपर्यंत कन्फ्युज होता.


_______________________________________________________


जसे आले होते तसेच ते परत ऑफिसला जायला निघाले.


"कोर्टला जावूया."गाडीत बसता बसता नंदू म्हणाला. सांज मात्र गप्प होती.

"...."सांजचे डोळे पाण्याने डबडबले.

"तो वाट बघत असेल तुझी. कॉप म्हणून नव्हे, तर मेंटोर, वेलविशर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू त्याच्यासाठी जिवाभावाची आहेस."नंदू बोलताना सांज त्याच्या डोळ्यात गोंधळून पाहत होती.

"हो. मी तुला त्याच्यापासून लांब राहायला सांगितलं होतं; कारण त्याचं वागणं तेव्हा मला क्लिअर नव्हतं आणि तुझी काळजी वाटतं होती." नंदूने समोर बघत गाडी स्टार्ट केली.

" आणि आता सकाळपासून; तुझा हा जो धड नसलेला, पडेल चेहरा आहे. तो माझ्याने बघवत नाही आहे." त्याने तिला हसवण्याचा व्यर्थ प्रयत्न केला.


" सकाळी मी त्याच्या विचारत नव्हते. बडी, मला सकाळी स्वप्न पडलं." तिचं वाक्य ऐकून त्याने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली.


त्याच्या अश्या अचानक गाडी थांबवण्याने माधव आणि रावण ही दचकले.


" तू काय म्हणालीस?" नंदू अजूनही शॉक मध्ये होता.

"सकाळी मी त्याच्या विचारत नव्हते रे."तिनेही वैतागून त्याच्याकडे पाहिले.

"त्याच्यानंतर काय म्हणालीस? ते सांग." तो जरा ओरडलाच तिच्यावर. तीही बिथरली.

" मला रात्री….रात्री नाही….पहाटे…..नाही पहाटे नाही. वेळ नक्की नाही माहित रे; पण स्वप्न पडलं एवढं नक्की." ती आठवण्याच्या प्रयत्नात दुखणार डोकं घट्ट धरून म्हणाली.


"आपण घरी जातोय." नंदूने ऑर्डरच सोडली.

" अरे नको. ऑफिसमध्ये कामं आहेत आणि मी ठीक आहे." सांज स्वतःला सावरत म्हणाली.

" हे तू नको ठरवुस."नंदूचे धारदार डोळे तिच्यावर रोखले गेले.

" बडी, माझं ऐकून घे आधी. आपण इथून ऑफिसला जातोय. बस, नाहीतर आता मी गाडीतून खाली उतरेन."सांज सुद्धा गरजली, तसे गाडीत बसलेले इतर दोघे घाबरले.


"मी सकाळपासून याच विचारत होते, तुला सांगू की नको आणि सांगू तर काय सांगू मला तर त्या स्वप्नातलं काहीच आठवत नाही. फक्त एवढंच आठवतंय की मी घाबरलेले. आता घरी गेलो तर आजो घाबरतील. त्यांच्यासाठी स्ट्रेस घेणं चांगलं नाही. आपण ऑफिस वर्क संपवून मग बोलू." एवढं पटापट बोलून तिने आवंढा गिळला." मान्य असेल तर ठीक नाहीतर मी गाडीतून उतरते."


"आणि कुठे जाशील? ही गाडी तर तुझीच आहे ना?" माधव मधेच बोलला. तशी रावणने सरळ रेषेत डावीकडून उजवीकडे मान फिरवली.

\" याला केव्हाही विनोद सुचतात.\"

या सगळ्यांवर काही उत्तर न देता नंदूने गाडी ऑफिसच्या दिशेने वळवली.

_______________________________________________________


ठिकाण: सीबीआय हेड क्वार्टर.


"हे स्वप्न प्रकरण काय आहे?" रावणने गंभीर होऊन सांजला विचारले.

गाडीत झालेल्या चर्चेत त्याने सहभाग घेतला नसला तरी त्याचं लक्ष मात्र तिथेच होतं.


सांजच्या कॅबिनमध्ये फक्त माधव, रावण आणि नंदू होते. ज्युलिया लॅब मधून ड्रग रिपोर्ट कलेक्ट करायला गेली होती.

स्वामी हॉस्पिटलमध्ये जे गार्ड होते, त्यांना बघायला गेला होता.

अग्नेय आणि देवेश चित्रगुप्तच्या हीअरिंगसाठी गेले होते.


त्यामुळे ऑफिसमध्ये आज फक्त हे चौघेचं  होते.

"मला काल रात्री एक स्वप्न पडलं, काय ते आठवतं नाही; पण असं वाटतंय की हेच स्वप्न मी गेली कित्येक वर्ष बघते." सांज आठवायचा प्रयत्न करत होती.

"वाटतंय नाही. हो, तुझी मेमरी बरोबर आहे. तू लहानपणापासून स्वप्नं बघायचीस. रात्री- बेरात्री जागी होऊन थरथरायचीस. आजोनी आणि मी तेव्हा रात्र-रात्र जागून काढली आहे; पण सकाळी उठल्यावर मात्र तुला काही आठवतं नसे. त्या आठवणी तूझ्या मनाच्या गुप्त कप्यात लपवून ठेवायचीस."आता मात्र सांज नंदूकडे कुतूहलाने पाहू लागली.


"काल रात्री तुला तेच स्वप्न पडलं असणार.."

" म्हणजे तुला आणि आजोनां माझ्या स्वप्नाबद्दल माहित होत?" सांजने त्याला पुढे बोलूच दिले नाही.

"तुम्ही तसं मला आधी का सांगितलं नाही? लहान असतानाची गोष्ट वेगळी; पण आता तरी मी समजू शकले असते ना? हे सगळं. मला तुम्ही अंधारात ठेवलात!!!"

तो पुढे काही बोलणार एवढ्यात तिने त्याला हात दाखवून गप्प केलं.

तशी ती कोणाशीही न बोलता रागाने बाहेर निघून गेली.


_______________________________________________________


ठिकाण: कोर्ट प्रिमायसेस


कोर्ट जवळच्या एका छोट्या कॅफेमध्ये देवेश आणि अग्नेय समोरासमोर बसले होते. वाफाळत्या कॉफीचे मग आणि देवेशच्या चेहऱ्यावर भरपूर प्रश्न.


"तू? सांजच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहायला गेलायस????" देवेश अक्षरशः ओरडलाच.

"अरे!! हळू. ओरडतो काय??? कान फुटेल माझा." अग्नेय दचकला.

"एक्झॅक्ल्टी, व्हॉट हॅपेन?"देवेशने शक्य तितका नॉर्मल आवाज ठेवण्याचा प्रयत्न केला.

"लिसन, कामली; मला आता याच सिटी मध्ये राहायचं असल्यामुळे. मी ऑप्शन्स शोधत होतो. तुला माहीतच आहे." असं अग्नेयने म्हणताच देवेशने स्ट्रेट व्हर्टिकल लाईनमध्ये मान हलवली. अग्नेय पुढे काय सांगतोय हे ऐकायला तो एक्साईट होता.

"गूड, तर माझ्या एजंटने मला खूप सारे फ्लॅट्स आणि स्मॉल हाऊसेस दाखवली.
त्याला वाटलं मी त्यातलं एखादं विकत घेईन; पण माझा तसा कोणताही हेतू नव्हता. तेव्हा त्याने मला रेंट आणि पेईंग गेस्टसाठी अवेलेबल असलेले त्याच्याकडेचे ऑप्शन दाखवले. तेव्हा मी ब्रिगेडियर अय्यर यांच्याशी भेटलो. आय लाईक हिज पर्सनालिटी आणि देअर ॲटमोस्फियर. तेव्हा मला माहित होत; की त्यांना एक नात आहे. मला वाटलं असेल तेरा - चौदा वर्षांची; पण हे माहित नव्हतं ना!!!!  द सांज अय्यर ही त्यांची नात आहे. तुझ्यापेक्षा मी जास्त सरप्राइज झालो होतो."बोलताना त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा काल रात्रीचा प्रसंग उभा राहिला. तो तसाच गप्प झाला.


\" फक्त तिच्या घरी पेईंग गेस्ट राहतो म्हटलं तर हा असा रिऍक्ट झाला. काल रात्री मी तिला मिठीत घेतलं होतं हे जर सांगितलं तर……..\"

विचाराने त्याच्या अंगावर काटा आला.


"अच्छा!! असं झालं तर; पण संयु, काही बोलली नाही मला मगाशी?" देवेश त्याचं ऐकत मनात बोलायचं होतं ते नकळत मोठ्याने बोलला.


"संयु?????"अग्नेयने भुवया उंचावत आणि नजर देवेशच्या डोळ्यावर रोखत विचारले. तेव्हा देवेशला कळलं की तो मनात न बोलता मोठ्याने बोलला.

"येस. संयु.. तुला जसं मी एंबर म्हणतो. तसंच तिला मी कॉलेजमध्ये असताना संयु म्हणायचो. संयु अँड एनके माय कॉलेज बेस्टीज!!!" देवेश प्राउडली म्हणाला.

"ओह आय सी. हाउझ युर् कॉलेज लाईफ?" अग्नेयने सहज विचारावं तसं विचारलं; पण त्याला त्या तिघांचा भूतकाळ जाणून घ्यायचा होता. स्पेशली द सांज अय्यरचा भूतकाळ.


क्रमशः



©® स्वर्णा.




आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.

प्लीज वाचायला नक्की वेळ काढा आणि तुमचे अभिप्राय नोंदवा.

🎭 Series Post

View all