पांडव भाग ४२

The Truth Always Comes Out


पांडव - fantastic five⭐
भाग २७


(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -

सांज बिग हार्ट रोडवर मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे लाल शर्ट घातलेल्या रिक्षा ड्रायव्हरच्या रिक्षात बसली.

नंदू आणि देवेश कॅफेमधून, माधव आणि रावण हेड क्वार्टर मधून सांजला ट्रॅक करत निघतात.

वाटेत त्यांना मिळणारा ट्रॅकिंग सिग्नल लॉस्ट झाला.

देवेशच्या खबरींची टीम देवेशला अपडेट देऊ लागली.

सांजची रिक्षा ब्लॅक अँड व्हाईट पबच्या दिशेने न जाता दुसऱ्याचं रस्त्याने निघाली.

सांजला कळतं की रिक्षा ड्रायव्हर दुसरा-तिसरा कोणी नसून चित्रगुप्त आहे.

नंदू आणि टीमला ही कळत की सांज आणि चित्रगुप्त घरकुल अनाथ आश्रमकडे निघाले आहेत.

चित्रगुप्त आणि सांज आश्रमाजवळच्या बागेत बोलत बसले.

चित्रगुप्त तिला स्वतःची स्टोरी सांगायला सुरुवात केली.

एक लहान मुलगा, जसा ओक्साबोक्शी रडतो, तसा तो तिच्या मिठीत मोकळा होतं होता. रडताना त्याचा निरागसपणा तिच्या हृदयाला हलवून गेला. त्याच्या मनाला त्याने लगेचच आवरले,

"सॉरी, मी पुन्हा असं नाही करणार." तो मन दुसरीकडे बघून म्हणाला.

"मी तुला काही बोलले का? सॉरी, तर तू वेगळ्याच गोष्टीसाठी म्हटलं पाहिजेस." तिच्या भुवया उंचावल्या.

_______________________________________________________




आता पुढे-


ठिकाण : घरकुल अनाथ आश्रम



तिचं बोलणं ऐकून त्याने पुन्हा नजर फिरवली. तो पुढे सांगू लागला.


"जेव्हा तो मला सोडून गेला तेव्हा मी त्याच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या त्या राक्षसाला मारायचा निश्चय केला. त्यासाठी आधी त्याच्याच एका पबमध्ये पार्ट टाईम जॉब पकडला. तिथे मी कोणाच्याही नजरेत न येतं माहिती गोळा करू लागलो. ड्रग्स बद्दल आणि स्पेशली मिस्टर के. जॉयबद्दल आणि तो रोज रात्री उशिरापर्यंत तिथे दारू पीत बसायचा. पिऊन फुल्ल झाला की; तिथेच त्याची एक प्रायव्हेट रूम होती. तिथे झोपायचा आणि यामुळे बाकीचे घरी निघून जायचे. त्यादिवशी मी त्याला दारुमधून ड्रग्सचा ओव्हरडोस दिला आणि त्याच्या रूम मध्ये सोडायच्या नावाखाली तिथे गेलो. तिथे गेल्यावर मी त्याला इतक्या मोठ्या मात्रेत ड्रग्स दिले की……"त्याच्या मुठी आवळल्या, नसा फुलल्या. रागाने जागेवरून उठून तो दोन पावलं पुढे गेला आणि तेवढ्याच वेगाने मागे वळून सांजच्या समोर उभा राहिला.

तिच्या दोन्ही खांद्याना धरत, त्याने त्याचं रागात आपली पकड घट्ट केली. इतकी की त्याची बोटं तिच्या खांद्यात रुतली.

"दुसऱ्याला जबरदस्ती या ड्रग्सची सवय लावणारा, स्वतः नाही पचवू शकला……" त्याने भेटल्यापासून पहिल्यांदा तिच्या नजरेला नजर भिडवली.


डोळ्यात रिव्हेंज घेतल्याबद्दलचा आनंद भरभरून तिला दिसत होता क्षणभर एका अनोळखी माणसासमोर आपण उभे आहोत असे तिला वाटून गेलं. तिच्या नजरेतली हलकीशी दुःख लकेर त्याने टिपली. स्वतः ला कसं बसं सावरत तो बाजूला झाला.


" माझा मित्र नुसता मेला नाही ग! तीळ तीळ तुटला. मग मीपण; त्याला नुसता मारला नाही त्याला बारीक बारीक तुकड्यात कापला." त्याच्या बोलण्याने तो तिला अनोळखी भासू लागला.


"किलिंग इज हिल्लींग. अग ! तो आजारी होता. काही करून त्याला पैसा कमवायचा होता. त्याला आजार होता; माया गोळा करायचा. त्याची ट्रीटमेंट नको का करायला? त्याला मी मारलं नाही; त्याला बरं केलं." त्याने बोलता बोलता खिश्यात हात घातला आणि एक पेनड्राईव्ह काढला.

" यात त्याच्या विरुद्ध मी गोळा केलेले सगळे प्रुफ आहेत." तो पेनड्राईव्ह त्याने तिच्या हातात ठेवला.

"चैत्रा ताईची स्टोरी तर तुला माहीतच आहे. हो त्याला ही मीच मारला. एका निष्पाप जीवाला पेन देणाऱ्याला, तो पेन कसा असतो याची अनुभूती करून दिली मी. मी म्हटलं ना तुला मी त्या दोघांना जगातल्या दुर्धर रोगातून बर केलं आहे. आता त्यांना तो रोग वाईट काम करायला लावणारं नाही. या सगळ्याच मला जराही गिल्ट नाही आहे." बोलता बोलता तो हसू लागला.

" अरे हो, एक छोटू गुन्हा तर राहिला कबूल करायचा." त्याने असं म्हणताच सांज ने भुवया आकसल्या.


"डोन्ट टेल मी. त्या मार्केट मधल्या गुंडाची तशी दशा तू केली होतीस." तिलाही त्या गुंडांचे चेहरे आठवून हसू आले. 


" तुझ्या हसण्यात मी गुंतावे,
वेळेने ही मला फितूर व्हावे.
सारे जगच क्षणभर स्तब्ध होऊ दे,
या क्षणात मी माझे आयुष्य जगून घ्यावे."

त्याची चारोळी ऐकून ती शांत झाली. तोही नजर चुकवून दुसरीकडे पाहू लागला.


_______________________________________________________


ठिकाण: घरकुल अनाथ आश्रम


काही अंतरावर गाड्या लावून पांडव टीम लपून या सगळ्या गोष्टी ऐकत होती.


आधी त्यांनी लोडेड गन्स् रेडी ठेवल्या होत्या. जसं जसं चित्रगुप्त बोलत होता; तसं तसं त्यांची मानसिक स्थिती बदलत होती.


एकदा त्यांना तो सांजला काहीतरी करेल याची भीती वाटतं होती, तर एकदा त्याचीच यांना दया येत होती.

"काय करूया? आपण जाऊया का समोर?" रावण म्हणाला.

"नको. तो बिथरेल. सांजच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. सो, नाऊ वेट अँड वॉच." नंदू आणि तिरुपती एकदम बोलले. तसे रावण आणि माधवने त्या दोघांकडे आश्चर्याने बघितले.


"मोगॅम्बो आणि मिस्टर इंडिया, जय आणि विरू कधी बनले." माधव रावणच्या कानात खुसपुसला.

रावण त्याच्या वाक्यावर हसायला गेला तेव्हा माधवने त्याच्या तोंडावर हात ठेवला.

"ए बाबा मला होत्याचा नव्हता नाही बनायचं." त्याच्या तोंडावरचा हात काढून, हात जोडत माधव म्हणाला.

"..." रावणने डोळ्यांनीच ओकेची खूण केली.


_______________________________________________________


ठिकाण:घरकुल अनाथ आश्रम


"कन्फेशन तर तू मला दिलं आहेस. आता तुझी जी कंडीशन आहे, ती सद्धा सांग." सांज अगदी निर्विकारपणे म्हणाली.

"कंडीशन नाही, ती एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जी तुला ॲक्सेप्ट असेल तरच मी इथे लगेच सरेंडर करेन. एल्स, आय व्हॅनिशड फ्रॉम हिअर. जस्ट लाईक दॅट."त्याने तिच्या पुढ्यात हवेत टीचक्या वाजवल्या.


"आणि हो माझं अजून एक इंपॉर्टन्ट कन्फेशन पण शिल्लक आहे. आर यू रेडी फॉर धिस?" तो आशेने तिच्याकडे पाहत होता. ती मात्र शांत बसली होती. तिचं गप्प राहणं त्याला छळत होतं.


" व्हेदर आय एम रेडी ऑर नॉट, इट डीपेंड्स ऑन व्हॉट रिस्पॉन्सिबिलिटी यू आर गोईंग टू गिव्ह मी." तिचं उत्तर ऐकून तो विक्टरीयस हसला.

"ओके. देन लिसन, नंबर वन, हे जे समोर घरकुल आहे; ते माझी एक महत्त्वाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. इथल्या सगळ्यांची तू आपलं म्हणून काळजी घेशील. त्यांच्या प्रॉब्लेममध्ये तू नेहमी त्यांची हेल्प करशील.
मी जे काही केलं ते राईट ऑर रॉंग याच्या डिस्कशन मध्ये न पडता; जसं च्या तसं सगळ्यांना शब्दानं शब्द कळायला हवं. लेट देम डीसाईड इट." बोलता बोलता त्याने एक दीर्घ श्वास घेतला.

" चैत्रा ताईकडेही अधून मधून लक्ष ठेव. ती इनोसंट आहे. मी तिची सोय करून ठेवली आहे. तरीही तू लूक आफ्टर करशील म्हणालीस; की मला टेन्शन राहणार नाही." तो असं काही तिला सांगत होता; की तो खूप मोठा आहे आणि ही लहान असून हिच्यावर पहिल्यांदा रिस्पॉन्सिबिलिटी टाकत आहे.

"आणि हो मला तूच अटक करायची. मी फक्त आणि फक्त तुझ्याशीच बोलेन. इतर कोणीही माझी केस इंत्रोगेट करायला यायचं नाही." त्याच्या बोलण्यातून अगदी ॲटिट्युड झळकत होता.

"...." सांज बराच वेळ गप्प ऐकत होती. ती काहीच बोलली नाही असे पाहून त्याने चेहरा आकसला.


" काय झालं? तू गप्प का तुला मान्य नाही आहे का हे?" त्याच्या प्रश्र्नातही असा स्वर होता की तिने तिला मान्य आहे असेच सांगावे. जणू तिचा नकार तो पचवूच शकला नसता.


"तू अजून काही कन्फेस करणारं होतास?" ती खूप शांत झाली होती.


"अच्छा… ते होय. शार्प माईंड आहे तुझे." इतका वेळ सुपर फास्ट बडबड करणारा तो गप्प झाला. तिला वाटलं अजून कुठलं तरी दुःख आहे जे त्याच्या मनाला टोचत आहे.

"...."ती त्याला काही सांगायला जातच होती की तेवढ्यात त्याने बोलायला सुरुवात केली.


"मी आतापर्यंत तुला सांगितलेला शब्दनशब्द जितका खरा आहे, त्याहून ही कैकपटीने माझं तुझ्यावर असणारं प्रेम.." \" प्रेम \" हा शब्द उच्चारताच त्याच्या आवाजात जडपणा आला.

"पण आता मी तूझ्या प्रेमासाठी योग्य नाही ग. तू नको माझ्या प्रेमात पडूस. तशी तू पडलीच केव्हा होतीस म्हणा!" तो उपहासात्मक हसला.


"प्रेम, शब्द छोटा आहे म्हणून तुम्ही सगळे सहज वापरता; की त्याचा अर्थ तुमच्या लेखी फक्त मुलगा व मुलगी मधलं शारीरिक आकर्षण एवढाच आहे?"सांज त्याच्या डोळ्यात डोळे घालुन विचारत होती.

"आधी मी जर तुला नाही म्हणाले असते; तर तू म्हणाला असतास, मला अजून एक संधी दे. आता हे सगळं समोर आलं तर म्हणतोस प्रेमात पडलीच नसशील."ती उपहासाने हसली.

"सोपं आहे का हे सगळं? मी तुला जेव्हा पहिल्यांदा भेटले होते, तेव्हाच माझ्या मनाने मला तूझ्या मनातल्या सच्चेपणा ची ग्वाही दिली होती. आता ही जेव्हा कळलं ना; किती गुन्हेगार आहेस. मन क्षणभर हादरून गेलं;पण प्रोफेशन च असं निवडलं आहे की मना आधी बुद्धी ने विचार करावा लागतो." ती जागेवरून उठून थोडी पुढे गेली आणि मागे वळून त्याच्याकडे पाहत म्हणाली.

"तुझ्यात मी एक लाईफ पार्टनर कधीच शोधला नव्हता. तरीही मला तुझ्यात एक निरागस मित्र सापडत गेला. जस्ट डियर फ्रेंड." तिने शेवटच्या शब्दांवर जोर दिला.


"आता राहिला प्रश्न तुझ्या कंडीशन ती मी ॲक्सेप्ट करते आणि मी ही प्रयत्न करेन की तुला कमीत कमी शिक्षा व्हावी. तुला तिथूनही तुझ शिक्षण सुरू ठेवता येईल का? हेही मी पाहीन. आता तू जे शिकत आहेस ते तसचं सुरू ठेवणे शक्य नाही. पण पोस्टल कोर्सेस करून, तू त्यात ब्रेक पडू देऊ नये असं मला वाटतं." तिचं बोलणं त्याच्या हृदयात घर करत होतं.


बोलत बोलत ती दोघे तिथपर्यंत पोहचली जिथे हे चौघे लपले होते. त्यांना असं जवळ येताना बघून हे चौघेही बाहेर आले.


"कॉप, आय एम रेडी टू सरेंडर. प्लीज अरेस्ट मी." तो त्यांच्याकडे पाहून म्हणाला.

"तुला आजोबांना भेटायचं नाही का?" तिच्या प्रश्नावर तो खिन्न हसला.

"मी कधीच त्यांच्याशी नजर चोरून बोललो नाही आणि आज नजर मिळवू शकणार नाही." त्याने बेड्या घालण्यासाठी तिच्यापुढे दोन्ही हात केले.


त्याला अरेस्ट करून सगळे हेड क्वार्टरच्या दिशेने निघाले.



_______________________________________________________



ठिकाण: सांज चं घर


दारावरची बेल वाज वायला गेलेला हात आज तिचा मूड सांगून जातं होता. आजोनी दार उघडताच त्यांच्या मिठीत शिरणारी ती. आज गापचुप आपल्या रूम कडे निघाली.

"अगं जेवणार आ….." आजोंचे पुढचे शब्द ओठातचं रहिले.

रुमच्या दिशेने जाणारी ती, मान खाली घालुन पावलं मोजत चालल्यासारखी जात होती.


पलंगावर देह टाकला. डोळ्यांवर दमल्यामुळे झापड येतं होती. तरीही विचार झोपू देत नव्हते. आज खूप काही घडून गेल्यासारखे वाटत होते.


रात्री दीडच्या सुमारास तिचा डोळा लागला.



_______________________________________________________


"बाबा, आपन कधी पोहचनाल?"

"पोहचणार बाळा. आता आलं हां घर जवळ."

" आई, मी दोले मिटू का? ते मिटले की जादू होईल."

"हो ग माझ्या राणी, तू डोळे मिटून घे. ते मिटले की जादू होईल. जेव्हा उघडशील आपलं घर आपल्या समोर आपलं घर….."


"आपल घल आलं का? आपल घलं… आई सांग...आई…..बाबा……."

बराच वेळ पलीकडून काही आवाज नाही म्हटल्यावर तिने बंद केलेले डोळे उघडले. डोळ्यांसमोर एक प्रखर प्रकाश मुलीचे डोळे दिपवून गेला.

हॉर्न आणि ब्रेकच्या कर्णकर्कश आवाजात तिने दोन्ही हात घट्ट कानावर दाबून धरले. समोरून येणाऱ्या त्या प्रकाशझोताने तिच्या गाडीच्याजवळ येत तिच्या डोळ्यांना बंद होण्यास भाग पाडले. पुढे काय झाले तिला कळलेच नाही; पण त्यानंतर मात्र डोळे उघडताच रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आई-बाबा समोर दिसू लागले.


"आई!" एक एक अस्पष्ट किंकाळी खोलीत पसरली. घामाने डबडबलेली ती गादीवर अंग आकसून बसली. इतक्यात तिच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि …..


ती दोन मजबूत बाहुपाशात बंदिस्त झाली. तो स्पर्श देहाची थरथर थांबवणारा व मनाला शांत करणारा ठरला. ती तशीच त्याच्या मिठीत झोपली. तिला शांत तिच्या जाग्यावर झोपवून, त्याने तिच्या अंगावर पांघरूण घातले व खोलीतून बाहेर आला.


खोलीत काळोख असल्यामुळे,  त्याला कळलं नव्हतं की ती कोण आहे; ना की तिला कळलं होतं तो कोण आहे.

त्याच्या दृष्टीने त्याने एका घाबरलेल्या छोट्या मुलीला शांत केले होते. तिच्यासाठी तर तो एक आभास होता.



क्रमशः



©® स्वर्णा.




आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंट आणि स्टिकर्सच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.

आणि हो मी एक अव्यक्त नावाची अगदी छोट्या मोठ्या क्षणांची मालिका सुरू केली आहे. प्लीज तिला वाचायला नक्की वेळ काढा आणि तुमचे अभिप्राय नोंदवा.

🎭 Series Post

View all