Login

पांडव भाग ४१

The Truth Always Comes Out
पांडव - fantastic five⭐
भाग ४१


(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -

सांज चित्रगुप्तला भेटायचं प्रॉमिस करते.

ज्युलिया नंदूला त्याच्या बिहेवियरबद्दल जाब विचारते.

नंदू ज्युलिया, माधव आणि रावणला प्लॅन समजावून सांगतो.

देवेश आणि नंदूचं डिस्कशन.

चित्रगुप्तचे कोड्यातले मेसेजेस.

सांज हेड क्वार्टरमधून बाहेर पडली.

तिने पार्किंगमध्ये जाऊन स्वतःची गाडी काढली आणि बिग हार्ट रोडचा रस्ता धरला.

आता पुढे-


ठिकाण: बिग हार्ट रोड.

सांजने स्वतःची गाडी तिथल्या लोकल पार्किंग एरियामध्ये पार्क केली आणि ती बाहेर पडली.

सांज, नेहमीपेक्षा आज वेगळी तयार झाली होती.

स्पेशल स्पाइक्स शुझ, ज्याची लेंगथ ॲंकलपेक्षा जास्त होती. एका सॉक्समध्ये शार्प पॉकेट साइज नाईफ, दुसऱ्यात पॉकेट स्विस आर्मी नाईफ. जॅकेटच्या इनर पॉकेटमध्ये दोन बाजूला दोन बॅरेटा. खिश्यात कॅमेरा पेन कम नाइफ.

तिच्या तयारी मागे तिची भीती किंवा चित्रगुप्तबद्दलचा अविश्वास नव्हता. या सगळ्या मागे फक्त सावधानता बाळगणे हे एकच उद्दिष्ट होते.

तिने बिग हार्ट रोड जवळील रिक्षा स्टँडवर नजर फिरवली. तिथे फार वर्दळ नव्हती.

मोजून तीन - चार रिक्षा होत्या.

त्यातला एक रिक्षा ड्रायव्हर सोडला, तर सगळे रेग्युलर युनिफॉर्ममध्ये होते.

ती मेसेजमधल्या क्लूप्रमाणे रेड शर्टवाल्या रिक्षा ड्रायव्हरकडे गेली.


" ब्लॅक अँड व्हाईट पब."

"येस मॅम."

तिला आवाज ओळखीचा वाटला. तिने समोर पहिलं तर त्या रिक्षा ड्रायव्हरने मंकी कॅप घातली होती.

थोडावेळ त्याचं निरीक्षण करून तिने मनातला विचार झटकून टाकला.

_______________________________________________________

ठिकाण : सीसीडी (कॅफे कॉफी डे) आणि सीबीआय हेड क्वार्टर.

काही वेळापूर्वी……….


दोन वाफळते कॉफी मग्ज टेबलावर समोर वाट बघत होते. त्या दोघांचं मात्र त्या मग्जकडे लक्ष नव्हतं.

नंदूने लॅपटॉप बॅगमधून लॅपटॉप काढला. त्याला राउटर कॅनेक्ट करून त्याने लॅपटॉप सुरू केला.

ते सुरू होऊन व्यवस्थित कनेक्ट झाल्याची खात्री होताच, त्याने माधवला शेअर स्क्रीन इनव्हाईट पाठवलं आणि त्याला कॉल करून कॉल स्पीकरवर ठेवला.

" माधव, काय अपडेट आहेत?"

"आतापर्यंत तिला चार मेसेज आले. ते असे…" माधवने मेसेज त्याच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर ओपन केले. स्क्रीन शेअर केल्यामुळे ते मेसेज नंदूच्या लॅपटॉपवर दिसू लागले.

देवेश ही आता नंदूच्या शेजारी चेअर घेऊन बसला.

त्याने लगेच त्याचा मोबाईल ऑन करून त्याच्यावर सांजच्या गाडीतल्या ट्रॅकिंग डिव्हाईसला ट्रॅक करायला सुरुवात केली.


नंदूने चित्रगुप्तचे मेसेज सहज डिकोड केले.

"तिची गाडी बिग हार्ट रोडच्या दिशेने जातेय का?" देवेशला असं विचारताच त्याने होकारार्थी मान हलवली.

"माधव, तिचा फोन ट्रॅक कर. आता ती गाडीतून उतरून रिक्षात बसेल. माधव, तिथले सीसीटीव्ही कॅमेरा हॅक कर आणि ज्या ड्रायव्हरने रेड कलरचा शर्ट किंवा टी शर्ट घातला असेल त्याच्या रिक्षाचा नंबर, ड्रायव्हरचा चेहरा काही दिसतंय का? त्याची माहिती गोळा कर." नंदू झरझर मेसेज मधल्या हिंट माधवला सांगत होता.


"ती रिक्षात बसली. गाडीच ट्रॅकिंग डिव्हाईस बिग हार्ट रोडवर येऊन स्टॉप झालं. माधव, तुला तिच्या मोबाईलची लोकेशन ट्रेस होतेय ना?" देवेशने माधवला विचारताच तो गडबडला.

"ना ना...ही, तिचा फोन डिटेक्ट होतं होता आधी; पण आता…" माधव काळजीत पडला.

" आता काय?" देवेशने अधीर होऊन विचारलं.

"आय लॉस्ट हर." माधवचा आवाज थरथरला.


"वेट, मी त्या एरिया मधल्या माझ्या खबरीनांही ही माहिती पाठवली आहे. त्यातल्या एकाच मला आता रिप्लाय आलाय; की त्याला ती रिक्षा मिळाली आहे आणि तो तिच्यापाठी आहे." देवेशने काळजीत पडलेल्या माधवला धीर दिला.

"ती रिक्षा आता ब्लॅक अँड व्हाईट पबच्या दिशेने जाईल. लेट्स गो गाईझ. वी नीड टू कॅच देम. " नंदूने असं बोलत त्याचा लॅपटॉप बंद करून बॅग मध्ये ठेवला.

माधवने ही आपली आवराआवर करताना रावणला मेसेज केला,

" ॲक्शन टाईम."

दोन्ही ठिकाणावरून ते चौघे सांजच्या दिशेने निघाले.


_______________________________________________________

वर्तमानकाळ…

ठिकाण: ब्लॅक अँड व्हाईट पबच्या दिशेने जाणारा रस्ता.


सांज, आज नेहमीपेक्षा थोडी जास्त काळजीत होती. तिचं लक्ष ती रोडवर स्थिर करत होती.

मोबाईल मध्ये गूगल मॅप ऑन होता. अचानक तिला रिक्षा ब्लॅक अँड व्हाईट पबच्या मार्गावरून दुसऱ्या रोडला जात आहे असे दिसले.


तिने खिशातले कॅमेरा पेन, जे ऑन होते ते बाहेर काढले आणि त्यातून सर्जिकल नाईफ वेगळा केला.


रिक्षा ड्रायव्हरच्या बॅकला ते लावून ती शांतपणे म्हणाली, "हु आर यू? हा पबचा रोड नाही. स्टॉप द रिक्षा राईट नाऊ. अदरवायझ आय किल्ल यु."

"जीव हा माझा मौल्यवान नव्हताच
तरी तुझ्यावरून ओवाळून टाकला.
तुझ्या प्रेमात मी आधीच मेलो
आता श्वास ही अनोळखी झाला." रिक्षा रस्त्याच्या साईडला थांबली होती.

"शास्त्री?" ती आता थोडी रिलॅक्स झाली.

"तुला ओळखं पटली असेल तर तो नाईफ बाजूला करशील का? कहीं लग गया तो खून निकल आयेगा." तो गालात हसला आणि त्याने कॅप काढली आणि तो पुढे बोलू लागला.

" आपण पबमध्ये नाही जात आहोत. कारण तुलाही तिथे जाणं आवडतं नाही आणि मलाही परवडणार नाही." तो बोलत होता खरा; पण अजून त्याने तिच्याशी नजर मिळवली नव्हती. अगदी बॅक मिररमध्ये ही तिला त्याची भिरभिरती नजर दिसतं होती.

" आपण कुठे जातोय?" तिच्या आवाजात कुठलाच भाव नव्हता.

"तुला आवडेल असंच ठिकाणं आहे." असं म्हणून त्याने रिक्षा स्टार्ट केली.

"ही रिक्षा???"

"तुला म्हणालो, होतो ना! मी छोटे, मोठे पार्ट टाईम जॉब करत असतो. या रिक्षा ओनरकडे पूर्वी नाईट शिफ्ट करायचो. आजच्या दिवसासाठी फेवर मागितलं. त्यांनी परवानगी दिली." त्याचं उत्तर ऐकता ऐकता तिने जीपीएस ऑन केला.

"अग, तिकडे इंटरनेट नाही मिळणारं. आता आहे ती रेंज, ही जाईल वाटेत." तो अजूनही पुढे बघत बोलत होता. तिला त्याच्या वागण्याचा राग ही येत होता आणि कौतुक ही वाटतं होतं.


_______________________________________________________


"व्हॉट रब्बिष?? जो खबरी तिचा पाठलाग करत होता. त्याच्या आतापर्यंतच्या करंट लोकेशनवरून असं दिसतं होतं; की तिच्या रिक्षाने ब्लॅक अँड व्हाईट पबचा रस्ता न फॉलो करता वेगळाच रुट पकडला आहे आणि आता तर त्या खबरीच लोकेशन ही मिसींग आहे." देवेश फ्रस्ट्रेट होऊन म्हणाला.

"डोन्ट वरी. मला समजलंय की तो तिला कुठे नेतोय. आपण बरोबर ट्रॅकवर आहोत आणि जर माझं प्रिडिक्शन करेक्ट असेल, तर डार्लिंग इज सेफ."नंदूच्या चेहरा आणि आवाज दोन्ही स्ट्रेस फ्री वाटले, तरी आतून धाकधूक होतीच.

"कुठे जातेय ती?"देवेशने पॅनिक होऊन विचारले.

"घरकुल एक निवारा. एक अनाथ आश्रम आहे इथून काही अंतरावर एक गाव आहे. तिथे तो आश्रम आहे." नंदूने असं बोलतच माधव आणि रावणला लोकेशनची इन्फॉर्मेशन पाठवली. पुढे नेटवर्क नसल्याचेही कळवले.

_______________________________________________________


बराच वेळ रिक्षेत शांतता होती. दोघेही स्वतः काहीच बोलत नव्हते; पण बरोबर असणाऱ्यांचे गप्प असणे मात्र मनाला त्रास देऊन जात होते.

"मी अजून एक रिक्वेस्ट करू का?"

"हां?" ती आपल्या विचारातून बाहेर आली.

"......" त्याने बोलायला सुरुवात केली; पण पुढे बोलूच शकला नाही.

\" मी तिच्याकडे काही जास्त तर मागत. नाही ना? शेवटी तिच्यासाठी मी एक…….\"

"गप्प का झालास? कसली रिक्वेस्ट?"

"नको राहू दे. मी तुझ्याकडे खूप जास्त डिमांड ठेवतोय. मी.." त्याचा आवाज जडावला. तो पुढे बोलू शकला नाही.

तीही गप्प झाली. तिला त्याच्याबरोबर स्पेंड केलेला सगळ्या मोमेंट आठवू लागल्या. अचानक तिच्या मनाला वाटलं,

\" एका ट्रकने येऊन जोरात रिक्षाला धडक द्यावी. मी खूप घाबरुन जावं. या मोठ्या न संपणाऱ्या नाईट मेयर मधून स्वतः खडबडून जाग व्हावं.\" ती जाणत होती हे सगळं अशक्य आहे. हे नाईट मेयर नाही आहे. हे ही तिच्या मनात खोल माहित होतं, जस्ट लाईक सिक्स् सेन्स; की चित्रगुप्त शास्त्री हा प्रोफेशनल क्रिमिनल नसून एक रिवेंज सीकर विक्टिम आहे. तिला त्याच्याबद्दल सिंपथी होती. तिला त्याच्यात एक छोटा फ्रेंड दिसतं होता. ज्याला में टरींग ची गरज आहे आणि ते न मिळाल्याने तो भरकटला आहे.

"आपण पोहचलो, तू रिक्षातून बाहेर येतेस ना?" चित्रगुप्त म्हणाला तसे तिने आजुबाजुला पाहिले.

बाहेर घरकुल असा मोठा बोर्ड होता. ती बाहेर येऊन आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली.

"मी सरेंडर करत आहे. तेही स्वतःच्या मर्जीने; पण मला तुझ्याकडून काही प्रॉमिस हवी आहेत." तो आता मात्र तिच्या डोळ्यात पाहत होता. त्याला त्या डोळ्यातून त्याच्या फिलिंग्ज तिच्या हार्ट पर्यंत जातायत का? याचं त्याला कन्फर्मेशन हवं होतं.


तिच्या डोळ्यात, अजुनही त्याला कशाचा पत्ता लागत नव्हता. सांज एक वेल ट्रेन कॉप होती. तिच्या डोळ्यात काय आहे हे ओळखण, हे कोणासाठीही सोप्पं नव्हतं चित्रगुप्तलापण ते कठीण गेलं.


त्याने पुढे बोलायला सुरुवात केली.


"इथे जवळच एक बाग आहे. आपण बसून बोलू." त्याने असं म्हणताच तिने मान हलवली.

दोघेही तिथल्या जवळच्या बागेत बसले. चित्रगुप्तने तिला त्याच्या बालपणापासून घडलेल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली.


"एका अपघातात आई वडील गमावलेला छोटा दोन अडीच वर्षांचा मी, आजोबांचा हात धरून घरकुल मध्ये आलो. तेव्हा पासून हे घरकुल माझं बनलं आणि मी याचा. आजोबांनी, आम्हांला सगळं दिलं. मूलभूत गरजांपासून ते आमचं शिक्षणं. तुला आठवतं? आपली पहिली भेट झाली; तेव्हा मी तुला माझ्या मित्राबद्दल सांगितलं होतं. मयूर त्याचं नाव. माझा इथला पहिला मित्र. आम्ही जवळपास एकाच वयाचे. इथेच लहानाचे मोठे झालो. अभ्यासात खूप हुशार दोघेही स्कॉलरशिप मिळवून मोठ्या कॉलेज मध्ये गेलो." सांगताना तो उठून उभा राहिला. त्याच्या शब्दात आणि डोळ्यात एक वेगळीच चमक होती.

"झालं तिथेच सगळं संपल. त्या कॉलेज मध्ये जाणं इथपर्यंत ठीक होतं; पण तिथल्या वसतिगृहात राहायला जायचा निर्णय चुकीचा होता." तो पुन्हा तिच्या बाजूला बाकड्यावर येऊन बसला आणि मन खाली घातली. तिचा हात जागीच चुळबुळत पुन्हा शांत झाला. त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला धीर देण्याची ओढ तिने मनातच दाबून टाकली.

डोळ्यातल्या आसवांनी जमिनीला आपलंसं केलं तरी त्याचे मिटलेले ओठ विलग व्हायला मानत नव्हते.


आता मात्र सांजलाही राहवलं नाही.

ती जरी एक हार्ड कॉप असली तरी आतून तर एक सॉफ्ट हार्ट गर्ल होती.

"......." काही न बोलता तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

अथक प्रयासाने जो धीर एकवटला,
तुझ्या स्पर्शाने तो गळून पडला.
पाषाण हृदयाचा मुखवटा माझा,
तुझ्या मिठीत कधीच विरघळला.


एक लहान मुलगा, जसा ओक्साबोक्शी रडतो, तसा तो तिच्या मिठीत मोकळा होतं होता. रडताना त्याचा निरागसपणा तिच्या हृदयाला हलवून गेला. त्याच्या मनाला त्याने लगेचच आवरले,

"सॉरी, मी पुन्हा असं नाही करणार." तो मन दुसरीकडे बघून म्हणाला.

"मी तुला काही बोलले का? सॉरी, तर तू वेगळ्याच गोष्टीसाठी म्हटलं पाहिजेस." तिच्या भुवया उंचावल्या.


क्रमशः



©® स्वर्णा.




आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.