एक जोडपं असं ही - ( भाग - 3 )

Couple

     

         स्वामींनी हळू हळू मोठी होत असते, अभ्यासात ही खूप हुशार असते, घरात सर्वांची लाडकी असते. ती पाच वर्षाची झाल्यावर हेतल आनंद ला बोलते आपण दुसरा चान्स घेऊया, तर आनंद सरळ हेतल ला बोलते कि स्वामींनी च्या डिलिव्हरी च्या वेळी तुला बाळ होताना कळा देताना जो त्रास मी बघितला होता तॊ त्रास मला पुन्हा तुला कधीच द्यायचा नाही आहे. मला एक मुलगी च बस झाली, तिलाच आपण चांगल, शिकूवून  मोठं करू.

       हेतल मग हा विषय सासू ला बोलते,  आई तुम्ही च आता त्यांना समजवा. त्यावर आनंद ची आई बोलते तॊ असाच आहे त्याने आता निर्णय घेतला आहे न तरी तॊ कुणाचं च ऐकणार नाही. तॊ विषय तिथेच संपतो, आणि मग हेतल आणि आनंद पुन्हा दुसरा चान्स घेत नाहीत.

       स्वामींनी खूप गुणी असते, आनंद च्या आई च्या आणि हेतल च्या संस्कारात वाढत असते, हेतल च्या लग्नाला आता दहा वर्ष होत आलेली असतात, पण अजून तिच्याशी माहेरचे म्हणजे ( भाऊ आणि वडील ) बोलत नसतात, हेतल ची आई कधीतरी नातीला बघावंसं वाटल तर सहा महिन्यांनी येऊन हेतल आणि नातीला भेटून जातं असे, पण भाऊ आणि वडील अजून ही हेतल च तोंड बघायला तयार नसतात.

         स्वामींनी दहावी होते, दहावीला 92% मार्क्स मिळवते, 12 वी ला पण 88%  मिळवते, आणि मग पुढे फार्मसी ला ऍडमिशन घेते. तिच्या या प्रगती वर घरचे सगळे खूप खुश असतात, पण एकच असत कि स्वामींनी जसं जशी मोठी होत असते तस तशी त्यबेतीने खूप जाड  व्हायला लागते. मध्यंतरी च्या काळात आनंद च्या छोट्या बहिणीचं पण एका चांगल्या घरात लग्न होत, तिचा नवरा डॉक्टर असतो. 

         स्वामींनी आता एका मोठ्या कंपनी मध्ये ऑफिसर म्हणून कामाला लागते, स्वामींनी पंचवीस वर्षाची झाल्यावर तिच्या लग्नाचं बघूया अशी आनंद ची आई बोलायला लागते, हेतल आणि आनंद पण बोलतात कि आता स्थळ बघायला सुरवात करूया. आणि दोन च महिन्यांनी आनंद च्या आई च्या अचानक छातीत दुखायला लागत, ऍडमिट करेपर्यंत त्या हार्ट अटॅक ने ऑफ होतात.

         घरात सर्वांनाच खूप दुःख होत, हेतल तर रडून दिवस घालवत असते. आणि मग एक वर्षांनी पुन्हा स्वामींनी साठी स्थळ बघायला सुरवात होते, स्वामींनी खूप जाड असल्यामुळे सगळीकडून नकार च येत होते, असं करता करता स्वामींनी 32 वर्षाची होते, पण सगळीकडून नकार च येत असतात. आता हेतल आणि आनंद पण खूप काळजीत असतात.

      आणि एके दिवशी त्यांच्या च बिल्डिंग मधला एक मुलगा त्याच्या आई - वडिलांबरोबर स्वामींनी ला मागणी घालण्यासाठी घरी येतो, त्याला काहीच प्रॉब्लेम नसतो, फक्त डोक्यावर केस थोडे कमी असतात, त्याची आई बोलते, हा आमचा एकुलता एक मुलगा, त्याला तुमची स्वामींनी आवडते. ती खूप संस्कारी आहे, खूप गुणी आहे असं सांगत असतो, आई - वडिलांना खूप छान जपते ती असं बोलत असतो.

         आणि काल बोलला कि आई आपण तिच्या आई वडिलांना विचारूया का लग्नाबद्दल, म्हणून आम्ही आज इथे आलो आहोत, हेतल आणि आनंद ला पण बरं वाटत, स्वामींनीं ला पण विचारलं जातं कि चालेल न तुला ती पण पटकन हो बोलते.

        आणि मग एक महिन्याने साखरपुडा आणि मग 3 महिन्यांनी लग्न असं सगळं ठरत. मुलगा पण एका चांगल्या कंपनी मध्ये कामाला असतो, निर्व्यसनी असतो, सुस्वभावी असतो, त्याचं बिल्डिंग मधला असल्याने तसा तॊ सर्वांच्या परिचयाचा पण असतो.

        त्यामुळे हेतल आणि आनंद पण खुश होतात. स्वामींनी ला पण बरं वाटत, ती पण म्हणते सासर जवळच आहे, त्यात मी एकुलती एक त्यामुळे आई बाबांना पण नीट त्यांच्या ह्या वयात सांभाळता येईल, एवढे वर्ष होऊनही ही आई ला माहेर नाही ती कधीच 34 वर्षात माहेरी गेली नाही, त्यामुळे मी आई ला सर्व सुखं देईन, स्वामींनी चे होणारे सासरे पण एकाच बिल्डिंग मधले असल्यामुळे आणि आनंद लहानपणी पासून तिथेच राहिल्याने आनंद चे तसें मित्र असतात.

            अशाप्रकारे स्वामींनी चं मग एका महिन्याने साखरपुडा आणि तीन महिन्याने लग्न होत, हेतल आणि आनंद तिच्या पाठवणीच्या वेळी खूप रडतात, पण स्वामींनी चे सासू - सासरे बोलतात अहो तीन माळे  सोडून खालीच तर आहे आता स्वामींनी च घरं कधीही या मुलीला भेटायला काहीच हरकत नाही.

         स्वामींनी चा  नवरा पण स्वभावाने खूप चांगला असतो तॊ पटकन बोलतो आई - बाबा आता एकटीच स्वामींनी तुमची मुलगी नाही, अजून एक हा नितीन नावाचा मुलगा पण आहे आता तुम्हाला, हक्काने केव्हाही या आपल्या ह्या मुलाच्या घरी. हेतल आणि आनंद ला त्याचं बोलणं ऐकून खूप समाधान वाटत.

        हेतल आणि आनंद लग्नावरून घरी आल्यावर आता आपण दोघेच घरी, ह्या विचारानेच अस्वस्थ होतात.

       पुढच्या भागात आपण बघणार आहोत स्वामींनी च्या संसारा विषयी आणि तिच्या मुलाच्या प्लांनिंग बद्दल.......

( सौ. सोनल गुरुनाथ शिंदे - ( राहणार - देवरुख - रत्नागिरी )

  

         

🎭 Series Post

View all