पांडव भाग २१

The Truth Always Comes Out


भाग २१


पांडव - fantastic five⭐

(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -

( हुश्श ! झाला बाई एकदाचा तह . कोणामध्ये काय विचारता, अहो! पांडव आणि खुरापती टीम मध्ये. मी घाबरलेच होते म्हटलं हे सातजण भांडत राहिले तर माझ्या कथेचं काय होईल, तुम्ही कंटाळून जाल. तसे समजूतदार आहेत सगळे. यात मुख्य सूत्रधार कोण होती ते तर तुम्हाला कळलंच असेल. आफ्टर ऑल तुम्ही स्मार्ट रीडर्स आहात. तह झाला म्हणजे नोकझोक होणार नाही, असं समजू नका हां.)

मागच्या भागात \"किलिंग इज हीलिंग\" केसवर काम सुरु झाले होते. ज्युलियाच्या घरी डिनरचा आस्वाद घेऊन नेक्स्ट डे प्लान तिथेच बनला. मागच्या भागाचं सरप्राईज आणि आकर्षक पात्र ठरला तो म्हणजे - ‘अग्नेय‘

हा आहे तरी कोण? एक गूढ पात्र.



आता पुढे -


“म्हातारबा ??????” सगळे एका सुरात म्हणाले.

तिरुपती आणि स्वामी ही आश्चर्याने बघत होते. त्या दोघांना तर हे प्रकरण माहित नव्हते.

“ओह, आय सी तो वो तुम थे |” माधव ‘वो कौन थी?‘ च्या टोनमध्ये बोलला आणि जरा पुढे येऊन अग्नेयला न्याहाळू लागला.

“......” अग्नेय त्याच्या वागण्याने जरा गोंधळला.

“हे ! हे ! असा माझ्याकडे बघू नकोस. मी सरळ मार्गी माणूस आहे. हां, आता तुझं निरीक्षण करतोय; पण त्यामागे एक कारण आहे. हो की नाही सांज?” त्याने मिश्कीलपणे सांजकडे पहिले. सांजने याचं काही होणार नाही अशा अर्थाने डोळे फिरवले.

“वायफळ चर्चा नको. खूप काम पडलीत, चला वाटेला लागा.” तिरुपतीने सगळ्यांना मार्गस्थ व्हायला भाग पाडलं.


“सांज, तुला चष्मा कधी लागला.” ज्युलीयाने सांजला कोपर मारलं. सांज न कळून तिच्याकडे बघताच ज्युलिया म्हणाली, “हि इज ……. आय कान्ट एक्स्प्लेन इन वर्डस. तू त्याला म्हातारबा म्हणूच कशी शकतेस?” सांजने तिच्याकडे दुर्लक्ष केलं.

“इग्नोर देम. त्या मंकीना टिवल्याबावल्या करायला टॉपिक हवा असतो फक्त.” बराच वेळ सगळा प्रकार शांतपणे बघत असणाऱ्या अग्नेयला बघून तिरुपती म्हणाला; पण त्याला कुठे माहित होतं अग्नेय पांडवांचं नाही तर सांजचं निरीक्षण करत होता.

“नो इश्यू. बरं मला सांग. मी काय काम करणं अपेक्षित आहे.“

“तू चल आमच्याबरोबर तुला वाटेत सगळं समजावतो.”

ज्युलिया आणि स्वामी फॉरेन्सिक डीपार्टमेंटला निघून गेले. माधव आणि रावण यांनी आधी लेडी सीरियल किलर केसमधल्या सगळ्या विक्टीम मुलींच्या घरी जाऊन चौकशी करायचे ठरवले. त्याप्रमाणे ते दोघेही निघून गेले. सांज आणि हे तिघेही क्राईम स्पॉटना विझीट द्यायला निघाले.


_________________________________________


पार्किंगमध्ये पोहोचताच नंदूने आपल्या गाडीकडे जायला सुरुवात केली. कालची आठवण ताजी असल्याने तिरुपती काहीच न बोलता त्याच्या मागून जाऊ लागला. सांज आणि अग्नेय मात्र वेगवेगळ्या विचारात या दोघांच्या पाठीमागे चालत होते.

सांज ‘ओह, तेव्हाच त्यादिवशी एवढी चांगली फाईट केली याने. मी कसं काय विसरू शकते. आपल्याला त्याला त्या दिवसासाठी थ्यांक्यू म्हणणं गरजेचं आहे. ‘

अग्नेय ‘व्हॉट? ही कॉप आहे. एवढीशी तर आहे. नाही म्हणायला, त्यादिवशी तिने जबरदस्त त्या गुंडांना तुडदवलं होतं. आय एम इंप्रेस.’

सगळे आपआपल्या विचारातच गाडीत बसले.

नंदूने प्रश्नार्थकरित्या सांजकडे बघताच ती म्हणाली, ”आधी आपण पहिल्या स्पॉटवर जाऊ, जिथे मिस्टर जॉयचे बॉडी पार्टस मिळाले होते.”

मागे बसलेल्या तिरुपतीने अग्नेयला केस समजावून सांगायला सुरुवात केली.


____________________________


गाडी मिस्टर जॉयची बॉडी मिळालेल्या कचराकुंडीत जवळ आली.

तो एक गजबजलेला मार्केटचा एरिया होता. बरीच माणसं त्यांचं दैनंदिन काम करत होती.

विक्रेते आपलं सामान विकण्यात व्यस्त, खरेदी करणारे ते विकत घेत होते. रंगांनी रंगलेली, नटलेली ती बाजारपेठ चहुकडून गजबजलेली होती. वर्दळ इतकी होती; की कोणाचा कोणाला पत्ता नव्हता. कोणी विचार करू शकणार नाही, या स्पॉटवर एखाद्याने बॉडी पार्ट डंप केले होते.


एक तिथला लोकल गुंड वसुली करत फिरत होता. बरोबर त्याचं एक दोन तीन जणांचं टोळकं होतं. मार्केटमध्ये एका भाजी विक्री करणाऱ्याला तो वसुली द्यायला धमकावू लागला.

"ए लई शाना झाला का बे?"त्याचा एक चेला.

"दादा म्हणतायत नां द्यायचं म्हणजे गपगुमान द्यायचं." दुसरा पंटर.

"नाही ओ, एवढा धंदा होतं. कुठून देऊ मी. त्यात तुम्ही जागेचं भाडं ही खूप घेता." भाजी विक्रेता काकुळतीला आला.

"ए हुशार, भाडं भाडं काय करतो रे SSS. ######." त्यांचा म्होरक्या आता पुढे आला आणि त्या विक्रेत्यावर हात उचलणार एवढ्यात……

"दादा, जाऊ द्या ना. देतील ते तुमचे पैसे. का उगाच भांडताय?" एक भाजी विकत घेता असलेला मुलगा त्याला म्हणाला.

"ओये, स्कॉलर, आपलं ढापण सांभाळायचं काय? उगाच मध्ये येशील तर मुंगी सारखा चिरडला जाशील." पहिला पंटर म्हणाला, तसे त्यांच्या लीडरने किडके दात विचकले.

"ही सरळ गुंडगिरी आहे." तोच चशमिश मुलगा पुन्हा आपला नाकावराचा चष्मा सरळ करत बोलला.

"हो, रे, आपल्याला तर माहीतच नव्हतं. तू थांब तुला वाकडी गुंडगिरी दाखवतो." दुसरा चेला.

"ये हिरो, गप्प निघायचं तुला माहित नाही आपल्यामागे कोण आहे." असं म्हणताच, तो गरीब मुलगा घाबरला. त्याचा गैरफायदा घेऊन त्याच्या अंगावर एका चेल्याने ठोसा मारायला हात उचलला.

त्याचा हात मागच्या मागे धरला गेला. त्याने मागे वळून पाहिलं तोपर्यंत सांजने तो करकचून पिरघळला होता.

" तुला तरी कुठे माहित तुझ्यामागे मी आहे ते." त्याचा हात सांध्यातून निघायचा तेवढा शिल्लक राहिला. तो वळून तिच्या तावडीतून सुटका करून घेतोय न घेतोय तोच तिची सनसनाटी चपराक त्याच्या गालावर धडकली. दुसरा चेला त्याला कव्हर करायला तिच्या अंगावर एकदम धावून आला.

"नको. अरे कोणी तरी तिला मदत करा." त्या भाजी घेणाऱ्या मुलाचा जीव घाबरागुबरा झाला. "प्लीज, हेल्प."

तो धावत जवळ उभ्या असलेल्या तिरुपती, अग्नेय आणि नंदूकडे गेला.

"दादा, मदत करा ओ तिची. ते गुंड खूप भयानक आहेत." त्याने कासावीस होऊन तिरुपतीला सांगितले.

अग्नेय काही बोलणार किंवा काही करायला जाणार एवढ्यात, नंदूने त्या मुलाला बोलावले. नंदू गाडीच्या बोनेटवर बसला होता.


"घाबरु नकोस. ये बस इथे. " त्याच्या खांद्यावर हात टाकून नंदू बिनधास्त बसला होता.


____________________________________________________


"काल तर केवढा पुळका आला होता. आता का नाही जात तिच्या मदतीला?" तिरुपतीने खदखदत विचारले. त्याला नंदुचा खूप राग येत होता आणि स्वतःचा पण. \"का तिच्या बाबतीत मी पुढाकार घ्यायला घाबरतो? का माझं मन इशारा करत असतानाही तन त्याची साथ देत नाही.\"


"तिला मदतीची गरज लागेल असं दिसत नाही. कोणीतरी त्या गुंडांना डॉक्टरकडे न्यायची सोय करा." अग्नेय तिची फाईट बघून इंप्रेस झाला होता.

"अरे यार, हे डार्लिंगसाठी वॉर्म अप एक्सरसाईज आहे. आपण मुलींना संरक्षण दिलं पाहिजे. अशी लोकांची धारणा मी चूक नाही म्हणत; पण मुलींनीही स्वतःचं रक्षण करणे गरजेचे आहे. आपण वेळप्रसंगी गरज बघून त्यांना मदत करायलाच हवी; पण याचा अर्थ त्यांना दुबळेपणा आणू नये. त्यांच्यात स्वसंरक्षण करू शकतो हा आत्मविश्वास आपण निर्माण होऊ दिला पाहिजे. हे लोक तिला काही करू शकत नाही. तेही मी इथे बसलो असताना. तिला जरा मज्जा घेऊ दे. यांना कुटायची." नंदू सांजकडे बघत अभिमानाने बोलत होता.

तेवढ्यात सांजचे दोन्ही हात त्या दोन्ही चेल्यांनी धरले. तेव्हा ती एका चेल्याच्या दिशेने सरकली. त्यामुळे त्याच्या पकडीमधलं अंतर कमी होऊन पकड सैल झाली. याचा फायदा घेऊन तिने त्याच्या शरीरावर जोर देत, एक हाय किक दुसऱ्याच्या नाकावर ठेवून दिली.

इकडे सांज अगदी सराईतपणे त्या दोघांना मारत होती. तिच्या ताकदीपुढे त्यांचा निभाव लागत नव्हता.

तेवढ्यात त्यांच्या म्होरक्याने मागून तिच्या डोक्यात मारायला रॉड उचलला.

-©® स्वर्णा


_________________________________________________________________








आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंट्सच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.


वाचत रहा. आनंदी रहा. सुरक्षित रहा


🎭 Series Post

View all