पांडव भाग ३२

The Truth Always Comes Out


पांडव - fantastic five⭐
भाग ३२


(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -

रणछोड डॉ. लोबोंच्या सांगण्यावरून \" मोहन \" बनला होता. (की तोच खरा मोहन आहे?)

\" चित्रगुप्त शास्त्री \" चैत्रा बेणेच्या घरी काय करत होता. ( की माधवला गैरसमज झाला?)

सांज आणि पांडव डी प्लस पॉइंटच्या दिशेने निघाले.

ज्युलिया, अग्नेयच्या आणि सिक्युरिटी गार्ड्स मधलं अंतर कमी होतं ते आता एकमेकांच्या दृष्टिक्षेपात आलेत.


आता पुढे -


ठिकाण: डी प्लस पॉइंट


सगळेच ज्युलिया आणि अग्नेयच्या दिशेने निघाले होते.

आता बघायचं होतं; की आधी नंबर कोणाचा लागतोय.

अर्थातच त्या सिक्युरिटी गार्ड्स जिंकणार होते; करणं त्यांचंच अंतर सर्वात कमी होतं आणि ते पोहचले ही.


दारातून एक अजस्त्र लोकांचा ग्रुप ज्युलिया आणि अग्नेयला आत येताना दिसला. त्या दोघांनी स्वतःला तयार केलं.


ज्युलियाने तिच्या जाकेटच्या चोर कप्यातून एक बॅरेटा (छोटी पिस्तूल) काढली आणि त्यांच्यावर पॉइंट केल्या. अग्नेयने ही त्याच्या दोन 3302 ब्लॅक 9 मिमी गन फुल्ली लोडेड त्यांच्यावर रोखल्या.


\"शूटआऊट ॲट डी प्लस पॉइंट बिगिंस.\"


"ज्युलिया, बॅक टू बॅक कव्हर." अग्नेय ओरडला.
ज्युलियाने त्याला \" ओके.\" अशी खूण केली. सहा ते सात जण होते. त्यांच्या हातात स्टीक्स होत्या. त्या स्टीक्स पाहून या दोघांनी गन्स परत होत्या तिथे ठेवल्या आणि पोझिशन घेतल्या.


अग्नेय पुढे होता. त्याच्यासमोर चालून आलेल्या पहिल्या गार्डची स्टिक त्याने पकडली आणि त्या साईड वर जोर देत दुसऱ्या साईडची किक त्याच्या कानावर मारली.


तिथे मारामारी सुरू होताच तिथला ड्रग्स घेणाऱ्यांचा ताफा यांच्या दिशेने पाहू लागला. जे थोडे शुद्धीत होते. ते बाहेर पळून जाऊ लागले. इतरांना तर तेवढेही त्राण उरले नव्हते. एखादा पिक्चर झोपेत बघावा तसे ते या फाईट कडे बघत होते.

ज्युलियाने जरी गन जॅकेट मध्ये ठेवली, तरी त्याचं वेळी तिने जॅकेट मध्ये अडकवलेला छोटा नानचाकु(नानचाकु ला नानचक असे सुद्धा म्हणतात.) बाहेर काढला आणि पुढे सरसावली. तिची नानचाकु वरची पकड पाहून पुढे धावून येणारे गार्ड्स काही क्षण स्तब्ध झाले.

हवेत नानचाकु फिरवून त्याने ती सराईत पणें आठ(8)चा इंग्रजी आकार बनवत होती. समोरचे गार्ड्सच काय तर अग्नेय सुद्धा तिला काही वेळ बघत राहिला आणि स्वतःची फाईट विसरला. त्याचं दुर्लक्ष झालं तेवढ्यात अग्नेयला एक फटका पड ला. तसं अग्नेयने पुन्हा फाईट वर लक्ष केंद्रित केलं. तरीही त्याचं लक्ष ब्रूस ली प्रमाणे नानचाकु चालवणाऱ्या ज्युलिया वरून हटत नव्हतं.

ज्युलिया अत्यंत कुशलतेने हातांवर नानचाकु खेळवत सहज त्या गार्ड्सना लोळवत होती.
ते गार्ड्स सुद्धा काही कमी नव्हते. सगळे जिम मध्ये बॉडी कमावलेले पट्टीचे फायटर होते.


त्यातल्या एकाला हे प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे दिसून येताच त्याने अजून काही जणांना बोलावले.


इथे ज्युलिया आणि अग्नेयने अर्ध्याहून जास्त जणांना अर्ध मेलं करून सोडले होते.


ते दोघे खूप कुशलतेने लढत असले तरीही होते तर फक्त दोघे. त्यांनाही थोडा मुका मार लागला होता. असं असूनही ते लढत होते. चार गार्डस तर त्यांनी आधीच गुंगीत पाठवले होते. उरलेल्या गार्डसना अर्ध अर्ध वाटून घेतात तसे दोघेही मारत होते.


मारता मारता अग्नेयच्या लक्ष्यात आलं
\" अरे, हे तर तेवढेच जण आहेत. जेवढे आधी होते. काय प्रकार आहे? चार तर अजून ही पडलेले आहेत. जे कधी उठतील याची खात्री नाही. मग हे
कुठून आले?\" त्याचं लक्ष कोपऱ्यात उभा असलेल्या आणि फोन नुकताच बंद करणाऱ्या गार्ड कडे गेलं.

\" अच्छा हां नवा स्टॉक ह्याने ऑर्डर केला आहे तर आणि अजून काही लोकांना बोलावलेल दिसतंय.\"

विचारात गुंतल्यामुळे अग्नेयच लक्ष थोड्या वेळासाठी विचलित झाले. याचा फायदा घेऊन एक गार्ड त्याच्या डोक्यावर वार करण्यासाठी सरसावला.


ज्युलियाची नजर त्याच्यावर जाताच ती ओरडली.

"अग्नेय!!!!!!!!"


तो वळून तिच्या सांगते त्या दिशेने पाहे पर्यंत गार्डच्या हातातील रॉड वेगाने त्याच्या मानेच्या दिशेने येत होता.

डोळे मिटाण्याशिवाय अग्नेयला त्याक्षणी दुसरा पर्याय सुचेना; कारण त्याचे दोन्ही हात समोर गार्डना मारण्यात व्यस्त होते.

"एम्बर!!!!!!!!!!" तिरुपतीच्या आरोळीने तो गार्ड ही जरा दचकला. देवेश आणि सांज तिथे पोहचले होते.

त्याचवेळी समोरच दृश्य पाहून देवेश चवताळून त्या गार्डच्या अंगावर धावला.
देवेशच्या नुसत्या आवाजाने तो गार्ड थबकला होता. त्याने हाई किकने गार्डच्या हातातला रॉड जमीनदोस्त केला. आणि पाठीमागे वळून अजून एक किक त्या गार्डच्या नाकावर ठेवून दिली.

देवेश आणि सांजला पाहून ज्युलिया आणि अग्नेय जरा निश्चिंत झाले.

आता फाईट आवाक्यात आली आहे, असे वाटून चौघेही दुप्पट जोमाने लढू लागले.

पण हा त्यांचा संभ्रम ठरला. त्या गार्डनी ही लढत त्यांच्या हाताबाहेर जातं आहे असं लक्षात येताच त्यांच्या गन्स बाहेर काढल्या आणि फायरींग सुरू केलं.


अचानक सुरू झालेल्या गोळीबाराने चौघेही जरा बावरले. तरीही त्यांनी झटपट आडोसा धरून स्वतःचे स्थान सुरक्षित केले. आपापल्या गन रेडी करू ते ही त्या गार्डवर फायरींग करू लागले.


फायरींग करताना कोणत्याही निरपराध व्यक्तीला गोळी लागू नये याची सांज आणि टीम काळजी घेत होती.


ही टीम काही केल्या हार मानत नाही म्हटल्यावर गार्ड मधल्या एकाने मागून येऊन सांजवर नेम धरला. सांजची त्या गार्डकडे पाठ होती आणि त्या गार्डच्या निशाण्यावर सांज होती. त्याने नेम धरून गन फायर केली.


गन मधली गोळी सांजच्या दिशेने निघाली.


"देवू!!!!!!!!!!!!!" आसमंतात नंदुची एकच आरोळी गुंजली.

सगळ्यांचे लक्ष त्या आवाजाच्या दिशेने जाईपर्यंत नंदूच्या गन मधील बुलेटने त्या गार्डला यमसदनी पाठवले होते.


_______________________________________________________



(थोड फ्लॅश बॅक…...)


गार्डने सांजच्या दिशेने गन फायर केली.
बंदुकीतून निघालेली गोळी वेगाने तिच्या दिशेने निघाली होती. देवेशला ते दिसताच तो वेगाने सांजच्या जवळ जाऊन, तिच्या आणि त्या गोळीच्या मध्ये आला आणि त्यामुळे ती गोळी त्याच्या हाताला चाटून गेली.


हा प्रकार घडला, तेव्हा नंदू, स्वामी, माधव आणि रावण एकत्र तिथे पोहचले होते.



_______________________________________________________


( वर्तमान )


नंदूच्या ओरडण्याने सगळ्यांचे लक्ष सांज आणि देवेश कडे गेले. गोळी लागल्यामुळे देवेश सांजच्या अंगावर आदळला. तिने सरळ होऊन त्याला सावरले.


सांजचे डोळे नकळत भरले. पाण्याबरोबरच \" का?\" या प्रश्नाने तिच्या डोळ्यातून देवेश कडे पाहिले.


"कधीतरी माझ्या मनाने शरीराला आणि बुद्धीच्या अहंकाराला झुगारून, तुझ्याकडे धाव घ्यायलाच हवी होती. आय एम हॅप्पी टुडे. तो दिवस आज आहे." हाताने भळाभळा रक्त वाहत असल्यामुळे डोळ्यांवर थोडी ग्लानी आलेला \" देवेश तिरुपती\"…. अहं…. सांज आणि पांडव टीमचा \" खुरापाती \"; डोळे मिटू न देण्याचा अथक प्रयत्न करत सांजच्या डोळ्यात डोळे घालुन म्हणाला.


पूर्ण टीम आल्यामुळे त्यांनी सगळ्या गार्डसना जयबंद केले. नंदू मात्र सर्वात आधी देवेश कडे धावला.

एका बाजूला सांज आणि एका बाजूला नंदू आणि त्या दोघांचा आधार घेऊन मध्ये देवेश असे तिघे ही गाडी कडे जायला निघाले. बाकीचे त्यांना पाठमोरे जाताना आश्चर्याने पाहत गार्डसना ताब्यात घेत होते. तिथे तेवढ्यात आलेल्या लोकल पोलिसांनीही त्यांना मदत केली.


सांज, देवेश आणि नंदू; नंदूच्या गाडी जवळ आले. देवेशला आधार देऊन गाडीत बसवताना देवेश हसत होता.

"व्हॉट? ह्यात हसण्यासारख आहे का काही?" नंदूने जरा वैतागून विचारले.

" नाही रे… जुने दिवस आठवले." अजून हि देवेशच्या चेहऱ्यावर हसू होते.

आता मात्र सांज आणि नंदूचे ही ओठ रुंदावले.


_______________________________________________________


क्रमशः

©® स्वर्णा.


आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.


वाचत रहा. आनंदी रहा. सुरक्षित रहा.


🎭 Series Post

View all