पांडव भाग ६

The Truth Always Comes Out


पांडव - fantastic five.
भाग ६


(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)


आतापर्यंत आपण वाचले -
मेघा शिंदे केस पूर्ण झाली होती. त्या मृतदेहाची ओळख सापडली. राम, एक गरीब तरुण, वय - ३२ , अनाथ आश्रमात वाढला, छोटी छोटी काम करून पोट भरायचा. सध्या हॉस्टेलवर राहत होता. त्याने फ्री लाईफ संस्थेची मदत घ्यायचा प्रयत्न केलेला आपल्या ऑपरेशन साठी आणि म्हणून सांज तिथे चौकशी करायला गेली होती. तिथून परत येताना .......

एक ट्रक भरधाव वेगाने तिच्या दिशेने येत होता. तिचे लक्ष आवाजाच्या दिशेने गेले. डोळ्यांसमोर वेगाने जवळ येणारा ट्रक दिसत असूनही पाय जणू कोणी पुरून ठेवले आहेत असे एका जागेवर खिळले. डोळे मोठे होऊन त्या ट्रकच्या लाईटवर केंद्रित झाले होते. जसा तो जवळ आला, तिने दोन्ही हात कानावर ठेवले. डोळे गच्च बंद केले. जणू आता ते उघडणारच नाहीत.


आता पुढे -

जोरात हॉर्न वाजत होता. ट्रक ड्रायव्हरने सांजच्या अगदी जवळ येऊन ब्रेक मारला. अकस्मात लावलेल्या ब्रेकचा कर्ण कर्कश आवाज रस्त्यावरच्या शांततेला भेदून गेला. ट्रक ड्रायव्हर गाडीतून उतरून खाली आला. सांज कानावर हात ठेवून जागीच खाली बसली होती. डोळे अजूनही घट्ट मिटलेले होते.

"जीव द्यायचा तर दुसऱ्याच्या गाडी खाली जा. आम्हा गरिबांना कश्याला गोत्यात आणता?"
तो काहीसा घाबरून, काहीसा वैतागत, काहीसा रागाने बोलत होता.

सांज अजून ही काहीच हालचाल करत नव्हती. जणू तिचं रूपांतर एका अभेद्य दगडी मूर्तीत झाले होते. इतक्यात लोकांची बरीच गर्दी आजूबाजूला जमा झाली होती. त्या रस्त्यावरची रहदारी थांबली होती.

अचानक एक माणूस त्या लोकांतून पुढे आला. सांजच्या अगदी जवळ जाऊन त्याने तिची विचारपूस केली.

"आर यू ऑल राईट?"

तिच्याकडून अजूनही जास्त प्रतिसाद नव्हता. तो हळूच वाकला आणि तिला खांद्याला धरून उभ करून रस्त्याच्या एका बाजूला घेऊन निघू लागला.

"ओ भाऊ, कुठे निघाले?"
"पोरगी दिसली नाही; की चालले इंप्रेस
करायला."

त्याने एक जळजळीत कटाक्ष त्या तग्यांच्या गर्दी कडे टाकला. त्या तीक्ष्ण डोळ्यात एक आवाहन होते. सगळे शांत झाले. तो सांजला घेऊन जसा बाजूला झाला, ट्रक ड्रायव्हर ट्रक घेऊन निघून गेला.

तिथे जवळ असलेल्या बसस्टॉपच्या बाकड्यावर त्याने तिला बसवले. तो तिच्यासाठी पाणी आणायला त्याच्या गाडीजवळ गेला.

**************

रस्त्यावर ट्रॅफिक जॅम झाला होता. त्याने जेव्हा गाडीतून बाहेर पाहिले तेव्हा थोडं पुढे त्याला लोकांची गर्दी दिसली. गर्दी कमी व्हायचं नाव घेत नव्हती. शेवटी तो गाडीतून उतरला आणि गर्दीच्या दिशेने निघाला. एक छोटी मुलगी कानावर हात ठेवून, डोळे गच्च मिटून रस्त्याच्या मध्येच बसली होती. तिची काहीच हालचाल नव्हती. जवळचा ट्रक ड्रायव्हर तिला ओरडत होता.

\"आय थिंक हीला ट्रॉमा अटॅक आला आहे.\" तो तिला हळू उठवून तिथून घेऊन निघाला. तिला बसस्टॉपच्या बाकड्यावर बसवून तो तिच्यासाठी पाणी आणायला त्याच्या गाडीजवळ गेला.

*************
अक्युट ट्रॉमा हा मुख्यतः अपघात, बलात्कार, प्राणघातक हल्ला किंवा नैसर्गिक आपत्तीसारख्या एकाच त्रासदायक घटनेमुळे होतो. तो प्रसंग व्यक्तीच्या भावनिक किंवा शारीरिक सुरक्षेस धोकादायक ठरलेला असतो. अशी घटना व्यक्तीच्या मनावर कायमचा प्रभाव निर्माण करते. वैद्यकीय मदतीद्वारे लक्ष न दिल्यास त्याचा परिणाम व्यक्तीच्या विचार करण्याच्या आणि वागण्याच्या मार्गावर होऊ शकतो. ह्या ट्रॉमा मध्ये सहसा व्यक्तीची स्थिती पुढील प्रमाणे होते.अत्याधिक चिंता किंवा घाबरून जाणे, चिडचिड, गोंधळ, शांत झोप घेण्यास असमर्थता, सभोवतालचा संपर्क तुटल्याची भावना, लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता, स्वत:ची काळजी नसते.

सांजच्या लहानपणी झालेल्या अपघाताच्या वेळी तिला ट्रॉमाचा मेजर अटॅक आला होता. ती खूप लहान होती. त्यामुळे डॉक्टर म्हणाले; की सावकाश ट्रीट करावं लागेल नाही, तर तिला ब्रेन हॅमरेजचा धोका आहे. कित्येक महिने ती गप्प बसून होती. कोणाशी बोलत नव्हती, चालत नव्हती. तेव्हा आजो आणि नंदूने तिला खूप सांभाळले होते. हळूहळू तिनेच त्या घटना तिच्या मनाच्या कप्प्यात कुलूप लावून बंद केल्या होत्या. आपल्या सगळ्या कमजोरीना तिने मागे टाकून ट्रेनिंग पूर्ण केले होते.

आता बराच काळ निघून गेला होता. त्यामुळे तिला आपल्याला असा काही त्रास होता हे फक्त माहित होते. त्याचे तेवढे गांभीर्य तिच्या लेखी राहिले नव्हते. आज तो जवळ येणारा ट्रक, त्याचा वेग, हॉर्नचा कर्कश आवाज, डोळ्यावर आदळणारे प्रखर हेड लाईट त्या बंद कप्प्याचे दार ठोठावून गेल्या.

****************

"धर पाणी पी. अरे कुठे गेली इथेच तर बसली होती." तो पाणी घेऊन सांजला बसवलं होत त्या बाकड्याकडे आला होता. बाकड्यावर सांज नव्हती.

\"मिस? तिचं नाव ही माहित नाही. पण कुठे तरी बघितल्यासारखी वाटतेय. कुठे? थिंक, अग्नेय थिंक. व्हेअर हॅव आय सीन हर बिफोर? हां येस, दॅट?पाईन ॲपल किडो.\"

****************

सांज अजून ही सुन्न होती. तिला थोडंसं बर वाटलं तेव्हा तिच्या लक्षात आले की ती एका बाकड्यावर बसली आहे. ती तिथून जाण्यासाठी उठली तिला पुन्हा थोडे गरगरले. ती परत बसली. \" नो सांज यू कॅन डू इट. चल निघायला हवं.\" मनाशीच ठरवून ती कशी बशी उभी राहिली आणि चालायला सुरुवात केली. आपण थोड्या वेळापूर्वी काय करत होतो? या भागात का आलो होतो? चालता चालता हे सगळं आठवायचा प्रयत्न करत होती. तिचे डोके अशाने दुखू लागले होते. तरीही ती चालत होती. तिला मोबाईलची आठवण झाली. तिने पॉकेट चेक केले तसा मोबाईल सापडला. फोन ओपन करून तिने नंदूचा नंबर डायल केला. रिंग होत होती. इतक्यात तिच्यासमोर एक बलदंड माणूस येऊन उभा राहिला. सांज त्याला वाट मोकळी करावी म्हणून डावीकडे सरकली, तर तोही डावीकडे सरकला. सांज उजवीकडे सरकली, आता हे महाशय ही उजवीकडे सरकले. सांजच्या कानाला असलेल्या फोनची रिंग अजूनही सुरू होती. त्या माणसाने आता सरळसरळ तिचा रस्ता अडवला. सांज अजूनही पूर्ण ट्रॉमामधून बाहेर आली नव्हती. ट्रॉमाच्या आधीची सांज असती ?‍♀️ तर त्याचं काही खरं नव्हतं. ट्रॉमामुळे ती जरा क्षीण झाली होती.

वाद नको म्हणून ती थोडी मागे गेली तर मागे आदळली. कशाला आदळली आहे हे बघायला वळली तर तेवढीच बलदंड व्यक्ती मागे उभी होती. व्यक्ती कसले? गुंड होते गुंड????

"काय?"

"तेच आम्ही विचारतोय? काय शहाणपणा सुचतोय काय?" त्यातला एक बोलला.

"हीच आहे का रे ती?" एकाने तिच्याकडे साशंक नजरेने बघून विचारले.

"भाई, फोटोत तर हीच आहे."

"लहान आहे रे ही. हिला का मारायला सांगितलं आहे?"

त्याचं लक्ष नाही बघून सांज जरा बाजूला जाऊ लागली. तिला शक्तीपेक्षा युक्तीने बचाव करणेच योग्य वाटले.

" ए कुठे जाते?" त्यातल्या एकाने तिचा फोन धरलेला हात पकडला. हातातला फोन काढून बंद करून खिश्यात घातला आणि तिचा हात मुरगळण्याचा प्रयत्न केला. त्या हाताला जरा ढील देऊन सांजने दुसऱ्या हाताची मुठ वळली आणि ज्याने हात धरला होता, त्याच्या नाकावर मारून दिली. इतकी जोरात मारली की त्याच्या नाकातून भळाभळा रक्त येऊ लागले. तिने त्याच्याकडून फोन बळकवून स्वतःच्या पॉकेटमध्ये घातला. तिच्यात अशक्तपणा नसता तर आज तो माणूस पडला खाली असता; पण पोहचला ढगात असता. शेवटी त्याला \"द सांज\"चा फटका पडला होता. ते बघून बाकीच्यांना कळलं की हे काही साधं प्रकरण नाही. ते एकत्र तिच्या अंगावर धाऊन आले. तिचा फोन परत वाजत होता.

आपली सांज अशक्त असली म्हणून काय झालं कमी नव्हती. तिने एकेकाला अश्या हाई किक दिल्या की ते परत काही मागायला हात पुढे करू शकणार नव्हते. त्यांची ही फाईट काही थांबायचं नाव घेत नव्हती. एका मुलीकडून मार खातोय या कल्पनेने ते अजून चवताळून तिच्या अंगावर धावून येत होते.

हळू हळू सांज दमु लागली. तेवढ्यात एकाने मागून येवून तिच्या डोक्यावर काठीचा दणका दिला. दुसरा दणका द्यायला हात उचलणार इतक्यात त्याचा हात मागून हवेतच धरला गेला. त्याने मागे वळून पाहिले तर समोर अग्नेय उभा होता.

सांज ज्या अवस्थेत तिथून गायब झाली होती. त्यामुळे अग्नेयला तिची काळजी वाटत होती. तो तिचा शोध घेत तिथपर्यंत पोहोचला होता. वेळेत आला होता म्हणा ना. त्याने बघितले तेव्हा ती एखाद्या वॉरियरसारखी लढत होती. छोटा पॉकेट बडा धमाका वाटत होती. तो तिची फाईट लांबून एन्जॉय करत होता. बघता बघता त्याच्या डोळ्यात राग आणि भीती एकत्र उमटली. जेव्हा त्याने त्या गुंडाला सांजच्या डोक्यावर काठीने मारताना बघितले. त्याने क्षणाचाही विलंब न लावता तिच्यावर होणारा दुसरा वार रोखला होता.

सांजने एका हात डोक्यावर धरला होता. तिच्या हाताला गरम ओलसर रक्त लागले. सांज हळूहळू शुद्ध हरवू लागली.

अग्नेयने आता पर्यंत सगळ्या गुंडांचा उरलेला अर्धा जीव पूर्ण संपवला. आता त्याचे तिच्याकडे लक्ष गेले, तेव्हा ती खाली कोसळत होती. त्याने तिला सावरले.

" हे किडो, हे चॅम्प, उठ डोळे मिटू नको. आपण हॉस्पिटलमध्ये जातोय. वेक अप युअरसेल्फ. हे किडो."

" डोन्ट कॉल मी....... दॅ........ट......... यू................म्हातारं............. "पुढचे शब्द ओठातच विरले.

***************

नंदकुमार हॉस्पिटलमध्ये एका रुमच्या बाहेर फेऱ्या मारत होता. डोळे रागाने लाल झाले होते. तो फिरता फिरता पॅसेजच्या खिडकीजवळ थांबला. समोर रस्त्यावरून वाहन जात येत होती. अचानक एका गाडीने ब्रेक दाबला, समोरून एक आजी रस्ता ओलांडत होत्या. भीतीची एक थंड लहर त्याच्या अंगातून सळसळली.

तो रामची माहिती गोळा करत होता तेव्हाच त्याचा फोन वाजू लागला. स्क्रीनवर सांजच नाव बघून ओठ रुंदावले. \" आता ही सॉरीचा जप करेल.\" या विचारात त्याने फोन उचलला.

"हॅलो."

"काय?"

"तेच आम्ही विचारतोय? काय शहाणपणा सुचतोय काय?"

"हीच आहे का रे ती?"

"भाई, फोटोत तर हीच आहे."

"लहान आहे रे ही. हिला का मारायला सांगितलं आहे?"

"ए कुठे जाते?"

हा ऐकत होता तो पर्यंत कॉल कट झाला. त्याने नंतर खूप रिंग केल्या; पण सांज त्या गुंडांना धुत होती. त्यामुळे तिने तो उचलला नाही.

जेव्हा सांजला अग्नेयने सांभाळले तेव्हा तिचा वाजणारा फोन त्याने उचलला.

"हॅलो सांज."

"तिच्यावर कोणीतरी अटॅक केला होता. तिच्या डोक्याला मार बसून बेशुद्ध झाली आहे. मी जवळच्या क्लिनिकला तिला घेऊन जातोय. तुम्हाला लोकेशन पाठवतो. तुम्ही या." सगळं एका दमात बोलून समोरच्याच्या उत्तराची वाट न बघता कॉल कट झाला होता. होणार नाही, तर काय सांजला डॉक्टरकडे नेणं जास्त गरजेचे होते.

नंदकुमार धावतच त्या लोकेशनवर पोहोचला. डॉक्टर सांजला तपासत होते. त्याचे डोळे त्याला पापणीची उघडझाप ही करू देत नव्हते. जखम डोक्याला झाल्यामुळे शुद्ध यायला वेळ लागेल अशी माहिती डॉक्टरनी दिली आणि ते निघून गेले.
खिडकीत उभं राहून नंदू सगळं आठवत होता.

******************

\"ओह. त्या किडोच नाव सांज आहे. ग्रेट फायटर. तो फोन वर कोण होता? काय सेव्ह होतं नाव ते? हां \"buddy\". तिला शुद्ध येईपर्यंत मी थांबायला हवे होते. निदान तो बडी कोण आहे ते तरी बघता आले असते. महत्त्वाचे काम नसते तर नक्कीच थांबलो असतो. आता शुद्ध आली असेल ना तिला.\" अग्नेय सांजचा विचार करत होता. नकळत ओठावर तिचे नाव पुन्हा आले. "सांज."






-©®स्वर्णा


_--------------------------


अरे मी प्रश्न लिहिले नाही?
आज पांडव फॅन्सनी मला प्रश्न विचारा.

असंच माझ्या सगळ्या कथांना तुमची सोबत मिळू दे.


तुमच्या प्रतिक्रिया वाचून अजून छान लिहायला प्रोत्साहन मिळते. त्यामुळे कॉमेंट्स करायला विसरू नका.

वाचत रहा, आनंदी रहा, सुरक्षित रहा ?
धन्यवाद


🎭 Series Post

View all