स्वप्नं वेडी

It's A Story Of Girl Who Loves To Follow Her Dreams


#स्वप्नं_वेडी

वार शनिवार होता ....आज आणि उद्या म्हणजे रविवारी मला आँफीसला सुट्टी असायची मग काय माझा आवडता छंद मी जोपासायाचे तो म्हणजे भटकंती..माझे घरचे गावी असतात मी आधी जायचे दर आठवड्याला घरी पण बसचा प्रवासामूळे अंग खूप दुखायचे आणि मग त्याचा परिणाम आँफीसच्या कामांवर होयचा.. म्हणून मग ठरवलं या येवढ्या मोठ्या मुंबईत आपलं कोणी खास माणूस नसलं म्हणून काय झालं पण रस्ते आहेत सोबत जोडीला माझी मैत्रीण सायकलही आहे ...फिरत राहूया दोन दिवस दर आठवड्याला कधी निसर्गाच्या सानिध्यात तर कधी गजबजलेल्या गर्दी मध्ये...

आजही पाहटे लवकर उठले माय फेवरेट स्काय ब्लू कलरचा टि-शर्ट घातला व्हाईट ट्रँक पँट घातली ...सोबत काही सँन्डवीजेस मी डब्यात घेतले ,पाण्याची बाँटल,फर्स्ट एडचा छोटा बाँक्स , डिओड्रंट घेऊन मी बँग पाठीला लटकवली...डोक्यावर टोपी आणि डोऴ्याला गाँगल लावून मी माझ्या फोन मध्ये कँमेरा ओपन करून स्वत:लाच किस केलं...काय चिकनी दिसतेय मी , जर आहे सोबतीला ऐवढा देखना चेहरा तर मग कशाला हवा स्वप्नातील राजकुमार वैगरे...झालं तर मी निघाले माझ्या भटकंतीला..आँक्टोंबर महिना सुरू आहे तर मस्त थंडीचे दिवस चालू होते...मस्त रप रप सायकलीचे पँन्डल मारत मारत इकडे तिकडे टर्न घेत घेत आनंदात माझी पर्सनल मुमेंट इन्जाँय करत होते ....आणि अचानक एक महाशय येऊन धडकला.. तोही सायकल वरच होता...मी जोरात ब्रेक दाबलं..त्याच्याकडे रागात पाहीलं...डोक्याला उलटी टोपी घातलेली..डोळ्याला गाँगल आणि सँडो विथ थ्री फोर्थ घातलेला तो मला पहात होता..

मी - ए भाई, ज़रा देख के चलो...आगे ही नहीं, पीछे भी
दायें ही नहीं, बायें भी

तो-ऊपर ही नहीं नीचे भी ..ए भाई...ए भाई, ज़रा देख के चलो...

मी (आनंदाने )- फिल्मी ?

तो - अरे टोटल फिल्मी..

मी - वाँव दँटस् ग्रेट यार...कुठे चाललायस ?

तो - फीक्स नाही

मी - फीक्स नाही म्हणजे ?..

तो - अगं मी ठरवत नाही असं काही...नुसता भटकत राहतो सँटरडे आणि सनडे ला...

मी - अरे वा सेम माझ्या सारखचं की ... मी पण शनिवार रविवार फिरतच असते सायकलवर..

तो - अरे वा...एक बात बताओं तूम मेले में बीछडी हुई मेरी बेहेन तो नही ?

मी - बेहेन होंगी तेरी दुश्मन..अच्छा तेरा नाम क्या है...

तो - डाँन...बारा मुलूकों की पुलिस मुझे ढुंड रही है...और आप ?

मी - मे मोना मोना डार्लिंग..

तो - व्हाट..

मी - गप कर ..मी सुद्धा तमाशा मुव्ही पाहीलाय..

तो - बरं पार्टनर बनणार का ?

मी - ये आत्ता तर ओळख झाली लगेच पार्टनर..शी बाई मला लाज वाटते..

तो - गपे नौटंकी..मी भटकंतीचा पार्टनर बनशील का ?..असं विचारतोय

मी - हो हो नक्कीच..चल आज आधी मस्त स्ट्रीट रोडवर हिंडू मग जंगलात किंवा डोंगर दर्या पहायला जाऊ....

आम्ही गेलो मुंबईच्या फेमस खाऊ गल्ल्यांमध्ये मज्जा केली...आम्ही जरी आत्ता भेटलो असलो तरी आम्ही एकमेकांसोबत खूप कंम्फरटेबल फिल करत होतो...दोघांच्या खूप गोष्टी अगदी सेम सेम चाँईसच्या होत्या जसं की त्याला जास्त तेलकट पदार्थ नाही आवडत आणि मलाही नाही आवडत म्हणून आम्ही दुपारी साधं मँगी आणि आम्लेट पाव खाल्लं रोडवर ...नंतर मग कळालं की तो सुद्धा आयटी फील्ड मधील होता त्यालाही कामाचा खूप लोड असतो...दोघांना देखील प्राणिमात्रांविषयी आणि रोडवरील भिकार्यांविषयी आपूलकी होती..त्याने बँगमध्ये रस्त्यावरील कुत्र्यांसाठी बिस्कीटस आणले होते आणि मी लहान गरीब मूल दिसले तर त्यांच्यासाठी नेहमी सोबत डब्ब्यामध्ये सँन्डविचेस पँक करून नेते...

त्यानंतर आम्ही मस्त निसर्गाच्या सानिध्यात गेलो.. सुर्य मावळतीला आला होता...समोर नदी आणि चारही बाजूंनी हिरवीगार झाडे तो सीन पाहण्यासारखा होता....तो बोलला "मला या मस्त वातावरणात पोहायचं आहे नदी मध्ये पण पोहता येत नाही"...मी बोलले " क्यू फिकर करता है...मै हू ना"..त्याला आनंद झाला तो लगेच शर्टलेस झाला आणि मग मी त्याला पोहण्याकरता घेऊन गेले....खूप घाबरत होता सारखं मला पकडायचा...त्याचा स्पर्श अंगाला एक वेगऴीच जादू दाखवायचा..पाणीदेखील थंड होतं त्याची नौटंकी सुरू झाली लगेच..

तो - हाय हाय क्या गर्मी है...

मी - तूफा है सासों मे..

तो - भीगे होटं तेरे

मी - प्यासा दिल मेरा..

गाणे म्हणता म्हणता नदीच्या पात्रामध्ये दोन जीव एकत्र कधी आले कळालेच नाही ...मी न राहवून त्याला किस केलं...आणि जोरात मला कानाखाली बसली..मी पूरती डचकले...पाहते तर काय समोर माझी रूममेट माझ्या शेजारी झोपलेली..मला शिव्या घालत होती माझ्या हरकतींसाठी....तेव्हा कळालं की अरे देवा हे तर स्वप्नं होतं तर..पण किती छान होतं ना...

कोण होता तो स्वप्नी पाहीलेला...तो खरचं अस्तित्वात असेल?..मी पटकन माझी ड्राँईंग बूक काढली आणि त्याला रेखाटू लागले..डोळे बंद करायचो आणि त्याला आठवायचे असं करत करत ते टपोरी डोळे ...भूवयांवर असलेली एक तिरपी रेघ..रेखीव नाक..कोरीव बियर्ड ..लंबोदरा सारखे मोठे कान..काळेभोर विस्कटलेले ते केस..आणि होठ जनू गुलाबाच्या नाजूक पाकळ्याच....बघता बघता चित्र रेखाटलही मी त्यात रंगही भरले..तर असा होता माझा स्वप्नातील राजकुमार नाही नाही राजकुमार नाही सहप्रवासी हो तो सहप्रवासी होता अगदी माझ्या सारखाच माझ्याच स्वभावाचा.. पण याला शोधायचं कुठे...शोधायचं कुठे....कुठे वरून गाणं आठवलं...

चीव चीव चिमने अगं ये चिमने
काय रे चिमण्या ?...हा बघ आणलाय
मोत्याचा दाणा..बघू बघू..आ हं..छान आहे
बाई छान आहे बाई..पण ठेवायचा कूठे...
ठेवायचा कूठे.?

अगदी तसंच याचं ही झालं, याला शोधायचं कुठे ?...मग एक मस्त आयडिया सुचली माझं एफबी वर एक अकाऊंट होतं कुसुम मनोहर या नावाने तिकडे मी हा फोटो माझा प्रोफाईल पिक म्हणून ठेवला..वाटलं कोणीतरी नक्की याच्या ओळखीतलं किंवा हा स्वत:च मेसेज करेल फोटो पाहिल्यावर..पण कसलं काय..एक दिवस गेला दोन दिवस गेले बघता बघता महिना उलटला तरी कोणाचा मेसेज किंवा कमेंट नाही आली फोटोवर...उलट तो माझा bf आहे असं समजून माझंच कौतूक करत होते लोकं...म्हणून मग वैतागून मी तो पिक डिलीट केला..काही दिवसानी एकाजनाचा मेसेज आला..राहूल चिंतामणी या इसमाचा...की,
" तू प्रोफाईल पीक का चेंज केला..मस्त बनवला होता तू माझा फोटो"...मेसेज पाहून मी तर आनंदाने आँफीस मध्ये काय करू आणि काय नको असं झालेलं....

मी त्याला बोलले की तूम्हाला एकदा भेटायचंय तूम्ही पत्ता सांगाल का आपण भेटू एका सनडे ला..ठरलेल्या दिवशी मी त्याच्या गावी गेले नाशिकला...मी खूप एक्साईटेड होते स्वप्ऩात भेटलेल्या माझ्या सहप्रवासी बद्दल..मनात ठरवलं की याला प्रपोज करून टाकू आज...मनात " टिक टिक वाजते डोक्यात "गाणं चालू होतं...मी मस्त काल्पनिक विश्वात होते...

तिथे ठरलेल्या रेस्टाँरंट मध्ये गेले...जातानी बाहेर मी त्याला पाहीला..त्याची कपड्यांची स्टाईल खूपच आँड होती...लाल शर्टवर हिरवी पँन्ट... त्यात तो बाहेरच्या टपरीवर सिगारेट ओढत होता..मला आश्चर्य वाटलं.. तरीही मी त्याला भेटले..त्याला माझ्या स्वप्नाबद्दल सांगीतलं...तो खूप हसायला लागला...मला बोलला फील्मी आणि मी नाहीओ..मला हे फालतू टाईमपास पहायला आजीबात आवडत नाही.. भटकंती तर मी कधीच करत नाही.. हा पण आपल्याला शनिवार रविवार मित्रांसोबत पबला जाऊन इंजाँय करायला आवडतं ...त्याने खूपकाही आँर्डर केले जेवणासाठी आणि जसंकाय खूप दिवसापासून भुकेला आहे असं बकाबका खात होता.. मला किळस आली..मला बोलला तूम्हाला भेटायचं होतं ना तर तूम्हीच बील भरा...मला असं वाटलं का मी भेटायला आले, स्वप्न हे स्वप्नंच राहून दिलं असतं तर बरं झालं असतं...जाता जाता मी पाहीलं बाहेर एक कुत्रा त्याच्यावर भूंकत होता तर ह्याने त्याला दगडाने मारून पळवून लावलं...बापरे किती तो विरोधाभास होता.. एकाच चेहर्याच्या दोन स्वभावांना मी भेटलेले...स्वप्नात एक आणि सत्यात एक...

समाप्त...

मित्रांनो खूपवेळा असं होतं की फोनवर बोलनारा..मेंसेंजर वर बोलनारा मित्र किंवा मैत्रीण आपल्याला आवडते मग प्रेम होतं...भेटण्याची ओढ लागते पण जेव्हा सहवास करतो आपण त्यांच्या सोबत...तेव्हा फोनवरील गोड बोलनारा मित्र आणि रियल लाईफ मधील मित्र यामध्ये खूप फरक पाहिला मिळतो...माऩ्य आहे मला की कथेचा शेवट मी वास्तवदर्शी आणि वाईट केला...पण कधितरी असही लिहून पहावं होणं ?