पांडव भाग ३१

The Truth Always Comes Out


पांडव - fantastic five⭐
भाग ३१


(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -

"माधव, चलायचं ना?" रावणने शून्यात नजर लावुन बसल्यासारख बसलेल्या माधवला म्हणाला.


"आं? हां? चल निघू. ओके मिस बेणे. येतो आम्ही." माधवने ही तिचा निरोप घेतला.


चाळीतून बाहेर पडताना सुद्धा माधव विचारत गढला होता.


"आठवला?" माधव जोरात ओरडला तसं रावणाने त्याच्याकडे पाहून \" कोण \" म्हणून भुवया उंचावल्या.


"चित्रगुप्त शास्त्री." माधवने असं म्हणताच रावणचे ही डोळे विस्फारले.

आता पुढे -

ठिकाण: डी प्लस पॉइंट


त्याच्या मागून हे दोघे चालत निघाले होते. वाटेत ज्युलिया स्पाय कॅमेराने इमेजेस क्लिक करत होती. अग्नेय त्याच्या बारिकबारिक हालचालींचे निरीक्षण करत होता. जसे ते पुढे पुढे जात होते, तसा वातावरणात एक विलक्षण दर्प जाणवत होता.

तो मुलगा पुढे, त्याच्या मागे अग्नेय आणि अग्नेयच्या मागे ज्युलिया.
ज्युलियाची पावले संथ पडत होती. अग्नेयला जाणवलं, तसा तो मागे वळला.

त्याला ज्युलियाच्या परिस्थितीचा अंदाज येत नव्हता.

\" हिला सुद्धा सांज सारखा स्मेल मुळे त्रास होतोय का?\" मनातच विचार करत तो तिच्या अगदी जवळ चालू लागला. जेणे करून तिला आधार देता येईल. जवळ चालत होता खरा, पण त्याने त्याची मर्यादा ओलांडली नव्हती.

ज्युलियाच्या लक्षात येताच ती गालात हसली.

"हनी, आय एम फिट अँड फाईन. फक्त हे क्षण फक्त मनात कोरत आहे." जवळ आलेल्या अग्नेयच्या अजून जवळ जाऊन ती मोठ्यानेच बोलली; पण खुणेने त्याला स्पाय कॅमेरा दाखवायला विसरली नाही.

तिने क्षणार्धात खूण केली होती. जी फक्त त्यालाच कळली.

"वेलकम. टू अवर हेवन." तो मुलगा समोर पाहत हात दाखवत बोलला आणि तो पुन्हा काउंटर सांभाळायला निघून गेला.


सर्वत्र धुराच वलय तयार झालं होतं. सर्व प्रकारचे ड्रग्स घेत युवक आणि युवती देहभान हरवून त्या खोलीत पडली होती.
त्यांना कशाचीही जाग म्हणून नव्हती.

एका कोपऱ्यातून डिजे वर गाणी सुरू होती. त्या प्लेलिस्ट मध्ये त्याचं धुंद मूडची गाणी सुरू होती.

काही नशाचा अंमल झालेली मुलं तिथेच डान्स फ्लोर वर अंगविक्षेप करत नाचत होती. ज्युलियाने
क्षणाचाही विलंब न लावता सांजला मेसेज पाठवला सोबत एक फोटो ही पाठवला.

"कम फास्ट. इटस् ऍक्शन टाईम."

सांजचा मेसेज बॉक्स ब्लिंक झाला.

सांजने तो मेसेज रावण आणि नंदूला फॉरवर्ड केला.


"वी आर कमिंग." ज्युलियाने रिप्लाय वाचून मोबाईल क्लच मध्ये ठेवला.


ती तसं करत असताना दोन माणसं तिच्याकडे संशयित नजरेने बघत होती.
अग्नेयच्या ते लक्षात येताच त्याने ज्युलियाचा क्लच काढून आपल्या हातात घेतला आणि तिचा चेहरा हाताने स्वतः वर केंद्रित करत म्हणाला,

"बेब, मी इथ असताना तू कोणाला मेसेज करते… आय डोन्ट लाईक धिस."
बोलता बोलता त्याने डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्या माणसांकडे इशारा केला.

"हनी, यू नो ना माय मॉम. जाम डोक्याला ताप आहे ती बाई. तिच्यापासून वाचायला मी इथे तुझ्यासोबत येते. तू नको ना नर्व्हस होऊ." तिने अगदी अलगद अग्नेयच्या गालाजवळ ओठ नेले. जेणे करुन इतरांना वाटेल की ती त्याला किस करतेय; पण तिने तसं केलं नाही फक्त इतरांना तसं भासवल. त्याच्या कानात हळूच कुजबुजली.

" टीम येतेय."

"नाऊ इट्स शो टाईम!" असं म्हणत तिने क्लच पुन्हा आपल्या हातात घेतला. ज्युलिया आणि अग्नेय दोघेही कामाला लागले.

मगाशी दोघेजण, जे ज्युलियाकडे संशयाने बघत होते. त्यांचा संशय तर त्याने केव्हाच दूर केला होता.


आता ती बिनधास्तपणे अग्नेयच्या गळ्यात हात घालून डान्स फ्लोर वर थिरकत होती. थोडसं वातावरण आपल्या आवाक्यात आहे, म्हटल्याबरोबर तिने हळूहळू कोणाच्याही नकळत तिच्या सॅम्पल बॅगमध्ये मध्ये ड्रग्स संपल्स कलेक्ट करायला सुरुवात केली.


अग्नेय सुद्धा, ती तिच्या कामात गुंतलेली असताना, तिला गार्ड करायचं काम करत होता. तिच्याजवळ कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, म्हणून तो कटाक्षाने लक्ष देत होता. अस करताना त्याची नजर चौफेर होती. टीम वर्कचा उत्कृष्ट नमुना तिथे बघायला मिळत होता. हे कोऑर्डिनेशन फार काळ टिकलं नाही; कारण ती दोन माणसं पुन्हा एकदा जुलियाच्या दिशेने यायला निघालेली अग्नेयच्या दृष्टीस पडली.


अग्नेय सावध झाला. तसे त्याने चेहऱ्यावर मात्र दाखवलं नाही. ज्युलियाला सुद्धा त्याने डिस्टर्ब केलं नाही.



शिकार पाहून त्याच्याकडे निशब्द पावलांनी जाणाऱ्या व्याघ्र, केसरी प्रमाणे तो त्या दोघांच्या दिशेने जातं होता.



ज्युलिया पाठमोरी राहून काहीतरी करत होती. तिची पाठ त्या दोघांच्या दिशेने असल्याने ते तिच्याकडे येतं आहेत हे तिला दिसत नव्हतं.


त्यांची पावलं तिच्या दिशेने झपझप पडू लागली. तसा अग्नेयने ही त्याचा वेग वाढवला.

तरीही ते त्याच्या आधी तिच्याजवळ जाऊन पोहचले.

त्यांनी तिच्या पाठीला रिव्हॉल्व्हर लावली.

तिचे हात जागच्या जागी थांबायला हवे होते. ते त्या उलट अती वेगाने हातातल्या क्लच मध्ये फिरले.

तिने निमिषार्धात अनेस्थेशियाच औषध असलेली सिरींज तयार केली आणि मागे वळून त्या रिव्हॉल्व्हर रोखलेल्या माणसाच्या मानेत रिकामी केली.


हा सगळा प्रकार अनपेक्षित रित्या घडल्यामुळे तो माणूस बेसावध होता. पेन्सिलच्या आकाराची सिरींज त्याच्या मानेत रिकामी झाली होती आणि बघता बघता तो खाली कोसळला होता.


त्याच्या मागच्या माणसाने ज्युलिया वर झेप घेण्या आधी अग्नेयने त्याच्या छोट्या मेंदूवर फटका मारला.

तो माणूसही पाठोपाठ खाली कोसळला. एवढं सगळं घडलं तरी तिथे इतरांनी फारशी हालचाल केली नाही. कारण ते शुद्धीतच नव्हते. त्यांच्याकडे पाहून ज्युलिया आणि अग्नेयला त्यांची कीव आली.


कीव करत बसण्या एवढा वेळ त्यांच्या कडे राहिला नव्हता; कारण इतर कोणी या घटनेची दखल घेतली नसेल तरीही, \"उपरवाला सब देखता है - सीसीटीव्ही कॅमेरा \" त्यातून ही सगळी घडामोड तिथल्या सिक्युरिटी गार्ड्सना मिळाली होती आणि ते या दोघांच्या दिशेने यायला निघाले होते.


_______________________________________________________


सांजने ज्युलियाचा मेसेज तिरुपतीला दाखवला. तिरुपतीने गाडी स्टार्ट केली आणि ते दोघे डी प्लस पॉइंटच्या दिशेने निघाले.


_______________________________________________________


मेसेज आला तेव्हा रावण आणि माधव चैत्राच्या घराच्या बाहेर होते. दोघेही मेसेज वाचून लगेच गाडीत बसले आणि आणि मोबाईलचा जिपिएस ऑन करून गूगल मॅप वर डी प्लस पॉइंट लोकेशन सेट केली.


_______________________________________________________


नंदुही स्वामी बरोबर निघाला. नंदू तिथल्या लोकल पोलिसांना इन्फॉर्म करायला विसरला नाही. वाऱ्याच्या वेगाने गाडी घेऊन तोही निघाला.


सगळेच ज्युलिया आणि अग्नेयच्या दिशेने निघाले होते.

आता बघायचं होतं; की आधी नंबर कोणाचा लागतोय.

अर्थातच त्या सिक्युरिटी गार्ड्स जिंकणार होते; करणं त्यांचंच अंतर सर्वात कमी होतं आणि ते पोहचले ही.


दारातून एक अजस्त्र लोकांचा ग्रुप ज्युलिया आणि अग्नेयला आत येताना दिसला. त्या दोघांनी स्वतःला तयार केलं.


ज्युलियाने तिच्या जाकेटच्या चोर कप्यातून एक बॅरेटा (छोटी पिस्तूल) काढली आणि त्यांच्यावर पॉइंट केली. अग्नेयने ही त्याच्या दोन 3302 ब्लॅक 9 मिमी गन फुल्ली लोडेड त्यांच्यावर रोखल्या.


"शूटआऊट ॲट डी प्लस पॉइंट बिगिंस."





_______________________________________________________


क्रमशः

©® स्वर्णा.


आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.


वाचत रहा. आनंदी रहा. सुरक्षित रहा

🎭 Series Post

View all