भाग २४
(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)
आतापर्यंत आपण वाचले -
सगळ्या टीमला म्हातरबाचा शोध लागला. ज्युलिया आणि स्वामी फॉरेन्सिक डीपार्टमेंटला गेले होते. त्यांच्या हाती काय मिळालं ते अजून कळलं नाही आहे. माधव आणि रावण यांनी आधी लेडी सीरियल किलर केस मधल्या सगळ्या विक्टीम मुलींच्या घरी जाऊन चौकशी करायचे ठरवले. त्याप्रमाणे ते दोघेहि निघून गेले होते. त्यांचे ही रिपोर्ट्स अजून मिळायचे आहेत. सांज आणि या तिघांनी(नंदू, तिरुपती आणि अग्नेय) हि क्राईम स्पॉटना विझीट दिली. त्यांची तिकडे एक फाईट झाली. लोकल गुंडांबरोबर. सांजला चित्रगुप्तने म्हणजेच शास्त्रीजीनी प्रपोज केलं. मुख्य म्हणजे तिच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाला. चित्रगुप्तने त्यांना त्याच्या मित्राची, त्याच्याबरोबर घडलेल्या घटनेची आणि डी प्लस पॉइंटची माहिती दिली. सांज आणि टीमने डी प्लस पॉइंटला विझिट दिली. तिथे त्यांना जास्त इन्फो मिळाली नाही; पण तिथलं वातावरण संशयित नक्कीच होतं. पांडव, तिरुपती, स्वामी आणि अग्नेय एकत्र येऊन केस डिस्कस करत होते.
आता पुढे -
ठिकाण: सीबीआय हेड क्वार्टर
तिरुपती अग्नेयला सांगत होता.
"सांज, दिसण्यावर जाऊ नको. या मॅडम, या सगळ्यांच्या लीडर आहेत. ज्युडो मास्टर आणि अत्यंत शार्प कॉप. कमी वयात तिने खूप मोठी प्रगती केली आहे." सांज आणि अग्नेय एकमेकांना बघून काही बोलणारच होते; की तेवढ्यात माधव म्हणाला, "तुम्ही दोघे आधी पासूनच एकमेकांना ओळखता ना. मग इंट्रो कशाला हवा."
दोघेही त्याला बघून कसनुसे हसले.
"मी समजलो नाही, कसं शक्य आहे हे? सांजच्या कॉलेज मध्ये तर एम्बर नव्हता." तिरुपती सहज बोलून गेला.
सांज आणि नंदू सोडून बाकीच्या सर्वांनी त्याच्याकडे आश्चर्याने बघितले.
"वेट. आय हॅव सम क्युरिझ? तुम्हाला सांजच्या कॉलेज मध्ये कोण होतं कोण नव्हतं कसं माहीत?" माधवने संशयित नजरेने भुवयांच धनुष्य ताणल आणि तिरुपती कडे बघत म्हणाला.
"......." बाकीच्यांनी उत्तरासाठी या तिघांकडे ही पाहिले.
"तिरुपती सर हे मला आणि सांजला कॉलेजमध्ये सिनियर होते." नंदू.
"हो. मी त्यांना सिनियर होतो." तिरुपतीने दुजोरा दिला.
"हु इज एम्बर?" ज्युलियाने ही प्रश्नमंजुषेमध्ये सहभाग घेतला.
अग्नेयने हाताने स्वतःकडे खूण केली.
"तो आणि मी माझ्या ट्रेनिगच्या वेळी एकत्र होतो. आम्ही बॅचमेट आहोत. \" एम्बर \" हे त्याचं निक नेम आहे आणि कोड नेम सुद्धा." तिरुपतीने पुष्टी जोडली.
"ओह. आय सी." माधव असं म्हणताच ज्युलिया, रावण आणि स्वामीने मानेने \"समजले.\" असा इशारा केला.
"आता प्रश्नमंजुषा संपली असेल तर, आपण कामाचं बोलूया का?" सांजने अजून काही प्रश्न यायच्या आधी ते दडपण्यासाठी बोलली.
तिरुपतीला विचारायचं होतं; सांज आणि अग्नेयच्या भेटी बाबत. नेहमीप्रमाणे त्याने यावेळीही ते प्रश्न मनात दडपले.
"ज्युलिया?" सांजने ज्युलियाकडे पाहिले.
."येस." ज्युलिया तिचा फॉरेन्सिक रिपोर्ट समजावून सांगू लागली.
"येस, ते बॉडी पार्टस डेल्टा पब ऑनर मिस्टर जॉयचे आहेत. त्याच्या मुलांच्या डीएनए बरोबर त्याच्या बॉडीचे डीएनए सॅम्पल मॅच झालेले आहेत."
अस बोलता बोलता तिने के. जॉयचा चार्ट अपडेट करायला सुरुवात केली.
विक्टीम नंबर १: मिस्टर के. जॉय.
प्रोफेशन :डेल्टा पबचे ऑनर.
डीएनए रिपोर्ट्स: मॅच.
मार्क ऑन वन बॉडी पार्ट: किलिंग इज हिलिंग.
फॉरेन्सिक अनाल्याईसिस: बॉडी मध्ये ड्रग्सची हेवी क्वांतिटी मिळाली. तेच मृत्यूच कारण आहे. त्यानंतर बुचर ? नाईफ वापरून बॉडीचे पार्ट करण्यात आले.
प्रोफेशन :डेल्टा पबचे ऑनर.
डीएनए रिपोर्ट्स: मॅच.
मार्क ऑन वन बॉडी पार्ट: किलिंग इज हिलिंग.
फॉरेन्सिक अनाल्याईसिस: बॉडी मध्ये ड्रग्सची हेवी क्वांतिटी मिळाली. तेच मृत्यूच कारण आहे. त्यानंतर बुचर ? नाईफ वापरून बॉडीचे पार्ट करण्यात आले.
सगळ्यांनी लक्ष ज्युलिया पुढे काय सांगत आहे त्यावर केंद्रित केले.
________________________________________________________________________
ठिकाण: मदर मेरी हॉस्पिटल अँड रेहाबिलेशन सेंटर.
रात्रीचे दोन वाजत आले होते. आकाशातल्या प्रेमाच्या प्रतिकाला बघून आपल्या मनातल्या प्रियेच्या आठवणींना उजाळा देत, त्या तो चंद्रमाला न्याहाळत होता.
\"मीरा माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम. ती का आवडली? ते मी नाही सांगू शकत. कधी पासून आवडायला लागली हे ही माहित नाही. माझ्यासाठी ती म्हणजे सुखद धक्क्यांनी भरलेल्या आठवणींचा प्रवास. आमचं प्रेम हे शब्द आणि स्पर्श या दोघांच्याही पलीकडे पोहचलं होतं.
मी नुकताच ड्युटीवर जॉईन झालो होतो. तिला वेळ देणं कमी झालं असलं तरी बंद केलं नव्हतं. तिही समजूतदार कधी कसली तक्रार केली नाही तिने.
"आपण लग्न करूया का?" माझ्या प्रश्नावर ती हसली.
"तू परवानगी मागावी, असं मोठं माझ्या घरी कोणी नाही." ती अनाथ होती. तिचे भरलेले डोळे माझ्या मनाला हादरवून गेले.
"राम सोडला तर माझी ही तुझ्यासारखीच परिस्थिती आहे." मी उतरलो. राम ही कामाच्या वेळी स्वतःकडे असच दुर्लक्ष करायचा. \" राम अय्यर \" माय बेस्ट फ्रेंड. माझं कुटुंब होता तो माझ्यासाठी. आम्ही ड्युटी एकत्र जॉईन केली. माझं आणि मीराच गुपित त्या एका घटनेमुळे मी सगळ्या जगापासून लपवलं होतं.
मी जेव्हा मिराशी लग्न करायचा निर्णय घेतला तेव्हा त्यालाच तर सगळ्यात आधी सांगायचं ठरवलं होतं. सांगणारं त्याच्या आदल्या रात्री तो प्रसंग घडला आणि मला तो निर्णय घ्यावा लागला. \" तिच्यापासून दूर जाण्याचा.\"
तो दिवस मला अजून जसाच्या तसा लक्षात आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ती आणि तिच्या मृत शरीर जवळ आक्रोश करणारा तो! आमचा एक ज्युनिअर. त्याच्या गरोदर बायकोला त्याच्या समोर गोळी घालून तिची हत्या करण्यात आली होती. अंगावर काटा उभा राहिला होता आमच्या.
त्या दिवसानंतर मी मीराला टाळू लागलो होतो. रामच्या आणि सीता वहिनीच्या लग्नात, राम मला म्हणाला होता; \"बघ कोणी आवडते का? तुझ पण आताच उरकून घेऊ नाही तर असाच राहशील.\" तेव्हा मी फक्त हसलो होतो. काय सांगणार होतो त्याला? त्यानंतर त्याचं आणि वहिनीच जाण इतकं मनावर परिणाम करून गेलं; की मी मीराला कधीही न भेटण्याचा घेतलेला निर्णय, अजूनच ठाम झाला. तिचं आयुष्य मला माझ्यामुळे संकटात घालायचं नव्हतं. तिच्या पत्रांना उत्तरे दिली नाही; की ती साधी वाचली ही नाहीत. तिचे फोनही उचलले नाहीत.\"
त्याचा तेव्हा मलाही खुप त्रास झाला आणि आताही अशी शिक्षा मिळते.
तिचा रुसवा मी दूर केला असता, तिचा राग मी सहन केला असता; पण हा अनोळखी वावर माझा जीव कासावीस करून घेईल एकदाचा.\"
__________________________________________________________________________
-©® स्वर्णा.
__________________________________
आपलं नेहमीच आहेच ओ.......
वाचत रहा. आनंदी रहा. सुरक्षित रहा