Login

पांडव भाग ३७

The Truth Always Comes Out


पांडव - fantastic five⭐
भाग ३७


(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -

संशयाच्या सुया \" चित्रगुप्त शास्त्री \" वर रोखल्या गेल्या.

सांज आणि ज्युलिया यांचा मन मोकळं करणारा संवाद.

नंदु रुसला आहे सांज वर असं काही वाचकांना वाटतंय बघुया खरंच रुसला आहे का?

अरे ते हॉस्पिटल मधले गार्डस्!!!  त्यांची चौकशी करायला गेलेल्या सांज आणि रावणच्या हाती काही लागले का ते पाहू?



आता पुढे -


ठिकाण : सीबीआय कॅन्टीन.


" सांज, निघू या ना?" रावण.

"हो. पण आज माझा गाडी चालवायचा अजिबात मूड नाही आहे. त्यामुळे तुझ्या पुष्पक विमानातून जाऊया." सांज हसत म्हणाली आणि पुढे निघाली.

"थॅन्क्स ज्युलिया, तू तिच्याशी बोललीस. आमचा तिच्यावर अविश्वास नाही ग. पण वरून कितीही स्ट्राँग दिसलं तरी ते पिल्लू आतून भावूक आहे. काळजी वाटते तिची; म्हणून मी तुला सांगितलं." रावण सांजला तिथून जातं असताना बघून ज्युलियाला म्हणाला.

"आय अग्री. आतून खूप कोवळ्या मनाची आहे ती आणि तिच्यासाठी काहीपण."अस बोलून तिने रावणाच्या मुठीवर मूठ लावली.


_______________________________________________________


ठिकाण: हॉस्पिटल.

"डॉक्टर, आता त्या सगळ्यांची तब्येत कशी आहे?" सांजने असं विचारताच डॉक्टरांनी त्यांना त्या गार्डसची माहिती दिली.

"त्यांना शुद्ध केव्हा येईल?" रावणने विचारले.

"सांगणं कठीण आहे. त्यांना एवढं मारलंय की; ते शुद्धीवर येतील तेव्हाही बोलण्याच्या मनस्थितीत असतील की नाही. ते माहित नाही." डॉक्टर काळजीच्या स्वरात म्हणाले.


"ओके डॉक्टर, आम्हाला केस अपडेट कळवत रहा." असं म्हणून सांज आणि रावण तिथून जाऊ लागले.

"एक्सक्युज मी." डॉक्टरांच्या थांबवण्यामुळे ते वळले.

"....." दोघेही \" काय?\" हा प्रश्न तोंडावर छापून उभे होते.

"यांची दशा खूप वाईट आहे, यांना एवढं तुम्ही मारलं?" डॉक्टरांनी प्रश्नार्थक नजरेने वाक्य उच्चारले.

दोघांनीही \" नाही \" अश्या माना डोलावल्या.

" मग कोणी?" आता मात्र डॉक्टरांच्या चेहऱ्यावर कुतूहल स्पष्ट दिसत होतं.


" तो माणूस आमच्या दोघांपैकी नाही." दोघेही मिश्किल हसत तिथून निघून गेले.


\"असं काय केलं असेल यांनी? जे त्यांना, त्या माणसाने एवढं मारलं.\" डॉक्टर मनात विचार करू लागले. त्यांना कुठे माहित होतं \" नंदकुमार देवधर  हे फक्त नावच पुरेसं आहे, अपराध्यांची पाचावर धारण बसवण्यासाठी.\"

तिथल्या सिक्युरिटी ऑफिसरना सूचना देऊन हे दोघे तिथून निघाले.


_______________________________________________________


ठिकाण: सीबीआय हेड क्वार्टर


तिरुपती, त्याच्या केबिनमध्ये खिडकीतून बाहेर बघत विचार करत उभा होता. गेले दोन तीन दिवस त्याच्यासाठी खूप उलथापालथ करणारे होते. विचारांची, भावनांची वर्दळ. या कोलाहलातून मेंदू आणि ह्रदयाला शांत करत तो अस्ताला जाणाऱ्या सूर्य देवाला पाहत होता.


तेवढ्यात डोअर नॉक झालं. देवेश वळला आणि आपल्या जागेवर जाऊन बसला.

"येस, कम इन."

"सर, केबिन लॉक करायची का?" पियूनने असं विचारताच त्याने घड्याळात पाहिले.

\"इतका वेळ निघून गेला, लक्षात आलं नाही.\"
त्याने स्लिंगमधला हात सांभाळत टेबलवर नजर फिरवली. मोबाईल आणि बॅरेटा घेऊन तो केबिनच्या बाहेर पडला आणि जाताना पियुनला केबिन लॉक करायला परवानगी देऊन गेला.


त्याने त्याच्या ड्रायव्हरला कॉल केला.

" मी बाहेर येतोय. गाडी घेऊन ये."

बिल्डिंगच्या बाहेर येताच त्याची गाडी हजर होती. तो दार उघडून गाडीत बसला.


"लेट्स गो." ड्रायव्हरला ऑर्डर देऊन गाडी सुरू करायला सांगितली.


त्याची गाडी गेटबाहेर जाताच, एक गाडी सीबीआय हेड क्वार्टरमधून बाहेर पडली. लक्षात येणार नाही असे अंतर ठेवून ती गाडी तिरुपतीच्या गाडीला फॉलो करत होती.


_______________________________________________________


काही वेळापूर्वी……..


गाडीचं लॉक ओपन करून तो ड्रायव्हर सीटवर बसला. तो दार बंद करेपर्यंत, लगबगीने बाजूच दार उघडलं गेलं आणि बंद ही झालं.


" कुठे चाललीस?" थोडंसं त्रासिकपणे नंदूने सांजला विचारलं.

"तेरे संग, तेरे संग." गाण्याचे बोल अगदी बेसूर पद्धतीने म्हणत ती त्याच्याकडे पाहून कसंनूसं हसली.

तो अजूनही तिच्याकडे प्रश्नार्थक रीतीने बघत होता.

" पुढच्या ओळी येत नाहीत मला. रागावू नको." तिने बत्तिशी दाखवली.


त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि समोर बघू लागला.

तिरुपतीची गाडी जाताना दिसताच, त्याने तिला विचारले,

"उतरतेस का? मी त्याला भेटायला जातोय." त्याचा स्वर जरा गंभीर झाला.

"मलापण त्याला भेटायला यायचं आहे." त्याने \" ओके \" अशी मान डोलावली आणि गाडी स्टार्ट करून देवेशच्या गाडीच्या मागे त्याला कळणार नाही असे अंतर ठेवून सोडली.


_______________________________________________________


वर्तमानकाळ………


ठिकाण: देवेशचं घर


देवेश नुकताच घरात आला होता. कपडे चेंज करायला, त्याच्या बेडरूममध्ये गेला.

थोड्या वेळातच डोअर बेल वाजू लागली.

"कमिंग."

त्याने अंगात ग्रे कलरची लेनिनची ट्रॅक पँट घातली होती. स्लीवस नसलेला फ्रंट ओपन आणि झीप असलेला व्हाईट टीशर्ट.

त्याने अंगात टीशर्ट, अर्धा दुखापत झालेल्या हाताच्या बाजूने सावकाश घालून, दुसरा हात टीशर्टच्या आत सरकवण्याचा प्रयत्न करत तो दरवाज्याच्याजवळ जायला निघाला.


जाता जाता त्याने घड्याळावर एक नजर फिरवली. \" आता कोण आलंय? यावेळी?\"

तसाच अगदी दाराजवळ जात त्याने पिपहोल (दरवाजा उघडण्यापूर्वी बाहेर कोण आले आहे, हे पाहण्यासाठी दरवाजाला ठेवलेले छोटेसे छिद्र) मधून पाहिले.

समोर उभ्या माणसांना पाहून त्याला क्षणभर काही सुधरलंच नाही. कसलाही मागचा पुढचा विचार न करता, आहे त्या अवस्थेत त्याने दरवाजा उघडला.


आता सुन्न होण्याची वेळ नंदू आणि सांजची होती.


_______________________________________________________


काही वेळापूर्वी……..


सांज आणि नंदू, देवेशच्या घरी आले खरे!! पण आता आत गेल्यावर काय बोलायचं यासाठी शब्दांची खूप जुळवाजुळव करतच दाराजवळ गेले.


बराच वेळ बेल वाजवून ही काहीच प्रतिसाद आला नाही, म्हटल्यावर दोघेही धास्तावले.

\" आता दरवाजा तोडायचा.\" हा निश्चय करून नंदू जरा पुढे सरकलाच की; तेवढ्यात आतून पावलांचा आवाज आला. तसा तो जागीच थांबला.

दाराचे लॉक उघडण्याचा आवाज आला तेव्हा यांचा जीव भांड्यात पडला.

_______________________________________________________


वर्तमानकाळ…...

दार उघडून देवेश या दोघांकडे गोंधळल्यासारखा बघत होता.

अंगात अर्धा दुखापत झालेल्या हाताच्या बाजूने घातलेला आणि अर्धा टीशर्ट खालीच पाठीमागे लोंबकळत असलेल्या अवस्थेत देवेश त्यांच्यासमोर उभा होता. टीशर्टच्या आत काहीच नसल्याने हाफ कव्हर्ड अँड हाफ बेअर चेस्ट डोकावत होती. हे सगळे त्याच्या जिम ट्रेनिंगचे रिझल्ट दाखवत होते. अशा अवस्थेत प्रश्नांचे जाळे पसरलेल्या चेहऱ्याने देवेश त्या दोघांकडे बघत तसाच दार अडवून उभा होता.

त्याला तसं पाहून क्षणभर स्तब्ध झालेली सांज, लगेच स्वतःला सावरत "सॉरी." असं म्हणत पाठमोरी वळली.


तेव्हा सगळा प्रकार देवेशच्या लक्षात आला.

त्याने पुन्हा तो टीशर्टचा लोंबकळत असलेला हात अंगात चढवायचा प्रयत्न केला आणि तो कळवळला.

नंदूने लगेच पुढे होऊन त्याची मदत केली.

टीशर्टची झीप अगदीवर गळ्यापर्यंत ओढून दिली, तसा देवेश हसला.


"तू आता मागे वळून, आत येऊ शकतेस." दोघेही त्याच्यामागून घरात आले. घराचं आतून ऑब्झरवेशन करू लागले  .

"घरात कोणी नाही आहे का? म्हणजे फॅमिली किंवा हेल्पर नाही आहे का?" इकडे तिकडे बघत मध्येच थांबून सांजने विचारले.

"नाही, मी एकटाच राहतो." त्यांना सोफ्यावर बसायला सुचवत तोही त्यांच्या समोर बसला आणि पुढे बोलू लागला, "मदतीची तशी गरज नाही भासली आणि आता गरज आहे, म्हणून शोधत होतो; पण सापडत नाही आहे."


"तुम्ही बसा. मी कॉफी आणतो तुम्हा दोघांसाठी." तो उठत होता, तसे सांज आणि नंदू उठून एकदम म्हणाले.


"तुम्ही नको, मी बनवते/बनवतो." एकच वेळी बोलल्यामुळे, देवेश हसू लागला.

"घरात कुठे काय ठेवलंय कोणाला माहित आहे? त्याने जा करायला."

देवेश असं म्हणताच दोघांनी माना खाली घातल्या.

"तुम्हीपण चला. दाखवा कुठे काय ठेवलं आहे ते? मी कॉफी बनवतो." नंदूच्या वाक्यावर देवेश वैतागला.


"मी माझ्या ऑफिस स्टाफला स्वतःच्या किचनमध्ये जाऊ देत नाही." देवेश जरा रागाने म्हणाला.

"पण मी काही इथे ऑफिस स्टाफ म्हणून आलो नाही." नंदूही पॅनिक होऊन म्हणाला.

"मग तू मला अहो-जाहो का करतोयस? मी काय तुझ्यापेक्षा इतका मोठा नाही आहे. रादर वी आर कॉलेज फ्रें…… फ्रेंड्स." बोलताना काही क्षणांसाठी देवेश अडखळला खरा; पण आज त्याला या विषयाचा सोक्षमोक्ष लावायचा होता. "इनफ!!! आपण तिघे पूर्वीसारखे एकमेकांशी नाही का बोलू शकत? निदान आऊट ऑफ ऑफिस अवर्स. मला आधीसारखी \"देवू\" म्हणून हाक मारू शकत नाही का तुम्ही दोघे?" देवेश खूप आशेने त्या दोघांकडे पाहू लागला; कारण या तिघांमध्ये असणारी आइस वॉल ब्रेक करायची गरज होती.

"जुनी सवय मोडली आता." नंदूने चेहरा फिरवला. याचं फिलिंग्ज त्याच्याही होत्या. फक्त एक्स्प्रेस करता येत नव्हत्या.

"संयू, तू तरी सांग ना एन.के. ला. मान्य आहे मला की; मी चुकलो. मी आपल्यात जे काही गैरसमज होते, ते बोलून कमी करायला हवे होते; पण नाही सुचलं त्या वयात. एवढे काही मोठे नव्हतो आपण. एन. के. ला समजव ना." देवेशच्या डोळ्यात पाणी आले. तो तिथेच खुर्चीवर बसला. सांज ही त्याच्या बोलण्याने इमोशनल झाली आणि त्याच्यामागे येऊन उभी राहिली. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

" वेट!! देवू, तुला मी किती वेळा सांगितलं आहे!!! मला एन.के. म्हणायचं नाही. तू एन.के. म्हणायला लागलास की; ही मला नटखट म्हणायला सुरुवात करते." नंदूच्या या वाक्याने मात्र दोघेही आधी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघू लागले. जेव्हा त्यांना नंदूच्या बोलण्याचा अर्थ समजला, तेव्हा डोळ्यातलं पाणी पुसत हसायला लागले.


"जो जसा आहे, त्याला तसं म्हणायला हवं ना!! दे टाळी." देवेशने तिला टाळी दिली.

नंदु सुद्धा आता त्या दोघांकडे बघून हसू लागला.

"चला दोघे असे हसत राहणार आहात की; कॉफीपण करणार आहात?" सांजच्या अशा बोलण्यावर देवेश उठला. दोघांनीही पाठ फिरवून किचनकडे जायला सुरुवात केली. तेवढ्यात देवेश मागे फिरला.

"तूपण चल. आत बसून गप्पा मारू." सांजला असं सांगताच, तीसुद्धा या दोघांच्या मागे किचनकडे जाऊ लागली.

देवेशचं किचन अगदी लॅविश होतं. फुल्ली ईक्विपड आणि क्लीन अँड टाईडी किचन पाहून दोघेही इंप्रेस झाले.

"व्हेअर इज युवर बेटर हाफ?" सांजने मिश्किल नजरेने देवेशला विचारले.

" इथेच आहे." देवेश अगदी रोमँटिक आवाजात म्हणाला.

"आताच तर म्हणालास एकटा राहतो?" सांज आणि नंदू दोघांच्याही भुवया उंचावल्या.

"घरात नाही रे, इथे आहे." हृदयावर हात ठेवून देवू ड्रामॅटिकली म्हणाला, तसे या दोघांनी \"जुना देवू जागा झाला.\" अशी रिएक्शन दिली.

बोलता बोलता नंदूने गॅसवर एक पाण्याने भरलेलं एक भांडं ठेवलं. ते बघून देवेश म्हणाला, "गॅसवर कॉफी कशाला करतोस? अरे, कॉफी मशीन मध्ये बनव."

"ती बघितली रे मी; पण हे भांडं कॉफीसाठी नाही, चहासाठी आहे. मला माहीत आहे, तुला कॉफी आवडत नाही."

"आवडत नव्हती. तुम्हा दोघांच्याबरोबर कॉफी प्यायची सवय झाली आणि मग तुमची आठवण म्हणून ती सवय जोपासली गेली." देवेश बोलता बोलता हळवा झाला.

नंदूने पाण्याच्या भांड्याच्या खालचा गॅस बंद केला.

समोरच्या कॉफी मशीनकडे बघत देवेश म्हणाला, "ही बघ इथे, मी छान नवीन कॉफी ब्लेंड आणली आहेत. ती वापर." त्याने पाठीमागच्या वॉल शेल्फचा डोअर ओपन केला. शेल्फमध्ये अरेबिका, रोबस्टा, लिबेरिकासारखे पॉप्युलर ब्रँडचे कॉफी बीन्स जार ठेवले होते.

नंदूने त्यातले बीन्स जार निवडून कॉफी मशीन स्टार्ट केली. त्याची सेटिंग ॲडजस्ट करून तिघांच्या चॉईसची कॉफी बनवायला सुरुवात केली.

देवेशसाठी, एस्प्रेसो.
(प्रेसड हॉट वॉटर फिल्टरमधून जाते ज्यामध्ये बारीक, डार्क रोस्टेड बीन्स असतात. जी त्याच्यासारखीच रिच समजली जाते.)

नंदूसाठी, ब्लॅक कॉफी.
(त्याच्यासारखीच सिंपल आणि सोबर. कॉफी आणि कॅफीनचं लो टू मिडीयम काँसंत्रेशन असलेली आणि हॉट वॉटर कॉफीच्या बीन्सवर टाकले जाते.)

सांजसाठी अमेरिकनो.
(ब्लॅक ड्रिप कॉफीसाठी ऑप्शन, अमेरिकनोमध्ये हॉट वॉटरने डायल्युट {पातळ किंवा मिश्रित करणे} केलेला एस्प्रेसो शॉट होय.)
थोडक्यात काय तर ब्लॅक कॉफी आणि एस्प्रेसोला पूरक अशी.)



आता किचनमध्ये कॉफी कमी आणि या तिघांच्या कॉलेजच्या गप्पा जास्त दरवळत होत्या.


क्रमशः



©® स्वर्णा.




आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.

आणि हो मी एक अव्यक्त नावाची अगदी छोट्या मोठ्या क्षणांची मालिका सुरू केली आहे. प्लीज तिला वाचायला नक्की वेळ काढा आणि तुमचे अभिप्राय नोंदवा.



वाचत रहा. आनंदी रहा. सुरक्षित रहा.

0

🎭 Series Post

View all