पांडव भाग २५

The Truth Always Comes Out


पांडव - fantastic five⭐
भाग २५


(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -
त्या दिवसानंतर मी मीराला टाळू लागलो होतो. रामच्या आणि सीता वहिनीच्या लग्नात, राम मला म्हणाला होता; \"बघ कोणी आवडते का? तुझ पण आताच उरकून घेऊ नाही तर असाच राहशील.\" तेव्हा मी फक्त हसलो होतो. काय सांगणार होतो त्याला? त्यानंतर त्याचं आणि वहिनीच जाण इतकं मनावर परिणाम करून गेलं; की मी मीराला कधीही न भेटण्याचा घेतलेला निर्णय, अजूनच ठाम झाला. तिचं आयुष्य मला माझ्यामुळे संकटात घालायचं नव्हतं. तिच्या पत्रांना उत्तरे दिली नाही; की ती साधी वाचली ही नाहीत. तिचे फोनही उचलले नाहीत.\"



त्याचा तेव्हा मलाही खुप त्रास झाला आणि आताही अशी शिक्षा मिळते.

तिचा रुसवा मी दूर केला असता, तिचा राग मी सहन केला असता; पण हा अनोळखी वावर माझा जीव कासावीस करून घेईल एकदाचा.\"


आता पुढे -

ठिकाण: सीबीआय हेड क्वार्टर


माधव आणि रावण त्या विक्टीम मुलींच्या घरी गेले तेव्हाचा सगळा रिपोर्ट त्यांनी सबमिट केला.


सगळ्या विक्टिम नाईट शिफ्ट करणाऱ्या होत्या, हा एक मुद्दा सोडला तर कोणतीही गोष्ट कॉमन नव्हती. याचा अर्थ तो सीरियल किलर कोणत्याही फिक्स पॅटर्नने मुलींना मारत नव्हता. त्यामुळेच पोलिसांना त्याला पकडणे कठीण जातं होते.


मग त्याचा खून कसा आणि का झाला? हा प्रश्न होता. त्याच्या बॉडी वर जो मार्क होता. त्यावरून असा संकेत मिळत होता; की के. जॉय आणि त्याचा खुनी एकच असावा. हा केवळ एक संशय होता.


माधव आणि रावणच्या इन्वेस्टीगेशन रिपोर्टमधून वरील माहिती मिळाली.

ज्युलियाने त्याची कुंडली मांडली.


विक्टीम नंबर 2 : सीरियल किलर नेम अंनोन.
डीएनए रिपोर्ट्स: मॅच

"याचे आणि मृत मुलींच्या शरीरात मिळालेले डीएनए सॅम्पल्स मॅच झालेले आहेत. पण हा मृत देह मिळाला तेव्हा कोणत्याही मुलीची मिसिंग कंप्लेंट आली नव्हती." ज्युलिया तिचा रिपोर्ट सांगत होती.


"मृत मुलींच्या शरीराची अवस्था आणि त्या कीलरच्या शरीराची अवस्था सारखीच होती." स्वामीने सांगितले.

"जसं की त्याने त्याला त्याचं वेदना दिल्या, ज्या त्या मुलींना झाल्या होत्या. शिक्षेचा एक प्रकार पूर्वी न्यायव्यवस्थेत होता, डोळ्यासाठी डोळा. त्या प्रणालीचा वापर केला आहे." स्वामीने अजून माहिती दिली.


"याचा अर्थ जस्टिस हा त्या किलरचा मोटो आहे; पण व्हाय किलिंग इज हीलिंग" माधव कपाळावर बोट घासू लागला.


"ते कळेलच. आपण एकदा त्या मुलींच्या वर्क प्लेसेसना जाऊन चौकशी करून येऊ." तिरुपती पुढे बोलू लागला, "चला आता खूप उशीर झाला आहे. सगळ्यांनी घरी जा. उद्या उरलेलं काम बघू."

"येस बॉस." स्वामीने दोन बोटांचा सलाम केला आणि सगळेच निघाले.

सगळे एक एक करून पार्किंग मधून आपापल्या गाड्या काढू लागले. तशी माधवची नजर अग्नेयच्या बाईकवर गेली.


"ओह माय गॉड. यामाहा वायझेडएफ आर १५ व्ही ३. यामाहा कंपनीची बेस्ट स्पोर्ट्स बाईक.
सिंगल सिलेंडर इंजिन,
कमाल पॉवर - 18.6 HP @ 10,000 rpm,
कमाल टॉर्क - 14.1 Nm @ 8500 rpm,
गिअरबॉक्स - 6-स्पीड,
इंधन प्रणाली - इंधन इंजेक्शन,
टॉप स्पीड - 136 किमी ताशी अंदाजे,
फ्रंट ब्रेक - 282 मिमी सिंगल डिस्क,
मागील ब्रेक - 220 मिमी सिंगल डिस्क,
2-चॅनेल ABS
फ्रंट सस्पेंशन - टेलिस्कोपिक फॉर्क्स,
बॅक सस्पेंशन - मोनोशॉक" माधव अगदी मेनूकार्ड वाचल्या सारखं अग्नेयच्या बाईकचे वर्णन केले.

अग्नेयला हसूच आले.

"मी चालवून बघू का एकदा?" माधव अधीरपणे म्हणाला.

"चल, मी तुला घरी सोडतो. मग तिकडून माझ्या घरी जाईन." अग्नेय म्हणाला तसे मात्र माधवच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले.


इतक्यात त्याच्या मागे सांज येऊन उभी राहिली. अग्नेयला हाय करून तिने माधवच्या खांद्यावर टॅप केलं.

"मॅडी, रात्रीच्या वेळी तो एवढा स्टॉक कसा नेणार तू? मी तुला माझ्या गाडीने सोडू का?" तिने असं विचारताच अग्नेयच्या भुवया उंचावल्या.

"स्टॉक?"त्याने माधव कडे विचित्र नजरेने पाहिले.

"सांज, नीट बोलत जा ग बाई. त्याचा चेहरा बघ. ब्रो, ती त्या स्टॉक बद्दल नाही बोलतं. आज्जो आर्मी ऑफिसर असल्यामुळे तिच्या तोंडून असले वर्ड्स सहज बाहेर येतात. तिला खाद्यपदार्थाच्या स्टॉकबद्दल बोलायचं होतं. तो तिच्या घरून ती माझ्यासाठी घेऊन आली होती." माधव पटपट स्पष्टीकरण देऊ लागला. बोलता बोलता तो पुन्हा सांजकडे वळला आणि म्हणाला, " ते मी केव्हाच पाठवून दिलं त्याच्या योग्य जागी आणि तू मला प्रॉमिस केलं होतं हे सिक्रेट राहील म्हणून. तरी तू…" त्याचा चेहरा पडला.


"त्यात काय लपवायचे? तुला माझ्या हातचं जेवण खावस वाटलं तर, तू केव्हा ही तू मला सांगू शकतो." सांज ने त्याच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवत म्हटले.

"हो, ग पण तुझा तो, बडी कम बीएफ आहे ना. त्याला कळलं तर, मला गायब करेल तो." माधवने नंदूची ॲक्टिंग करून दाखवली.

\" नंदू हीचा बीएफ आहे. ही तर म्हणाली होती; की हीच्या आयुष्यात कोणी नाही.\" अग्नेयच्या कपाळावर रेघ उमटली.


"कोण गायब करेल तुला?"तेवढ्यात तिथे पोहचलेला नंदू म्हणाला.

"सैतान का नाम भी नहीं लिया मैने….."माधव पुटपुटला.

"काय?" नंदू त्याचं बोलणं न कळल्याने त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागला.

"ब्रो, तुझी गाडी मला नंतर नक्की चालवायला दे. मी आता जरा घाईत आहे. बाय ब्रो, बाय सांज, बाय नंदू." माधव धावपळीत निघून गेला. हे तिघेही त्याच्याकडे भूत बघितल्यासारखे बघत होते.



____________________________________________________________________
_______


ठिकाण : सांजच घर.

सांज आज लवकर पेक्षा ही लवकर उठली. आजो नसल्याने तिच्यावर आज जास्त जबाबदारी पडली होती. सगळं आवरून ती सीबीआय ऑफिसच्या दिशेने निघाली.

तिला राहून राहून कालच माधवच वागणं आठवतं होतं. असं काय होतं त्याच्या मनात ते कळतं नव्हतं. त्याच्या घराचा, त्याच्या घरातील लोकांचा किंवा त्याच्या घरी जायचा विषय निघाला की तो तिथून पळ काढत असे. हा एक विषय सोडला तर त्याच्याविषयी संशय घेण्यासारख काही नव्हतं. त्याच्याबद्दल संशय कमी काळजी जास्त वाटायची. तो काहीतरी लपवत आहे हे मनाला खटकत होतं.


याच विचारात सांजची गाडी ऑफिसच्या गेटजवळ आली. गेट बंद असल्यामुळे तिची नजर वॉचमन काकांना शोधू लागली. ते कोणाबरोबर तरी बोलत उभे होते. बोलत कमी समोरच्या व्यक्तीला ढकलत जास्त होते. सांजने थोडी वाट बघितली आणि त्यांचं बोलणं थांबेना म्हटल्यावर ती गाडीतून उतरून त्या दोघांच्या दिशेने जाऊ लागली. काकांबरोबर बोलणारी व्यक्ती तिला पाठमोरी होती. ती त्यांना गयावया करून काहीतरी सांगत होती. काका ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते. ते त्याला हकलत होते.


"काका, काय झालं?" सांज जशी त्यांच्या जवळ आली तशी म्हणाली.

तिचा आवाज ऐकताच त्या व्यक्तीचे डोळे चमकले. ओठांच्या कडा रुंदावल्या, मगास पासून काकांशी बोलताना काकुळतीला आलेले शरीर निश्चिंत झाले. भडभड बोलणाऱ्या ओठातून निःश्वास बाहेर पडला.
तो सांजच्या दिशेने वळला. तशी तिच्या कपाळावर येऊ पाहणारी आठी कुठच्या कुठे गायब झाली.

"ओहो, शास्त्रीजी. तुम्ही इकडे कसं येणं केलत." असं तिच्याकडे प्रसन्न चेहऱ्याने बघणाऱ्या चित्रगुप्त शास्त्रीला म्हणत, ती त्या दोघांकडे एका टेबल फॅनप्रमाणे पाहणाऱ्या काकांकडे वळली आणि म्हणाली, "माझा फ्रेंड आहे. मी बघते."


"बॉयफ्रेंड!" चित्रगुप्तने पुष्टी जोडली.

तशी तिही \" याचं काही होऊ शकत नाही. \" याविर्भावात हसली.

काकाही \" उगीचच वेळ फुकट गेला.\" अशी मान हलवून निघून गेले.


"हम्म, बोला कसं येणं केलं?"सांज चित्रगुप्तला म्हणाली.

" आपण बसून बोलूया का?" त्याने असं विचारताच तिने हातातल्या घड्याळाकडे पाहिलं.


"सो सॉरी, माझा रीपोर्टींग टाईम झाला आहे. आपल बोलणं शक्य होणार नाही." तिने मनापासून सांगितले.


"डोन्ट वरी. जॉब पहिला. मी तुझी वाट पाहीन." तो असं म्हणताच ती बावरली.

"नको. आमच्या वेळेचे काही नक्की नसतं. आपण नंतर भेटू. बाय मी निघते." त्याला पुढे काही बोलू न देता ती घाईने गाडीच्या दिशेने निघाली आणि गाडीत बसून गेटच्या आत गाडी घेऊन गेली ही. तो तिथेच तिला पाहत उभा राहिला.



________________________________________________________________________


ठिकाण : सीबीआय हेड क्वार्टर


सांज बंद होणाऱ्या लिफ्टच्या दिशेने धावली.

लिफ्टच हळूहळू बंद होणार दार तिच्या नजरेला खिळवून ठेवत, स्वतःकडे धावत यायला भाग पाडत होतं. तिने जोरात आरोळी दिली.

"वेट."

अगदी शेवटच्या क्षणाला बंद होणार दार हळूहळू तिच्या समोर उघडू लागलं. तोपर्यंत ती दाराच्या बाहेर उभी राहिली होती.


लिफ्टच्या आतल्या व्यक्तीने तिच्याकडे बघून डोळे फिरवले. तिलाही कुठे फरक पडत होता म्हणा. तिही बेफिकरीने लिफ्टमध्ये शिरली; पण नंतर तिच्या लक्षात आले. बाजूला उभी असणारी व्यक्ती, आता पूर्वीचा खुरापत काढणारा सिनियर राहिला नसून, आता तिच्या डिपार्टमेंटचा हेड आहे.


"गूड मॉर्निंग." तिने ग्रिट केले; पण \" सर \" हा शब्द काही तोंडातून बाहेर येईच ना.

त्याने नुसतं मान हलवली.


\" सरडा कुठला? किती भाव? मी शिस्तीत विश केलं ना? नुसतं मॉर्निग म्हणायला काय कष्ट पडतात याला? एक शब्द तोंडातून बाहेर पडत नाही आता आणि आम्हाला पूर्वी ओरडायला, आम्हाला टोमणे मारायला शब्द भांडार होतं या खुरापातीकडे.\" सांज विचारत गुंतली होती. तेवढ्यात लिफ्टची बेल वाजली. डोअर ओपन झालं.

सांज बेलच्या आवाजाने विचारातून बाहेर आली आणि पांडवांच्या कॅबिनच्या दिशेने जायला निघाली, तेवढ्यात तिच्या कानावर पडले,

"मॉर्निंग"

तिने आश्चर्याने मागे वळून तिरुपतीकडे पाहिले.

तो तिला ओलांडून पुढे जाताना हलकेच गालात हसला.


__________________________________________________________________________


ठिकाण : सीबीआय हेड क्वार्टर


पांडव आणि इतर पांडवांच्या कॅबीन मध्ये अँक्शन प्लॅन तयार करतं होते.


"स्वामी आणि माधव विक्टीम मुलींच्या वर्क प्लेसेस ना भेट देऊन, तिथल रीपोर्टींग मला द्या." तिरुपतीने असं सांगताच ते दोघे निघून गेले.


"मी अजून एकदा सगळे फॉरेन्सिक रिपोर्ट चेक करून घेते." ज्युलियाने असं सांगताच तिला तिरुपतीने मुक संमती दिली.


तिरुपती, स्वामी आणि अग्नेय मिस्टर के. जॉय यांच्या घरी चौकशीसाठी आणि त्यांना डी एन ए रिपोर्ट्सची माहिती देण्यासाठी निघून गेले.

सांज, नंदू आणि माधवनी कलेक्ट केलेलं सीसीटीव्ही फुटेज रीचेक करायला घेतले.


___________________________________________________________________________


ठिकाण : सीबीआय हेड क्वार्टर


रात्र झाली होती. सांज, नंदू आणि माधव घरी जायला निघाले.


"अजूनही काही क्लू सापडतात का? ते बघावे लागतील." नंदू.

"येस. सीसीटीव्ही फूटेज मध्ये काही सापडत नाही आहे. नेमकी ती कचराकुंडी त्या कॅमेऱ्यात कव्हर नाही होतं." माधव हताश होऊन म्हणाला.

"तो हुशार आहे, म्हणून तर केस चॅलेंजिंग आहे आपल्यासाठी. सोडवायला आपला कस लागेल." सांज त्याला प्रोत्साहन देत म्हणाली.

गप्पा मारता मारता ते कधी आपापल्या गाडीकडे पोहचले कळलंच नाही.


गाड्या पार्किंगच्या बाहेर निघाल्या.


सांजने नेहमी प्रमाणे गेट जवळ येऊन ते उघडण्यासाठी हॉर्न वाजवला. गेट हळूहळू उघडत होतं. सांजने गाडी हॉर्न वाजल्यावर बंद केलेली गाडी स्टार्ट केली आणि उघडणाऱ्या गेटवर नजर रोखली.


उघडणाऱ्या गेट मधून पाठमोरी आकृती दिसू लागली. जसा गाडीचा आवाज आला ती व्यक्ती वळली आणि सांजच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले.


"चित्रगुप्त शास्त्री?"


___________________________________________________________________________



क्रमशः


©® स्वर्णा.


आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.


वाचत रहा. आनंदी रहा. सुरक्षित रहा.

🎭 Series Post

View all