पांडव भाग ३

Truth Always Comes Out


भाग 3

(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले....
पांडवना बॉसने मीनाक्षी लांबा मर्डर केस सोपवली होती. त्यातून त्यांनी खऱ्या खुनी मिस टीयाला शोधून काढलं. केसच्या सक्सेस नंतर आज सांजच्या घरी ?? पार्टी होती. त्याचं सामान घेण्यासाठी सांज मार्केटमध्ये आली होती.

आता पुढे-

सांज म्हणजे टॉम बॉय मुलीचं उत्तम उदाहरण. अंगात ग्रे कलरची हुडी, ब्लॅक थ्री फोर्थ, गळ्यात रेबनचा गॉगल, पायात हेवी सोल असलेले मिलट्री शूज. सांज म्हणजे एक वेगळंच समीकरण होत. मुलांना कितीही वाटलं की तिला निरखावं, बघत राहावं, पण हिंमतच व्हायची नाही त्या बिचाऱ्या जीवांची. या अश्या अवतारात मॅडम ?️ ? शॉपिंग करत होत्या. आज डिनर पार्टी जी होती.
शॉपिंग ? ट्रॉलीमध्ये लिस्टमधील एक एक आयटम टाकत ती पुढे पुढे जात होती.
कोणी बघितलं तर वाटेल; की सतरा-अठरा वर्षांची मुलगी खरेदीला आली आहे. त्या लहान मूर्तीची कीर्ती किती महान आहे कोणाला माहीत होते.
इतक्यात एकच गदारोळ झाला काही चोर त्या सुपर मार्केटमधून काही वस्तू घेऊन पळत होते. धावत धावत ते अचानक कशाला तरी अडकून खाली पडले. त्यांना कळायच्या आत सेक्युरिटी गार्डने त्यांना पकडले होते. ???\"पण ते अडकले कशात?\" हा विचार तुम्ही पण करताय ना. सोप आहे बरोबर सांजने पसरल्या मार्बल्समध्ये????
पण कोणालाच कळलं नाही. सांजचं काम इतकं शांत की पत्ताच लागला नाही. ओह नो त्या मार्बल्स पसरण्याच्या नादात अननस घ्यायचा राहिला. ती फ्रूट सेक्शनकडे गेली. बघते तर काय एकच शिल्लक होता तिथे. मग काय ?‍♀️?‍♀️?‍♀️धावली ?याच्याकडे पण त्या आधीच एका स्कायबल्यू हूडीवाल्याने ?उचललं आणि जायला लागला.
सांज ओरडलीच त्याचावर
"वेट, मला हवं होतं ते, मी पहिल्यांदा पाहिलं होतं."
तो वळला. एक किल्लर ? स्माईल देत म्हणाला.
"बेटर लक नेक्स्ट टाईम किड्डो."

आता मात्र आमच्या कूल गर्लचा पारा चढला.

"हे यु , आय एम नॉट अ किड्डो."

तो फक्त हसला आणि निघून गेला. कसला हॅण्डसम लूक होता त्याचा; पण आमच्या सांजने ? न मिळाल्याने त्याच्या लूक्सकडे दुर्लक्ष केलं.

? नाही मिळालं आता काय आजो माझी फेवरीट डिश कशी बनवणार. या विचाराने तिचा चेहराच पडला.

पडकं तोंड घेऊनच तिने दारावरची बेल वाजवली.
"सरप्राइज !" सगळे पांडव तिच्या आधीच घरी हजर होते आणि आजोना कामात मदत करत होते. त्यांना बघून तिची कळी खुलली.

दार उघडणाऱ्या रावणच्या हातात शॉपिंग बॅग्ज देऊन तिने ज्युलियाला मिठी मारली. माधवने तिला हाय फाईव दिली. नंदू मात्र तिच्याकडे एकटक लांबून बघत होता. ती केव्हा जवळ आली त्याला कळलंच नाही.

"हे बडी कुठे हरवला आहेस?"

"तुझ्यात" नंदू ओठात पुटपुटला.

"काही म्हणालास का?" सांजला त्याचा आवाज ऐकू गेला नव्हता.
त्याने काही नाही म्हणून मान हलवली.
तिने त्याला एक मैत्रीपूर्ण मिठी मारली आणि तिच्या आजोंना मदत करायला किचनमध्ये निघून गेली.
"बोला मास्टर, काय सेवा करू आपली?"
"अननस आणलंस?"
तिने जीभ चावली.
"त्या म्हातारबाने माझं अननस पळवलं." एकदम बेबी फेस करत ती बोलली हे पाहून सगळे हसू लागले. कोणाला वाटेल या सोज्वळ चेहऱ्याला मोठे मोठे क्रिमिनल घाबरून असतात.

"मेनू में क्या है?" रावणने सांजला विचारलं.

आपल्या स्पेशल स्टाईलमध्ये ती सांगू लागली.
"मंगलोरियन चिकन बिर्याणी, स्पेशालिटी ऑफ मेंगलोर. यात मंगलोरियन पेस्ट आहे. पेस्टमध्ये नारळ, धणे, वेलची, एका जातीची बडीशेप, लवंगा, आले, कोरडी लाल तिखट, लसूण आणि जिरे असतात. एक जाड नारंगी रंगाची पेस्ट तयार करतात. ती बिर्याणीची मेन इंग्रिडीइंट आहे.???बरोबरीला बिर्याणी रायता.
कुंडापुरा कोळी सारू ही चिकन करीची आणखी एक शैली आहे आणि ते मंगलोरियन किनारपट्टीवर खूप लोकप्रिय आहे. कढीपत्त्याची ग्रेव्ही नारळाच्या दुधासह कांदा, लसूण, आले आणि इतर मसाल्यापासून बनविली जाते. विथ नीर डोसा हे तर आमच्या कर्नाटकमधला फॅमस खाद्यपदार्थ आहे.
तुळु भाषेत नीर या शब्दाचा अर्थ पाणी आहे. नीर डोसा ही एक अतिशय प्रसिद्ध डिश आहे .
केसरी भाथ ही एक गोड आवृत्ती आपला गोड शिरा तशीच सहसा सर्व्ह केली जाते (एकत्र चाऊ चा भाथ म्हणतात) ही रवा, साखर, तूप, आणि दूध, तसेच केशर आणि अननस घालून बनविली जाते. (पदार्थांची एक्स्ट्रा माहिती मी स्पेशल तुम्हा वाचकांसाठी गिफ्ट म्हणून दिली आहे. काही सुंदर कर्नाटकी पदार्थ जे आपण ही नक्कीच ट्राय करायला हवेत. तुमच्यातल्या स्पेशल खवय्यांसाठी माझ्याकडून भेट) पण आता केशर भाथ माझी आवडती डिश नाही बनवता येणार."

सांजचा चेहरा पुन्हा पडला.
"आणि हे सगळं त्या म्हातारबामुळे त्याने माझं अननस पळवलं."
तिने मान खाली घातली.

डायनिंग टेबलवर एक एक पदार्थ ठेवत आजो म्हणाले, "चला हात धुवून या."

तसे सगळे हात धुवून आले. डायनिंग टेबलकडे बघताच सांजचा चेहरा उजळला.

"केशर भाथ. आय लव यू आजो." तिने तर त्यांना घट्ट मिठी मारली.

"पण मी तर आणलं नव्हतं अननस मग केळी घालून केलंय का?" तिने घाबरत विचारलं कारण तिला केळी घालून केलेलं आवडायचं नाही.

"नंदू अननस घेऊन आला होता."

"बडी यू आर सिंपली ग्रेट." तिने नंदुचे गाल ओढले.

सगळ्यांना हे नवीन नव्हते. तिची आणि नंदुची जय विरू सारखी बाँडींग होती. खूप जुने मित्र होते ते दोघे. सीबीआय त्यांनी ठरवून एकत्र जॉईन केलं. सांज सोडून बाकी तिघांना माहित होतं.
काय? काय म्हणून काय विचारताय, तुम्हा सगळ्यांना ही माहीत झालं असेलच आफ्टर ऑल तुम्ही स्मार्ट रीडर्स आहात. बरोबर नंदुच सांजवर एकतर्फी प्रेम होतं पण त्याने तसं कधी तिला काहीच सांगितलं नव्हतं. सांजचं म्हणाल तर ती या सगळ्या पासून अनभिज्ञ होती. माधव आणि रावण यांनी तिला कधी सांगितलं नाही कारण नंदुचा जमदग्नी कोणाला???? बघायचा होता. त्याने धमकीच तशी दिली होती. सांगायचं झालं तर फक्त मीच तिला सांगेन इतर कोणीही नाही सांगायचं.

कळलं, कळलं आता तुम्ही म्हणाल ज्युलिया तिला पण माहित होतं आणि ती नंदुच्या धमकीला घाबरत पण नव्हती. मग तिने का नाही सांगितलं बरं ??? कारण तिला नंदूसाठी स्पेशल वाली फिलिंग होती. कूछ कूछ हो रहा था लेकीन नंदू नहीं समझा था. ना ही सांज.

तर असं होतं सगळं. आय नो इट्स कॉम्प्लिकेटेड पण काय करू आहे तर असंच.
*******
जेवण आटपून ते आजोना आवरायला मदत करू लागले. सगळं आवरून आईसक्रीम ?बाउल घेऊन सगळे बाहेर मोकळ्या लॉनमध्ये बसले. आज सगळे मस्त आरामात होते. ? आईसक्रीम खाता खाता आजो त्यांना त्यांचे मिलट्रीचे किस्से सांगू लागले. बोलता बोलता कधी वेळ निघून गेला कळलंच नाही.

सगळे घरी जायला निघाले होते.
"बडी तू ज्युलियाला घरी सोडशील ना? माधव आणि रावण माधवच्या बाईक वरून जाणार आहेत."
"नको सांज, मी गाडी आणली आहे मी जाईन." ज्युलिया.

"तू गप्प ग. बडी तू बोल सोडशील ना? आणि ज्युलिया तुझी गाडी मी उद्या घेऊन येईन ऑफिसला डोन्ट वरी."

नंदूने मानेनेच होकार दिला. सगळे एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या घरी जायला निघत होते; त्यांचा मोबाईल एकत्र वाजला.

बॉसचा मेसेज होता.

" न्यू केस आहे उद्या शार्प १० मॉर्निंगला भेटू. सी यू ऑल.? बाय पांडव. "

सगळ्यांनी एकमेकांकडे सूचक नजरेने पाहिले
आणि हसत निघून गेले.



-©स्वर्णा


_--------------------------

बॉस पांडवांना कोणती नवीन केस देणार आहेत.
नंदू सांज ला त्याच्या मनातलं सांगू शकेल का?
की आधी ज्युलिया त्याला कन्फेस करेल.

जाणून घेण्यासाठी वाचत रहा

पांडव-fantastic five ⭐


असच माझ्या सगळ्या कथाना तुमची सोबत मिळू दे.
तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कॉमेंट आणि लाईक्सच्या माध्यमातून नक्की कळवा. यातून तुम्हाला कथा किती आवडते. जे लिहिलं जातंय त्यावर तुमचं स्वच्छ मत कळत. हा एकमेव हेतू आहे.

तुमच्या प्रतिक्रिया वाचून अजून छान लिहायला प्रोत्साहन मिळते.

धन्यवाद


🎭 Series Post

View all