भाग ३३
(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)
आतापर्यंत आपण वाचले -
सांज, देवेश आणि नंदू; नंदूच्या गाडी जवळ आले. देवेशला आधार देऊन गाडीत बसवताना देवेश हसत होता.
"व्हॉट? ह्यात हसण्यासारख आहे का काही?" नंदूने जरा वैतागून विचारले.
" नाही रे… जुने दिवस आठवले." अजून हि देवेशच्या चेहऱ्यावर हसू होते.
आता मात्र सांज आणि नंदूचे ही ओठ रुंदावले.
आता पुढे -
(मोठा फ्लॅश बॅक……)
ठिकाण : कॉलेज कॅम्पस (अर्थात देवेश, नंदू आणि सांज या त्रिकुटाचा)
मुलांनी गजबजलेला कॅम्पस.
कॉलेज म्हटलं; की रंगीत आयुष्य, ओसंडून वाहणारी तरुणाई, अल्लड प्रेमाचे गुलाबी रंग, दाट मैत्रीचे बंध आणि बरचं नाही तर भरपूर काही.
सगळ्यांचे आवडीचे असणारे ते आयुष्यातील क्षण जे मनाच्या तिजोरीत जपून ठेवले जातात.
असेच अविस्मरणीय दिवस जगत आपण नवीन जिवलग जोडत जातो.
नंदू आणि सांज बालमित्र हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे. इतके जीवश्च कंठश्च; की सिनेमातील प्रसिद्ध ओळ \" एक मुलगा आणि एक मुलगी कधीच मित्र असू शकत नाही.\" त्या दोघांनी पुसून नाहीशी केली होती.
त्या दोघांचं त्रिकुट बनलं ते देवेशच्या येण्यामुळे. तो या दोघांना सिनियर. नवीन ॲडमिशन होता तो. त्यांची ओळख लगेच झाली. सांज आणि नंदू कॉलेज मध्ये जय - विरू म्हणून प्रसिद्ध. त्यांची ही मैत्रीचं देवेशला त्यांच्याकडे आकर्षित करायला कारणीभूत ठरली.
देवेश नवीन असल्यामुळे त्याचे कोणीच मित्र नव्हते. असे असताना या दोघांनी मात्र त्याला लगेच आपलंस केलं होतं. तो ही रुळला होता.
नंदू आणि सांज हे बालमित्र असल्यामुळे त्यांना एकमेकांच्या बऱ्याच सवयी आणि आवडी निवडी माहित होत्या. ज्या देवेश साठी अनोळखी होत्या. बरेचदा त्याच्या मनाला \" आपण यांना आधीपासून का ओळखत नाही?\" हा प्रश्न शिवयाचा. त्याला ही त्या दोघांसाठी तेवढंच महत्त्वाचं बनायचं होतं. जेवढे ते एकमेकांसाठी होते. तो याकरिता खूप प्रयत्न करायचा.
सांज आणि नंदू त्याला आपलं मानत होते. देवेशने काही तरी वेगळं करावं मग त्याची मैत्री आपण मान्य करू असं त्या दोघांच्या मनातही नव्हतं.
एकच अडचण होती ती म्हणजे ते दोघे बालपणापासून एकत्र होते. त्यामुळे एकमेकांच्या इतके जवळ आले होते; की त्यांना ही ते जाणवत नव्हतं.
त्यांना जाणवतं नसलं तरी जग आहे ना..
. प्रत्येक गोष्टीत स्वतःच मत द्यायला. त्या जगाने त्याचं काम वेळीच केलं होतं.
त्यांचं जग म्हणजे त्यांच्या आजूबाजूची मुलं, ज्यांना असं ठाम मत होतं; सांज आणि नंदू एकमेकांवर प्रेम करतात.
. प्रत्येक गोष्टीत स्वतःच मत द्यायला. त्या जगाने त्याचं काम वेळीच केलं होतं.
त्यांचं जग म्हणजे त्यांच्या आजूबाजूची मुलं, ज्यांना असं ठाम मत होतं; सांज आणि नंदू एकमेकांवर प्रेम करतात.
याच सो कॉल्ड जगाने ही गोष्ट देवेशच्या कानात भरून दिली.
देवेश तेव्हा चिडला.
"असं काही नाही आणि जरी असतं तरी सांज आणि एन. के. पहिलं मला बोलले असते." त्याचे कान भरणाऱ्या मुलाला देवेशने ठणकावून सांगितलं.
"तुला ते जवळचा मित्र मानतच नाहीत. तुला कशाला ते त्यांचं लव्ह लाईफ सांगतील. तू एक उपरा आहेस त्यांच्यासाठी. यू आर आऊट साईडर." तू मुलगा कुत्सित हसत म्हणाला.
"इनफ!!!!!!!" त्याने डोळ्यात अंगारे आणून त्या मुलाला पाहिले. तो मुलगाही काही कमी नव्हता.
"मी सिद्ध करून दाखवतो. चल …" असं म्हणून देवेशला नंदू आणि सांज कडे घेऊन गेला.
ते दोघं कॅन्टीन मध्ये बोलत बसले होते.
देवेश आणि तो मुलगा तिथे गेले.
"हाय गाइज्."
"हाय."
"सांज, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे."तो मुलगा सांजला म्हणाला.
"हां विचार ना बिनधास्त." सांज अगदी बेफिकरीने म्हणाली.
"तुझ नंदू वर प्रेम आहे का?" हा प्रश्न मात्र त्याने देवेशकडे अर्थपूर्ण रित्या पाहत सांजला विचारला.
"हो. माझंच कशाला, त्याचं ही माझ्यावर खूप खूप प्रेम आहे." सांज अगदी मोकळेपणाने म्हणाली खरी; पण ते शब्द मात्र गरम उकळत्या तेलाप्रमाणे देवेशच्या कानात पडले. त्याचा आधीच मनात असलेला दुजा भाव आणि त्यात सांजचं असं बोलणं. त्याच्या काळजात असंख्य वार करून गेलं. तो मुलगाही त्याच्याकडे सुचकतेने पाहत होता. त्याच्या तश्या पाण्याने आगीत तेल ओतण्याचे काम केले आणि पुढे एकही शब्द न ऐकता देवेश तिथून निघून गेला.
सांज पुढे बोलत होती.
"आमचं फक्त एकमेकांवरच नाही तर देवू वर ही खूप प्रेम आहे आणि त्याच ही आमच्यावर. हो की नाही रे देवू????? देवू?????? अरे हा इथेच होता ना? कुठे जातोय तो?" पाठमोऱ्या देवेशच्या शरीराकडे बघून ती म्हणाली.
" अग, येईल तो. काहीतरी काम आठवलं असेल त्याला." नंदू म्हणाला तसं तिने \" ठीक आहे.\" अश्या अर्थाने मन डोलावली.
पण ठीक काही नव्हतं. त्या दिवसापासून त्या तिघांची मैत्री संपुष्टात आली होती.
त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम असणं देवेशला खटकत नव्हतं. त्याला खटकल होतं ते म्हणजे, ही गोष्ट त्याला इतरांकडून कळण.
या दोघांना तर या गोष्टीचा ध्यासभासही नव्हता.
कारण त्यांच्या मनातलं प्रेम हे मैत्रीच्या नात्याने ओतप्रोत भरलेल होतं आणि देवेश च्या मनातला प्रेम या शब्दाचा भाव, हा तो होता जो भाव फक्त आयुष्याच्या जोडीदारांना एकमेकांविषयी वाटतो.
दुसऱ्या दिवशी देवेश कॉलेजला आला नाही. चौकशी करताच लक्षात आलं; की तो कॉलेज सोडून गेलाय. त्याने बाकीच्या सगळ्या फॉर्मलिटिझ त्याच्या वडिलांच्या स्टाफ मार्फत पूर्ण केल्या.
त्याचा कोणताही संपर्क यांच्याकडे नव्हता. त्याचं असं काही न सांगता जाणं या दोघांच्याही मनाला दुखावून गेलं होतं.
पण जसा काळ पुढे गेला हे दोघेही विसरले. देवेश मात्र विसरला नाही.
जेव्हा सांज आणि नंदू, सीबीआय ऑफिस मध्ये जॉईन झाले, तेव्हा त्यांना कळलं; की देवेश त्यांना सिनियर आहे. ते दोघेही खुश झाले.
देवेश मात्र त्यांना अनोळखी असलेल्या सारखे वागवत होता, टोमणे मारत होता.
सुरवातीला सांज आणि नंदू दुखावले गेले; पण नंतर मात्र त्यांनीही त्याला पळता भुई थोडी करून सोडली होती.
_______________________________________________________
( वर्तमान )
ठिकाण : हॉस्पिटल.
देवेश डोळे मिटून हॉस्पिटलच्या बेड वर पडून होता. हात दुखत तर होताच; त्याहीपेक्षा जास्त त्याला नंदू आणि सांजला सामोरं जाण्याची भीती वाटत होती.
\" देवेश तिरुपती. फिअरलेस कॉप, त्याच्या बॅच चा फर्स्ट रँक होल्डर. कुठल्याच परिस्थिती ला कधीही न घाबरणारा. आज स्वतःच्याच जुन्या मित्रांना फेस करायला घाबरतोय. अहं, लेट मी करेक्ट माय सेल्फ. मी घाबरत नाही आहे; पण थोड ऑकवर्ड वाटतं आहे मला. ओह गॉड ब्लेस मी. हेल्प मी. यांच्याशी भांडण याहून खूप सोपं होतं. हे…… हे खूप कठीण आहे माझ्यासाठी. नो सोल्युशन. डोळे कधी ना कधी तर उघडावेच लागतील.\" देवेश मनातल्या मनात स्वतःची तयारी करत होता.
खूप साऱ्या शब्दांची जुळवाजुळव केली असं म्हणायला, देवेश कडे शब्द होते कुठे? त्याला तर वाटतं होतं. गोळी त्याच्या हाताला नाहीतर त्याच्या मेंदूला चाटून गेली आणि जाताना सगळे शब्द चाटून फुसून घेऊन गेली.
"गोळी दंडाच्या त्वचेवर उथळ कोनात आदळली आहे, त्यामुळे वरवरच जखम झाली आहे. तरीही हाताला आराम मिळावा म्हणून हाताला हॅण्ड सपोर्ट स्लिंग मध्ये ठेवावं लागेल. जखम भरेपर्यंत." डॉक्टर सांज आणि नंदूला माहिती देत होते.
"ओके डॉक्टर." नंदू सगळं काळजीपूर्वक ऐकत होता.
"डॉक्टर, एवढ्यात यांना शुद्ध यायला हवी होती." सांजने काळजीने विचारले.
"हो यायला तर हवी होती; पण खूप रक्त खूप वाहून गेल्याने अशक्तपणा येऊन गुंगी राहिली आहे. येतील ते शुद्धीवर." डॉक्टरांनी असं म्हणताच. त्या तिघांनीही एकदम देवेशकडे काळजीने पाहिले.
त्यांना कुठे माहित होतं, खुरापाती साहेब केव्हाचेच शद्धीवर आले आहेत आणि यांचं बोलणं ऐकत आहेत.
सांजने जेव्हा बारकाईने निरीक्षण केले तेव्हा तिच्या लक्षात आलं; की देवेशची बुबळ तर हलत आहेत.
\" अच्छा!!!! साहेब, उठलेत तर. आता बघच मी काय करते.\" शेवटी ती सांज आहे.
"चल नंदू, चला डॉक्टर. पेशंट जेव्हा शुद्धीत येईल तेव्हा येईल." ती देवेशला ऐकू जाईल असं मोठ्याने बोलली आणि तिथून बाहेर निघून गेले.
ते बाहेर गेल्याची खात्री होताच देवेशने हळू डोळे किलकीले केले. पूर्ण खोलीचा अंदाज घेत त्याने तिथे कोणी नसल्याच पडताळून पाहिले.
पाठीवरून खूप वेळ झोपल्यामुळे, जरा पाठीत भरल्यासारखे झाले देवेशला. तो उठून बसायचा प्रयत्न करू लागताच, हातामुळे त्याला शक्य होईना. तरीही तो उठायला बघत होता.
हातावर जोर देता येत नसल्याने त्याला उठताना त्रास होतं होता. अचानक कोणीतरी त्याला आधार देऊन सावकाश सरळ बसवले.
"थँक्यू." म्हणतं तो त्या व्यक्तीकडे वळला आणि तिला बघतच राहिला.
ती व्यक्ती सांज होती आणि तिच्या मागे नंदू ही उभा होता.
क्रमशः
©® स्वर्णा.
आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.
वाचत रहा. आनंदी रहा. सुरक्षित रहा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा