एक जोडपं असंही - ( भाग - 1 )

Couple


            .. ( ही एक सत्य घटना आहे ) ( साल - 1965 )..

         हेतल एका गुजराती ब्राह्मण कुटूंबात जन्मलेली मुलगी, गोरीपान, दिसायला  देखणी, घाऱ्या डोळ्याची, अशी ही हेतल शहा. घरातलं तिसरं अपत्य, दोन मुलांच्या नंतर तिसरी झालेली ही मुलगी,

         घरात सर्वात लहान, दिसायला अतिशय सुंदर, त्यामुळे सर्वांचिच लाडकी, आजी - आजोबा तर तिचं ते गोड - बोलणं ऐकून हरखून जात, तिच्या बरोबर खेळत, तीला गार्डन ला नेत, दोन ही मोठे भाऊ ही तिचे खूप लाड करत. अशी ही हेतल घरातल्या सर्वांचा चं लाडोबा.

         हेतल हळू हळू मोठी होत गेली, हेतल अभ्यासात तशी फार हुशार नव्हती, पण हेतल ला चित्रकलेची खूप आवड होती. अगदी सहाव्या वर्षा पासून चं हेतल चित्र काढू लागली होती. नंतर नंतर शाळेत होणाऱ्या सर्व चित्रकला स्पर्धामध्ये हेतल प्रथम येऊ लागली. हेतल बघता बघता बारावी झाली आणी तिने ठरवलं कि मी चित्रकला या विषयात चं काहीतरी पुढे कोर्स करते, घरातल्या सर्वांनी पण तिच्या या गोष्टीला दुजोरा दिला आणि हेतल ला चित्रकलेच्या कोर्से ला ऍडमिशन घेतलं गेलं.

        हेतल चा दोन वर्षाचा कोर्से पूर्ण झाला आणि हेतल ने ठरवलं कि चित्रकला शिक्षक म्हूणन नोकरी करावी, आणि मग तिने त्यानुसार शाळानमध्ये अर्ज करण्यास सुरवात केली आणि महिना भराने एका शाळेतून रिप्लाय आला, हेतल ला नोकरी मिळाली, हेतल ची एका मराठी शाळेमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. हेतल लहानपणा पासून मुंबई ला वाढलेली त्यात आजूबाजूला शेजारी मराठी माणसं - त्यामुळे हेतल ला मराठी बोलायला व्यवस्थित येत होते.

             हेतल पहिल्यापासून चं बोलायला सुस्वभावी - हुशार, नम्र उत्साहाचा झरा...अशी होती, त्यामुळे तिला शाळेत सर्व स्टाफ बरोबर जुळवून घ्यायला वेळ लागला नाही. शाळेतल्या विद्यार्थ्यांबरोबर पण हेतलं छान हसून खेळून राहत असे. त्यामुळे ती सर्व मुलाची ती आवडती टीचर बनली.

       हेतल ला तिथे नोकरी करून एक वर्ष होत आलं होत आणि एका नवीन शिक्षक शाळेत रुजू झाला, हेतल सारखाच बोलायला अगदि गोड, सर्वांची मदत करण्यास सदा तत्पर असणारा असा हा आनंद, हेतल ची या  गणित शिकवणाऱ्या मराठी शिक्षकांबरोबर चांगलीच गट्टी जमली थोड्याच दिवसात, आनंद घाडीगावकर नावाचा हा मालवणी शिक्षक. हेतल पेक्षा दोन वर्षांनी मोठा.

        आनंद च्या घरी आई आणि लहान बहीण आणि हा असं कुटुंब होत, वडील हा पाचवीत असताना च एका अपघातात वारले होते. त्याची आई पण एका खाजगी शाळेवर मराठी विषयाची शिक्षिका होती. पक्का मच्छि खाणारा असा हा आनंद - बुधवारी, शुक्रवारी, आणि रविवारी - आवर्जून मासे खाणारा हा असा आनंद.

        हेतल ची आणि आनंद ची मैत्री हळू हळू प्रेमात रूपांतरित होऊ लागली. हेतल 25 वर्षाची होत आली होती, हेतल आणि आनंद आता प्रेमात, गेली तीन - चार वर्ष होते, आणि अचानक एका दिवशी हेतल चे वडील ती शाळेतून घरी गेल्यावर तीला बोलले कि तूला उदया बघायला पाहुणे येणार आहेत.

        हेतल ला वडिलांना काय आणि कसं सांगू आनंद बद्दल असं झालं होत, कारण तिला माहित होत कि तिच्या घरचे वातावरण ब्राह्मण आणि हा आनंद पक्का मासे खाणारा त्यात जातं वेगळी - हेतल गुजराती तर हा मराठी. हेतल वडिलांना हो म्हणाली आणि मनातल्या मनात बोलली उदया बघायला येणारा मुलगा संध्याकाळी येणार आहे तर मी उदया दुपारी शाळेत गेल्यावर आनंद बरोबर बोलून काय करायचं ते ठरवेन.

         हेतल ने दुसऱ्या दिवशी दुपारी शाळेत गेल्या वर  लगेचच आनंद ला हा विषय सांगितला, हेतल अगदी रडवेली  झाली होती, आनंद पण काळजीत पडला, पण तॊ हेतल ला धीर देत बोलला तू आज संध्याकाळी काहीच बोलू नकोस घरी आज तू काहीच दाखवू नकोस तूझ्या चेहऱ्यावर कि तुला हे चाललेलं मान्य नाही, वैगरे....... पण मला चार दिवस दे, मी घरी आई बरोबर बोलून बघतो आपल्या प्रेम प्रकरणाबद्दल, आई काय बोलते ते बघतो आधी.

       हे सर्व ऐकून हेतल जराशी निश्चिन्त झाली. संध्याकाळी बघण्याचा प्रोग्राम झाला, हेतल दिसायला खुप सुंदर त्यामुळे पाहुण्यांना पण ती लगेचच आवडली. हेतल आता काळजीत पडली, कधी एकदा आनंद ला विचारते कि तू काय ठरवलं आहेस असं तीला झाले होते.

           आनंद ला दुसऱ्या दिवशी हेतल ने हे सर्व सांगितल्यावर आनंद बोलला कि  मी माझ्या आई बरोबर बोललो आहे तीला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण मला वाटत कि एकदा तूझ्या वडिलांनबरोबर आपल्या बद्दल बोलून बघू, मी आज आई ला घेऊन तुझ्या घरी लग्नाची मागणी घालायला येतो. हेतल खूप घाबरली, आनंद ला सांगू लागली अरे नको, तुला माहिती नाही माझे  बाबा किती कडक  आहेत ते ह्या नात्याला कधीच परवानगी देणार नाहीत.

           हेतल बोलली अरे आनंद माझे बाबा ऐकणार नाहीत, उलट तू आणि तुझी आई आल्यावर त्यांचा उगाचच अपमान करतील, पण आनंद ऐकला नाही तॊ हेतल ला बोलला तूझ्या वडिलांना एकदा च फक्त बोलून तर बघतो, ते जर नाही च बोलले तर आपण येत्या चार - पाच दिवसात लग्न करू बस. हे बोलल्यावर हेतल ला जरा बरं वाटल.

         आनंद संध्याकाळी सात वाजता आई ला घेऊन हेतल च्या घरी  पोचला, हेतल ने कसलीच पूर्व कल्पना न दिल्यामुळे हे सर्व ऐकून घरातले सर्व म्हणजे तिचे दोन मोठे  भाऊ आणि वडील  खूप चिडले. आनंद ला पण बोलले कि हे आम्हाला मान्य नाही. आनंद ची आई त्यांना समजावू पाहत होती पण कोणीच ऐकायला तयार नव्हते.

        आनंद ने डोळ्याने च हेतल ला रडू नको मी आहे ना...असं बोलून तिथून निघाला. दोन दिवस हेतल शाळेत आलीच नाही, त्यावेळी हेतल कडे मोबाईल पण नव्हता, आता मात्र आनंद ला काळजी वाटू लागली. आणि त्याने तिच्या बिल्डिंग मधल्या एका मैत्रिणी ला कॉन्टॅक्ट करून हेतल च्या घरी जाऊन यायला सांगितले. मैत्रीण निरोप घेऊन आली कि हेतल ला घरात कोंडून ठेवलं आहे, पण हेतल त्यांना सांगतेय कि मला शाळेत नोकरीला जाऊ द्या मी आनंद बरोबर बोलणार नाही पाहिजे तर ह्या पुढे.

      आनंद च्या हातात आता वाट पाहण्याशिवाय काहीच उरले नव्हते. आणि सहा दिवसांनी हेतल शाळेत आली  - तीला आनंद बरोबर बोलायचं नाही त्याला भेटायचं नाही, दोन भाऊ रोज तुला नोकरी च्या ठिकाणी आणतील आणि सोडतील, त्याचा नाद सोडून द्यायचा, ह्या बोलीवर शाळेत पाठवण्यात आलं.

         हेतल ला मोठा भाऊ शाळेत सोडून गेला, आणि हेतल ला आता आनंद ला कधी भेटते  असं झाले होते आणि ती शाळेच्या मधल्या  सुट्टीत आनंद ला बोलली कि आनंद आपण आता च्या आता पळून जाऊन लग्न करू मला पुन्हा घरी जायचं नाही, शाळा सुटेपर्यंत वाट बघितली तर दादा मला न्यायला येईल. हेतल च रडणं बघून आनंद म्हणाला बरं ठीक  आहे तू शांत हो मी करतो काहीतरी.

       आणि अशाप्रकारे हेतल आणि आनंद - शाळेच्या मधल्या सुट्टी मध्ये, शाळेच्या मुख्याध्यापक बाई ना सांगून लग्न करायला गेले आणि एका  जवळ च्या च देवळात लग्नं करून पुन्हा दोन तासात शाळेत आले पण, आनंद ने आई ला शाळेच्या च फोन वरून फोन  करून घरी कळवले आई तू गृहप्रवेश ची तयारी करून ठेव मी तुझ्या सुनबाई ला घेऊन येतोय. आनंद ची आई पण अवाक झाली अरे कधी लग्न केलेस, एवढ्या घाई मध्ये, आनंद बोलला आई मी सगळं घरी येऊन सांगतो.

        आणि मग हेतल शहा ची  ( हेतल आनंद घाडीगावकर ) झाली.

पुढच्या भागात आपण बघणार आहोत, एक गुजराती ब्राह्मण मुलगी - मराठी ( मालवणी ) कुटुंबात कशी ऍडजेस्ट होते.

( कथा आवडल्यास जरूर लाईक आणि कमेंट करून सांगा.).

( सौ. सोनल गुरुनाथ शिंदे ) ( देवरुख - रत्नागिरी )


🎭 Series Post

View all