पांडव भाग २९

The Truth Always Comes Out


पांडव - fantastic five⭐
भाग २९


(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -


तो मुलगा स्वर्गातून पृथ्वीवर आला, तशी ही अगदी दिलखेच हसली आणि अग्नेयकडे वळून म्हणाली, "हे डियर, इथे खरंच काही स्पेशल आहे का? की तू मला उगीच घेऊन आला आहेस? माझ्याकडे जी वस्तू आहे; तिच्यामुळे आपण आपल्या प्लेस मध्येही स्वर्गसुख घेतलं असतं. इथे असं काय आहे?" तिने वाक्य पूर्ण करताना त्या मुलाकडे तुच्छतेने पाहिले.

आता मात्र त्या मुलाचा इगो दुखावला गेला. तो काउंटर मधून बाहेर येऊन त्या दोघांना म्हणाला,

"फॉलो मी, मग सांगा; की ही जागा कशी आहे ते?"


त्यांना इशारा करून तो आत जायला निघाला. हे दोघजण त्याच्या मागून निमूट पणे निघाले. जाताना ज्युलिया तिच्या हेअर पिन मधला रेकॉर्डर ? माईक, नेकलेसच्या पेंडंट मधला ट्रॅकर आणि ब्रोच मधला कॅमेरा सुरू करायला विसरली नाही.


आता पुढे -


ठिकाण: पोलीस स्टेशन, सीरियल किलर डेड बॉडी जिथे आलेली ते.


"गूड मॉर्निंग, पीआय तळपदे."

"गूड मॉर्निंग, ऑफिसर्स." पीआय तळपदे नी सांज आणि देवेश बरोबर हस्तांदोलन केले.


"व्हॉट कॅन आय डू टू हेल्प यू?" पीआय तळपदे त्यांना खुर्चीत बसायचा इशारा करून आपण आपल्या जागेवर बसत म्हणाले.


"आम्हाला त्या सीरियल किलर केस संदर्भात अजून माहिती हवी होती." देवेश म्हणाला.

" आमच्याकडे जेवढी माहिती होती, तेवढी आम्ही तुम्हाला त्याच वेळी दिली. आता आमच्याकडे कोणतीही जास्तीची माहिती नाही." दिलगिरी व्यक्त करत पीआय तळपदे म्हणाले.


"इट्स ओके नो प्रॉब्लेम" त्यांची परिस्थिती समजून सांज म्हणाली.


तिथे थांबून काही फायदा नाही हे लक्षात येताच ते दोघेही परत जायला निघाले.

बाहेर पडत असताना त्यांच्या कानावर दोन हवालदाराचे शब्द पडले.

"अरे, कसला डोक्याला ताप करून ठेवला होता?" पहिला हवालदार.


"हो रे, नुसती दादागिरी. असंच झालं पाहिजे असल्या गाव गुंडाच्या बरोबर." दुसरा हवालदार.


"कसले कार्टून दिसत होते ते तिघे."पहिला दिलखुलास हसला.

"मिश्या आणि केस काढून टाकलेले. म्हणतात कसे, कोणी केलं ते माहित नाही. सकाळी आरश्यात स्वतःला बघितलं तर कळलं म्हणाले." दुसऱ्याला ही हसू आवरेना.


"काय सुरू आहे?" पीआय तळपदे तिथे येऊन म्हणाले, तसे दोघेही सावधान पोझिशन मध्ये उभे झाले आणि त्यांना सेल्युट ठोकला.

"काही नाही सर, ते जवळच्या मार्केट मध्ये हफ्ता गोळा करणाऱ्या गाव गुंडाच्या झालेल्या फजिती बद्दल बोलत होतो. त्यांनाच माहित नाही; की त्यांची अशी वसुली कोणी केली व का?" पहिला हवालदार म्हणता क्षणी तळपदे ही हसले. तेवढ्यात त्यांचे लक्ष सांज आणि देवेश कडे गेले. जे हा सगळा प्रकार बघत तिथेच उभे होते.

त्यांना तसं बघताना बघून तळपदे त्यांच्या जवळ गेले आणि म्हणाले, "काही विशेष नाही ओ, ते रोजचेच वसुली गुंड आहेत. कोणी तरी हल्लीच त्यांना शेजारच्या मार्केट मध्ये वसुली करताना बेदम मारहाण केली. त्यानंतर ते एक दोन दिवस घरीच होते आणि आज सकाळी ही तक्रार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आले."

"हो सर, म्हणतात कसे, भुताने केस गायब केले." दुसरा हवालदार देवेशकडे बघत हसू आवरत म्हणाला.

हे अजून सांज आणि देवेश ही हसू लागले आणि त्यांचा निरोप घेऊन निघून गेले.

बाहेर आल्यावर गाडीचा दरवाज्याजवळ येऊन सांज जरा रेंगाळली.

" काय झालं?" तिचं तसं जागीच थबकण गाडीत बसलेल्या देवेशला न कळल्याने त्याने विचारलं.

"ते आत, जे जवळच मार्केट म्हणत होते ते? म्हणजे आपण गेलो होतो ते मार्केट तर नव्हे ना?" ती अजूनही विचारात अडकलेली.

" अरे हो, पण या पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत ती मार्केट एरिया येतं नाही माझ्या मते." देवेशच बोलणं ऐकतच विचारत गुंतलेली सांज गाडीत बसली.


"तरीही ते मार्केट इथून जवळच आहे. कदाचित ते गुंड इथे जवळ राहणारे असतील."सांजने शक्यता वर्तवली.


"मग तसा विचार केला तर, आपण इंवेस्टिगेट करत असलेले गुन्हे जवळपासच्याच भागात घडलेत." देवेश अगदी सहज बोलून गेला आणि त्याने गाडी स्टार्ट केली.


सांज मात्र त्याच्या कडे आश्चर्याने बघत राहिली. तिने मनात विचार केला.


\" एवढी महत्त्वाची बाब आपल्या कशी लक्षात आली नाही? की आपण इतर गोष्टींना जास्त महत्त्व दिलं.\"


कधी कधी डोळ्यांसमोर दिसत असणाऱ्या गोष्टींकडेच आपलं दुर्लक्ष होतं.


________________________________________________________________________


ठिकाण: मदर मेरी हॉस्पिटल अँड रेहाबिलेशन सेंटर.


"नाही. मला जेवायचं नाही." मीरा चिडून उठली.


"ताई, असं कसं चालेल, तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत. जेवला नाहीत, तर त्या कश्या घेता येतील?" नर्स काकुळतीला येऊन म्हणाली.


" मी एकदा सांगितलं ना. मोहन आल्याशिवाय मी जेवणार नाही." मीरा त्या नर्स वर अजून चिडली. तिचा राग तिच्या आवाजातून डोकावत होता.

"येतील ते आम्ही फोन केला आहे त्यांना. तोपर्यंत तुम्ही जेवण आटपून घ्या. मग ते आले; की तुम्हाला निवांत गप्पा मारता येतील." नर्सने सारवासारव केली.


" हे तू असच बोलून फसवतेस मला. तो काही येत नाही आणि मी जेवले; की ही औषध मला गुंगी आणतात, मी झोपते." मिराने बोलता बोलता मान खाली घातली. " उद्या उठली; की सगळं विसरून जाते. तू …...तू…..तू याचा गैरफायदा घेतेस." मीरा रागाने त्या नर्सच्या जवळ गेली आणि तिच्या हातातल्या गोळ्यांच पाकीट भिरकावले.


नर्सला ही कळेना काय उत्तर द्यावे ते. ती ही हताश होऊन त्या जमिनीवरच्या पाकिटाकडे बघू लागली.


त्या पाकिटाजवळ दोन पावलं येऊन थांबली.


नर्सने त्या व्यक्तीकडे पाहिले आणि काही बोलणार, एवढ्यात त्या व्यक्तीने तिला हातानेच शांत राहण्याचा इशारा केला.


ते पाकीट नर्सच्या हातात देऊन त्या व्यक्तीने तिच्या हातातलं जेवणाच ताट घेतलं.


ते घेऊन तो तिच्या जवळ गेला आणि तिच्या बाजूला बसला.


"मी यायला उशीर केला म्हणून केवढा तो राग नाकावर." बोलता बोलता त्याने एक घास बनवला आणि तिच्या ओठांजवळ नेला. तिने मान वर करून त्याच्या कडे पाहिले.

"सॉरी ना, माझ्यावरचा राग नंतर तू माझ्यावर मनसोक्त काढ; पण आधी जेऊन घे." त्याच्या हातातला घास अजूनही तिच्या ओठांजवळ होता.


तिने भरलेल्या डोळ्यांनी त्याला पाहत ओठांना विलग केले.

"मोहन, तू आलास……" तिचे शब्द तिची साथ देत नव्हते.


त्याने तिला घास भरवत मानेने होकार दिला.

"कुठे होतास तू? किती उशीर केलास? मी किती वाट पाहत होते?" ती घास खाता खाता भडाभडा बोलत होती.


"किती ते प्रश्न आधी जेवून तर घे. मग बोलू आपण."त्याने तिला भरवण्याचे काम सुरू ठेवले होते.

जेवण भरवून झाले. ती तोंड धुवून आली, तसे हातातले ताट नर्सकडे देऊन त्याने गोळ्यांचे पाकीट हातात घेतले.


"नको. मला आज तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. या गोळ्या मला झोपवतील आणि मग तू निघून जाशील." तिने त्याचा हात घट्ट धरून केविलवाणा चेहरा केला.


त्याने नर्सकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले.

\" प्लीज त्यांना या गोळ्या द्या. \" असा इशारा करून नर्स तिथून बाजूला झाली.


"एका अटीवर आपण गप्पा मारू, तू या गोळ्या घ्यायला हव्यात. नाहीतर मी आताच जातो." त्याने तिला शब्दात अडकवू पाहिले.


तिने नाईलाजाने त्या गोळ्या घेतल्या; पण त्याचा हात घट्ट धरून. लांबून पाहणाऱ्या नर्सने ही त्याला \" धन्यवाद \" म्हणत तिथून प्रस्थान केले. तसे त्याने तिला आधार देत गादीवर झोपवले. पांघरुण नीट करून दिले आणि पुन्हा त्याचा हात तिच्या हाती गेला.


"सांग काय सांगत होतीस ते?" तो म्हणाला तशी ती त्याच्या डोळ्यात गुंतली.

"खूप काही सांगायचं असतं मला. खूप तक्रारी करायच्या आहेत." तीही त्याच्याकडे हसून बघत बोलली.


"मग सांग ना. मी तुझ सगळं ऐकल्या शिवाय कुठे ही जाणार नाही." तो आतुरतेने बोलला.

"खरंच?" तिचे डोळे चमकले.


\" डोळ्यात तुझ्या राहून ही
मी मलाच दिसत नाही.
वेड मन जवळ तुझ्या
असूनही तुला शोधत राही.\"


दोघांचे डोळे एकमेकात गुंतले. पापण्यात भरलेले अश्रू जगाला कळू नये म्हणून त्याने डोळे मिटले.

तश्या मिटलेल्या पापण्यांना जरा ही न हलवता तो म्हणाला, " अगदी खरं." त्याने तिचा हात ज्याने त्याचा हात घट्ट पकडला होता तो, दुसऱ्या हाताने दाबला.


बराच वेळ तिचा काही प्रतिसाद नाही, म्हणून त्याने डोळे उघडून तिच्याकडे पाहिले, तर ती डोळे मिटून शांत निद्रेच्या स्वाधीन झाली होती.


\" तुझ्या नशिबी दुरावा लिहून
मी अलिप्त राहिलो.
तुझ नशीब तेच माझं नशीब
नकळत कसं विसरलो.

मला रात्र जागवण्यासाठी एकटा सोडून स्वतः मात्र औषधांच्या मदतीने झोपेला आपलंसं केलंन.\"

त्याला स्वतःच्याच विचारांचं उपहासात्मक हसू आलं.


तिचा हातातला हात चादरीखाली अलगद ठेवून तो उठला. खोलीतला पंखा सुरू करून, लाईट बंद केली आणि तो बाहेर निघून गेला.


काही अंतर चालला नसेल त्याच्या खांद्यावर हात विसावला.


"रणछोड."

हाक ऐकून तो मागे वळला.

समोर डॉ. लोबो उभे होते. डोळ्यात अगणित प्रश्न घेऊन.



___________________________________________________________________________



क्रमशः


©® स्वर्णा.


आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.


वाचत रहा. आनंदी रहा. सुरक्षित रहा.

🎭 Series Post

View all