पांडव भाग १८

The Truth Always Comes Out



भाग १८

पांडव - fantastic five⭐

(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -

एक नवीन मृत्यू साखळी गुन्ह्याची म्हणजेच सीरियल किलिंगची केस पांडवकडे आली आहे. आतापर्यंत यात एक पब ओनर आणि एक तर स्वतःच सीरियल किलर असेल असा संशय असलेला, अश्या दोघांचा खून झाला.

"किलिंग इज हिलींग" ही टॅग लाईन किलर वापरत आहे.

तिरुपती आणि पांडव नोकझोक झाली. तिरुपतीने पांडवना वेगळं करायचा प्रयत्न केला तो ही असफल झाला.
\"रणछोड आणि मीरा\" काय ऋणानुबंध
त्यांना एकमेकांना जोडतोय? मीराला नक्की विस्मृती झाली आहे; की सगळं आठवतंय? असेच बरेच प्रश्न निर्माण करणारा मागचा भाग ठरला.


आता पुढे -

ते सगळे अजूनही पोलीस स्टेशनमध्येच होते. त्यांनी ती डेड बॉडी आणि त्याच्याबरोबर मिळालेले काही पुरावे ताब्यात घेतले आणि ऑफिसला जायला निघाले.

गाडीत स्मशान शांतता होती. कोणीच कोणाशी बोलत नव्हते. स्वामी अजून ही झालेल्या प्रकाराशी अनभिज्ञ होता. त्याला काहीच संदर्भ लागत नव्हता.

त्याने ड्राईव्ह करणाऱ्या ज्युलियाला विचारायचा प्रयत्न केला. तिला विचारणार तेवढ्यात तिने दिलेला लूक पाहून हा गप्पच बसला.

(आता तुम्ही म्हणाल, गाडी तर सांजची, ती चालवत होती. ज्युलिया कशी काय ड्राईव्ह करते. तर त्याच झालं असं)


__________________________________________________________

सांजने तिच्या गाडीच्या ड्रायव्हिंग साईडचा दरवाजा उघडायला हात नेला. तिचा तो हात नंदूने मागे खेचून त्यातून चावी काढून घेतली.

"ज्युलिया, तू सांजची गाडी चालव. ती माझ्या गाडीतून येणार आहे." त्याने तिच्या हातातली चावी ज्युलियाकडे फेकली. ज्युलियाने ती कॅच केली आणि सांजच्या गाडीच्या दिशेने निघाली.

"त्याने काय मोठा फरक पडणार आहे. सगळे ऑफिसला तर जातोय; की इतका ही धीर धरवत नाही." खुरापतीने तिरकस टिपणी केलीच.

"ऑफिसलाच जातोय म्हणूनच म्हटलं." त्याने खाऊ का गिळू नजरेने त्याच्याकडे बघितलं.

सांजला आपल्या गाडीत फ्रंट डोअर ओपन करून देऊन तो गाडीत बसला.

_________________________________________________________


"असं वागायची गरज होती का?" गाडीतली शांतता भंग करत सांजने नंदूला विचारलं.


तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून तो शांतपणे गाडी चालवत होता. शांत फक्त वरून वरून; आतून ज्वालामुखी खदखदत होता.

"बडी, मी तुझ्याशी बोलते. तुला असं वाटत नाही का; की तू उगीचच इतका चिडला होतास." तिचा \"उगीचच\" हा शब्द त्या ज्वालाला बाहेर काढणारी ठिणगी ठरला.


"उगीचच? हां. उगीचच.... मी तुझी काळजी करतो उगीचच.... चार पाच दिवस आधी तुला ट्रॉमा अटॅक आला ते उगीचच.... तुझ्यावर गुंडांनी जीवघेणा हल्ला केला ते उगीचच..... त्या दिवशी तू पूर्ण रात्रभर बेशुद्ध होतीस. हां...... ते ही उगीचच म्हणा....... सकाळपासून तुझा उजवा हात दुखत आहे आणि या दोघा महाभागांनी तुला गाडी चालवायला लावली.... तरीही मीच उगीचच....." तो भराभरा बोलून मोकळा होत होता. तिला मात्र त्याचे कौतुक वाटत होतं. नेहमी कसं याला न सांगता सगळं कळतं.
विषयाला बगल देण्यासाठी तिने विचारलं, "तुला कसं कळलं; की माझा हात दुखतो आहे."

त्याने अगदी क्षणभर तिच्या नजरेला नजर भिडवून पुन्हा गाडी चालवण्यावर लक्ष केंद्रित केले. तीही समजायचं ते समजून गेली.


_________________________________________________________


पांडव, तिरुपती आणि स्वामी पांडवांच्या ऑफिसमध्ये बसले होते. जे आता सर्वांचं कॉमन ऑफिस झालं होतं.

"आपण एक एक पॉइंट करून पुन्हा सगळा रिव्ह्यू करू." तिरुपतीने असं म्हणून सांजकडे बघितलं. ती केस एक्सपलेन करायला उठतच होती; की माधव आणि नंदूने तिला थांबवलं.

"सर, त्या आधी आम्हाला पण काही मुद्दे स्पष्ट करायचे आहेत. जर तुमची परवानगी असेल तर?" माधव खोचकपणे म्हणाला.


"गो अहेड." तिरुपतीचाही आता नाईलाज झाला होता. त्याची परवानगी मिळताच नंदू बोलू लागला.

"आम्हाला तुमचं सगळंच अमान्य आहे असे नाही. युनिफॉर्म आणि काही बाबी आम्हाला मान्य आहेत. फक्त टीम विभाजन आम्हाला मान्य नाही." एवढं बोलून त्याने एक दीर्घ श्वास सोडला.

"आम्ही तुमच्या सगळ्याच निर्णयाचा विरोध करत नाही आहोत, तर तुम्ही ही आमचं एवढंसं म्हणणं ऐकावत ही एकच अपेक्षा आहे. तसंही कोणीतरी म्हटलं आहे; की माणसाकडे पूर्वग्रह ठेवून न बघता त्याच्या निर्णयाला समजून घ्यावं. असं केलं की तो माणूस समजतो. माणसाचा निर्णय चुकला म्हणून माणूस चुकीचा ठरत नाही." हे सगळं त्याने सांजकडे पाहत न म्हणताही तिरुपतीला मात्र ती व्यक्ती सांज आहे हे कळायला वेळ लागला नाही.

"ओके. आय अग्री. इथून पुढे नो टीम डिव्हायडेशन. आपण एकत्र काम करू." तिरुपतीकडून अशा प्रतिक्रियेची अपेक्षा कोणालाही नव्हती.

सांजने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं, तेव्हा तो ही तिच्याकडेच पाहत असल्याचं तिला जाणवलं.


"असे माझ्याकडेच बघत राहणार आहात; की केसचा रिव्ह्यू स्टार्ट करायचा." हे बोलतानाही त्याची नजर सांजवरच होती.

_________________________________________________________


सांजने केस डिस्कस करायला सुरुवात केली.

ऑन व्हाईट बोर्ड:


विक्टीम नंबर १: मिस्टर के. जॉय.
प्रोफेशन :डेल्टा पबचे ऑनर.

"नुसते याच नाही तर अश्या अनेक पब आणि कॅसिनोचे ते मालक होते." तिने लिहीत असताना मध्येच थांबून माहिती दिली.

ती बसली आणि पुढची माहिती द्यायला ज्युलिया उठून बोर्ड कडे गेली.

"कालपर्यंत मिस्टर के. जॉय ही एक मिसिंग केस होती. आज आम्ही तिथल्या लोकल पोलिस स्टेशनमध्ये गेलो होतो. तेव्हा तिथे कळले; की त्याच आवारातील एका कचराकुंडीत काही संशयित बॅग्ज सापडल्या. त्यात ह्युमन बॉडी पार्टस होते आणि काही सामान मिळालं ज्यावरून ती बॉडी जॉय यांची असल्याचा संशय आहे. एका बॉडी पार्टवर हा मार्क होता." असं म्हणून तिने बोर्डवर ड्रॉ केलं,


"किलिंग इज हिल्लींग."

"म्हणून नंदू म्हणाला; की आपण एकाच केस वर काम करतोय. मी ते बॉडी पार्टस ऑटोपसीसाठी फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये पाठवले आहेत आणि त्या बरोबर मिळालेल्या वस्तू आणि त्यावरचे कलेक्ट केलेले फिंगर प्रिंट अँड ब्लड सँपल्स सुद्धा पाठवून दिले आहेत. त्याचे रिपोर्ट्स उद्या येतील. आता येताना मी आता मिळालेल्या केसमधली बॉडी आणि एविडेन्ससुद्धा लॅबला पाठवून आले. त्याचे रिपोर्ट्ससुद्धा उद्या मिळतील." ती बोलून जागेवर जाऊन बसली.

सांजने सूचकपणे माधवकडे बघितलं.

"मी आणि रावणने जॉयची कुंडली मांडली आहे. पब आणि कॅसिनोचे मालक हे निव्वळ जगाला दाखवायला घातलेला मुखवटा आहे. ही इज अ बिग ड्रग माफिया अँड वेपन सप्लायर. त्याच्या बॅक हिस्टरी मध्ये खूप काँट्रावरसी आहेत. त्याची संपत्ती ही अनेकांना लुटून आणि त्यांची आयुष्य बरबाद करुन मिळवलेली आहे." माधव डिटेल्स देत होता.


"ज्या कचरा कुंडीत त्या बॅग्ज मिळाल्या त्याच्या जवळच्या सीसीटीव्ही फुटेज पण मी गोळा करून आणलं आहे." रावणने पेन ड्राईव्ह सांजकडे दिला. "हल्लीच त्याच्या या गायब होण्यापूर्वी त्याने एक मोठी रेव्ह पार्टी थ्रो केली होती. सगळी पिढी नासवली आहे याने. मेला ते बरंच झालं नाही तर मी मारला असता." रावणने मुठी आवळल्या.

माधव येऊन जागेवर बसला. ज्युलिया पुन्हा बोर्डजवळ जाऊन पुढचे मुद्दे मांडू लागली.


२.अनोन डेड बॉडी

"सध्या तरी \"किलिंग इज हिलिंग\" हा एक मार्क सोडला तर जास्त काही सबळ पुरावे नाही मिळालेत. ही सुद्धा बॉडी ऑटोपसीसाठी फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये पाठवली आहे. रिपोर्ट्स उद्या येतील."

"जी मूळ केस होती. जिच्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो ती सीरियल किलर केस. तिच्या रीलेटेड मी काही डाटा गोळा करून आणला आहे. त्या पोलिस स्टेशनमधून जसं; की त्या मृत मुलींचे ऑटोपसी रिपोर्ट," स्वामीने सांगता सांगता हातातली फाईल ज्युलियाकडे दिली. "त्यांचे ॲड्रेस, मोबाईल कॉन्टॅक्ट अँड अदर इन्फॉर्मेशन." ती फाईल त्याने माधवच्या समोर धरली.

"ओके एव्हरीवन, आपल्याकडे खूप काही इन्फॉर्मेशन नाही जमा झाली; पण आहे ती कमी पण नाही आहे. तिचं वापर करून आपण पुढचा शोध सुरू ठेवूया." तिरुपतीने असं बोलताच सगळे कामाला लागले.


_________________________________________________________

"सांज, वेट." सगळे बाहेर पडत असताना त्यांच्याबरोबर जायला उठणारी सांज तिरुपतीच्या थांबवण्याने तिथेच थांबली.

"काय झालं त्याला?" त्याच्या प्रश्नाचा रोख न कळून ती त्याच्याकडे अजाणतेपणाने पाहू लागली.


त्याने सहज उठून तिच्याजवळ येत दुखऱ्या हाताकडे सूचकपणे पाहिले. हा मात्र तिच्यासाठी धक्का होता.


"मसल स्प्रेन." ती थोडक्यात उत्तर देऊन बाहेर जायला निघाली. दारापर्यंत पोहोचते न पोहोचते तोपर्यंत तिने मागे वळून पाहिले आणि म्हणाली, "आम्ही सगळे ज्युलियाकडे डिनरला जात आहोत. येणार का?"

आता मात्र आश्चर्यचकित होण्याची वेळ त्याची होती.

"तुम्हाला चालेल का आलेलं?" त्याने थोडे कचरत विचारले.

"आणि मी एकटा नाही आहे. माझ्याबरोबर स्वामी असतो जेवायला. तुम्हाला अन्कंफर्टेबल होईल."

सांज बाहेर आली नाही हे बघून नंदू पुन्हा आत आला होता. तो दारात उभा राहून यांचं बोलणं ऐकत होता.

"डार्लिंग, सोड फोर्स नको करू. ते आता आपले वर्क सीनिअर आहेत. कॉलेज सीनिअर नाहीत." सांजला हाताला धरून नेत नंदू बोलला.

"ओके. आय एम कमिंग."


_________________________________________________________


.


_________________________________________________________


-©® स्वर्णा


_________________________________________________________________









आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.


वाचत रहा. आनंदी रहा. सुरक्षित रहा.


🎭 Series Post

View all