Login

पांडव भाग १७

The Truth Is Always Comes Out


भाग १७
पांडव - fantastic five⭐


(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -
"कुठे गेला होतास तू? सकाळपासून तुझी किती वाट पाहिली मी. मला कोणी तुझ्याबद्दल सांगत पण नव्हतं किती विचारलं मी. "

"काय विचारलं तू त्यांना?"

त्याच्या या प्रश्नावर ती गोड लाजली. त्याला तिच्याकडे बघून मागचे काही दिवस आठवले.


आता पुढे -


"आपण कोण?"

"मी रणछोड."

"अपॉइंटमेंट आहे का? एवढ्या रात्री आम्ही पेशंट तपासत नाही. तुम्ही उद्या अपॉइंटमेंट घेऊन या." डॉक्टर लोबो त्याच्याकडे संशयित नजरेने बघत म्हणाले.

"मी काही रुग्ण नाही आहे. मला काम हवं आहे."

"त्यासाठी सुद्धा सकाळी यायला हवं होतं. ही वेळ नाही काम मागायची." त्याच्या हातातल्या मीराच्या हातावर नजर जाताच शक्य तितका आवाज सौम्य ठेवत डॉक्टर लोबो म्हणाले.

"माफ करा, मी इथे जवळच रोजंदारी वर काम करत होतो आणि तिथेच राहत होतो. मालकांच्या आजारी आईवडिलांची सेवा करायचो, जेवण बनवायचो, घराची देखरेख करायचो; पण काल मालक आई वडिलांना कुठल्यातरी उपचारासाठी परदेशी घेऊन गेले. मला वाटलं निदान घराची देखरेख करायला तरी मला ठेवतील तर त्यांनी ते पण विकल ओ." त्याने डोळे पुसले.

"सकाळपासून काम शोधतोय. कुठेच मिळालं नाही. मला अनुभव नाही इतर कामांचा. कोणीतरी इथं काम आहे असं सांगितलं. माझं चुकलंय. असं रात्री येता नये होतं; पण काय करू माझा आसराच आता राहिला नाही." बोलता बोलता त्याचा आवाज पुन्हा जड झाला. लोबोंना काय बोलावं ते सुचत नव्हतं. अजूनही त्यांचं सगळं लक्ष या दोघांनी धरलेल्या एकमेकांच्या हाताकडे होतं.

"ठीक आहे. उद्या या तुम्ही आपण उद्या बोलू." असं म्हणत लोबोनी त्याच्या हातातला मीराचा हात सोडवला.

मग रणछोडही मागे वळुन जाऊ लागला. त्याला कोणीतरी हाताला धरून अडवले.

इतका वेळ शून्यात नजर लावून त्या धरलेल्या हाताकडे बघणारी मीरा, त्याच्या दूर जाण्याने भांबावून गेली. तिने धावत जाऊन त्याचा हात घट्ट पकडला.

"कुठे जातोयस तू? थांब मी पण येते."

आता मात्र लोबो घाबरले. तिथे मध्यस्थी करायला ते पुढे सरसावले.

" तू जेवलास का?" मीरा

"नाही." रणछोड

"मीराताई ते जातायत. त्यांना जाऊ द्या."
डॉ. लोबो.

"तो जेवला नाही आहे. त्याला वाढू या. जेवेल आणि मग जाईल." मीराची विनंती त्यांना मोडता येईना.

"नको. मी जातो. बाहेर जेवेन काहीतरी. तुम्ही नका त्रास करून घेऊ." रणछोड तिच्या हातातला हात सोडवून घेत जायला वळला.

"ताई, जेवण कुठे आणून देऊ?" इतक्यात मागून आलेली नर्स म्हणाली. डॉ. लोबोनी तिच्याकडे आश्चर्याने पाहिले.

"ताई, जेवल्या नाहीत अजून." एवढे बोलून तिने मान खाली घातली.

त्यांना आपापसात बोलताना बघून रणछोड जायला निघाला.

"मला नको जेवायला. आता पर्यंत भूक होती; पण आता नाहीशी होते असं वाटतंय तू घेऊन जा ते ताट."

मीरा त्याच्या कानावर पडेल अश्या मोठ्या आवाजात बोलली. त्याची पुढे जाणारी पावले आपोआप जागेवर खिळली. तसे तिने धावत जाऊन पुन्हा त्याचा हात घट्ट धरला.

"जेवूया ना आपण. तू नको जाऊस. " तिने त्याला सांगताना डॉ. लोबोंना खुणावले.

"चला जेवून घ्या."

मगाशी विचारायला आलेल्या नर्सकडे बघून मीरा म्हणाली, "दोन ताटं वाढ आणि ती काल रिकामी झालेली सर्वेंट कार्टर मधली खोली याला दे राहायला एवढ्या रात्री कुठे जाईल तो." नर्सने केविलवाणा चेहरा करून डॉ. लोबोंकडे पाहिले. त्यांनी नाईलाजाने मानेनेच संमती दर्शवली. ते तिघेही जेवणासाठी निघाले.

पाठमोऱ्या मीराच्या आकृतीकडे पाहत डॉ. लोबो विचार करू लागले. साध्या साध्या गोष्टी हल्ली विसरणाऱ्या तिला काल रिकामी झालेली सर्वेंट कार्टर कशी काय लक्षात राहीली.
ते त्या दोघांचा विचार करत सेक्युरिटी चेक करायला व तिथल्या लोकांना रणछोडवर लक्ष ठेवायला सांगण्यासाठी निघून गेले.

________________________________________________________


काल रात्रीच्या प्रसंगाने त्याला झोपुच दिले नव्हते. रात्रभर वेगवेगळ्या गोष्टीनी त्याच्या पापण्यांना एकमेकांना भेटू दिले नव्हते. पहाटेच त्याचा डोळा लागला.

तेवढ्यात दार कोणीतरी ठोठावले. कोण आहे ते पाहण्यासाठी तो उठून दारापर्यंत गेला. दरवाज्यात कालचीच नर्स उभी होती. डॉ. लोबोनी त्याला बोलावलं आहे हा निरोप घेऊन आली होती.

तो फ्रेश होऊन डॉक्टरांच्या केबिनकडे निघाला.

________________________________________________________


लोबोना तरी कुठे झोप आली होती. त्यांनी एका रात्रीत रणछोडची जन्म कुंडली शोधून मांडली होती. त्यात जास्त काही आक्षेपार्ह आढळून आले नव्हते, तरी पुन्हा पुन्हा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे चौकशी केली होती.

दार टकटकले. मान वर करून बघताच त्यांनी दारातल्या व्यक्तीला आत यायला सांगितले.

पुन्हा त्याच्यावर प्रश्नाचा भडिमार करून त्यांनी स्वतःची खात्री करून घेतली.

"ठीक आहे. तू इथे नोकरी करू शकतोस. तू आजपासून मेल वॉर्डमध्ये मदतनिसाचं काम सांभाळ." असं म्हणत लोबोनीं बेल वाजवली. त्यांचे लक्ष मात्र रणछोडच्या चेहऱ्यावर होते.

ती कृतकृत्य भावाने उठला आणि त्याने भारावून जात डॉक्टर लोबोना मिठी मारली.
"खुप खुप उपकार झाले. मी मन लावून काम करेन. तुम्हाला तक्रारीला वाव नाही ठेवणार."

दार पुन्हा वाजले.
"रघु, यांना तुझ्या बरोबर घेऊन जा. मेल वॉर्डमध्ये नवीन मदतनीस. काम शिकव आणि कालची खोली यांना दे राहायला."

रघुने मान डोलावली आणि रणछोडला बरोबर चालायची खूण केली.

________________________________________________________

रणछोड व्यवस्थित काम करत होता. त्याला न येणाऱ्या गोष्टी तो मनःपूर्वक शिकत होता. लोबोंची त्याच्यावर नजर होती. हळूहळू त्यांचा संशय कमी होत होता; पण नाहीसा झाला नाही.

त्याला अधून मधून जाता येता ओझरती मीरा दिसायची. तिचं त्याच्याकडे लक्ष नसायचं.

मीराच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून तिला छोटी छोटी काम रोज करायला दिली जात होती. अशीच एका संध्याकाळी ती बागेत झाडांना पाणी घालत होती. अचानक तिचा पाय त्याच पाण्याच्या पाईपमध्ये अडकला. ती धडपडली. तोल जाऊ लागला; की तेवढ्यात जवळून जात असलेल्या रणछोडने तिला आधार दिला.

त्याचा आधार घेऊन तिने स्वतःला सावरले.

"थँक्यू." म्हणत ती जाऊ लागली. जसं काही ती त्याला ओळखतच नाही. त्याच्या डोळ्यात एक वेदनेची छटा उमटली. त्याने पुढे होऊन तिला थांबवले. तिच्या पुढ्यात उभ्या त्याला बघून ती गोंधळली.

"तुमचं काही काम आहे का माझ्याकडे? असे का पाहता? आपण एकमेकांना ओळखतो का?"

"नाही. माझा गैरसमज झाला. सॉरी."

तो भरलेल्या अंतःकरणाने मागे वळला.

________________________________________________________

"कुठे हरवला आहेस? चल ना जेवायला जाऊ." तो विचारांच्या गर्दीतून बाहेर आला.
मागचे काही दिवस असाच चालू होतं. कधी ती त्याला ओळख दाखवायची, कधी ती त्याला ओळखायची नाही. कधी ती त्याच्याशी भांडायची, कधी खूप प्रेमाने वागवयाची, कधीकधी तर ?????त्याला बघायची सुद्धा नाही. तो बिचारा मात्र हे सगळं सहन करायचा. \"का करायचा तिच्यासाठी एवढं?\" त्या दोघांकडे बघणाऱ्या प्रत्येकाला हा प्रश्न पडायचा.



________________________________________________________


पोलिस इनस्पेक्टर खूप विचारात आपल्या केबिनमध्ये बसले होते. डोक्यावर गरगर फिरणारा पंखा सुद्धा त्यांना आता आराम देत नव्हता. काय झालं होतं आणि काय घडून गेलं. त्या सगळ्याचा विचार त्यांच्या डोक्‍यात घर करून बसला होता. इतके दिवस ते या केसमागे परिश्रम घेत होते.
शेवटी प्रकरण हाताबाहेर जाऊन त्यांना वरून ऑर्डर आल्या. तेव्हा त्यांना कालच ती फाईल सीबीआयकडे पाठवावी लागली आणि हा प्रकार आज घडावा. त्यांची मती खुंटली होती. तेवढ्यात बाहेर आवाज येऊ लागला. केबिनच्या बाहेर गेले तर पुढ्यात सांज, तिरुपती आणि स्वामी उभे होते.

"वेलकम ऑफिसर्स. आय एम पीआय तळपदे." त्याने हस्तांदोलनांसाठी हात पुढे केला.
"हाय. देवेश तिरुपती." तिरुपती.
"हाय. एम. स्वामी." स्वामी.
"हाय. सांज अय्यर." सांज. तिघांनीही स्वतःची ओळख देत हात मिळवला.

"काल आम्हाला तुम्ही दिलेली फाइल मिळाली. त्यामुळे आम्ही आज व्हिजिटला आलो. काय प्रकरण आहे?" स्वामीने थेट मुद्द्याला सुरुवात केली.

"आज सकाळीच एक डेड बॉडी मिळाली आहे. या, केबिनमध्ये बसून बोलू." पीआय तळपदे कपाळावर बोटांनी चोळत केबिनच्या दिशेने जायला निघाला.

"आपण आधी डेड बॉडी बघू या का?"
सांजने विचारलं.

"ठीक आहे. तुम्ही आधी ती पाहून घ्या मग आपण चर्चा करू." त्या तिघांना घेऊन तो ती बॉडी ठेवली त्या खोलीकडे जायला निघाला.

________________________________________________________


"व्हॉट? या बॉडीचा आणि या केसचा काय संबंध? हा तर एका पुरुषाचा देह आहे आणि केस मुलींवर रेप करून मारणाऱ्या सीरियल किलरची आहे ना." तिरुपतीने आश्चर्यचकित होत विचारले.


"हो बरोबर आहे तुमचं; पण ही बॉडी सेम कंडीशनमध्ये सापडली आहे. त्यामुळे मला संशय आहे. माझं डोकं विचार करून करून फुटायची पाळी आली आहे. आता बॉडी पोस्टमार्टमलाच पाठवत होतो. तेवढ्यात तुम्ही आलात."

"ज्युलिया." नेहमीच्या सवयीने सांजच्या तोंडातून ज्युलियाचे नाव निघाले.

तिरुपती आणि स्वामीने तिच्याकडे बघितले असता आपण काही बोललोच नाही अशा आविर्भावात ती उभी राहिली.

तिरुपतीला तिचे सजेशन समजले होते. त्याने लगेच ज्युलियाला फोन लावला.

"हॅलो."

"येस सर."

"तू आता इथे पोलीस स्टेशनला ये. मी ॲड्रेस पाठवतो."

"सॉरी सर. तुम्ही दिलेलं जॉय केसचं काम अजून पूर्ण झालं नाही आहे आणि आमच्या टीमला तुम्ही हेच काम दिलंय." ज्युलियाच्या हातातून फोन काढून घेऊन नंदुने तिरुपतीच्या म्हणण्याला प्रतिउत्तर दिले होते.

देवेशच्या कपाळी आठी नावाच्या वळ्या पडू लागल्या होत्या. सांजला लक्षात आले काय प्रकार झाला असेल ते. तिने तिरुपतीच्या हातातून त्याच्याही नकळत त्याचा फोन काढून घेतला.

"बडी, आय निड बोथ ऑफ यू हियर. राईट नाऊ." सांजच्या आवाजातली जरब, घटनेचं गांभीर्य सांगून गेली.

"येस." एवढं बोलून फोन कट झाला.


________________________________________________________

ज्युलिया सफाईने डेड बॉडी एक्झामिन करायला सुरुवात केली. काही सँपल्स रिपोर्टसाठी लॅब मध्ये पाठवून दिले. पुन्हा एकदा तिने बॉडी रीचेक केली.

"नंदू, सांज,... सी धिस......." ज्युलियाच्या अचानक ओरडण्याने त्यांचं लक्ष वेधलं.

सगळे जण डेड बॉडीच्या सभोवती जमले.


नंदू, सांज आणि ज्युलिया सोडून बाकीच्यांना अजूनही काय झालंय ते लक्षात येत नव्हतं.

ते तिघे एकमेकांकडे सूचक नजरेने बघू लागले.

"कोणी सांगेल का मला? काय झालंय ते? तुम्ही सगळे असे का एकमेकांकडे बघताय?" तिरुपती काही लक्षात न आल्याने त्रस्त होऊन म्हणाला.

"आतापर्यंत आपण पाचही जण एकाच केस वर काम करत होतो आणि इथून पुढेही एकाच केसवर काम करणार आहोत." नंदू कोड्यात बोलावं तसं बोलला.

"म्हणजे?" आता मात्र तिरुपतीचा पारा चढला.

तेव्हा ज्युलियाने त्याला त्या बॉडी वरचा मार्क दाखवला.


"किलिंग इज हिल्लिंग."


आता तो ही स्तब्ध झाला.



-©® स्वर्णा


_________________________________________________________________



वाचत रहा. आनंदी रहा. सुरक्षित रहा.


🎭 Series Post

View all