पांडव भाग १

The Truth Always Comes Out

भाग १
(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)



"नाही." पुनः तेच, सारखं सारखं एकच स्वप्न पडणं म्हणजे काय अर्थ असेल याचा. या गोष्टी निरर्थक आहेत. सगळे विचार झटकून ती फ्रेश होण्यासाठी अंथरुणातून बाहेर पडली.


स्वप्नांचे अर्थ बघायला तिच्याकडे वेळ होता कुठे? आई बाबा जो आयुष्याचा मुख्य आधार असतात तोच नव्हता तिच्याकडे. ती खूप लहान असताना ते देवाघरी गेले होते. आजोबा आणि ती दोघेच होते या छोट्याश्या कुटुंबाचे सदस्य.



\" सांज अय्यर - सीबीआय ऑफिसर.
रंग - गोरा नाही पण उजळ ,
ज्युडो 8th रँक होल्डर,
(बघितलं तर मात्र वाटत नाही हा? म्हणून आरोपी फसतात.?)\"

\" रिटायर्ड ब्रिगेडयर कृष्णा अय्यर.
सांजचे आजोबा,
ज्युडो मास्टर,
सध्या ज्युडो क्लास चालवतात.
सांज साठी तिचा जीव की प्राण.\"


आता ही झाली पात्र ओळख. आता त्यांच्याबरोबर थोडी ओळख अजून करून घेऊ या.

खूप पूर्वी महाराष्ट्रात स्थायिक झालेलं हे कर्नाटक मधील कुटुंब. सांज चे बाबा राम अय्यर सुद्धा सीबीआय ऑफिसर होते. आई सीता अय्यर स्कूल टीचर होती. राम आणि सिताचे एका कार ॲक्सीडेंट मध्ये निधन झाले.
चिमुकल्या सांजला तिच्या लाडक्या आजोंनी लहानच मोठं केले. कर्नाटकमध्ये आजोबांना \"अज्जा तंदे \" म्हणतात. त्यामुळे सांज त्यांना लाडात आजो म्हणायची. लहानपणीच त्यांनी तिला ज्युडोचे धडे गिरवायला लावले होते.

जेव्हा तिच्या आईवडिलांचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा ती त्याच गाडीत होती. अगदी लहान वयात एवढी मोठी घडल्यामुळे तिच्या बुद्धीने त्या आठवणी मेंदूत कुठे तरी खोल लपवून ठेवल्या होत्या. राहिली होती ती निव्वळ मोठ्या आवाजाची भीती ज्याला आपण साऊंड ट्रॉमा ही म्हणू शकतो. मोठ्या आवाजात तिचा मेंदू बधीर व्हायचा, काहीच सुचेनास होई. त्या घटनेच्या आठवणी दडपल्यामुळे आईवडिलांच्या आठवणीही धूसर झाल्या होत्या.

आजोनी मात्र तिला कधी कसली कमतरता भासू दिली नाही. त्यामुळेच आज ती एक अंडर कव्हर सीबीआय ऑफिसर होती.

बरीच मिशन तिने कमी वयात सक्सेसफुल केली होती. स्पाय नेटवर्क ही तिची स्पेशालिटी होती.तिचे स्पाय नेटवर्क खूपच विश्वसनीय, गोपनीय आणि दूरवर पसरले होते.


आज तिला तिच्या ऑफिस मध्ये नवी केस हॅण्ड ओव्हर करायला बॉसनी बोलावल होते. Mr. सरदेसाई तिचे सीनिअर ऑफिसर
एक हुशार आणि जोहरी व्यक्तिमत्त्व. सगळे त्यांना बॉस म्हणायचे.


सांजने आपल्या टीम बरोबर बॉसच्या कॅबिन वर नॉक केले.


आतून एक धीर गंभीर आवाज आला," येस कम इन."

केबिनच्या दरवाजातून सांजची टीम एक एक करून सांजच्या मागून येऊ लागले.


ज्युलिया - एक हॉट आणि तितकीच शातिर असलेली युवती, परफेक्ट कॉम्बिनेशन ऑफ ब्युटी विथ ब्रेन, फॉरेन्सिक एक्स्पर्ट


माधव - चष्मा लावलेला, चेक्सचा शर्ट घातलेला हॅकर, त्याला बघितलं तर वाटणार नाही; पण हॅकिंग चा किंग.


रावण - याच खर नाव शांताराम वाचून हसायला आल ना सांजपण अशीच हसली होती. "रावणासारखा देह व राग घेऊन जन्माला आलेल्या तुला कोणी शांत रामाचं नाव दिलं, तेरा नाम आज से रावण." हे सगळं सांज बोलली म्हणून चालून गेलं हां. दुसऱ्या कोणाची ओठातून बोलायची काय डोळे वर करून त्याच्याकडे बघायची हिंमत नव्हती. व्रेस्टलिंग चॅम्पियन आणि बॉम्ब स्कॉड स्पेशालिस्ट.


नंदकुमार - सबकी खबर रखनेवाला, एका मोठ्या स्पाय नेटवर्कचा लीडर, सांजचा बड्डी. स्पाय नेटचे सगळे रुल्स यानेच सांजला शिकवले होते.


त्यांच्या टीमचे त्यांनी नामकरण केले होते.

"पांडव"



- ©स्वर्णा


_--------------------------

बॉस नीं पांडवांना का बोलावलं आहे.
काय नवीन गोष्टी सांजच्या आयुष्यात घडणार आहेत.
या पांडवाची थ्रिलर लाईफ कशी आहे.

जाणून घेण्यासाठी वाचत रहा.

पांडव - fantastic five.

________________________________

आजचा भाग लिहिण्यासाठी खूप संशोधन करावं लागलं. आशा आहे की तुम्हाला हा भाग खूप आवडेल.


तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कॉमेंट आणि स
लाईक्सच्या माध्यमातून नक्की कळवा.


तुमच्या प्रतिक्रिया वाचून अजून छान लिहायला प्रोत्साहन मिळते.

हा भाग तुम्हाला आवडला आणि तुम्ही उत्सुक आहात पुढच्या भागांना वाचायला असे मला समजू दे तुमच्या समिक्षातून कळवा.
तुमच्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत आहे.

फॉलो करायला विसरू नका.

धन्यवाद.



🎭 Series Post

View all