Dec 05, 2021
कविता

गणपती बाप्पा साठी पत्र.

Read Later
गणपती बाप्पा साठी पत्र.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
घेतली हाथी लेखणी बाप्पा,
लिहन्यास तुला पत्र..
खुप आहे सांगायचे ,
पण सुरवात कुठून करू..

आला होता मागल्या वर्षी ,
गणपतीला तु बाप्पा..
कोरोनाशी लढता लढता ,
वेळ नाही गावला...

दर्शनास असायची लाईन,
तुझ्या तेव्हा बाप्पा..
आता दर्शन काय ,
दरवाजेही बंद झालेत बाप्पा..

किती आणि काय काय लिहु बाप्पा,
पुरेल का रे हा पेपर...

हार , फुल सगळ्यांचीच,
विटंबना झाली बाप्पा...
आला होता तोह कोरोना,
गेला माणसातली माणुसकी घेऊन..

सण सुद बाप्पा काही नाही उरले..
उरले ते फक्त सॅनिटाईजर मास्क आणि,
Social डिस्टेसिन्ग तेवढे...

पत्र लिहुन तुला कळवते रे बाप्पा,
नाही घाबरवतंय तुला...
नाही तर तुच म्हणशील बाप्पा,
ह्या वर्षी मला दिड दिवसच आण...

येशील तेव्हा बाप्पा मास्क नक्की लाव...
नाही तर bmc म्हणेल,
चलो हजार रुपया लाव..

फक्त सांगतेय बाप्पा, येताना मात्र..
कोविड टेस्ट करून घे...
नाही तर कॉरंटाईन व्हावं लागेल,
14 days...

ह्या वेळेस येताना,
कोरोना सुरळीत करून ये बाप्पा...
नाही तर ह्या वर्षी सुद्धा,
व्हिडीओ कॉल वर भेट...
असं म्हणावं लागेल बाप्पा...

पत्र लिहुन संपवते बाप्पा,
काळजी स्वतःची घे...
ह्या वर्षी येताना,
सुख समृद्धी घेऊन ये...
बाप्पा..

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Manisha Narendra Parab

Job

मि लॅब टेकनिशन आहे. लिहायला वाचायला खुप आवडत.