Login

पांडव भाग ३८

The Truth Always Comes Out
पांडव - fantastic five⭐
भाग ३८


(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -

रावण आणि सांज हॉस्पिटलमध्ये भेट देऊन, त्या गार्डस् ची चौकशी करून येतात.


सांज आणि नंदू देवेशचा पाठलाग करतात.


देवेश, नंदू आणि सांजमधली आईस वॉल ब्रेक करण्यासाठी देवेशने पुढाकार घेतला.


आता किचनमध्ये कॉफी कमी आणि या तिघांच्या कॉलेजच्या गप्पा जास्त दरवळत होत्या.


आता पुढे -


ठिकाण : देवेशचं घर

तिघेही देवेशच्या प्रशस्थ हॉलमध्ये बसले होते.


"तुझं कॉलेज ट्रान्स्फर हे आम्हां दोघांसाठी एक मोठा धक्का होतं. तुझ्याशी असणारी मैत्री नुकतीच स्ट्रॉंग होतं असताना, त्या दिवशी तू अचानक निघून गेलास. तो ही कायमचा." नंदूने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे बोलू लागला, " तू कॉलेजमध्ये जेव्हा आला होतास, तेव्हाही खूप गप्प गप्प राहायचास. तेव्हा मी हिला म्हटलं होतं, ही नीड सम टाईम टू मिक्स विथ अस."

"म्हणून आम्ही स्वतःहुन, तुला तुझ्या कॉलेज आणि स्टडी लाईफ व्यतिरिक्त कधीच काही विचारलं नाही. वाटलं, एक वेळ अशी येईल जेव्हा तू स्वतःहुन सांगशील." सांज देवेशकडे पाहून पुढे म्हणाली, "जेव्हा ती वेळ आली तेव्हा तू गायबच झालास. ना आम्हाला तुझा ॲड्रेस माहित होता नाही कॉन्टॅक्ट नंबर. रादर त्यावेळी फोन एवढे वापरात नव्हते."

"मी चिडलो होतो. तुम्हां दोघांनाही माहित आहेच. मला तेव्हा आणि आता ही लपवाछपवीची किती चीड आहे ते. त्यामुळे जो राग, मनात घर करून बसला होता. तो काही केल्या कमी व्हायचं नावच घेत नव्हता. त्यात मी स्ट्रीम चेंज केली. एमबीएच्या एंट्रन्स एक्सझामला बसलोच नाही. गपचुप युपिएससी क्लिअर केली आणि घर सोडलं. तोपर्यंत बराच काळ लोटला होता. सगळ्या आठवणी ब्लर झाल्या होत्या. ट्रेनिंग डेज मध्ये एंबर आणि मी खूप धमाल केली. नंतर तिथला परफॉर्मनस पाहून मला खूप छान पोस्टिंग मिळाली." देवश भडभडून बोलतं होता. बरेच दिवस दाबून ठेवलेल्या मेमरीज आणि फिल्लिंग्ज ब्लास्ट होऊन बाहेर पडत होत्या.

"तिथे माझी आणि बॉसची म्हणजे सरदेसाई सरांची ओळख झाली. हि इज आयडॉल फॉर मी अल्सो. नंतर मी जॉब करता करता ज्युनिअरनां ट्रेन करायला सुद्धा जाऊ लागलो. अजूनही मला गेस्ट लेक्चरसाठी बोलावतात. पुढे आपण तिघे पुन्हा एकदा भेटलो. सगळ्या मेमरीज ताज्या झाल्या. त्या पुढे काय घडलं ते तुम्हां दोघांना माहित आहेच." देवेशच्या डोळ्यात कॉन्फिडन्स वाहत होता.

बोलता बोलता कॉफीचे मग रिकामी झाले होते, तरीही मैफिल काही केल्या संपत नव्हती.

सांजचा फोन वाजू लागला. त्या रिंगमुळे सगळ्यांचं लक्ष सांजच्या फोनकडे गेले.

"आजोंचा फोन असणारं." असं म्हणून सांजने फोन घेतला आणि ती बाजूला जाऊन बोलू लागली.

_______________________________________________________


(सांज आणि आजोंच फोनवरच संभाषण)

सांज: हॅलो, सो सॉरी, आजो. मी फोन करणारच होते तुम्हाला.

आजो: बेटू, घड्याळ बघ. किती वाजलेत? तू जेवायला नाही हे कळवायला कधी विसरत नाही. आज तुझा फोन नाही, म्हणून काळजी वाटली.

सांज: आजो, मी आणि बडी, ओएमजीच्या घरी आहोत. जुन्या गप्पा निघाल्या तर वेळ कधी गेला कळलंच नाही.

आजो: हाऊ इज ही नाऊ?

सांज: ही इज फाईन. मायनर पेन आहे. वॉंडबद्दल आता ड्रेसिंग करताना कळेल किती भरलाय तो.
आजो, मी आणि बडी इथेच जेवून येऊ. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जेऊन घ्या.

आजो : यू डोन्ट वरी अबाऊट मी. आपला पेईंग गेस्ट आला आहे. मी आज डिनर त्याच्याबरोबर करेन. ही इज वेरी जॉली फेलो. आय लाईक दॅट यंग मॅन.

सांज: आजो, एन्जॉय युर सेल्फ. तो कसा ही असो, त्याच्या जास्त क्लोज जाऊ नका.

आजो: येस डियर. रात्री उशीर होतं असेल तर नंदूबरोबर ये.

सांज: येस ब्रिगेडियर.


_______________________________________________________



सांज फोन ठेवून हे दोघे बोलत बसले होते तिथे आली.

" काय म्हणत होते आजो?" देवेशने विचारलं.

"काय म्हणणार? ते जेवायला हीची वाट बघत असतील आणि बाईसाहेब त्यांना सुद्धा कळवायला विसरल्या; की त्या इथे आपल्यासोबत आहेत." नंदूचा चिडका स्वर ऐकून देवेश हसला.

"हो ना. असंच करते संयु तू, सकाळी त्या चित्रगुप्तबद्दलपण आम्हांला सांगायला विसरलीस." देवेश ड्राम्याटिकली सांजला म्हणाला.

" ए खुरापती ..." सांजने त्याला रागात खाऊ का गिळू नजरेने पाहू लागली.

आता देवेशचा चेहरा हसता हसता रागाने तांबडाबूंद झाला.

त्याला असं पाहून नेहमी प्रमाणे सांजने नंदूकडे टाळी मागितली. तिचा टाळीसाठी पुढे आलेला हात बिचारा एकटाच मागे आला.


"आपण असेच हसत, खिदळत राहायला माझी काहीच हरकत नाही; पण त्या आधी तुम्ही दोघे काय जेवणार ते सांगा. मी ऑर्डर करतो." देवेशने त्यांना असं सांगून ऑर्डर करण्यासाठी मोबाईल हातात घेतला. त्या दोघांनी त्याला आपल्या ऑर्डर दिल्या.


"ओके. वी विल वेट." असं म्हणत देवेशने फोन ठेवला.

"काही वेळातच आपलं जेवण येईल, तर मी काय म्हणत होतो?"

" थांबा, थांबा, तुम्ही दोघेही काहीही म्हणायच्या आधी; मला काहीतरी सांगायचं आहे." दोघांचेही लक्ष तिच्या बोलण्याकडे केंद्रित झाले.

" सकाळी जो काही विषय झाला त्याविषयी. कॅन्टीनमध्ये मी आणि बडी बसलो असताना, त्याला मी सांगणारच होते; की रात्री मला चित्रगुप्तचा फोन आला होता. तेवढ्यातच आम्हाला तुझ्याकडून बोलवण आलं आणि ते बोलणं अर्धवट राहिलं." तिने एक आवंढा गिळून पुन्हा बोलायला सुरुवात केली. "मला काही लपवायचं नव्हतं. फक्त मी सांगू शकले नाही आणि गैरसमज निर्माण झाला. आता उरला विषय चित्रगुप्त शास्त्रीचा. त्याच्याविषयी फक्त माझे एवढेच म्हणणे आहे; की फक्त संशयावरून त्याला शिक्षा नको व्हायला. त्यांचं वय कमी आहे. तो शिकत आहे. आपला एक चुकीचा निर्णय, त्याचं करियर उद्ध्वस्त करू शकतो. नंतर पश्र्चाताप होण्यापेक्षा, आधीच आपण पुरेपूर चौकशी करून मगच त्याच्याविषयी ॲक्शन घेऊ."

" आय ॲग्री वीथ हर." देवेश मनापासून म्हणाला.

"टेल मी समथिंग दॅट आय डोन्ट नो. तू तर तिच्याशी नेहमीच सहमत असायचास. ती काय बोलली; की लगेच हा देव बोलला तथास्तु." नंदू नाराजीने म्हणाला.

" तो बोलणारच, आफ्टर ऑल ही इज ओएमजी. माय गॉड." सांजने नंदूला अजूनच डीवचले.

देवेश काही बोलणार एवढ्यात बेल वाजली.


" जेवण आलं असेल. मी घेऊन येतो." नंदू म्हणाला.

"आम्ही प्लेट्स रेडी करतो." देवेश आणि सांज डायनिंग टेबलजवळ गेले.


_______________________________________________________


जेवण आटपून तिघेही हॉलमध्ये निवांत बसले होते.


"देवू, हाताचं ड्रेसिंग करायला हवं ते बघ थोडं रक्त येतय." नंदू काळजीने म्हणाला.

" हो. मी झोपायच्या आधी करेन." देवेश बेफिकरीने म्हणाला.

"चालणार नाही. बडी तू आताच कर त्याचं ड्रेसिंग मी फर्स्ट एड बॉक्स घेऊन येते. कुठे ठेवलाय सांग." सांज उठत म्हणाली.

"अरे!!!!! नको तुम्हां दोघांना घरी पोहचायला उशीर होईल." देवेश म्हणाला.

"पण मी घरी कुठे जातोय?" नंदूने असं म्हणताच सांज आणि देवेश दोघांनीही त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले.

"हे कधी ठरलं?" त्या दोघांनी एकदम विचारलं.

"आताचं, हा जो तुझा वन मॅन आर्मी शो सुरू आहे. तो बघून, मी असं ठरवलं आहे; की जोपर्यंत तुझा हात बरा होईपर्यंत मी इथेच राहणार आहे." असं म्हणत नंदू उठला आणि त्याने देवेशला विचारलं "फर्स्ट एड बॉक्स कुठे आहे?"

देवेश फक्त खुणेने दाखवू शकला. नंदुच बोलणं त्याला शॉकींग होतं.


नंदू त्याने दाखवलेल्या बाजूला गेला आणि येताना बॉक्स घेऊन आला.


सावकाश हात स्लिंगमधून बाहेर काढला. स्लिंग एका बाजूला ठेवले. जखमेवरच बँडेज काढत, त्याने ते एका बाजूला ठेवून दिलं. जखमेवर लावलेलं कापसाच बँडेज काढून जखमेच ऑब्झरवेशन केलं.

"जखम बऱ्यापैकी कव्हर होतं आली आहे. पेन आहे का?" असं विचारताच देवेशने मानेनेच नकार दिला. "अँटीसप्टिकमध्ये डीप करून कॉटन दे." दोन्ही हातांना सॅनिटाईझ करत डॉ. देवधर आपल्या असिस्टंट मिस अय्यरंना म्हणाले.

"येस." सांज आपली गपचुप त्याच्या इंस्ट्रक्शन फॉलो करत होती.

त्याने तिने दिलेल्या कॉटनने जखम सावकाश पुसली.

तोपर्यंत सांजने त्याला नवीन कापसाचे बँडेज बनवून  दिलं.

"काळजी घे. जखम व्यवस्थित रिकव्हर होतं आहे." नंदू म्हणाला.

" अरे तू राहत आहेस, याला माझी काहीच हरकत नाही. तिला तरी जाऊ दे." देवेश दबक्या आवाजात म्हणाला.

"मी कुठे नाही जात आहे. मी येताना याच्या गाडीतून आले. माझी गाडी तर ऑफिसमध्येच राहिली. त्यामुळे मीही इथेच राहणार. मी आजोनां फोन करून कळवून येते." त्या दोघांनी तिला काही बोलून अडवण्याआधी ती तिथून मोबाईल घेऊन पसार झाली.

" आजो हिला परमिशन देतील?" देवेशने नंदूला विचारलं.

" त्यांच्याकडे दुसरा चॉईस सोडणार नाहीत या मॅडम." शेवटचा बँडेजचा लेयर गुंडाळून गाठ मारत नंदू म्हणाला.

"असो. चल तुला चेंजिंगसाठी कंफर्टेबल क्लॉथ देतो." देवेश बेडरूमच्या दिशेने जात म्हणाला.

" हो, अजून एक पेअर दे. तिलाही लागतील."

नंदू देवेशने दिलेले कपडे घेत म्हणाला.

"हो देतो; पण ते कपडे माझे आहेत, तिला होतील का?" त्याने असं म्हणताच नंदूने देवेशच्या कपड्यातली सांज इमॅजिन केली आणि त्याला हसूच आवरेना.

"तिला होतील ही; पण ती त्यात कशी दिसेल?"  एवढ्यात त्याला सांज येताना दिसली. आता मात्र दोघेही हसू लागेल.

"काय झालं."

"काही नाही चल, तुला चेंजिंगसाठी क्लॉथ कुठले हवे ते घे." तो तिला घेऊन त्याच्या वॉक इन वोड्रोबकडे निघाला.

एक लॅविश वॉक इन वोड्रोब. ज्यात उत्कृष्ट इंटेरियर, आकर्षक रंगसंगतीने सुटसुटीत हँग करून ठेवलेले कपडे. सुटस, फॉर्मल्स, कॅज्युअल्स, डेली वेअर्स. सगळं कसं अगदी एक्स्ट्रा ऑर्डीनरी होतं. सांजला कळेना की काय निवडाव? रादर तिच्या हाइटला त्यातले सगळेच कपडे मोठे झाले असते. बघता बघता तिची नजर एका डेली वेअरवर स्थिरावली.

एक साधा कॉलर असलेला पोलो टी आणि थ्री फोर्थ जीन्स. तिने ते कपडे हातात घेतले.

" मी हे घालू?" तिच्या हातातले कपडे बघून देवेश गप्प झाला. त्याने मानेनेच होकार कळवला आणि तो बाहेर निघून गेला.

नंदू चेंज करून बाहेर येऊन बसला होता.

" काय झालं? आपल्या बुजगावण्याला कपडे मिळ……" देवेशच्या मागून येणाऱ्या सांजवर नजर पडताच नंदूचे शब्द बाहेर आलेच नाहीत. तेही कपडे तिच्यासाठी मोठेच होते. देवेशची थ्री फोर्थ पँट तिला फुल्ल झाली होती.

"हे कपडे अजून आहेत तुझ्याकडे? आपण तिघांनी सेम शॉपिंग केलं होतं. आपल्या फ्रेंडशिपची आठवण म्हणून." सांज कौतुकाने स्वतःच्या कपड्यांकडे बघत म्हणाली.


"हो, मैत्रीची पहिली आठवण आहे ती. मी आणि एनके बेडमध्ये झोपतो. तू गेस्टरूममध्ये झोप. काही लागलं तर सांग आम्हाला." असं सांगतच त्याने तिला गेस्टरूम उघडून दिली.

तिथे तिची व्यवस्था करून देऊन देवेश झोपायला निघून गेला.



_______________________________________________________


ठिकाण: देवेशचं बेडरूम


खिडकीतून बाहेर बघत नंदूने सहजच एक नजर चौफेर फिरवली.


"एनीथिंग सिरीयस?" झोपायची तयारी करत असलेला देवेश त्याला पाहून म्हणाला.


"नाही रे. काही नाही. आता अश्या वागण्याची एक सवय झालीय. सांजबरोबर असताना, नेहमी सगळं डबल चेक करायचं; ही एक हॅब्बिट होऊन बसली आहे." नंदू म्हणाला आणि वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आला.

" एन के डू यू लव्ह सांज?" देवेशने प्रत्येक शब्द मोजल्यासारखा उचाराला.

"तुला खरं सांगू, माझं मलाच काही माहित नाही. तरीही माझ्या मनात सांजविषयी ज्या काही भावना आहेत त्यालाच जर प्रेम म्हणतात. तर हो माझं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे." एवढं बोलून त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि अंथरुणात झोपत देवेशला विचारले, 


"तुझं काय? मी तुला ही सेम प्रश्न विचारू शकतो." नंदूच्या या प्रश्नावर देवेशने नजर चोरली.

"तिच्याबद्दल माझ्या मनात काय आहे? याबाबत मीच अजून शुअर नाही आहे, तर तुला काय सांगू?" त्याने ही गादीवर पाठ टेकली.


"देवू, नातं नेहमी डिफाईन का रे करावं लागतं? माझा तुझ्यावर आणि तुझा माझ्यावर जीव आहे, हे पुरेस का नसतं?" झोपून एकटक सीलिंगकडे पाहत नंदूने देवेशला विचारले. "जीव आहे, प्रेम आहे तर ते का आहे? कोणत्या प्रकारचं आहे? मग त्याला तुम्ही दोघे काही नावं का देतं नाही? असे प्रश्न समाजाला पडतात कुठून?"हे विचारताना इमोशनल होऊन त्याने देवेशकडे पाहिले.


"मी ही तुला विचारलं, तेव्हा तू म्हणालास; की तुझ्या फिलींग्ज तू शब्दात नाही एक्स्प्रेस करू शकत. मी म्हणतो, करायच्या कशाला? तुझ्या मनात तिच्याबद्दल काही वाईट आणि चुकीच्या भावना नाहीत हे पुरेस नाही का? ज्यावेळी तुला त्या स्पष्ट होतील तू त्या एक्स्प्रेस करशीलचं. त्याची घाई या समाजाला का असते?"

"बरोबर आहे तुझं. अरे हेच जर तुझं माझं नातं असतं तर ते त्यांना आधीच माहीत असतं. ते त्यांनी शब्दात बांधलं नसतं." देवेश असं म्हणून पुढे बोलू लागला, "मैत्री हे नात फक्त दोन पुरुष किंवा दोन स्त्रिया मध्येच असतं; अशी मोठी मिसअंडरस्टँडिंग आहे. या सो कॉल्ड समाजाला."


"करेक्ट. शास्त्री आणि सांज यांच्या नात्याविषयी मला संशय किंवा मिसअंडरस्टँडिंग नाही आहे रे! मला फक्त एवढंच वाटतं; की सांजने सावध रहावं. चित्रगुप्तचं वागणं संशयित आहे अगदी सुरुवातीपासून. तिची काळजी आहे मला. शरीराने स्ट्रॉंग असली तरी मनाने फ्रजाईल(नाजूक) आहे ती आणि त्यात हा समाज. त्यांना समोर दिसणार प्रत्येक नातं, नाव देऊन त्याला डिफाईन करायचं असतं. ते कोणी देऊ शकले नाही तर खूप मोठा अपराध होतो. पाप होतं पाप!!!!!" नंदूचे डोळे आता हृदयाच्या जखमेवरची खपली निघाल्याने भळाभळा वाहू लागले.


"एन के, काय रे? तू रडतोयस?" देवेश त्याला पाहून धास्तावला.

"तुझ्याशी बऱ्याच दिवसांनी बोललो आणि मनावरचा ताबा सुटला. काही जुन्या आठवणींना चुकून स्पर्श झाला." नंदू उठला आणि डोळे पुसत टेबलावर ठेवलेल्या बॉटलमधले पाणी प्याला.

"आता विषय निघालाच आहे, तर मनातलं सगळं सांगून टाक. मन हलकं होईल तुझं." देवेश त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.

नंदू बेडवर बसला आणि त्याने देवेशला त्याच्या आईवडिलांची सगळी कहाणी सांगितली.

"देवू, तिला माहित आहे मी तिचा मुलगा आहे. मला माहित आहे ती माझी आई आहे. तरीही फक्त या समाजापुढे माझे बाबा तिला आपली बायको बनवू शकले नाहीत म्हणून तिला मी आई म्हणू शकतं नाही. हा कोणता न्याय झाला." त्याने मान जमिनीकडे वळवली.

त्याची सगळी स्टोरी ऐकून देवेश ही इमोशनल झाला. त्याने खाली मान घालून डोळे पुसत असलेल्या नंदूला घट्ट मिठी मारली.
_______________________________________________________


प्रि व्ह्यु :

ठिकाण: देवेशचं घर


रात्री दीड दोनच्या सुमारास.

एक मोठी किंकाळी तिथल्या निरव शांततेचा भंग करून गेली.




क्रमशः



©® स्वर्णा.




आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.