पांडव ३४

The Truth Always Comes Out
पांडव - fantastic five⭐
भाग ३४


(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -

एक रोमांचक आणि चित्त थरारक लढत आणि लढते शेवटी देवेशच्या हाताला  गोळी चाटून जाते.

या प्रसंगानंतर थोडीशी सांज, नंदू आणि देवेशच्या भूतकाळाची झलक. ज्यामुळे त्यांच्या नात्याचा तेव्हा रंग बदलला ती घटना.

आता पुढे -


ठिकाण : हॉस्पिटल.


हातावर जोर देता येत नसल्याने त्याला उठताना त्रास होतं होता. अचानक कोणीतरी त्याला आधार देऊन सावकाश सरळ बसवले.

"थँक्यू." म्हणतं तो त्या व्यक्तीकडे वळला आणि तिला बघतच राहिला.


ती व्यक्ती सांज होती आणि तिच्या मागे नंदू ही उभा होता. देवेश त्या दोघांकडे अनिमिष नेत्रांनी पाहत होता.

पाठोपाठ डॉक्टर ही तिथे आले.

त्यांनी देवेशला तपासून सर्व व्यवस्थित असल्याचे आणि घरी जायला काही हरकत नसल्याचे सांगितले.

"काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. जसं; की हाताला थोडे दिवस संपूर्ण आराम द्यायचा. जखमेवर नियमित ड्रेसिंग करायचं. औषधे वेळेवर घ्या. डाएट लिहून दिला आहे, तो पाळा. हँड सपोर्ट स्लींग नियमित वापरा, त्याने हाताला आराम मिळेल. काळजी घ्या." डॉक्टर सगळं सांगून निघून गेले.


पुन्हा एक शांतता पसरली. आता पुढे काय बोलावं हेच सुचेनास झालं तिघांनीही.

"मी डिस्चार्ज फॉर्मलिटी बद्दल बघते." त्या दोघांना तिथेच सोडून सांज रिसेप्शनपाशी गेली.


"मी सगळं आवरतो. निघायला हवं."
नंदूने उगीचच न पसरलेल समान आवरायला घेतलं. शांततेला भंग करणं जड जातं होतं.

"हो." काहीतरी बोलावं म्हणून देवेश बोलला.

\"किती वेळ असं गप्प राहणार? आज मीही बोलणं टाळलं तर उद्याचं काय? एकत्र कामं करतो बोलावं तर लागतच. लागतच?? लागतच नाही, बोलायचं आहेच. या दोघांशी बोलता यावं म्हणून मी त्यांच्याशी भांडायचो. राग तर होताच; पण दोघांबद्दल प्रेम ही तितकंच आहे. आता अनायसे संधी चालून आली आहे. आज किती वर्षांनी मी एनकेच्या तोंडून \" देवू \" ऐकलं. \"एनके!\" मी त्याला पूर्वीसारखी एनके म्हणून हाक मारू का? तो परत मला देवू म्हणेल का?\" विचार करत करत नकळत त्याची नजर नंदूवर स्थिरावली.

बराच धीर एकवटून देवेशने त्याच्याशी बोलायचे ठरुवन, ओठांना विलग केलेच होते.

तेवढ्यात दरवाजा उघडल्याचा आवाज झाला. दोघांनीही एकत्र दरवाजाकडे पाहिले.


"आता हात कसा आहे? आम्ही आलो तेव्हा कळलं; की डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला." ज्युलियाच्या नजरेत काळजी होती.

"बरा आहे. हो आता त्याचीच तयारी करतोय." देवेश नंदुकडे खुणावत ज्युलियाला म्हणाला.

" बॉस, फार दुखतय का? जखम खोल आहे का?" स्वामी कावराबावरा झाला होता.

"स्वामी, काय हे मी ठीक आहे. इतका भावूक स्वभाव आपल्या प्रोफेशन साठी बरा नाही आणि गोळी फक्त दंडाला चाटून गेली आहे. बाकी काही नाही." देवेश जवळ येऊन बसलेल्या स्वामी च्या हातावर एका हाताने थोपटत म्हणाला.


अग्नेयने त्याला नजरेनेच विचारले; की त्याला आता कसं वाटतंय.

त्यानेही मानेनेच \" ठीक आहे.\" कळवले.

आता कुठे देवेशने धीर एकवटून बोलायचा प्रयत्न करत होता; तेवढ्यात ही सगळी मंडळी आली आणि बोलायचं राहून गेलं.


"निघायचं?" सांजने रूममध्ये येतं विचारलं. तसं सगळे निघाले.


अग्नेयने नंदूच्या हातातून मेडिसिनची बॅग घेतली आणि देवेश जवळ जाऊन म्हणाला, " मी तुला घरी सोडतो. काका आणि काकींना कळवल का?"

" नाही. नको तू त्यांना काही सांगू ही नको. माझा फोन???" एवढ्या वेळाने देवेशला त्याच्या मोबाईलची आठवण झाली.

त्याने खिश्यातला मोबाईल चेक केला. त्याच्यावर कोणाचेही कॉल नाहीत, हे बघून त्याच्या चेहऱ्यावर कोणताही परिणाम झाला नव्हता. त्याने तसाच फोन आपल्या खिश्यात ठेवला.

"लेट्स गो एव्हरी वन. ऑफिसला जाऊ या. मला जरा अपडेट चेक करायचे आहेत. " देवेशच बोलणं ऐकून बाकीचे काही बोलायला तोंड उडणारा त्या आधीच देवेश बॉसी टोन मध्ये बोलला, " आय डोन्ट वॉन्ट एनी डिस्कशन. इट्स माय ऑर्डर." बोलून तो अग्नेयच्या गाडीत बसला.

सगळे निघाले सीबीआय हेड क्वार्टर कडे.


_______________________________________________________


ठिकाण : सीबीआय हेड क्वार्टर


पांडव, तिरुपती, अग्नेय आणि स्वामी सगळे स्थानापन्न झाले. सगळ्यांचं लक्ष फिरून फिरून देवेशच्या जखमी हाताकडे जातं होतं.

" स्टार्ट द रिपोर्टिंग." देवेशचा करडा आवाज आला, तसे सगळ्यांनी त्याच्या हातावरून नजरा वळवल्या.

देवेशने ज्युलियाकडे पाहून तिला बोलायची खूण केली.

" डी प्लस पॉइंट पूर्ण आपण सिल केलं आहे. मी या फाईटच्या आधीच काही ड्रग सँपल कलेक्ट करायला सुरूवात केली होती. ते लॅबमध्ये चेकिंगसाठी पाठवले आहेत. तिथे जे ड्रग्स घेत होते. त्यातले काही फाईट दरम्यान पळाले. काही तिथेच बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना मेडिकल चेकअपसाठी पाठवलंय सोबत कॉन्स्टेबल दिलेत. त्यांचे ब्लड आणि युरीन सँपल सुद्धा लॅबमध्ये पाठवलेत. ते व्यवस्थित शुद्धीवर आले; की त्यांच्या जबान्या ते कॉन्स्टेबल घेतील." ती धडाधड रीपोर्टिंग करत होती. सगळे लक्ष देऊन ऐकत होते.


"त्या गार्डसना मी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या चौकशीसाठी परमिशन हवी होती." अग्नेय म्हणाला.

" मी अप्लाय केलंय  परवानगी मिळाली की सांगतो." देवेशने त्याला खात्री दिली.

"आम्हाला त्या पोलिस स्टेशन मधून फारसं काही हाती लागलं नाही; पण एक क्लू हाती आलाय. मार्केट एरिया आणि ते पोलीस स्टेशन जवळ आहे फारसे अंतर नाही आहे, या दोन्ही ठिकाणांमध्ये. याचा अर्थ हे गुन्हे त्याचं जवळ पासच्या एरियात घडतं आहेत." सांज म्हणाली.


"आम्ही त्या मुलीच्या ऑफिस मध्ये गेलो. तिथे गेल्यावर कळले; की तिचे नाव चैत्रा बेणे. ती तिथे कॉल अटेंडंटच काम करत होती."

"होती म्हणजे?" बोलत असणाऱ्या रावणला स्वामीने टोकल.

"आता ती तिथे जॉब करत नाही. त्या दिवसांनंतर तिथे जॉब करणं अशक्य झालं होतं. त्या कंपनी मधून आम्ही तिचा ॲड्रेस घेतला आणि तिच्या घरी गेलो. तेव्हा मी तिला त्यादिवशीचा सगळा प्रसंग विचारला असता,  तिने असं सांगितलं; की ऑफिसमधून येताना एक व्यक्ती तिचा पाठलाग करत होती. आधी बरीच वर्दळ असल्यामुळे तिला काही वावगं वाटलं नाही; पण नंतर जशी लोक कमी होतं गेली, तरी ती व्यक्ती मात्र हीचं निरीक्षण करत तिथेच थांबली होती. तेव्हा मात्र चैत्रा घाबरली आणि कोणत्याही बससाठी न थांबता सरळ रस्त्याने चालू लागली. तो माणूसही तिच्या पाठोपाठ झपझप चालू लागला, तशी ती आणखीन घाबरली. बिथरलेली ती मागे बघत चालली होती. अचानक समोरून कोणाला तरी धडकली. ज्याला धडकली त्याने तिला असे पाहून, थांबवून विचारलं; की काही अडचण आहे का? तिने त्याला सगळा प्रकार सांगताच त्या मुलाने तिला रिक्षाने घरी सोडले. त्यानंतर मात्र घाबरून तिने ती नोकरी सोडून दिली. आता ती आजूबाजूच्या मुलांचे क्लासेस घेते. हे सगळं ऐकल्यावर मी तिला तो व्यक्ती सिरीयल किलर असल्याचे सांगितले आणि तो आता जिवंत नाही याची बातमी दिली. त्याच्यात मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी तिला स्टेशनला बोलवले आहे. ती उद्या येईल." रावणाने घडलेली सगळी सांगितली.


"तो मुलगा ज्याने तिला मदत केली तो तिथेच होता." भिंतीवर लावलेल्या \" चित्रगुप्त शास्त्री \" च्या फोटोकडे बघत माधव म्हणाला. तसे सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले.

" हो आणि तो याला \" चित्रगुप्त शास्त्री \" वाटतोय." रावणने सगळ्यांकडे बघत सांगितले.

"वाटतं नाही. आता मी शुअर आहे. रावण, हा फोटो नीट बघ. हाच आहे तो." माधव अजूनही त्या फोटोच्या समोरच उभा होता.


"नाही रे, हा वेगळा दिसतो. तो वेगळा दिसतो." आता रावण ही त्या फोटो समोर येऊन उभा राहिला.


"त्याचं नावं काय होतं?" नंदुने असं विचारताच दोघांच्याही चेहऱ्यावर गोंधळ उडाला.


"आम्ही त्याला नावं विचारलंच नाही."
माधवने मान खाली घातली.

"हो. त्याचं झालं असं; की मी आधी फक्त चैत्राशी बोलण्यावर लक्ष केंद्रित केलं. तोपर्यंत तो मुलगा मध्येच तिचा निरोप घेऊन गेलाही आणि जेव्हा याला त्याचं नावं आठवलं, तेव्हा आम्ही तिथून बाहेर निघून आलो होतो. सॉरी. आमचं चुकलं आम्ही त्याचं नाव विचारायला हवं होतं." रावण अस्वस्थ होऊन म्हणाला.


"होतं रे असं कधी कधी. उद्या चैत्रा डेड बॉडीची ओळख पटविण्यासाठी येणार आहे ना. तेव्हा तिच्याकडून त्या मुलाची माहिती घेऊ." सांज अगदी शांत आणि सहजतेने म्हणाली.

त्यानंतर नंदू आणि स्वामीने आणलेला रिपोर्ट ही स्वामीने देवेशला दिला.

उद्याचा दिवस प्लॅन करून सगळे घरी जायला निघाले.


_______________________________________________________


ठिकाण: पार्किंग एरिया सीबीआय हेड क्वार्टर.

सगळे आपापल्या गाड्या काढू लागले.


"तू मला घरी सोडशील का एम्बर?" देवेशने अग्नेयला विचारताच त्याने जरा विचार केला.

अग्नेय विचारात पडला आहे हे पाहून देवेशने हसत विचारलं, "काय रे काय झालं? कुठे डेटवर वैगरे जायचा आहेस का?"

"अं नाही रे, तसं काही नाही." अग्नेय पुढे बोलायला जरा संकोचला.

"मी सोडतो घरी." नंदू आपल्या गाडीकडे जातं म्हणाला. तसा देवेश गपचुप त्याच्या पाठीमागे गेला.


_______________________________________________________



गाडीत स्मशान शांतता होती. दोघेही वाट बघत होते; की समोरची व्यक्ती काहीतरी बोलेल; पण या विचारामुळे कोणीच काही बोलले नाही.

अचानक ब्रेक दाबल्याने देवेशची तंद्री भंग पावली. त्याने समोर बघितले तर तो त्याच्या घराच्या गेटजवळ गाडी थांबली होती.


हळू दरवाजा उघडून तो बाहेर आला आणि घराच्या दिशेने चालू लागला होता; की तेवढ्यात मागून आवाज आला.

"टेक केअर."

पाठमोरा देवेश गालात हसला आणि त्याने न लागलेल्या हातानेच ओकेची खूण केली व आत निघून गेला.


_______________________________________________________


ठिकाण: सांजच घर.


सांज घरी आली, तेव्हा घराचे दरवाजे उघडे होते.

\" येस, म्हणजे आजो आले.\" नुसत्या विचारानेच तिचा दिवस भराचा ताण निघून गेला. ती उत्साहाने घरात शिरली समोर बघते तर किचन मध्ये आजो जेवण बनवत होते.

" आज काय स्पेशल बनत आहे? दावत ए रसोईमध्ये." तिने चेंज करून येतं आजोना हसत हसत विचारले.

"सगळं तुझ्या आवडीच आहे. चल ताट घे." ते हसून म्हणाले.

"सांज, मी एक पेईंग गेस्ट ठेवायचा विचार करतोय."  त्यांनी असं म्हणताच तिने त्यांच्याकडे बघितले.

"मुलगा चांगला आहे, एक - दोन दिवसात इथे शिफ्ट होईल." आजो जेवायला सुरुवात करता करता म्हणाले.

ती काही बोलणार तेवढ्यात

"अन्नदाता सुखी भव." म्हणून त्यांनी जेवायला सुरुवात केली.

_______________________________________________________




ठिकाण: मदर मेरी हॉस्पिटल अँड रेहाबिलेशन सेंटर.


हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. समोरचं दृश्य पाहून नसा ताठ झाल्या.

त्याने झपाझप पावलांना त्या दोघांच्या दिशेने वळवले.


(छोटा फ्लॅश बॅक……)


मीरा आज खूप उदास दिसत होती.

"ताई, चला ना. बागेत फिरून येऊ." एक नर्स तिला असं पाहून तिचा मूड बदलण्यासाठी म्हणाली.

"नाही ग आज मन नाही." मीरा आर्त स्वरात म्हणाली.


"ताई, प्लीज माझ्यासाठी." अखेर तिच्या हट्टापुढे मीराला नमत घ्यावं लागलं.

दोघीही बागेच्या दिशेने निघाल्या.

सायंकाळ झाली होती. सर्वत्र हवेत गारवा स्वतःचे अस्तित्व निर्माण करू पाहत होता.

मीरा दोन्ही हातांनी दोन्ही दंडाना उब देतं तिच्या आवडत्या करंज्यापाशी उभी होती.


अचानक तिला शालीचा उबदारपणा जाणवला. तिने शाल व्यवस्थित ओढुन घेत मागे वळून पाहिले.

समोर रणछोड उभा होता. ती त्याच्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत होती. बराच वेळ दोघेही एकमेकांना पाहत असेच शांत उभे राहिले. तिने त्याच्याकडे दुर्लक्ष करून दृष्टी कारंज्याकडे वळवली.

"चला, आत जाऊन जेवून घेऊ." रण छोड मीराला म्हणाला. ती त्याच्याकडे वळली.

"तुम्ही मला काही बोललात का?" तिच्या डोळ्यातला अनोळखी भाव त्याच्या मनाला सलला.

"हो. जेवायला जाऊया ना."शक्य तितका आवाज नॉर्मल ठेवत तो म्हणाला.

"मला नाही जायचं." ती अजूनही कारंज्याकडे पाहत होती.

"असं कसं चालेल? नाहीतर मी उद्यापासून येणार नाही इथे." त्याने शेवटचा प्रयत्न केला.

"हे बघा तुम्ही इथे या, नाहीतर येऊ नका. याच्याशी माझा काही संबंध नाही.मी तुम्हाला ओळखत नाही." ती रागाने त्याच्याकडे वळून पाहत म्हणाली.

"असं काय करतेस? माझा तुला राग आला आहे का? आपण आता थोड्या वेळापूर्वी तर बोललो होतो." तो निर्वाणीच बोलला.

"एकदा सांगितलं ना; की मी तुम्हाला ओळखत नाही. माझ्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करू नका." तिने त्याच्या कडे पाठ फिरवली.

आता मात्र त्याला सहन झाले नाही. त्याने आततायी पणाने तिला खांद्याला धरून स्वतः कडे वळवले.

"सोडा मला. शेवटचं सांगते." तिने त्याचे दोन्हीं हात बाजूला केले आणि त्याला झिडकारले.

(वर्तमान काळ)


तो तिच्याशी बोलण्याचा पुन्हा प्रयत्न करत होता तेवढ्यात..


काही क्षणातच अग्नेय त्या दोघांच्या मध्ये एका अभेद्य भिंतीसारखा उभा राहिला.


_______________________________________________________


क्रमशः

©® स्वर्णा.


आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंट च्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.


वाचत रहा. आनंदी रहा. सुरक्षित रहा.

🎭 Series Post

View all