पांडव भाग ११

The Truth Always Comes Out


पांडव - fantastic five⭐
भाग ११


(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -
रावणच्या घरच्या झणझणीत गावरान मेजवानीनंतर पांडव बॅक टू वर्क मोडमध्ये आले. सांजवर हल्ला करणारे हल्लेखोर संशयितरित्या पोलीस स्टेशनच्या बाहेर पोत्यात सापडले. पांडवना माहित नाही आहे कोणी हे केलं.(आपल्याला तर माहित आहे. तुम्हाला माहित आहे का? नसेल तर मागचा भाग पटकन वाचून या????)

त्या हल्लेखोरांना घेऊन पांडव हेड क्वार्टरला परत आले. वाटेत सांज आणि खुरापातीची शाब्दिक चकमक झाली. सांजला खुरापाती बरोबर कोणाचा तरी ओळखीचा चेहरा दिसला. बॉसनी सांजला नवीन आलेलं लेटर दाखवले. बॉसचा भूतकाळ - मीरा.

हीच ते पत्र होतं. बॉसना आधी आलेली पत्र निनावी होती. त्यात काय होतं याचा उलगडा अजून झाला नाही. मागच्या भागात ज्या पत्राचा उल्लेख झाला आहे ते मीराच आहे याची पुष्टी बॉसनीच केली.


पत्राच्या एन्वेलोपवरचा पत्ता एका हॉस्पिटलचा होता. सांजने तिथे जाऊन नक्की काय प्रकार आहे ते बघण्याचे ठरवते.

________________________________________________________




आता पुढे -


टेबलवर निरंतर पेनाने टकटक सुरू होती. नजर LED स्क्रीनवर खिळून होती. देह जरी त्या खुर्चीत अवघडलेल्या अवस्थेत असला, तरी आत्मा कुठे गेला होता माहित नाही.


आजूबाजूला काय चर्चा सुरू आहे? माधव काय बिरबली कल्पना मांडतोय? कितीतरी वेळ एकच विषय त्या तिघांमध्ये चघळला जातोय? रूममध्ये त्यांची सुरवातीला सुरू असणारी चर्चा आता भांडणाचं रूप घेते का? पियुन किती वेळा केबिनमध्ये येऊन गेला? तो पुढ्यातला थंड होणारा कॉफीचा मग बदलून गरम मग किती वेळा ठेवून गेला? कशाचेच भान नव्हते.


अचानक दारातून येणारी व्यक्ती सरळ त्या टेबलापाशी आली. तिने काही न विचारता समोरचा आताच आणून ठेवलेला वाफळणाऱ्या कॉफीचा मग तोंडाला लावला आणि कॉफीचे हळूहळू घोट घेत बाजूच्या खुर्चीवर विराजमान झाली. पेनाची टकटक अजून सुरूच होती. आता मात्र त्याने ते पेन हातातून काढून घेतले.

विचारचक्र गोल धावत असताना मध्येच कोणीतरी त्याला तोडावे आणि सगळे विचार खळकन इतरत्र पसरावे असे तिचे झाले होते.


तिने ते पेन तसेच त्याच्या हातातून काढून घेतले आणि सरळ चालत समोरच्या वॉल मौंटेड बोर्डकडे गेली. ?️ पेन बोर्डवर धावू लागले. त्याच्या वेगात होणाऱ्या हालचालीने रूममध्ये एक वेगळाच आवाज घुमू लागला.


सगळे शांत झाले आणि त्यांनी आपापल्या जागा धरल्या.


पेन बोर्डची काया बदलत होते.


?️
विक्टिम नो. 1
राम
अपेंडिक्स पेशंट
अनाथ आश्रमात वाढला
बॉडी संशयितरित्या सापडली.
बॉडी पार्टस अब्सेंट
बॉडीमध्ये एका इल्लीगल अनेस्थेशिया इंजेक्शनचा प्रेझेन्स
फ्री लाईफ एनजीओ -नरेंद्र वेधे
एफ. वाय. एस. हॉस्पिटल.

विक्टिम नो. 2
मेघा शिंदे
डिलिव्हरी पेशंट
कॉम्प्लिकॅटेड सिच्युएशनला ॲडमीट
सस्पिशियश डेथ
सेम इल्लीगल अनेस्थेशिया इंजेक्शनचा प्रेझेन्ट इन बॉडी
ब्लड लाईन हॉस्पिटल- डॉ. पांडे
सब ब्रांच ऑफ एफ. वाय. एस. हॉस्पिटल.


सांजने दोन्ही मधल्या इल्लीगल अनेस्थेशिया इंजेक्शन आणि एफ. वाय. एस. हॉस्पिटलला ⭕ सर्कल केलं.


अक्यूज्ड नो. 1
डॉ. पांडे
ब्लड लाईन हॉस्पिटल
केस मेघा शिंदे
जामीनावर बाहेर आहे.
एफ. वाय. एस. हॉस्पिटल.

अक्यूज्ड नो. 2
नरेंद्र वेधे
फ्री लाईफ एनजीओ
केस राम


ती लिहीत असताना मागून रावणचा आवाज आला.

"आम्ही गेलो होतो परत एनजीओमध्ये सगळं गायब आहे. त्या वेधे सकट. ? बिल्डिंगच्या मागच्या बाजूला कागद पत्रे जाळल्याचे पुरावे मिळाले. त्यातली काही अर्धवट जळालेली कागदपत्रे आम्ही डिपार्टमेंट ऑफ फॉरेन्सिक सायन्सकडे पाठवले." त्याने ज्युलियाकडे बघितले.


"येस, त्यांचा रिपोर्ट तयार आहे. येईलच आता लॅबमधून." ज्युलियाने असं म्हणताच माधव आणि रावणने डोळे फिरवले.


"सांज, तूच सांग या दोघांना त्या प्रोसीजरला वेळ लागतो. मगाशी दोघांनीही मला नुसतं त्रस्त करून सोडलं. म्हणतात कसे? या पेक्षा कमी वेळात रावणची आई पदार्थाची टेस्ट करून सांगेल आत काय इंग्रिडीइंट्स आहेत ते." ज्युलियाने केविलवाणा चेहरा केला.


माधव आणि रावण मध्ये एक खसखस पिकली.


"तू त्यांना इग्नोर कर; ते तुझी मस्करी करतायत." सांज बोलतच होती की रिपोर्ट आले.


पियून रिपोर्ट ज्युलियाकडे देऊन गेला.

"गेस व्हॉट? एफ. वाय. एस. हॉस्पिटल. इज द बिग शार्क बिहाईंड धिस अल्सो." तिने ते रिपोर्ट सांजच्या पुढे धरले.


"सांजवर ज्या गुंडांनी हल्ला केला त्यांचं इंट्रोगेशान करताना त्यांनी जी इन्फॉर्मेशन दिली. ती डॉ. पांडे आणि त्यांचा बॉस अर्थात एफ. वाय. एस. हॉस्पिटलचे सर्वेसर्वा जेकब रॉबर्ट्सची इंवोलवमेंट सिद्ध करायला पुरेशी आहे." नंदूने मगाशी सांजच्या पुढ्यातून प्यायला सुरुवात केलेल्या मगमधली उरलेली कॉफी संपवत बोलला.


"मोठी आसामी आहे. माधव सगळे रिपोर्ट्स अँड एविडेंस घेऊन बॉसकडे जा. नॉन बेलेबल वॉरंट मिळतं का? ते बघ. शक्यता कठीण आहे पण ट्राय कर." सांजने सगळे रिपोर्ट्स अँड एविडेंस माधवकडे दिले.

_______________________________________________________


सांज हातातल्या ? पेपर नोटकडे पाहत विचार करत होती. तिला थोड्यावेळापूर्वी बॉस बरोबर झालेले बोलणे आठवले. बॉस अगदी भावूक झाले होते. जुन्या आठवणी सांगताना. विषय बदलावा, म्हणून तिने त्याच्या आधीच्या आलेल्या धमकीच्या पत्रांविषयी बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली,


"ही पत्रे जरा वेगळी आहेत आणि हा मजकूर जरा जास्तच अग्रेसिव वाटतोय ना. या व्यक्तीला कदाचित मीरा मॅमबद्दल कळले असेल आणि म्हणून हि व्यक्ती तुम्हाला अशी ब्लॅकमेल करू पाहत आहे. तिथे गेल्याशिवाय कळणार नाही."

"पण खरंच मीरा मॅमनी त्याला सांगितलं असेल का? आणि आधी खरं काय आहे याचा पण शोध लावायला हवा." बॉस डोळे मिटून खुर्चीवर रेलून बसले होते. मिटलेल्या डोळ्यांमध्ये आठवणींचे जुने क्षण चित्रपटासारखे पुढे सरकत होते. त्या सगळ्या आठवणी डोळ्यातून अश्रू बनून बाहेर येत होत्या. काय झालं होतं तेव्हा आणि काय आता आहे. काळ कसा पुढे सरकत गेला काहीच कळलं नाही. खरंच का मीराचं आणि माझं बाळ या जगात असेल? मीराने या पत्रात त्या बाळाचा काहीच उल्लेख केला नाहीये; की जो मला माफ करणार नाही म्हणाली आहे ती व्यक्ती ते बाळ आहे; कि ती देवाला उद्देशून बोलत होती. काहीच कळेना त्यांनी मानेला हिसका दिला आणि भावूक होऊन ते म्हणाले,
"सांज, प्लीज माझ्यासाठी एवढं कर. तू खरंच जा. जाऊन बघून ये गं. माझ्याने तर हिम्मतच होत नाहीये; पण मला या प्रकरणाच्या मुळाशी नक्की जायचं आहे. करशील ना?माझ्यासाठी एवढं."
सांजने काही न बोलता त्यांच्या हातावर हात ठेवला आणि ती उठून बाहेर जायला निघाली. बाहेर येताना ती हॉस्पिटलचा पत्ता घ्यायला मात्र विसरली नव्हती.
पत्ता लिहिलेला कागद आता तिच्या हातात होता. विचार करतच तिने काहीतरी मनाशी पक्के ठरवले आणि गाडीच्या चावीकडे तिने हात नेला. तिच्याबरोबर तिच्या शेजारचा नंदू उठला.
"मी पण येतो तुझ्याबरोबर." सांज काही बोलणार याच्या आधीच तो म्हणाला, "नो मोर डिस्कशन्स." तिच्या गाडीच्या चाव्या आपल्या हातात घेतल्या. दोघेही बाहेर पडले. ती गाडी चालवताना विचारात गुंतलेली होती.

________________________________________________________


\"मदर मेरी हॉस्पिटल अँड रेहाबिलेशन सेंटर.\" एक मोठा बोर्ड होता गेटच्या कमानीवर.
हॉस्पिटलचे आवार खूप मोठं होतं. सगळीकडे सुंदर झाडे, हिरवळ आणि प्रसन्न वातावरण होते. हॉस्पिटल असूनही तसं वातावरण कमी वाटतं होतं. सांज हळूहळू प्रत्येक गोष्टीचं बारीक काही निरीक्षण करत पुढे पुढे जात होती. इतक्यात एका नर्सने तिला हटकले आणि विचारलं,

"कोण आपण? कोण पाहिजे आपल्याला?"
सांजने तिची स्वतःची आणि नंदूची ओळख सांगितली आणि मीराला भेटायला आल्याचे सांगितले.
मीराला भेटायला पहिल्यांदाच कोणीतरी वेगळ माणूस बाहेरून आले होते. नर्स आश्चर्याने सांजकडे बघत होती.
ती तिला म्हणाली, " चला, तुम्हाला आधी त्यांच्या डॉक्टरांना भेटावे लागेल; कारण डॉक्टरांची परमिशन घेतल्याशिवाय तुम्हाला मीराताईंना भेटता येणार नाही. तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेतली आहे का?"

"नाही. कारण मला माहीत नव्हतं मीरा मावशीला भेटताना त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. मी फक्त पेशंटचे विझिटिंग अवर्स चेक केले. सॉरी." सांज खूप जेन्यूअनली म्हणाली.

"नो प्रोब्लेम. लेट मी चेक. व्हेदर ऑर नॉट ही ह्याज फ्री टाइम फॉर नाउ?" ते बोलत बोलत रिसेप्शनमध्ये पोहचले होते. तिथे नर्सने चौकशी केली.

त्यांना डॉक्टरनी आत बोलावले आहे असे रिसेप्शनिस्ट म्हणाली. तेव्हा तिघेही डॉक्टरांच्या केबिनकडे निघाले.


डॉक्टर विल्सन लोबो, न्यूरोलॉजिस्ट अँड जेरनाटोलॉजीस्ट दारावर एक मोठी पाटी होती.


"मे आय कम इन डॉक्टर?"

"येस."


सांज आणि नर्स केबिनचा दरवाजा उघडून आत गेले.

" हे तुम्हाला भेटायला आले आहेत." एवढं बोलून ती नर्स निघून गेली.

"प्लीज हॅव अ सीट. व्हॉट कॅन आय हेल्प यू?"

"आम्हाला मीरा मावशींना भेटायचं आहे. माझी आई आणि मीरा मावशी फार जुन्या मैत्रिणी होत्या. आज मला बर्‍याच दिवसांनी समजलं; की त्या इथे आहेत, म्हणून त्यांना मला भेटायाला मी इथे आले. मी भेटू शकते का?"
सांज अदबीने म्हणाली.

"तुम्हाला माहित आहे का? त्यांना काय आजार झाला आहे?" डॉक्टरनी साशंकतेने विचारले.
सांजने नकारार्थी मान हलवली.

"मी तुम्हाला त्याची थोडीशी कल्पना देऊ इच्छितो; कारण त्याशिवाय त्यांना भेटणे थोडेसे अवघड होईल." डॉक्टर गांभीर्याने म्हणाले व पुढे सांगू लागले.
"त्यांना अल्झायमर हा आजार झाला आहे. अल्झायमर रोग हा पुरोगामी न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यामुळे मेंदू संकुचित होतो आणि मेंदूच्या पेशी मरतात. अल्झायमर रोग हा डिमेंशियाचा सर्वात सामान्य कारण आहे - विचार, वर्तन आणि सामाजिक कौशल्यांमध्ये सतत घट होणे ज्यामुळे एखाद्या व्यक्तीने स्वतंत्रपणे कार्य करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अलीकडील घटना किंवा संभाषणे विसरणे समाविष्ट आहे. हा रोग जसजसा वाढत जाईल तसतसे अल्झाइमर रोग असलेल्या व्यक्तीची स्मरणशक्ती तीव्र नसते आणि दररोजची कामे करण्याची क्षमता गमावते.

औषधे लक्षणांची प्रगती तात्पुरती सुधारू किंवा कमी करू शकतात. या उपचारांद्वारे कधीकधी अल्झाइमर रोग असलेल्या लोकांना जास्तीत जास्त कार्य करणे आणि काही काळासाठी स्वातंत्र्य राखण्यास मदत होते.



आमचं हॉस्पिटल खूप मोठं आहे; इथे वेगवेगळे पेशंट येतात. त्या एक मदतनीस म्हणून आल्या होत्या. पण त्यानंतर काही चेक अप मध्ये इथल्या डॉक्टर्सच्या लक्षात आले की त्यांच्यामध्ये अल्झायमरची लक्षणं दिसून येत आहेत.


आमचा स्वतःचा एक एनजीओ आहे. त्या मार्फत आम्ही ज्यांचं कोणी नाही त्यांना शेल्टर प्रोवाईड करतो. मीरा ताई तिथे राहत होत्या. तिथल्या लोकांना मदत करणे त्यांची सेवा शुश्रुषा करणे अशी कामे त्या करायच्या. सुरुवातीला, अल्झायमरमुळे मीरा ताईंना एखाद्या व्यक्तीस गोष्टी लक्षात ठेवण्यास आणि विचारांचे आयोजन करण्यात अडचण येऊ लागली. कुटुंबातील एखादा सदस्य किंवा मित्राची अल्झायमरची लक्षणे कशी वाढतात हे लक्षात येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळेच तिथल्या लोकांच्या ते लक्षात येऊ लागलं.


अल्झायमर रोगाशी संबंधित मेंदूतील बदलांमुळे त्रास वाढू लागला. त्यांची अधूनमधून मेमरी चुकू लागली, परंतु अल्झायमर रोगाशी संबंधित स्मृती कमी होणे कायम राहीले आणि खराब होऊ लागली, यामुळे कामावर किंवा घरात कार्य करण्याची क्षमता प्रभावित होऊ लागली.

अल्झायमर रोगामध्ये होणारे मेंदू बदल मूड आणि वर्तनांवर परिणाम होतात. त्यांच्यात औदासिन्य, सामाजिक माघार, स्वभावाच्या लहरी, इतरांवर अविश्वास, चिडचिडेपणा आणि आक्रमकता, झोपेच्या सवयी बदलणे, एखादी गोष्ट चोरी केली गेली आहे यावर विश्वास ठेवण्यासारखे भ्रमलक्षणे वाढत असताना दिसू लागली."

"तुम्हाला त्या कितपत ओळखतील. काही सांगू शकत नाही. त्यांच्या कलाने घ्यावे लागते. तुम्ही भेटू शकता. चला." डॉक्टर बोलता बोलता केबिन बाहेर आले तसे सांज आणि नंदू ही त्यांच्या मागे निघाले.

"फक्त त्यांना त्रास होईल अस काही घडता नये. थोडक्यात तुम्हाला रोल प्ले करावा लागेल. त्या सध्या स्वतःला 25 वर्षांच्या समजतात. तश्या शांत असतात फक्त एका गोष्टीचं ध्यान ठेवा त्यांना तुम्ही काहीच विचारू नका किंवा आठवायला लावू नका."

सांज सगळं लक्षपूर्वक ऐकत होती. डॉक्टरनी डोअर नॉक केले आणि हलकेच ढकलून आत गेले. खोली अगदी नीटनेटकी ठेवली होती. सांजची नजर खोलीत भिरभिरू लागली.

संपूर्ण खोली रिकामी होती.

"डॉक्टर, ताई बागेत आहेत." रुमच्या बाहेरून जाणाऱ्या नर्सने आत डोकावून सांगितले.

"ओह, थँक्यू. लेट्स गो." ते सगळे बागेकडे निघाले.

"डॉक्टर, इथलं वातावरण खूपच प्रसन्न आहे. " चालता चालता नंदू म्हणाला तसे प्रतिउत्तर म्हणून ते हसले.


-©® स्वर्णा.

__________________________________



आपलं नेहमीच आहेच ओ.......

वाचत रहा. आनंदी रहा. सुरक्षित रहा



🎭 Series Post

View all