पांडव भाग २

Truth Always Comes Out
भाग 2

(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले;
सांज एक सीबीआय ऑफिसर आहे. तिचे आजोबा ब्रिगेडियर कृष्णा अय्यर ज्युडो क्लास चालवतात. सांजच्या लहानपणी तिचे आईवडील एका अपघातात तिला सोडून देवाघरी गेले. सांजची एक इन्वेस्टीगेशन टीम आहे. ज्युलिया?‍?, माधव?‍?, रावण?, नंदू?️ आणि सांज?‍✈️ असे आहेत आपले पांडव -fantastic five⭐ .

आता त्या सगळ्यांना बॉसच्या केबिनमध्ये बोलावलं आहे. तिथे ते बॉस काय सांगणार ते ऐकायला जमा झाले आहेत.

आता पुढे-

"हाय बॉस." पांडव एकत्र म्हणाले.

"हाय पांडव. हॅव अ सीट." बॉस.

" केस नो. 102 \"मीनाक्षी लांबा मर्डर केस\" लोकल पोलिसनी केलेल्या इन्वेस्टीगेशन रिपोर्ट हे आहेत. ही केस तुम्ही रिइन्वस्टीगेट करा." बॉसने एक फाईल पुढे सरकवली.

सांजने फाईल वाचायला सुरुवात केली.

" बॉस, ती केस तर क्लोज झाली होती ना. आय हॅव वॉचड इन न्यूज. द बिझनेस आयकॉन हिरेन लांबा इज मर्डरर. त्याचं एक्सट्रा मॅरिटियल अफेयर होतं त्याच्या ओल्ड फ्रेंड टियाबरोबर."
ज्युलियामधली गॉसिप क्वीन जागी झाली.

"शी इज राईट, मी पण न्यूज पेपर मध्ये वाचलं आहे." माधव.

सांज अजूनही फाईल वाचत होती. वाचता वाचता एक नजर तिने नंदूकडे बघितलं. दोघेही सूचक हसले.

"ओके बॉस. आम्ही ही केस रिइन्वस्टीगेट करतो." सांज फाईल घेऊन उठताना बोलली.

सांज बोलली आणि सगळ्यांनी हो मध्ये मान डोलावली.

"केस नो.102 मीनाक्षी लांबा."

विक्टिम: मीनाक्षी लांबा.
क्राईम सीन: लांबा मॅनशन.
कॉज ऑफ डेथ: गळा दाबल्यामुळे गुदमरून
असा संशय
पुरावे: गळ्यावर हिरेनचे फिंगर प्रिंट.
मोलकरणीची साक्ष.
घरात दुसरं कोणीही आढळून आलं नाही.
मर्डरचा मोटीव : एक्सट्रा मॅरिटियल अफेयर "

ऑफिसमध्ये शिरताच पटापट ज्युलियाने बोर्ड चार्ट बनवायला सुरुवात केली.

" अक्क्युज्ड : हिरेन लांबा.
प्रोफेशन: बिझनेसमन
क्रिमिनल बॅकग्राऊंड: नन
सोशल इमेज: नॉर्मल, क्लीन अँड क्लिअर
त्याने क्राईम ॲक्सप्ट केला आहे.

मग केस संपते ना सांज."
ज्युलियाने प्रश्नार्थक नजरेने सांजकडे बघितले.

सांज मिस्टरियस हसली.
"ओके आता

विक्टीम: मीनाक्षी लांबा
सोशल मीडिया आयकॉन.
इंस्टा, ट्विटर, फेसबुक लवर.
पार्टी ॲनिमल.
हेवी ड्रिंकर.

वन सेकंड सांज ही फॉरेन्सिक रिपोर्ट बघ. ओह
अब समज मे आया. ती मेली त्या रात्री ती फुल्ल ड्रंक होती."

"हो, पण मृत्यू श्वास रोखल्यामुळेच झाला आहे." माधवने पॉइंट आऊट केलं.

"हा खून एक्सट्रा मॅरिटियल अफेयर मुळे नाही झाला आहे. त्याचं ह्या सगळ्यांशी काही देणं घेणं नाही. मीनाक्षी आणि हिरेनची भांडण रोजची होती. तिला दोन वर्ष आधीपासून सगळं माहित होतं आणि ते डिओर्स पण घेणार होते. यातील काही माहिती त्यांच्या मोलकरणीच्या जबाबात आली आहे तर काही त्यांचे वकील मिश्रांचे स्टेटमेंटमध्ये." सांज म्हणाली.

" ज्युलिया, तू परत एकदा फॉरेन्सिक रिपोर्ट बघते का?" सांज.

" येस, मी बॉडीच रीचेक करते आणि तुला रिपोर्ट देते."

"माधव, या सर्वांची कुंडली मांड सगळं पाहिजे मला. इच अँड एव्हरीथिंग." सांज.

"डन."

" नंदू, रावण आणि मी जरा mr. लांबाना भेटून येतो."

********

"हॅलो mr. लांबा, आय एम फ्रॉम सीबीआय." म्हणत सांजने त्यांना तिचं आयडी कार्ड दाखवलं.
"मला तुम्हाला तुमच्या केससंदर्भात काही प्रश्न विचारायचे होते. मी विचारू शकते का?"

लांबानी मुक संमती दर्शवली.

"तुम्ही हा आरोप का मान्य केला? सॉरी डोन्ट मिस अँडरस्टूड मी. एक मोठा बिझनेसमन जो कोणताही मोठा लॉयर देऊन स्वतःची निर्दोष मुक्तता करू शकतो. त्याने सहज गुन्हा कबूल करणे काही पटत नाही."

लांबा काहीच बोलू नाही शकले. मान खाली घालून हाताच्या बोटांचा वापर करून आपली अस्वस्थता लपवत राहिले.

सांजने पुढचा प्रश्न केला, "टीया खरंच तुमची मैत्रीण होती का?"

या प्रश्नाने त्यांची नजर व मान एकदम वर झाली. भरलेल्या डोळ्यांनी ते सांजकडे बघू लागले.

"ऑफिसर केस क्लोज झाली आहे. त्यामुळे आता या सगळ्याचा काही उपयोग नाही. एक बिझनेसमन म्हणून नव्हे तर एक हताश व्यक्ती म्हणून मी तुम्हाला विनंती करतो. प्लीज लिव्ह मी अलोन." लांबा तिथून निघून गेले.

सांज ही शांतपणें बाहेर आली.
" नंदू , तू बरोबर होतास. ही केस दिसते तशी नाही आहे." असं म्हणत सांज गाडीत बसली. रावणने गाडी चालू केली.

**********
" सांज, हे बघ. हे बघशील तर म्हणशील पूर्ण गेम चेंज आहे. टियाचं बोलणं जास्त हिरेन बरोबर नव्हतंच ते होतं ........."

"मीनाक्षी बरोबर." नंदूने माधवचं वाक्य पूर्ण केलं.

"टीया एक मानसोपचार तज्ञ होती. ती मिनाक्षीला ट्रीट करत होती. मीनाक्षीच्या ब्लड रिपोर्ट मध्ये मेंदूला कंट्रोल करणाऱ्या मेडिसिनचे सँपल मिळालेत. त्या दिवशी त्या गोळ्यांचा ओव्हर डोस झाला होता." ज्युलिया.

"झाला होता; की दिला गेला होता."
नंदू.

"टीयाला भेटायला हवं, कॉल हर."

*******

"सो मिस टिया, तुम्ही मीनाक्षी लांबा ना कसली ट्रीटमेंट देत होता व का?" ज्युलिया.

"डिप्रेशन." टिया

" असं काय झालं होतं जे ती डिप्रेशन मध्ये होती."

"तिला संशय होता mr. लांबा वर .."

सांज हसली आणि तिने माधवकडे पाहिलं. माधवने टिया आणि मीनक्षीचे सोशल मीडिया वरचे काही फोटोज बिग स्क्रीनवर तिला दाखवले. तिला काही सिक्रेट चॅटिंगचे इमेज सुद्धा दाखवल्या; ज्या दाखवून तिने mr. लांबाना ब्लॅकमेल केलं होतं. हा खून कबूल करून त्यांची प्रॉपर्टी तिच्या नावावर करून द्यायला. नंदूने मिश्रांकडून विलचे डिटेल्स सुद्धा गोळा केले होते.

"आता पटपट बोला मॅडम." सांज तिच्याकडे बघत कुत्सित हसत बोलली.

"त्या दोघांचं रिलेशन डिस्टर्ब झालं होतं. त्यात मीनाक्षी माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी येऊ लागली. मला हिरेन आधीच आवडला होता. मी तसं त्याला सांगितलं ही; पण त्याचं त्याच्या बायकोवर प्रेम होतं. त्याने मला नाकारलं; मग मी वेगळा प्लॅन केला. मीनाक्षीच्या अवस्थेचा फायदा घेऊन तिला आमच्यात काही आहे हे पटवून द्यायला सुरुवात केली. त्यातून तिला वेगवेगळ्या ड्रग्सची सवय लावली. एका क्षणाचा फायदा घेऊन तिचे काही अश्लील पिक्स आणि व्हिडिओज बनवून हिरेनला पाठवले. वाटलं होतं हिरेन रागात तिला घटस्फोट देईल. त्याचं आधी तसंच ठरलं होतं; पण काहीच पुढे हालचाल होत नव्हती. मग मी ठरवलं की तिला ड्रिंकमधून ओव्हर्डोज द्यायचा आणि दिला ही. त्या नशेत ती त्याच्याशी भांडली आणि त्यात हे सगळं झालं. मी दोषी नाही ठरणार कारण त्याने गुन्हा कबूल केलाय आणि गळ्यावर फिंगर प्रिंट आहेत." एक विजयी हास्य चेहऱ्यावर आणत टिया म्हणाली.

"ज्युलिया" सांजने ज्युलियाकडे सूचक नजरेने पाहिले.

"तुझं सगळं बरोबर आहे, पण त्याने तिचा गळा दाबण्याच्या अगोदरच १ मिनिट तिचा श्वास रोखला गेला होता आणि गळ्यावरचे प्रेशर पण तेवढं नव्हते." ज्युलिया.

आता मात्र टियाचा चेहरा सुकला. एक वेगळं भयाण वास्तव तिच्या डोळ्यात उभं राहिलं. पुढे मात्र ती एकही शब्द बोलू शकली नाही.

सांजने तिला अटक केली. सगळे न्यू रिपोर्ट्स आणि टियाचं कन्फेशन घेऊन तिने बॉसच्या केबिनचा दरवाजा टकटकावला.

"केस नो.102 सोल्वड बॉस." एक आत्मविश्वासाने भरलेले हास्य तिच्या चेहऱ्यावर उमटले होते.

बॉसनी तिच्याकडे अभिमानाने पाहिलं .

*********

"आजो , आज पांडव घरी येणार आहेत. इट्स पार्टी टाईम. आपला स्पेशल डिनर मेनू रेडी करायचा आहे मी घरी आले; की आपण सुरुवात करू. मला सामानाची यादी मेसेज करून ठेवा. येताना घेऊन येते." सांज हसत हसत आपल्या आजोबांना सांगत होती.

तिने कॉल ठेवेपर्यंत यादीचा मेसेज आला. "यू आर ग्रेट." तिच्या चेहऱ्यावर हसू उमलले.



-©स्वर्णा


_--------------------------

आजचा भाग लिहिण्यासाठी खूप संशोधन करावं लागलं. आशा आहे की तुम्हाला हा भाग खूप आवडेल. माझ्यासाठी जरा नवीन विषय आहे काही चुकत असेल तर क्षमा असावी.


तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कॉमेंट आणि लाईक्सच्या माध्यमातून नक्की कळवा. यातून तुम्हाला कथा किती आवडते. जे
लिहिलं जातंय त्यावर तुमचं स्वच्छ मत कळत. हा एकमेव हेतू आहे.

तुमच्या प्रतिक्रिया वाचून अजून छान लिहायला प्रोत्साहन मिळते.

धन्यवाद


🎭 Series Post

View all