पांडव भाग २८

The Truth Always Comes Out


पांडव - fantastic five⭐
भाग २८


(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -
चित्रगुप्त शास्त्री आणि सांजची सरप्राइज पावभाजी डेट ?. नंदू आणि सांजचे मैत्री स्पेशल क्षण. सगळ्यात महत्त्वाचं माधवला सापडलेलं नवीन सीसीटीव्ही कव्हरेज आणि त्या मधला तो ज्याला बघून सगळे आश्चर्य चकित झाले.




आता पुढे -

एवढ्यात दार उघडून नंदू आणि सांज ऑफिस मध्ये आले त्यांनीही ती ⏸️ पॉज केलेली स्क्रीन पहिली. तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला.

"हा?" रावण म्हणाला.

"हो. तोच. मी पुन्हा पुन्हा तपासून त्याला ओळखलं. हा तोच मुलींचा सीरियल किलर आहे. ज्याची डेड बॉडी आपल्याला सापडली. हा व्हिडिओ त्या पोलिसांना बॉडी सापडायच्या एक दिवस आधीचा आहे. मी सहज त्या पोलीस स्टेशनच्या जवळ पासच्या भागातील सीसीटीव्ही कव्हरेज चेक करत होतो. तेव्हा हा व्हिडिओ मिळाला."माधवने सविस्तर माहिती दिली.

"पण आपल्याला ज्या मुलींच्या डेड बॉडी मिळाल्या आहेत, त्यात ही मुलगी नाही."ज्युलियाने तिचा संशय बोलून दाखवला.


"हीची मिसिंग कंप्लेंट ही नाही, तिथल्या जवळपासच्या पोलिस स्टेशन मध्ये. मी रिसर्च साठी सगळे रेकॉर्ड चेक केले होते."स्वामी म्हणाला.

"कदाचित हीची बॉडी मिळाली नसेल किंवा तिच्या बद्दल ती हरवल्याची तक्रार करणार कोणीही नसेल."रावणने शक्यता वर्तवली.


"किंवा तिला काही झालेलं नसेल." नंदू असं बोलताच सगळ्यांची नजर नंदू कडे वळली.

सगळे जण त्याचं बारकाईने निरीक्षण करू लागले.


"काय झालं? तुम्ही सगळे माझ्याकडे असं का बघताय?" त्यांच्या तश्या बघण्याने तो जरा गोंधळला.


"तू काल रात्री कुठे गेला होतास?" तिरुपतीने डोक्यावर आठी निर्माण करत विचारले.

"म्हणजे? मी काही समजलो नाही." नंदू अजूनही गोंधळून सगळ्यांकडे पाहत होता.

"तू काल घरी गेला नव्हतास का?" माधवच्या डायरेक्ट प्रश्नाने आणि नंदूने घातलेल्या कालच्याच कपड्यांकडे ज्या प्रकारे माधव बघत होता. त्याने सगळा प्रकार नंदूच्या लक्षात आला.

"याचा आणि या केसचा काही संबंध आहे का? माझ्या व्यक्तिगत आयुष्यावर उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही." नंदू जरा रागानेच म्हणाला.

"मी नंदुशी सहमत आहे. हा जरा पर्सनल प्रश्न आहे आणि त्याच उत्तर देणं न देणं हा नंदुचा स्वतःचा निर्णय आहे." अग्नेयने असं म्हणताच सांजने त्याच्याकडे आश्चर्याने बघितले. माधवने मान खाली घातली.

"सॉरी नंदू." माधव मनापासून म्हणाला.

"इट्स ओके." नंदू खुर्चीत बसत म्हणाला.

" तुझा कालचा युनिफॉर्म अजूनही तू घातला आहेस; म्हणून मी विचारलं. प्रश्न अगदी साधा होता. एवढं चिडण्यासारख त्यात काही नव्हतं आणि एम्बर म्हणाला, ते ही मला मान्य आहे; की उत्तर देणं न देणं हा तुझा निर्णय आहे." तिरुपती स्वतःची बाजू व्यवस्थित मांडत म्हणाला.

" मला माझं विचारणं चूक वाटतं नाही. त्यामुळे मी सॉरी म्हणणार नाही." तिरुपतीच्या या वाक्यावर नंदूने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.


"मॅडी, त्या व्हिडिओ मधल्या मुलीची काही अधिक माहिती मिळाली का?" सांजने विषय पुन्हा इंवेस्टिगेशनकडे वळवला.

"येस सांज, मी तिची माहिती काढली आहे. तिच्या घराचा आणि ऑफिसचा पत्ता मिळाला आहे. आज मी आणि रावण तिथे जाऊन येतो." माधवने असं म्हणून संमतीसाठी तिरुपती कडे पाहिले. तिरुपतीने मान डोलावून संमती दिली.


"त्या डी प्लस पॉइंटच पुढे काय झालं?" तिरुपतीने विचारताच माधव पुढे बोलू लागला.

" तो नंबर एक प्रायव्हेट नंबर आहे. त्याचा डाटा मिळवायला वेळ लागेल; पण मला वाटतं नाही, त्यातून काही जास्त माहिती मिळेल." माधव थोडासा हताश होऊन म्हणाला.

" नो प्रोब्लेम. आपण जी माहिती आहे त्यातून काही मार्ग मिळतोय का? ते बघू या. डी प्लस पॉइंटला अजून एक विझिट द्यावी लागेल." सांजने असं म्हणताच अग्नेय तिच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला आणि म्हणाला, " व्हाय नॉट माय डार्लिंग? टेल मी, व्हेन टू गो."


सांजने त्याला इग्नोर केलं आणि पुढे बोलू लागली,

"सारखं सारखं सेम माणसं तिथे गेली तर त्यांना संशय येऊ शकतो. असं मला वाटतं." बोलत बोलत ती ज्युलियाच्या जवळ जाऊन उभी राहिली.

"बरोबर आहे तुझं; पण वेगळं माणूस गेलं तर त्यांच्याशी ओळख वाढवणं कठीण होऊन बसेल." नंदू.


"करेक्ट. दोन्ही शक्यता नाकारता येणार नाहीत. त्यापेक्षा आपण असं करू; की आज तिथे एम्बर आणि ज्युलिया जातील. त्यामुळे एम्बरने निर्माण केलेली रिच अँड प्लेबॉय इमेज मेन्टेन राहिलं." तिरुपतीच्या म्हणण्याला सगळ्यांनी दुजोरा दिला. तसा तिरुपती पुढे बोलू लागला.

"नंदू, तू आणि स्वामी त्या डेल्टा पबला जा. जर के. जॉय मृत आहे, तर त्याचा न्यू ओनर कोण आहे? त्याचे इतर कोणी पार्टनर होते का? अँड मोस्ट इंपॉर्टन्ट तिथे काय सुरू आहे? या सगळ्याची माहिती काढा. मी आणि सांज त्या सीरियल किलरची डेड बॉडी मिळाली त्या पोलिस स्टेशनला जाऊन येतो."

तिरुपती बोलत बोलतच जागीच उभा राहिला आणि म्हणाला,

" ओके गायिझ, लेट्स स्टार्ट द इंवेस्टिगेशन."

"येस सर." सगळे एका सुरात म्हणाले.

प्रत्येकजण त्याला ठरवून दिलेल्या कामाच्या दिशेने निघाला.


________________________________________________________________________



ठिकाण: डी प्लस पॉइंट


"हे डूड, व्हॉट्स अप. वी वॉन्ट टेबल फॉर जस्ट चिल्ल आऊट. कॅन यू गिव्ह अस?" अग्नेय फुल्ल ऑन स्टाईल मध्ये म्हणाला.
तशी त्या काउंटर वरच्या मुलाची नजर त्याच्याकडे गेली. त्याने अग्नेय व ज्युलियाला नखशिखांत न्याहाळले.

त्या काउंटर वरच्या मुलाने अग्नेयला ओळखले नाही, असे त्या मुलाच्या चेहऱ्यावरून दिसत होते. असे खरेच होते; की तो तसे दाखवत होता. अग्नेयला त्याचा संशय आला; पण चेहऱ्यावर तसं न दाखवता तो त्याचं कूल बिहेविअर कंटीन्यू ठेवत, तो पुढे म्हणाला,

"डोन्ट टेल मी, तू मला ओळखलं नाहीस." अग्नेय जरा नाराज होतं आणि हातातली दोन हजारची नोट त्या मुलासमोर नाचवत म्हणाला.

त्या मुलाने ही लगेच ती नोट घेत अग्नेयला ओळखीचं हसू दिलं आणि म्हणाला,

"मी फक्त गांधीजींना ओळखतो. मी त्यांचा फॅन आहे." त्याने निर्लज्ज हसू चेहऱ्यावर आणत ती नोट हातात खेळवली आणि ज्युलिया कडे बघून म्हणाला, "न्यू कॅच? आधीची छान होती; बट धीस गर्ल इज डॅम सेक्सी." त्याने अग्नेयला बघून डोळा मारला.


"यू नो ना मी चॉईस इज डिफरेंट." अग्नेयने गॉगल लावत खांदे उडवले.

बराच वेळ त्यांना जरा लांबून बघणारी ज्युलिया पुढे आली आणि अग्नेयला खेटून उभी राहत म्हणाली," बेबी, आपलं काम इथे होणार आहे का? आय एम गेटींग बोअर्ड."


"ओह हनी, दॅट्स व्हाय वी केम हियर ना?" अग्नेयने तिच्या कमरेत हात घालून तिला अजूनच जवळ खेचलं. तशी तिही त्याच्या खांद्यावर दोन्ही हात विसावून त्याच्या बाहुपाशात रेलली.

तिच्या त्या मादक आवाजाला आणि हालचालींना बघून काउंटर वरचा मुलगा दोन मिनिट तिच्याकडे बघतच राहिला.

"हे यू? काय बघतोस असा? मुलगी बघितली नाही का कधी? " ती त्याच्या अगदी जवळ जाऊन, समोर उभी राहिली आणि त्याच्या डोळ्यासमोर बोटांनी चुटक्या वाजवल्या.


तो मुलगा स्वर्गातून पृथ्वीवर आला, तशी ही अगदी दिलखेच हसली आणि अग्नेयकडे वळून म्हणाली, "हे डियर, इथे खरंच काही स्पेशल आहे का? की तू मला उगीच घेऊन आला आहेस? माझ्याकडे जी वस्तू आहे; तिच्यामुळे आपण आपल्या प्लेस मध्येही स्वर्गसुख घेतलं असतं. इथे असं काय आहे?" तिने वाक्य पूर्ण करताना त्या मुलाकडे तुच्छतेने पाहिले.

आता मात्र त्या मुलाचा इगो दुखावला गेला. तो काउंटर मधून बाहेर येऊन त्या दोघांना म्हणाला,

"फॉलो मी, मग सांगा; की ही जागा कशी आहे ते?"


त्यांना इशारा करून तो आत जायला निघाला. हे दोघजण त्याच्या मागून निमूट पणे निघाले. जाताना ज्युलिया तिच्या हेअर पिन मधला रेकॉर्डर ? माईक, नेकलेसच्या पेंडंट मधला ट्रॅकर आणि ब्रोच मधला कॅमेरा सुरू करायला विसरली नाही.





________________________________________________________________________


क्रमशः


©® स्वर्णा.


आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.


वाचत रहा. आनंदी रहा. सुरक्षित रहा.




🎭 Series Post

View all