पांडव भाग २३

The Truth Always Comes Out


भाग २३
पांडव - fantastic five⭐

(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -
गाडी डी प्लस पॉइंटच्या बाहेर थांबली. गाडीतून उतरण्यासाठी डोअर ओपन करत होते तेवढ्यात नंदू म्हणाला, "आपल्याला गन रेडी ठेवाव्या लागतील. माहित नाही, आत कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल."

"त्यापेक्षा मी काय म्हणते? मी एकटी जाते. त्यांना डाऊट येणार नाही." सांज दरवाजा उघडायला लागली तर तो उघडेना. तिने रागाने नंदूकडे बघितलं.

"रीस्की आहे हे."

"आय अग्री विथ नंदू. आपण पूर्ण प्लॅनने जाऊ. दोघांनी आत जायचं आणि दोघांनी बॅक अप साठी तयार राहायचं." तिरुपतीचं म्हणणं सगळ्यांना पटलं. आता मोठा प्रश्न \"आत कोण जाणार?\"

"तू आणि किडो जर आत गेलास; तर तुमचे कपडे सेम आहेत, सो डाऊट येऊ शकतो त्यांना. त्यापेक्षा मी आणि ती थोड्या अंतराने वेगवेगळे जातो. आणि तुम्ही दोघे बॅकअपसाठी तयार रहा."अग्नेयचा प्लॅन त्यांना पटला.


आता पुढे -


"मला एका तासासाठी इंटरनेट हवं आहे. किती चार्ज होईल?" सांज आजूबाजूला अगदी सहज नजर फिरवत काउंटर जवळच्या मुलाला विचारत होती.

"आय डी प्लीज." तो आय डी मागेल याचा विचार करायला तिला वेळच मिळाला नव्हता. ती जरा विचार करत होतीच की तिच्या खांद्यावर हात टाकून अग्नेय तिथे उभा राहिला.

"शी इज विथ मी. हा माझा आयडी." असं म्हणून त्याने दोन हजारची नोट त्याच्या पुढ्यात धरली.

तिने डोळे मोठे करून त्याच्याकडे बघितले.

"इट्स नथींग डार्लिंग. आपल्याकडे भरपूर पैसे आहेत." असं म्हणून त्याला त्याच्या वॉलेट मधल्या दोन हजाराच्या नोटा आणि क्रेडिट कार्डस तिला मुद्दाम अशी दाखवली की ती त्या मुलालाही दिसतील.

त्या मुलाने त्यांना कॉम्प्युटर दाखवताच ती त्याचा खांद्यावरचा हात झटकून तिकडे निघून गेली.

"शी इज सो हॉट यू नो." अग्नेय अजूनही त्या काउंटर वरच्या मुलाशी बोलत होता.

त्याच्या बोलण्याचा रोख ऐकून तो मुलगा ही हसला.

"तिची नशाच वेगळी आहे. कधी मला चढेल काय माहित? आय एम वेटींग." त्याने सहज हात त्या मुलाच्या खांद्यावर टाकला.

"याहून ही किती तरी वेगळ्या गोष्टी असतात आयुष्यात ज्यातून स्वर्गात जातो माणूस." तो मुलगा बोलला तसा अग्नेय आतून जागरूक झाला.

"टेल मी." अग्नेय.

"सम अदर टाईम. तुम्ही आता कॅफेचा आनंद घ्या. तो बघा तुमच्या जीएफच्या बाजूचा कॉम्प्युटर रिकामी झाला आहे. तुम्हाला काही पाठवू का? कॉफी? सँडविच?" तो मुलगा अगदी सहज बोलत होता.

"टू कॉफिज."

\" इथे जास्त थांबलो तर याला संशय येऊ शकतो.\" असा विचार करून ऑर्डर देऊन अग्नेय सरळ सांजच्या दिशेने निघाला.


"इथल्या वातावरणात एक वेगळा संशयित गंध आहे." अग्नेय तिला सांगत होता, तेवढ्यात तिच्या नाकातून थोडस रक्त आलं.

"काय झालं?" त्याने काळजीने विचारलं.

"या एसी डंक मधून येणाऱ्या हवेत माईल्ड बर्न ड्रग्स स्मेल आहे. त्याचाच मला त्रास झाला वाटतं. इथे काहीच संशयास्पद दिसत नाही आहे, हा वास येतोय म्हणजे कुठे तरी काही नक्कीच घडतंय. तिथे काही कळलं का?" तिने तिथलाच टिश्यू पेपर नाक पुसायला उचलला.

"ओह डार्लिंग, माझा हँकी असताना तू टिश्यू का वापरते? टेक धीस." त्याने अगदी जवळ येवून तिचे पूर्ण नाक आणि तोंड झाकले जाईल असा रुमाल तिच्या चेहऱ्यासमोर धरला. "तो कॉफी घेऊन येतोय." असं तिच्या अगदी कानाजवळ येऊन कुजबुजला.

ती हि अलर्ट झाली.

"ओह डियर, देर इज नो फन हियर. तुझा फ्रेंड बोलला; की ही खूप हॅपनिंग प्लेस आहे." ती जरा लाडात काय आली. याला बोलायला सुचेनास झालं.

तो मुलगा कॉफी ठेवून निघूनही गेला. अजूनही अग्नेय मात्र सांजकडे बघतच होता.

"आपण निघू या का?" तिला अजून त्रास जाणवू लागला.

"हां?" तो तिच्या डोळ्यांच्या रंगातून बाहेर आला. \"मी पण ना. तिला काय वाटेल.\"

"निघू या." तिचं त्याच्याकडे लक्ष नव्हते. ती उठू लागली. त्या दोघांनीही कॉफीला स्पर्श केला नव्हता. तसेच दोघेही बाहेर जाऊ लागले.

काउंटर जवळच्या त्या मुलाने अग्नेयला एक कार्ड दिले आणि तो सूचक हसला.


____________________________________________________

"काही कळलं का?" तिरुपतीने गाडीत बसणाऱ्या सांज आणि अग्नेयला विचारले.

"काही प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि काही नवे प्रश्न निर्माण करून गेली."अग्नेय कोड्यात बोलावं तसं बोलला.

"बडी, गाडी जरा हवेशीर ठिकाणी घेतोस का?" सांजला त्या वासाचा त्रास अजून ही जाणवत होता.

"काय ग? काय झालं?"त्याच्या प्रश्नाला उत्तर न देता ती डोळे मिटून पडून राहिली.

"गाडी डायरेक्ट ऑफिसकडे घे. तिला रेस्टची गरज आहे." तिरुपतीला स्वतःला ही विश्वास बसेना की तो आज पहिल्यांदा सांजच्या बद्दलची काळजी व्यक्त करू शकला.

ते ऑफिसकडे जायला निघाले.

________________________________________________________


रेस्टरूममध्ये थोडा वेळ रेस्ट घेऊन सांज पुन्हा त्यांच्या कॉमन कॅबिनकडे जायला निघाली.


"हे कीडो, हाऊ आर यू फिलिंग नाऊ?" पाठी मागून येणाऱ्या अग्नेयने तिला हटकले.

"नॉट अगैन." ती तोंडात पुटपुटली.

तो पर्यंत तो तिच्या पुढ्यात येऊन उभा राहिला होता. ती अस्वस्थपणे कपाळावर अंगठा दाबून तर्जनीने कपाळ रब करू लागली.

"वी नीड टू टॉक." तिने असं म्हणताच तो लगेच उतरला, "ओके."

ते दोघेही कॅफेटेरियाकडे निघाले.

________________________________________________________


तो शांत बसून तिच्या बोलण्याची वाट बघत होता. बराच वेळ सगळा विचार करून तिने बोलायला सुरुवात केली.

"थँक्यू." एक मोठा फुल्ल स्टॉप.

"कशाबद्दल?" तो अनभिज्ञ.

"त्या रात्री तू माझी खुप मदत केलीस. खरचं खुप थँक्यू त्यासाठी." ती मनापासून कृतज्ञ.

"अल्वेज हॅप्पी टू हेल्प यू की…." तो आरामात सवयीप्रमाणे तिला किडो म्हणायला जात होता.

"वेट डोन्ट से दॅट. आपण एकत्र काम करतो. हे एवढसं कारण पुरे आहे; की मला माझं बर्थ सर्टिफिकेट दाखवावे लागेल. मी लहान नाही आहे हे सिद्ध करायला." ती थोडी रागात, थोडी कंटाळून म्हणाली.

"ओके. तू ही मला म्हातरबा म्हणायचं सोड." त्याने खांदे उडवले.

“जसं काही मीच सुरुवात केली होती." तिनेही डोळे फिरवले.

_____________________________________________________


कॅबीनमध्ये नंदू सोडून सगळे विचारत गढले होते. सांज आणि अग्नेय एकत्र आत आले. तिरुपतीने त्यांना डी प्लस पॉइंट मध्ये जे काही घडल ते सांगायला सांगितलं.

ते दोघही बारीक अन बारीक डिटेल सांगत होते. माधव बोर्डवर त्यातले महत्त्वाचे मुद्दे उतरवत होता. तेवढ्यात तिथे नंदू आला. त्याने एका लिफाफ्यातून इंस्टंट फोटो काढले आणि तो बोर्डकडे गेला. त्याने स्पाय कॅमेऱ्यातून काढलेले इंस्टंट फोटो बोर्डवर चिकटवायला सुरुवात केली.
त्यातले काही फोटो कचराकुंडीच्या जवळचे होते. काही फोटो आजूबाजूच्या मार्केट एरियाचे होते. एक फोटो चित्रगुप्त शास्त्रीचा होता.

“ हा एक साक्षीदार पण ठरू शकतो, खबरी पण ठरू शकतो. चित्रगुप्त शास्त्री याचं नाव.“ नंदूने त्याची माहिती द्यायला सुरुवात केली.

"तिथल्या जवळच्या कॉलेजमध्ये शिकतो. त्याच्याकडे डी प्लस पॉइंटची खूप माहिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तो त्या एरियात राहतो. त्यामुळे तिथल्या घडामोडींची त्याचाकडून जास्त माहिती मिळेल." तो बोलत असताना सांजने तिच्या मोबाईलमध्ये सेव्ह केलेला त्याचा नंबर माधवकडे दिला.

"याच्यावर नजर ठेव." नंदुने त्याला सांगितले.


"येस." माधवने लगेच तो नंबर घेतला.

"डी प्लस पॉइंट मधल्या त्या मुलाने मला हे कार्ड दिलं आहे यावर फक्त एक नंबर आहे. बाकी काही नाही. " अग्नेयने ते कार्ड सर्वांसमोर धरले.

"माधव कडे दे ते. तो यात मास्टर आहे." तिरुपतीने असं बोलताच माधव थोडा आश्चर्यचकित झाला. त्याचं बरोबर त्याने अभिमानाने आपली मान ताठ केली. अग्नेयने ते कार्ड त्याच्याकडे दिले.


"सकाळी आपण सगळे घाईत होतो. त्यामुळे नीट ओळख करून देता आली नाही सगळ्यांची. मी तुझी आणि यांची व्यवस्थित ओळख करून देतो." असं म्हणून तिरुपतीने सगळ्यांबद्दल सांगायला सुरुवात केली.

"मिट एम. स्वामी. हा त्याच्या बॅचचा टॉपर होता. एक उत्कृष्ट बहरुपी, जास्तीत जास्त भाषा सहज बोलता येणारा. त्याला यात महिरत मिळाली आहे." स्वामीने त्याच्याशी हस्तांदोलन केलं.

"नाइस टू मीट यू." स्वामी.

"सेम हीयर." अग्नेय.

"शांताराम, व्रेस्टलिंग आणि बॉक्सिंग चॅम्पियन आणि बॉम्ब स्कॉड स्पेशालिस्ट. असा कोणताही बॉम्ब नाही जो तो डिफ्युझ करू शकत नाही. बेस्ट इन हिझ वर्क." आता आश्चर्य वाटायची वेळ रावणची होती. रावणने त्याच्याशी हस्तांदोलन केलं.

"......." रावण काही न बोलता नुसता हसला.

"....." अग्नेयने ही हसून प्रत्युत्तर दिलं.

"हा माधव, याची तर ओळख मगाशीच दिली करून. ही इज वन ऑफ द वर्ल्ड बेस्ट हॅकर." माधवने त्याला दोन बोटांनी शॉर्ट सेलुट केला.

अग्नेयने मानेनेच त्याला प्रतिसाद दिला.

"ज्युलिया, एक सुंदरता आणि शातिर डोके जे एकत्र असणं दुर्मिळ आहे अशी ही, परफेक्ट कॉम्बिनेशन ऑफ ब्युटी विथ ब्रेन. आमच्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटची बेस्ट एक्स्पर्ट." ज्युलिया हात वेव्ह करून त्याला "हाय" म्हणाली.

"हाय." अग्नेय.

"नंदकुमार, स्पाय नेटवर्क सांभाळतो. आमचे सगळे खबरी याच्या अंडर काम करतात." नंदूने मानेनेच अभिवादन केले.

अग्नेयने त्याच्यासारखाच अभिवादन केलं.

"सांज, दिसण्यावर जाऊ नको. या मॅडम, या सगळ्यांच्या लीडर आहेत. ज्युडो मास्टर आणि अत्यंत शार्प कॉप. कमी वयात तिने खूप मोठी प्रगती केली आहे." सांज आणि अग्नेय एकमेकांना बघून काही बोलणारच होते; की तेवढ्यात माधव म्हणाला, "तुम्ही दोघे आधी पासूनच एकमेकांना ओळखता ना. मग इन्ट्रो कशाला हवा."

दोघेही त्याला बघून कसनुसे हसले.

-©® स्वर्णा


_________________________________________________________________








आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंट्सच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.


वाचत रहा. आनंदी रहा. सुरक्षित रहा

🎭 Series Post

View all