पांडव भाग ५

The Truth Always Comes Out
पांडव - fantastic five.
भाग ५


(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -

एका अनाथ मृतदेहाची चौकशी करायची जबाबदारी पांडव वर होती. ज्या बॉडीमधून ऑर्गनस गायब होते. सदाशिव शिंदे आपल्या पत्नीच्या मृत्यूविषयी कंप्लेंट घेऊन आले होते.

आता पुढे-

डॉक्टर पांडे तिथून जायला वळले. ते आपल्या कॅबीनकडे निघाले.

"वेट डॉक्टर, बाळाची बॉडी ही ताब्यात घ्यावी लागेल. व्हेअर इज इट?" सांजच्या अचानक आलेल्या प्रश्नाने डॉक्टर गोंधळले.

"काय झालं?"

"अं.. काही नाही. ती आहे. शिर्के, ह्यांच्या ताब्यात बाळाची बॉडी द्या."

शिर्के गोंधळून डॉक्टरांकडे बघू लागला.

"जा लवकर आणा." त्यांनी शिर्केवर आवाज चढवला. शिर्के बिथरल्यासारखा निघून गेला.

******************

"एस्क्युज मी. कॅन आय सीट हियर?"

"येस." समोरच्या व्यक्तीने कॉफीवरची नजर न हटवता उत्तर दिले.

"हाय आय एम माधव. न्यू जॉईन."

" हाय." माधव त्याला बोलतं करायचा प्रयत्न करत होता; पण त्याला काहीच प्रतिसाद मिळत नव्हता.

"ऍनी प्रॉब्लेम?" माधवने पुन्हा एक प्रयास केला.
"माझं स्वप्नच प्रॉब्लेम होऊन बसलं आहे माझ्यासाठी." ती व्यक्ती कोड्यात बोलून निघून गेली.

माधव ही तिथून बाहेर पडला. नंदूने त्याला कॅन्टीनमध्ये पाठवला होता. सांजने ज्या ज्युनिअर डॉक्टरकडे खूण केली होती, त्याची चौकशी माधव करत होता.

सांजने हॉस्पिटलमध्ये दोन लोकल पोलिस कॉन्स्टेबलना बोलावून केसची पुढची माहिती गोळा करायला सांगितली आणि ती बाहेर पडू लागली.

"मॅडम," भरलेल्या डोळ्यांनी सदाशिव तिच्यासमोर उभा होता. त्याला पुढे काही बोलावलं नाही.

एकीकडे सांजला त्याचा राग येत होता. एकीकडे दया वाटत होती. ती काही बोलणार त्या आधीच त्याने बोलायला सुरुवात केली.

"मी चुकलो. आज मेघाचा खरा दोषी मी आहे. बायको ही नवऱ्यासाठी काय असते हे ती आयुष्यातून गेल्यावरच का जाणवते?" पाणावलेल्या डोळ्यांनी तो बोलत होता.
"तुम्ही माझ्या विनंतीमुळे इथे आलात.
तुमच्या ऑफिसमधले ते पहिले साहेब म्हणत होते आम्ही अश्या छोट्या केस घेत नाही. लोकल पोलिस स्टेशनला जा. मी खरंच गेलो होतो ओ... पण कोणी दखल घेत नव्हतं. तुम्ही खरं काय ते शोधाल याची मला खात्री आहे. खूप खूप धन्यवाद." त्याने हात जोडले.

सांजने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
ती हॉस्पिटलमधून बाहेर पडली. बाहेर गाडीत सगळे तिची वाट बघत होते.

"बडी?"
"डन."
"ज्युलिया?"
"सांज, बॉडी सस्पिशियस आहे. येस, डिलिव्हरी कॉम्प्लिकेटेड होती; पण तिचा मृत्यू चुकीच्या ट्रीटमेंटने झाला आहे. बॉडी पोस्टमार्टम करायला लॅबमध्ये पाठवली आहे. ठोस पुरावे मिळतील." ज्युलिया सांगत होती. नंदू गाडी शांतपणे ड्राईव्ह करत होता. सांजचे लक्ष त्याच्याकडे गेलं. इतक्यात तिचा फोन वाजला.,

"काय? आम्ही येतो मागे." तिने कॉल कट केला.
"बडी, गाडी परत मागे वळव." पुढच्या वळणावर वळून गाडी पुन्हा हॉस्पिटलकडे निघाली.

******************

पांडव हॉस्पिटलमध्ये आले. पुढ्यात खूप गोंधळ दिसत होता. सांज आणि नंदू काय प्रकार आहे ते पाहण्यासाठी पुढे गेले.

रावणने एका वॉर्डबॉयच्या गळ्याला एका हाताने व दुसऱ्याच्या गळ्याला दुसऱ्या हाताने पकडले होते. ते दोघेही पळून जायला आटापिटा करत होते. रावण जराही इकडचा तिकडे होत नव्हता?.

त्यांच्या समोर बसून माधव रिसेप्शनचा कॉम्प्युटर तपासत होता.

सांजला बघून माधव तिच्याकडे गेला.

" सांज, आईच्या पोटातून बाहेर आल्यावर एकाची दोन बाळं झाली."

तो बोलत होता आणि समोर उभ्या डॉक्टर पांडेना घाम फुटत होता.

त्या वॉर्डबॉयनी दोन वेगवेगळ्या डेड बॉडी आणल्या होत्या. दोन बॉडी कशा असं विचारता ते गोंधळून वेगळी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. कॉन्स्टेबल ही चौकशी करत असतानाच माधवने रावणला तिथे बोलावून घेतले. त्यामुळे त्यांना चौकशी करणे सोपे झाले. अशी माहिती लोकल पोलिस कॉन्स्टेबलनी दिली.

"सांज सगळी डाळ कुसलीय...." माधव पुढे बोलत होता. तेवढ्यात त्याचं बोलणं पूर्ण होतं न होतं तोपर्यंत एका बाळाच्या रडण्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं. ज्युलिया एका छोट्या बाळाला घेऊन येत होती. तिच्या मागून एका जोडप्याला दोन साध्या वेशातले पोलिस घेऊन येत होते.

आता मात्र डॉक्टर पांडेचा चेहरा पूर्ण पांढरा पडला.

"मी आत येत असताना मला हॉस्पिटलच्या मागच्या दाराजवळ संशयित हालचाल दिसली. तिथे जाऊन बघते तर हे सगळे सापडले."


"अहो ते बाळ आमचं......" त्या जोडप्यातील पुरुष बोलणार एवढ्यात नंदू म्हणाला.

"ते आता लक्षात येईलच."

आता मात्र सगळे घाबरले. माधवने सांजला हॉस्पिटलचे रेकॉर्ड दाखवले. आजच्या रेकॉर्डमध्ये कुठेच त्या बाळाची एन्ट्री नव्हती. ज्युलियाने तो पर्यंत सदाशिवना बोलावून घेतले. बेबी आणि त्यांचे ब्लड सँपल घेऊन लॅबकडे क्विक ब्लड रिपोर्ट्स काढण्यासाठी पाठवण्यात आले.

सांजने बॉसना फोन करून हॉस्पिटल सील करायच्या ऑर्डर्स मिळवल्या. क्षणार्धात पूर्ण हॉस्पिटल ताब्यात घेण्यात आले.

डॉक्टर पांडेचे संशयित म्हणून अरेस्ट वॉरंट पण मागवून घेतले.


**************
दुपार झाली होती. पांडव त्या सगळ्यांना चौकशीसाठी सीबीआय ऑफिसमध्ये घेऊन आले. ब्लड रिपोर्ट्स आले. त्यांनी सिद्ध झाले की ते बाळ सदाशिव आणि मेघा शिंदेचं आहे.

***************
"तर डॉक्टर तुम्ही आता बोलणार की तुमची ट्रीटमेंट आम्ही करायची?" रावणने समोर बसलेल्या डॉक्टरना विचारले.

"मी कबूल करतो; की ते बाळ आम्ही त्या जोडप्याला दिले." त्याने मान खाली घातली.

"बस एवढेच? मेघा शिंदेचं काय?" ज्युलियाने असं विचारताच त्यांनी आश्चर्याने तिच्याकडे बघितले.

"बोला. वेळ फुकट जातोय. वेळेचे महत्त्व माहित आहे ना तुम्हाला." सांजने त्याच्याकडे रागाने पाहिले.

"हो, तिला तिचा मृत्यू आमच्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे झाला."

सांज त्याच्याकडे बघून कसा बसा राग आवरता घेऊन रूमच्या बाहेर पडली. त्याला अटक करण्यात आली.


**************

" कोणी उघडलं हे? मला न विचारता." नंदू रागारागात रावण आणि माधवकडे बघत होता.

"बोला गप्प काय बसलात?" तो अजूनच चिडला.

"बडी." एका हाकेत नंदुच्या चेहऱ्याचे भाव बदलले.

"काही नाही ग. या दोघांना जरा म्हणून धीर नाही. आपण यायच्या आधी तू आणलेला टिफीन अर्धा केला यांनी."

"त्यात नवीन काय आहे." हात पुसत आलेली ज्युलिया बोलली.

"माझं चीझ ऑमलेट संपवलं. सांजने माझ्यासाठी बनवलं होतं ते." नंदूकडे बघून सांज मात्र हसू लागली.

"ओह हे मुख्य कारण आहे तर. बडी, मी ऑलरेडी एक वेगळा डब्बा बाजूला ठेवला होता. हा घे."

ज्युलियाने आपण आणलेलं जेवण ही सगळ्यांना दिले.

हसत खेळत गप्पा मारत लंच ब्रेक संपला.

******************

"राम, एक गरीब तरुण, वय - ३२ , अनाथ आश्रमात वाढला, छोटी छोटी काम करून पोट भरायचा. सध्या हॉस्टेलवर राहत होता. त्याचा मित्र परिवार ही फारसा नव्हता. एक रुममेट होता - राघव . तो तीन दिवसापूर्वीच गावावरून परतला. त्यानेच रामची मीसिंग कंप्लेंट पोलिस स्टेशनमध्ये दिली होती.
मी जेव्हा सगळ्या मिसींग कंप्लेंटचे रेकॉर्ड चेक करत होतो तेव्हा ही माहिती मिळाली." माधव सांगत होता. त्याने दोन दिवस सलग रिसर्च करून ही माहिती मिळवली होती.

"कोणीही नातेवाईक नसल्याने त्याची जास्त चौकशी झाली नाही. त्याच्या रूमची तपासणी केली असता, फ्री लाईफ संस्थेची फाईल मिळाली. ही बघ." बोलता बोलता त्याने ती फाईल नंदूकडे दिली.

"या संस्थेत चौकशी केली का?" सांज विचारत होती तो पर्यंत तिचा फोन वाजला.
फोनवर बोलून तिने थोड्यावेळात तो बंद केला.

"डॉक्टरला जामीन मिळाला." तिने बोलताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर \"हे रोजचंच आहे \" असे भाव आले.

सांजने काही माणसं त्याच्या मागावर ठेवली.

**************

फ्री लाईफ एक सामाजिक संस्था. गरीब गरजू रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देणे, गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणे, निराधार स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे अशी कामे या संस्थेमार्फत करण्यात येत होती. रामने तिथे काही मदत मिळते का हे बघण्यासाठी विनंती केली होती. एवढे फाईल वाचून कळत होते.

संस्थेचे अजून तसे मोठे नाव झाले नव्हते. तिची जास्त माहिती इंटनेटवर नव्हती. फक्त पत्ता होता. सांजने तिथे जाऊन शोधायचं ठरवलं.
***************

"मी पण येतो." नंदू सांज बरोबर जाण्यासाठी तयारी करत म्हणाला.

"अरे नको. इथे त्या डॉक्टरची ॲक्टिविटी खूपच संशयित आहे. तू इथेच थांब."

"नको मी येतो. तिथे गरज पडेल."

"नंदू, मी काही लहान नाही. मी एक वेल ट्रेन्ड ऑफिसर आहे आणि ती एक सामाजिक संस्था आहे. अंडरवर्ल्ड डॉनचा अड्डा नाही. आता मी एकटीच जाणार." सांज जरा रागातच म्हणाली.

त्याचं काही ऐकून न घेता रागारागत तिने गाडी काढली. मोबाईल GPS वर संस्थेचे लोकेशन सेट करून ती ड्राईव्ह करू लागली.


सांजला माहित होतं; की तिच्या लहानपणात अश्या काही घटना आहेत ज्या फक्त तिला आठवत नाही. तरीही त्यांचे पडसाद तिच्या आयुष्यावर उमटलेले आहेत. नंदू आणि आजो या दोघांनाच त्याबद्दल माहित होते. त्यांनी कधीच सांजला त्या गोष्टी सांगितल्या नव्हत्या; की कधी सांजने त्यांना विचारल्या नव्हत्या.

"फ्री लाईफ"

संस्थेचा बोर्ड बघून सांज विचारातून बाहेर आली.

"हाय, मी सांज अय्यर. मला इथल्या व्यवस्थापकांना भेटायचं आहे."

" हाय, मी नरेंद्र वेधे. इथला व्यवस्थापक. काय मदत करू शकतो तुमची?"

"मी रामची मैत्रीण आहे. काही दिवसांपूर्वीच परत आले आहे. बाहेरगावी जायच्या आधी तो म्हणाला होता; की त्याच्या ऑपरेशनसाठी तो तुमच्या संस्थेची मदत मागणार आहे. "

"तसे बरेच गरजू इथे येतात. तुमच्याकडे त्याचा फोटो आहे का?"

सांजने त्याला फोटो दाखवला.

"हो, हा आला होता खरा. मला अजून कळलं नाही आहे; की तुम्हाला नेमकी काय मदत हवी आहे."

"मी परत आल्यापासून त्याला संपर्क करायचा प्रयत्न करत आहे; पण काहीच संपर्क होत नाही आहे. तुम्हाला काही माहीत आहे का? त्याचं ऑपरेशन झालं किंवा तो कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे. तुमच्याकडे त्याची काही माहिती असेल तर देता का. प्लीज."

" एक मिनिट मी तपासून सांगतो ."
त्याने रेकॉर्ड बुक चाळले.

" तो आला होता खरा; पण."

"पण काय?"

" त्याची नोंद फक्त घेतली होती आम्ही. त्यावेळी आमच्याकडे काही मदत उपलब्ध नव्हती. जेव्हा होईल तेव्हा कळवू असं सांगितलं होतं त्याला. मग तो निघून गेला. त्याने परत काही संपर्क केला नाही."

"थँक्यू"
तो फक्त हसला.


सांज तिथून बाहेर आली. इथे येऊन काही फायदा झाला नाही. केस अजून जिथल्या तिथे आहे. तिने गाडी वळवून रोडच्या दुसऱ्या बाजूला पार्क केली होती.
ती आपल्याच विचारात होती. एकदा तिने दोन्ही बाजूला बघितले तेव्हा रस्त्यावर गाड्या नव्हत्या.
तिने रस्ता क्रॉस करायला सुरुवात केली अर्ध अंतर आली असेल नसेल.................

एक ट्रक भरधाव वेगाने तिच्या दिशेने येत होता. तिचे लक्ष आवाजाच्या दिशेने गेले. डोळ्यांसमोर वेगाने जवळ येणारा ट्रक दिसत असूनही पाय जणू कोणी पुरून ठेवले आहेत असे एका जागेवर खिळले. डोळे मोठे होऊन त्या ट्रकच्या लाईट वर केंद्रित झाले होते. जसा तो जवळ आला, तिने दोन्ही हात कानावर ठेवले. डोळे गच्च बंद केले. जणू आता ते उघडणारच नाहीत.


**************

"हो काम होऊन जाईल." फोनवर कोणाला तरी सांगण्यात आल. पलीकडून काही न बोलता फोन कट झाला.





-©स्वर्णा


_--------------------------


सदाशिव शिंदे चूक होते की बरोबर तुमचं मत काय?


कोण होता फोनवर?
त्याने काय काम सांगितलं?
सांजचं काय होईल?
राम अजून ही कोडच?


जाणून घेण्यासाठी वाचत रहा .

पांडव-fantastic five ⭐



असंच माझ्या सगळ्या कथांना तुमची सोबत मिळू दे.

तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कॉमेंट माध्यमातून नक्की कळवा. यातून तुम्हाला कथा किती आवडते.
जे लिहिलं जातंय त्यावर तुमचं स्वच्छ मत कळतं. हा एकमेव हेतू आहे.


तुमच्या प्रतिक्रिया वाचून अजून छान लिहायला प्रोत्साहन मिळते.

वाचत रहा, आनंदी रहा, सुरक्षित रहा ?
धन्यवाद









🎭 Series Post

View all